1 Samuel 7

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 मग किर्याथ-यारीमाची माणसे आली, आणि त्यांनी परमेश्वराचा कोश नेला, आणि तो टेकडीवर अबीनादाबाच्या घरात आणून ठेवला. त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला परमेश्वराचा कोश राखायला पवित्र केले.
1 Então os homens da cidade de Jearim foram até lá e levaram a arca do Senhor . Eles a colocaram na casa de Abinadabe, que ficava num morro. E escolheram e separaram o seu filho Eleazar para tomar conta dela.
2 कोश किर्याथ-यारीमात येऊन राहिला त्या दिवसापासून, बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे झाली. इस्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली.
2 A arca da aliança ficou na cidade de Jearim bastante tempo, isto é, mais ou menos vinte anos. Durante esse tempo todos os israelitas oravam a Deus, o Senhor , pedindo ajuda.
3 शमुवेल इस्राएलाच्या सर्व घराण्याशी बोलला तो म्हणाला, “जर तुम्ही आपल्या सर्व मनाने परमेश्वराकडे परत वळता, तर आपणापासून परके देव आणि अष्टारोथ दूर करा, तुम्ही आपली मने परमेश्वराकडे लावा, आणि केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवील.”
3 Samuel disse ao povo de Israel: — Se vocês querem com todo o coração voltar a Deus, o
4 मग इस्राएली लोकांनी बआल व अष्टारोथ काढून टाकले, आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करू लागले.
4 Aí os israelitas jogaram fora as suas várias imagens de Baal e também as de Astarote e adoraram somente a Deus, o Senhor .
5 आणि शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएलांस मिस्पा येथे एकवट करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वरास विनंती करीन.”
5 Então Samuel mandou que todos os israelitas se reunissem em Mispa. E prometeu que ali oraria por eles ao Senhor .
6 मग ते मिस्पात जमले आणि त्यांनी पाणी काढून परमेश्वराच्या समोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास केला आणि म्हटले, “आम्ही परमेश्वराच्या विरूद्ध पाप केले आहे.” तेव्हा शमुवेलाने तेथे इस्राएली लोकांचे वादविवाद मिटवले आणि लोकांचे मार्गदर्शन केले.
6 Assim todos eles se reuniram em Mispa. Tiraram água e a derramaram em oferta ao Senhor , jejuaram o dia todo e disseram: — Nós pecamos contra Deus, o E ali em Mispa Samuel julgava e governava o povo de Israel.
7 आता इस्राएलाची लोक मिस्पांत जमले आहेत असे पलिष्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी इस्राएलावर चढाई करून आले. इस्राएल लोकांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले.
7 Quando os filisteus souberam que os israelitas haviam se reunido em Mispa, os cinco governadores filisteus saíram com os seus homens para atacá-los. Os israelitas souberam disso e ficaram com medo.
8 नंतर इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवावे म्हणून त्याकडे आम्हासाठी धावा करण्याचे थांबवू नका.”
8 E disseram a Samuel: — Não pare de orar ao
9 मग शमुवेलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्वरास केले; आणि शमुवेलाने इस्राएलासाठी परमेश्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्वराने त्यास उत्तर दिले.
9 Então Samuel matou um carneirinho e queimou todo ele como sacrifício a Deus, o Senhor . Pediu que o Senhor ajudasse o povo de Israel, e ele respondeu à sua oração.
10 आणि शमुवेल होमार्पण अर्पण करत होता, तेव्हा पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ आले; परंतु त्यादिवशी परमेश्वराने पलिष्ट्याविरूद्ध मोठ्या आवाजात गडगडाट करून त्यास घाबरे केले व गोंधळात टाकले आणि इस्राएलापुढे त्यांचा पराभव झाला.
10 Enquanto Samuel estava oferecendo o sacrifício, os filisteus avançaram contra os israelitas. Mas o Senhor os atacou com fortes trovoadas. Então eles ficaram em completa confusão e fugiram.
11 तेव्हा इस्राएलाची माणसे मिस्पातून निघून पलिष्ट्यांच्या पाठीस लागली आणि बेथ-कारापर्यंत त्यांना मारीत गेली.
11 Os israelitas saíram de Mispa e perseguiram os filisteus até Bete-Car, matando-os pelo caminho.
12 मग शमुवेलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन याच्या दरम्यान तो उभा केला आणि त्यास एबन-एजर असे नाव देऊन म्हटले, “येथपर्यंत परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”
12 Aí Samuel pegou uma pedra, pôs entre Mispa e Sem e disse: — Até aqui o Por isso deu a ela o nome de Ebenézer .
13 असे पलिष्टी पराभूत झाले आणि ते इस्राएलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. शमुवेलाच्या सर्व दिवसात परमेश्वराचा हात पलिष्ट्यांच्या विरूद्ध होता.
13 Assim os filisteus foram derrotados, e o Senhor Deus não deixou que eles invadissem a terra de Israel enquanto Samuel viveu.
14 आणि एक्रोनापासून गथपर्यंत, जी नगरे पलिष्ट्यांनी इस्राएलापासून घेतली होती ती इस्राएलास परत मिळाली; आणि त्यांचा प्रदेश इस्राएलाने पलिष्ट्यांच्या हातातून परत घेतला. त्यानंतर इस्राएल व अमोरी यांच्यामध्ये शांतता होती.
14 Todas as cidades que os filisteus haviam tomado, desde Ecrom até Gate, foram devolvidas ao povo de Israel. Dessa maneira os israelitas receberam de volta toda a sua terra. E também houve paz entre os israelitas e os amorreus.
15 शमुवेलाने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात इस्राएलाचा न्याय केला.
15 Até o fim da sua vida Samuel foi chefe e juiz do povo de Israel.
16 तो प्रत्येक वर्षी बेथेलास, गिलगालास, व मिस्पात अनुक्रमाने जाई. आणि त्या सर्व ठिकाणी इस्राएलाचा न्याय करी.
16 Todos os anos ele ia a Betel, Gilgal e Mispa e nesses lugares resolvia as questões que o povo lhe apresentava.
17 आणि रामा येथे तो परत माघारी येत असे, कारण तेथे त्याचे घर होते आणि तेथे सुध्दा त्याने इस्राएलाचे वादविवाद मिटवण्याचे काम केले. तेथे त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पायला वेदी बांधली.
17 Depois voltava para a sua casa na cidade de Ramá, onde também era juiz. E em Ramá Samuel construiu um altar para Deus, o Senhor .

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 7, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.