1 Samuel 26
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARA
1 जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनासमोर हकीला डोंगरात दावीद लपला आहे की नाही?”
1 Vieram os zifeus a Saul, a Gibeá, e disseram: Não se acha Davi escondido no outeiro de Haquila, defronte de Jesimom?
2 तेव्हा शौल उठला व आपल्याबरोबर इस्राएलाच्या तीन हजार निवडक मनुष्यांना घेऊन दावीदाचा शोध करायला जीफ रानात गेला.
2 Então, Saul se levantou e desceu ao deserto de Zife, e com ele, três mil homens escolhidos de Israel, a buscar a Davi.
3 शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे.
3 Acampou-se Saul no outeiro de Haquila, defronte de Jesimom, junto ao caminho; porém Davi ficou no deserto, e, sabendo que Saul vinha para ali à sua procura,
4 म्हणून दावीदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्यास समजले.
4 enviou espias, e soube que Saul tinha vindo.
5 मग दावीद उठून शौलाने तळ दिला होता त्या ठिकाणावर आला आणि जेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा मुलगा अबनेर हे निजले होते ते ठिकाण दावीदाने पाहिले; शौल तर छावणीत निजला होता व त्याच्यासभोवती लोकांनी तळ दिला होता.
5 Davi se levantou, e veio ao lugar onde Saul acampara, e viu o lugar onde se deitaram Saul e Abner, filho de Ner, comandante do seu exército. Saul estava deitado no acampamento, e o povo, ao redor dele.
6 तेव्हा अहीमलेख हित्ती व सरूवेचा मुलगा अबीशय यवाबाचा भाऊ यांना दावीदाने उत्तर देऊन म्हटले, “छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल?” तेव्हा अबीशय म्हणाला, “मी तुझ्याबरोबर खाली येईन.”
6 Disse Davi a Aimeleque, o heteu, e a Abisai, filho de Zeruia, irmão de Joabe: Quem descerá comigo a Saul, ao arraial? Respondeu Abisai: Eu descerei contigo.
7 मग दावीद व अबीशय रात्री लोकांजवळ गेले आणि पाहा शौल छावणीत निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला व त्याच्यासभोवती अबनेर व लोक निजलेले आहेत.
7 Vieram, pois, Davi e Abisai, de noite, ao povo, e eis que Saul estava deitado, dormindo no acampamento, e a sua lança, fincada na terra à sua cabeceira; Abner e o povo estavam deitados ao redor dele.
8 तेव्हा अबीशय दावीदाला म्हणाला, “आज परमेश्वराने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे; तर आता मी तुला विनंती करतो मला भाल्याने एकदाच घाव मारून त्यास भूमीवर ठार करून दे, मी त्यास दुसरा घाव मारणार नाही.”
8 Então, disse Abisai a Davi: Deus te entregou, hoje, nas mãos o teu inimigo; deixa-me, pois, agora, encravá-lo com a lança, ao chão, de um só golpe; não será preciso segundo.
9 पण दावीद अबीशयाला म्हणाला, “त्यांचा वध करू नकोस कारण परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकून कोण निर्दोष राहील?”
9 Davi, porém, respondeu a Abisai: Não o mates, pois quem haverá que estenda a mão contra o ungido do Senhor e fique inocente?
10 दावीद म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे; परमेश्वर त्यास मारील किंवा त्याचा मरण्याचा दिवस येईल किंवा तो खाली लढाईत जाऊन नष्ट होईल.
10 Acrescentou Davi: Tão certo como vive o Senhor , este o ferirá, ou o seu dia chegará em que morra, ou em que, descendo à batalha, seja morto.
11 मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकावा असे परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये; परंतु आता मी तुला विनंती करतो की, तू त्याच्या उशाजवळचा भाला व पाण्याचा लोटा घे; मग आपण जाऊ.”
11 O Senhor me guarde de que eu estenda a mão contra o seu ungido; agora, porém, toma a lança que está à sua cabeceira e a bilha da água, e vamo-nos.
12 तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते. परमेश्वराकडून त्याच्यांवर गाढ झोप आली होती.
12 Tomou, pois, Davi a lança e a bilha da água da cabeceira de Saul, e foram-se; ninguém o viu, nem o soube, nem se despertou, pois todos dormiam, porquanto, da parte do Senhor , lhes havia caído profundo sono.
13 नंतर दावीद पलीकडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर उभा राहिला आणि त्याच्यामध्ये मोठे अंतर होते;
13 Tendo Davi passado ao outro lado, pôs-se no cimo do monte ao longe, de maneira que entre eles havia grande distância.
14 तेव्हा दावीदाने लोकांस व नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली. तो म्हणाला, “अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय?” तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”
14 Bradou ao povo e a Abner, filho de Ner, dizendo: Não respondes, Abner? Então, Abner acudiu e disse: Quem és tu, que bradas ao rei?
