1 Samuel 28

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 त्या दिवसात असे झाले की पलिष्ट्यांनी आपली सैन्ये इस्राएलाशी लढायला एकत्र केली. तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “तुला आणि तुझ्या मनुष्यांना लढाईस माझ्याबरोबर यायचे हे तू खचित समज.”
1 E sucedeu, naqueles dias, que, juntando os filisteus os seus exércitos para a peleja, para fazer guerra contra Israel, disse Aquis a Davi: Sabe, decerto, que comigo sairás ao arraial, tu e os teus homens.
2 दावीदाने आखीशाला म्हटले, “तुझा दास काय करील हे तू खचित जाणशील.” तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “याकरिता तुला मी आपल्या मस्तकाचा रक्षक असा कायमचा ठेवीन.”
2 Então, disse Davi a Aquis: Assim saberás tu o que fará o teu servo. E disse Aquis a Davi: Por isso, te terei por guarda da minha cabeça para sempre.
3 शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांस व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते.
3 E já Samuel era morto, e todo o Israel o tinha chorado e o tinha sepultado em Ramá, que era a sua cidade; e Saul tinha desterrado os adivinhos e os encantadores.
4 पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्राएलांस एकत्र जमवून गिलबोवा येथे तळ दिला.
4 E ajuntaram-se os filisteus, e vieram, e acamparam-se em Suném; e ajuntou Saul a todo o Israel, e se acamparam em Gilboa.
5 शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे मन फार घाबरे झाले.
5 E, vendo Saul o arraial dos filisteus, temeu, e estremeceu muito o seu coração.
6 शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही.
6 E perguntou Saul ao Senhor , porém o Senhor lhe não respondeu, nem por sonhos, nem por Urim, nem por profetas.
7 मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, “म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन.” तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, “पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे.”
7 Então, disse Saul aos seus criados: Buscai-me uma mulher que tenha o espírito de feiticeira, para que vá a ela e a consulte. E os seus criados lhe disseram: Eis que em En-Dor há uma mulher que tem o espírito de adivinhar.
8 मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण.”
8 E Saul se disfarçou e vestiu outras vestes, e foi ele e com ele dois homens, e de noite vieram à mulher; e disse: Peço- te que me adivinhes pelo espírito de feiticeira e me faças subir a quem eu te disser.
9 तेव्हा ती स्त्री त्यास म्हणाली, “पाहा शौलाने काय केले आहे, त्याने भूते ज्यांच्या परिचयाची आहेत अशा जाणत्यांना व जादूगिरांना देशातून कसे काढून टाकले आहे, हे तू जाणतोस तर मी मरावे असे करण्यासाठी तू कशाला माझ्या जिवाला पाश घालतोस?”
9 Então, a mulher lhe disse: Eis aqui tu sabes o que Saul fez, como tem destruído da terra os adivinhos e os encantadores; por que, pois, me armas um laço à minha vida, para me fazer matar?
10 तेव्हा शौलाने तिच्याशी शपथ वाहून म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे, या गोष्टीवरून तुला काही शिक्षा होणार नाही.”
10 Então, Saul lhe jurou pelo Senhor , dizendo: Vive o Senhor , que nenhum mal te sobrevirá por isso.
11 मग त्या स्त्रीने म्हटले, “तुझ्यासाठी मी कोणाला वर आणू?” तेव्हा तो म्हणाला, “माझ्यासाठी शमुवेलाला वर आण.”
11 A mulher, então, lhe disse: A quem te farei subir? E disse ele: Faze-me subir a Samuel.
12 त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती स्त्री शौलाला म्हणाली, “तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस.”
12 Vendo, pois, a mulher a Samuel, gritou em alta voz; e a mulher falou a Saul, dizendo: Por que me tens enganado? Pois tu mesmo és Saul.
13 राजा तिला म्हणाला, “भिऊ नको. तू काय पाहतेस?” तेव्हा ती स्त्री शौलाला म्हणाली, “मी दैवत भूमीतून वर येताना पाहते.”
13 E o rei lhe disse: Não temas; porém que é o que vês? Então, a mulher disse a Saul: Vejo deuses que sobem da terra.
14 मग तो तिला म्हणाला, “तो कोणत्या रूपाचा आहे?” तिने म्हटले, “म्हातारा मनुष्य झगा घातलेला असा आहे.” तेव्हा तो शमुवेल आहे असे शौल समजला आणि तो आपले तोंड भूमीकडे लववून नमला.
