1 Samuel 6

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 आता परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला.
1 Esteve a arca do Senhor na terra dos filisteus sete meses.
2 आणि मग, पलिष्ट्यांनी याजकांना व ज्योतिष्यांना बोलावून त्याने म्हटले, “परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा.”
2 Estes convocaram os seus sacerdotes e adivinhos e perguntaram-lhes: Que faremos da arca do Senhor? Dizei-nos como havemos de a devolver ao seu lugar. Eles responderam:
3 ते म्हणाले, “तुम्ही इस्राएलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल तर तो अर्पणांच्या भेटींशिवाय पाठवू नका; तर त्याबरोबर दोषार्पण अवश्य पाठवावे. मगच तुम्ही निरोगी व्हाल, आणि त्याचा हात तुम्हावरून अद्यापपर्यंत का दूर होत नाही हे तुम्हास समजेल.”
3 Se devolveis a arca do Deus de Israel, não a mandeis vazia, mas juntai a ela uma oferta expiatória. Se fordes curados, sabereis então por que sua mão não cessou de pesar sobre vós.
4 तेव्हा ते म्हणाले, “जे दोषार्पण त्याबरोबर आम्ही पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्येप्रमाणे पाच सोन्याच्या गाठी व पांच सोन्याचे उंदीर; कारण तुम्हा सर्वांवर व तुमच्या अधिकाऱ्यांवर एकच पीडा आली आहे.
4 Que oferta expiatória, perguntaram eles, devemos fazer? Responderam: Cinco tumores de ouro e cinco ratos de ouro, conforme o número dos príncipes dos filisteus, porque foi essa a praga que vos feriu a vós e aos vossos príncipes.
5 म्हणून तुम्ही तुमच्या गाठीच्या आकाराची व तुमचे जे उंदीर शेताचा नाश करतात त्याच्या प्रतिकृती तयार करा आणि तुम्ही इस्राएलाच्या देवाचा गौरव करा कदाचित तो आपला हात तुम्हावरून, व तुमच्या देवावरून, व तुमच्या भूमीवरून काढेल.
5 Fazei, pois, figuras de vossos tumores e figuras de ratos que devastam a terra. Dai assim glória ao Deus de Israel; talvez retire ele a sua mão de cima de vós, de vosso deus e de vossa terra.
6 मिसरी लोक व फारो यांनी जशी आपली मने कठीण केली तशी तुम्ही आपली मने कशाला कठीण करता? जेव्हा तो त्यांच्याशी कठोरपणे वागला आणि त्याने त्यांना जाऊ देण्याची परवानगी दिली नाही, परंतु नंतर ते निघून गेले नाहीत काय?
6 Por que endureceis os vossos corações como os egípcios e o faraó? Estes só deixaram partir os israelitas quando o Senhor mandou os seus castigos sobre eles.
7 तर तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यांच्या वर कधी जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपा व त्यांची वासरे त्यांच्यापासून वेगळी करून घरी आणा.
7 Fazei um carro novo, escolhei duas vacas que aleitam, e que não tenham ainda levado o jugo, e metei-as no carro, depois de terdes preso os seus bezerros no curral.
8 मग परमेश्वराचा कोश घेऊन गाडीवर ठेवा. आणि तुम्ही दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या प्रतीकृती डब्यात घालून त्याच्या एकाबाजूला ठेवा. त्यानंतर, ती गाडी परत पाठवून द्या आणि तिच्या मार्गाने तिला जाऊ द्या.
8 Colocareis no carro a arca do Senhor, juntamente com um cofre, no qual poreis todos os objetos de ouro que ofereceis como expiação; depois deixai-a partir.
9 आणि पाहा, बेथ-शेमेशाकडे त्याच्या मार्गाने तो गेला, तर ज्याने आम्हावर हे मोठे अरिष्ट लावले आहे तो परमेश्वरच आहे हे जाणा; त्याउलट, जर गेला नाही, तर जे आम्हासोबत घडले ती आकस्मित घटना आहे असे आम्ही समजू.”
9 Segui-a com os olhos: se ela subir pelo caminho de sua terra, para as bandas de Bet-Sames, é o Senhor quem nos enviou esta praga; do contrário, conheceremos que não foi a sua mão que nos feriu, mas que tudo isto foi um simples acidente.
10 मग त्या मनुष्यांनी तसे केले, म्हणजे, त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी बांधून ठेवली.