15 मग दावीद अबनेराला म्हणाला, “तू वीर पुरुष नाहीस काय आणि इस्राएलात तुझ्यासारखा कोण आहे? तर तू आपला प्रभू राजा याच्यावर पहारा का केला नाही? कारण लोकातला कोणीएक तुझा प्रभू राजा याचा घात करायला आला होता.
15 Então, disse Davi a Abner: Porventura, não és homem? E quem há em Israel como tu? Por que, pois, não guardaste o rei, teu senhor? Porque veio um do povo para destruir o rei, teu senhor.
16 ही जी गोष्ट तू केली ती बरी नाही; परमेश्वर जिवंत आहे. तुम्ही आपला प्रभू परमेश्वराचा अभिषिक्त याला राखले नाही, म्हणून तुम्ही मरायला योग्य आहा. तर आता पाहा राजाचा भाला व पाण्याचा लोटा त्याच्या उशाजवळ होता तो कोठे आहे?”
16 Não é bom isso que fizeste; tão certo como vive o Senhor , deveis morrer, vós que não guardastes a vosso senhor, o ungido do Senhor ; vede, agora, onde está a lança do rei e a bilha da água, que tinha à sua cabeceira.
17 तेव्हा शौल दावीदाची वाणी ओळखून म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” दावीद म्हणाला, “माझ्या प्रभू राजा, ही माझी वाणी आहे.”
17 Então, reconheceu Saul a voz de Davi e disse: Não é a tua voz, meu filho Davi? Respondeu Davi: Sim, a minha, ó rei, meu senhor.
18 तो म्हणाला, “माझा प्रभू आपल्या दासाच्या पाठीस का लागला आहे? मी तर काय केले आहे? माझ्या हाती काय वाईट आहे?
18 Disse mais: Por que persegue o meu senhor assim seu servo? Pois que fiz eu? E que maldade se acha nas minhas mãos?
19 तर आता मी तुम्हास विनंती करतो माझ्या प्रभू राजाने आपल्या दासाचे बोलणे ऐकावे: परमेश्वराने तुम्हास माझ्यावर चेतवले असले तर त्याने अर्पण मान्य करावे. परंतु मनुष्याच्या संतानांनी चेतवले असले, तर ती परमेश्वराच्यासमोर शापित होवोत. कारण आज मला परमेश्वराच्या वतनात वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर लावून म्हटले की, जा अन्य देवांची सेवा कर.
19 Ouve, pois, agora, te rogo, ó rei, meu senhor, as palavras de teu servo: se é o Senhor que te incita contra mim, aceite ele a oferta de manjares; porém, se são os filhos dos homens, malditos sejam perante o Senhor ; pois eles me expulsaram hoje, para que eu não tenha parte na herança do Senhor , como que dizendo: Vai, serve a outros deuses.
20 तर आता माझे रक्त परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा, एका पिसवेचा शोध करण्यास इस्राएलाचा राजा निघून आला आहे.”
20 Agora, pois, não se derrame o meu sangue longe desta terra do Senhor ; pois saiu o rei de Israel em busca de uma pulga, como quem persegue uma perdiz nos montes.
21 तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे; माझ्या मुला दावीदा माघारा ये; माझा जीव आज तुझ्या दृष्टीने मोलवान होता, म्हणून मी यापुढे तुझे वाईट करणार नाही; पाहा मी मूर्खपणाने वागून फार अपराध केला आहे.”
21 Então, disse Saul: Pequei; volta, meu filho Davi, pois não tornarei a fazer-te mal; porque foi, hoje, preciosa a minha vida aos teus olhos. Eis que tenho procedido como louco e errado excessivamente.
22 मग दावीदाने असे उत्तर केले की, “हे राजा पाहा हा भाला, तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा.
22 Davi, então, respondeu e disse: Eis aqui a lança, ó rei; venha aqui um dos moços e leve-a.
23 परमेश्वर प्रत्येक मनुष्यास त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो. कारण आज परमेश्वराने तुम्हास माझ्या हाती दिले असता मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकला नाही.
23 Pague, porém, o Senhor a cada um a sua justiça e a sua lealdade; pois o Senhor te havia entregado, hoje, nas minhas mãos, porém eu não quis estendê-las contra o ungido do Senhor .
24 पाहा जसा तुमचा जीव माझ्या दृष्टीने मोलवान होता, तसा माझा जीव परमेश्वराच्या दृष्टीने मोलवान होवो; आणि तो सर्व संकटातून सोडवो.”
24 Assim como foi a tua vida, hoje, de muita estima aos meus olhos, assim também seja a minha aos olhos do Senhor , e ele me livre de toda tribulação.
25 तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझ्या मुला दावीदा तू आशीर्वादित हो” तू मोठी कार्ये करशील व प्रबल होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौलही आपल्या ठिकाणी परत गेला.
25 Então, Saul disse a Davi: Bendito sejas tu, meu filho Davi; pois grandes coisas farás e, de fato, prevalecerás. Então, Davi continuou o seu caminho, e Saul voltou para o seu lugar.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 26, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.