1 Tessalonicenses 5

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही.
1 A respeito da época e do momento, não há necessidade, irmãos, de que vos escrevamos.
2 कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.
2 Pois vós mesmos sabeis muito bem que o dia do Senhor virá como um ladrão de noite.
3 “शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.
3 Quando os homens disserem: Paz e segurança!, então repentinamente lhes sobrevirá a destruição, como as dores à mulher grávida. E não escaparão.
4 बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
4 Mas vós, irmãos, não estais em trevas, de modo que esse dia vos surpreenda como um ladrão.
5 कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.
5 Porque todos vós sois filhos da luz e filhos do dia. Não somos da noite nem das trevas.
6 ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे.
6 Não durmamos, pois, como os demais. Mas vigiemos e sejamos sóbrios.
7 झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात.
7 Porque os que dormem, dormem de noite; e os que se embriagam, embriagam-se de noite.
8 परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
8 Nós, ao contrário, que somos do dia, sejamos sóbrios. Tomemos por couraça a fé e a caridade, e por capacete a esperança da salvação.
9 कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.
9 Porquanto não nos destinou Deus para a ira, mas para alcançar a salvação por nosso Senhor Jesus Cristo.
10 प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
10 Ele morreu por nós, a fim de que nós, quer em estado de vigília, quer de sono, vivamos em união com ele.
11 म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
11 Assim, pois, consolai-vos mutuamente e edificai-vos uns aos outros, como já o fazeis.
12 आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
12 Suplicamo-vos, irmãos, que reconheçais aqueles que arduamente trabalham entre vós para dirigir-vos no Senhor e vos admoestar.
13 आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा.
13 Tende para com eles singular amor, em vista do cargo que exercem. Conservai a paz entre vós.
14 आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
14 Pedimo-vos, porém, irmãos, corrigi os desordeiros, encorajai os tímidos, amparai os fracos e tende paciência para com todos.
15 आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
15 Vede que ninguém pague a outro mal por mal. Antes, procurai sempre praticar o bem entre vós e para com todos.
16 सदोदित आनंद करा.
16 Vivei sempre contentes.
17 नित्य प्रार्थना करा.
17 Orai sem cessar.
18 प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
18 Em todas as circunstâncias, dai graças, porque esta é a vosso respeito a vontade de Deus em Jesus Cristo.
19 पवित्र आत्म्याला विझवू नका.
19 Não extingais o Espírito.
20 संदेशाचा उपहास करू नका.
20 Não desprezeis as profecias.
21 सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.
21 Examinai tudo: abraçai o que é bom.
22 वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
22 Guardai-vos de toda a espécie de mal.
23 आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
23 O Deus da paz vos conceda santidade perfeita. Que todo o vosso ser, espírito, alma e corpo, seja conservado irrepreensível para a vinda de nosso Senhor Jesus Cristo!
24 तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच.
24 Fiel é aquele que vos chama, e o cumprirá.
25 बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
25 Irmãos, orai também por nós.
26 सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा.
26 Saudai a todos os irmãos com o ósculo santo.
27 मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा.
27 Peço-vos encarecidamente, no Senhor, que esta carta seja lida a todos os irmãos.
28 आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
28 A graça de nosso Senhor Jesus Cristo esteja convosco!

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Tessalonicenses 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.