10 Assim o fizeram. Tomaram duas vacas que aleitavam e prenderam-nas a um carro, pondo os seus bezerros no curral.
11 मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर व त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवल्या.
11 Puseram no carro a arca do Senhor com o cofre que continha os ratos de ouro e as figuras dos tumores.
12 मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले.
12 As vacas tomaram diretamente o caminho que vai a Bet-Sames e seguiram sempre o mesmo caminho, mugindo, sem se desviarem nem para a direita nem para a esquerda. Os príncipes dos filisteus seguiram-nas até o limite de Bet-Sames.
13 तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले.
13 Ora, os betsamitas segavam o trigo no vale. Levantando os olhos, viram a arca e alegraram-se.
14 मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वरास होमार्पण अशा अर्पण केल्या.
14 O carro chegou à terra de Josué, o betsamita, onde se deteve. Havia ali uma grande pedra. Cortaram em pedaços a madeira do carro e ofereceram as vacas em holocausto ao Senhor.
15 लेव्यांनी देवाचा कोश, व त्याबरोबर ज्यात सोन्याच्या प्रतिमा होत्या तो डबा, हे उतरवून त्या मोठ्या दगडावर ठेवले. बेथ-शेमेशाच्या मनुष्यांनी त्या दिवशी परमेश्वरास होमार्पणे व यज्ञ अर्पण केले.
15 Os levitas desceram a arca do Senhor, juntamente com o cofre que vinha junto, contendo os objetos de ouro, e colocaram-na sobre a grande pedra. Os betsamitas ofereceram holocaustos e sacrifícios ao Senhor naquele dia.
16 आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.
16 E os cinco príncipes dos filisteus, que tudo tinham visto, voltaram naquele mesmo dia para Acaron.
17 परमेश्वरास पलिष्ट्यांनी ज्या सोन्याच्या गाठी दोषार्पण म्हणून पाठवल्या त्या अशा: अश्दोदकरता एक, गज्जाकरता एक, अष्कलोनाकरता एक, गथकरता एक, एक्रोनाकरता एक.
17 Eis o número das figuras de hemorróidas de ouro que os filisteus ofereceram ao Senhor como oferta expiatória: uma por Azot, uma por Gaza, uma por Ascalon, uma por Get, uma por Acaron.
18 आणि जो मोठा दगड ज्यावर त्यांनी परमेश्वराचा कोश ठेवला तेथपर्यंत पलिष्ट्यांची जी नगरे, म्हणजे तटबंदीची नगरे व खेडीपाडीही, ज्या पांच सरदांराची होती, त्यांच्या संख्येप्रमाणे ते सोन्याचे उंदीर होते. तो दगड आजपर्यंत यहोशवा बेथ-शेमेशकर यांच्या शेतात आहे.
18 Ofereceram, além disso, tantos ratos de ouro quantas cidades havia pertencentes aos cinco príncipes, cidades fortificadas e aldeias sem muros, Disto é testemunha a grande pedra, sobre a qual puseram a arca do Senhor, no campo de Josué, o betsamita, onde pode ser vista até o dia de hoje.
19 मग परमेश्वराने काही बेथ-शेमेशकर मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशाच्या आत पाहिले होते. त्याने सत्तर जण मारले. परमेश्वराने लोकांस फार मोठा तडाखा दिला, त्यामुळे लोकांनी शोक केला.
19 O Senhor feriu os habitantes de Bet-Sames, porque tinham olhado para dentro de sua arca: feriu setenta homens entre cinqüenta mil. O povo chorou por causa desse grande golpe com que o Senhor, o tinha ferido.
20 तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली, “पवित्र परमेश्वर याच्यासमोर कोणाच्याने उभे राहवेल? त्याने आम्हापासून वरती कोणाकडे जावे?”
20 Os habitantes de Bet-Sames disseram: Quem poderá subsistir na presença do Senhor, deste Deus Santo? E para quem irá {a arca}, afastando-se de nós?
21 मग त्यांनी किर्याथ-यारीमाच्या रहिवाशांकडे दूत पाठवून म्हटले, की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे; तुम्ही खाली येऊन तो आपणाकडे वरती न्या.”
21 Mandaram dizer aos habitantes de Cariatiarim: Os filisteus devolveram a arca do Senhor; vinde e levai-a para vós.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.