1 Samuel 27
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI
1 दावीद आपल्या मनात म्हणाला, “कधीतरी मी शौलाच्या हातून नाश पावेन; तर पलिष्ट्यांच्या मुलखात मी पळून जावे यापेक्षा मला दुसरे काही बरे दिसत नाही; मग शौल इस्राएलाच्या अवघ्या प्रांतात आणखी माझा शोध करण्याविषयी निराश होईल आणि मी त्याच्या हातातून सुटेन.”
1 Davi, contudo, pensou: "Algum dia serei morto por Saul. É melhor fugir para a terra dos filisteus. Então Saul desistirá de procurar-me por todo o Israel, e escaparei dele".
2 मग दावीद उठला आणि तो व त्याच्याबरोबर असलेली सहाशे माणसे अशी ती मावोखाचा मुलगा आखीश, गथाचा राजा याच्याकडे गेला.
2 Assim, Davi e os seiscentos homens que estavam com ele foram até Aquis, filho de Maoque, rei de Gate.
3 तेव्हा दावीद व त्याची सर्व माणसे एकेक आपल्या कुटुंबासहीत गथात आखीशा जवळ राहिली; दावीदाबरोबर त्याच्या दोघी स्त्रिया ईज्रेलीण अहीनवाम व पूर्वी नाबालाची पत्नी होती ती कर्मेलीण अबीगईल या होत्या.
3 Davi e seus soldados se estabeleceram com Aquis, em Gate. Cada homem levou sua família, e Davi, suas duas mulheres, Ainoã, de Jezreel, e Abigail, mulher de Nabal, de Carmelo.
4 आणि दावीद गथास पळून गेला असे कोणी शौलाला सांगितले, मग त्याने त्याचा शोध आणखी केला नाही.
4 Quando contaram a Saul que Davi havia fugido para Gate, ele parou de persegui-lo.
5 दावीद आखीशाला म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर या मुलखातील कोणाएका नगरात मी तेथे रहावे म्हणून मला जागा दे; तुझ्या दासाने राजधानीत तुझ्याजवळ का रहावे?”
5 Então Davi disse a Aquis: "Se eu conto com a sua simpatia, dá-me um lugar numa das cidades desta terra onde eu possa viver. Por que este teu servo viveria contigo na cidade real? "
6 तेव्हा आखीशाने त्यास सिकलाग दिले. यामुळे सिकलाग आजपर्यंत यहूदाच्या राजांकडे आहे.
6 Naquele dia Aquis deu-lhe Ziclague. Por isso, Ziclague pertence aos reis de Judá até hoje.
7 दावीद पलिष्ट्यांच्या मुलखात राहीला ते दिवस एक पूर्ण वर्ष व चार महिने इतके होते.
7 Davi morou em território filisteu durante um ano e quatro meses.
8 दावीद आणि त्याच्या लोकांनी निरनिराळ्या ठिकाणी हल्ला करून गेशूरी, गिरजी, आणि अमालेकी यांच्यावर स्वाऱ्या केल्या; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश आहे त्यामध्ये ही राष्ट्रे पूर्वीपासून वसली होती.
8 Davi e seus soldados atacavam os gesuritas, os gersitas e os amalequitas, povos que, desde tempos antigos, habitavam a terra que se estende de Sur até o Egito.
9 दावीदाने त्या प्रांतातले पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नाही; मग मेंढरे गुरे व गाढवे उंट व वस्त्रे ही घेऊन तो आखीशाकडे परत आला.
9 Quando Davi atacava a região, não poupava homens nem mulheres, e tomava ovelhas, bois, jumentos, camelos e roupas. Então retornava a Aquis.
10 तेव्हा आखीश म्हणाला, “आज तू कोणावर घाला घातलास?” दावीद म्हणाला, “यहूदाच्या दक्षिण प्रदेशावर व यरहमेली यांच्या दक्षिण प्रदेशावर व केनी यांच्या दक्षिण प्रदेशावर.”
10 Quando Aquis perguntava: "Onde você atacou hoje? " Davi respondia: "O Neguebe de Judá" ou "O Neguebe de Jerameel" ou "O Neguebe dos queneus".
11 दावीदाने गथाकडे वर्तमान आणायला पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवली नाही. त्याने म्हटले, “त्यांना जिवंत ठेवले तर ते आम्हाविषयी सांगतील व म्हणतील की, दावीदाने असे असे केले आहे.” आणि तो पलिष्ट्यांच्या मुलखांत राहिला तेव्हापासून त्याची चाल अशीच होती.
11 Ele matava a todos, homens e mulheres, para que não fossem levados a Gate, pois pensava: "Eles poderão denunciar-me". Este foi o seu procedimento enquanto viveu em território filisteu.
12 आखीशाने दावीदावर भरवसा ठेवून म्हटले, “त्याने आपल्या इस्राएली लोकांकडून आपणाला अगदी तुच्छ मानवून घेतले आहे, म्हणून तो सर्वकाळ माझा दास होऊन राहील.”
12 Aquis confiava em Davi e dizia: "Ele se tornou tão odiado por seu povo, os israelitas, que será meu servo para sempre".
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 27, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.