14 E lhe disse: Como é a sua figura? E disse ela: Vem subindo um homem ancião e está envolto numa capa. Entendendo Saul que era Samuel, inclinou-se com o rosto em terra e se prostrou.
15 मग शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर आणून का त्रास दिला आहे?” तेव्हा शौलाने उत्तर केले, “मी फार संकटात पडलो आहे. कारण पलिष्टी माझ्याशी लढाई करीत आहेत. आणि परमेश्वर मला सोडून गेला आहे, आणि तो भविष्यवाद्यांकडून किंवा स्वप्नांकडून मला उत्तर देत नाही; मी काय करावे हे तुम्ही मला कळवावे म्हणून मी तुम्हास बोलावले आहे.”
15 Samuel disse a Saul: Por que me desinquietaste, fazendo-me subir? Então, disse Saul: Mui angustiado estou, porque os filisteus guerreiam contra mim, e Deus se tem desviado de mim e não me responde mais, nem pelo ministério dos profetas, nem por sonhos; por isso, te chamei a ti, para que me faças saber o que hei de fazer.
16 तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे; तर तू कशाला मला विचारतोस?”
16 Então, disse Samuel: Por que, pois, a mim me perguntas, visto que o Senhor te tem desamparado e se tem feito teu inimigo?
17 जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे.
17 Porque o Senhor tem feito para contigo como pela minha boca te disse, e o Senhor tem rasgado o reino da tua mão, e o tem dado ao teu companheiro Davi.
18 कारण तू देवाची वाणी मानली नाही, आणि त्याचा तीव्र क्रोध अमालेकावर घातला नाही, म्हणून आज परमेश्वराने तुझे असे केले आहे.
18 Como tu não deste ouvidos à voz do Senhor e não executaste o fervor da sua ira contra Amaleque, por isso, o Senhor te fez hoje isso.
19 परमेश्वर इस्राएलास तुझ्याबरोबर पलिष्ट्यांच्या हाती देईल. उद्या तू तुझ्या मुलांसमवेत माझ्याजवळ असशील. परमेश्वर इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल.
19 E o Senhor entregará também a Israel contigo na mão dos filisteus, e amanhã tu e teus filhos estareis comigo; e o arraial de Israel o Senhor entregará na mão dos filisteus.
20 तेव्हा शमुवेलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच भूमीवर उपडा पडला आणि फार भयभीय झाला, व त्याच्यात काही शक्ती राहिली नाही. कारण सर्व दिवस आणि सारी रात्र त्याने काही भाकर खाल्ली नव्हती.
20 E, imediatamente, Saul caiu estendido por terra e grandemente temeu por causa daquelas palavras de Samuel; e não houve força nele, porque não tinha comido pão todo aquele dia e toda aquela noite.
21 मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, “पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत.
21 Então, veio a mulher a Saul e, vendo que estava tão perturbado, disse-lhe: Eis que deu ouvidos a tua criada à tua voz, e pus a minha vida na minha mão e ouvi as palavras que disseste.
22 तर आता मी तुम्हास विनंती करते, तुम्ही ही आपल्या दासीचा शब्द ऐका आणि मला तुमच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवू द्या; तो तुम्ही खा यासाठी की, तुम्ही वाटेने जाल तेव्हा तुम्हास शक्ती असावी.”
22 Agora, pois, ouve também tu as palavras da tua serva, e porei um bocado de pão diante de ti, e come, para que tenhas forças para te pores a caminho.
23 परंतु त्याने नाकारून म्हटले, “मी खाणार नाही.” मग त्याच्या चाकरांनी व त्या स्त्रीनेही त्यास आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीवरून उठून पलंगावर बसला.
23 Porém ele o recusou e disse: Não comerei. Porém os seus criados e a mulher o constrangeram; e deu ouvidos à sua voz. E levantou-se do chão e se assentou sobre uma cama.
24 त्या स्त्रीच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले; तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या बेखमीर भाकरी भाजल्या.
24 E tinha a mulher em casa uma bezerra cevada, e se apressou, e a degolou, e tomou farinha, e a amassou, e a cozeu em bolos asmos.
25 मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले.
25 E os trouxe diante de Saul e de seus criados, e comeram. Depois, levantaram-se e se foram naquela mesma noite.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 28, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.