1 Samuel 20

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 दावीद रामा येथल्या नायोथाहून पळून योनाथानाकडे येऊन म्हणाला, “मी काय केले आहे? माझा अपराध काय? तुझ्या वडिलाच्यापुढे माझे काय पाप झाले आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?”
1 Então, fugiu Davi da casa dos profetas, em Ramá, e veio, e disse a Jônatas: Que fiz eu? Qual é a minha culpa? E qual é o meu pecado diante de teu pai, que procura tirar-me a vida?
2 तेव्हा त्याने त्यास म्हटले, “असे न होवो तू मरणार नाहीस; पाहा माझा बाप लहान मोठे काहीएक कार्य मला सांगितल्या वाचून करीत नाही. तर ही गोष्ट माझा बाप माझ्यापासून कशाला गुप्त ठेवील? असे होणार नाही.”
2 Ele lhe respondeu: Tal não suceda; não serás morto. Meu pai não faz coisa nenhuma, nem grande nem pequena, sem primeiro me dizer; por que, pois, meu pai me ocultaria isso? Não há nada disso.
3 मग दावीद शपथ वाहून म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझा बाप खचित जाणतो; म्हणून तो म्हणतो, हे योनाथानाला कळू नये कळले तर त्यास दुःख होईल; परंतु खरोखर परमेश्वर जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे माझा जीव मरणापासून केवळ पावलांच्या अंतरावर आहे.”
3 Então, Davi respondeu enfaticamente: Mui bem sabe teu pai que da tua parte achei mercê; pelo que disse consigo: Não saiba isto Jônatas, para que não se entristeça. Tão certo como vive o Senhor , e tu vives, Jônatas, apenas há um passo entre mim e a morte.
4 तेव्हा योनाथान दावीदाला म्हणाला “जे काही तुझा जीव इच्छितो ते मी तुझ्यासाठी करीन.”
4 Disse Jônatas a Davi: O que tu desejares eu te farei.
5 दावीद योनाथानाला म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे तेव्हा मला राजाबरोबर जेवण्यास बसणे भागच आहे; परंतु मला जाऊ दे परवा संध्याकाळपर्यंत मी रानात लपून राहीन.
5 Disse Davi a Jônatas: Amanhã é a Festa da Lua Nova, em que sem falta deveria assentar-me com o rei para comer; mas deixa-me ir, e esconder-me-ei no campo, até à terceira tarde.
6 जर तुझ्या वडिलाने माझी आठवण काढलीच तर सांग की, दावीदाने आपले गाव बेथलहेम येथे जायला माझ्याकडे आग्रह करून रजा मागितली कारण तेथे त्याच्या सर्व कुटुंबाचा वार्षिक यज्ञ आहे.
6 Se teu pai notar a minha ausência, dirás: Davi me pediu muito que o deixasse ir a toda pressa a Belém, sua cidade; porquanto se faz lá o sacrifício anual para toda a família.
7 जर तो, ठीक आहे असे म्हणेल तर तुझ्या दासास शांती प्राप्त होईल. परंतु जर त्यास राग आला, तर त्याने माझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे जाण.
7 Se disser assim: Está bem! Então, teu servo terá paz. Porém, se muito se indignar, sabe que já o mal está, de fato, determinado por ele.
8 यास्तव तू आपल्या दासावर कृपा कर. कारण तू आपल्या दासास आपल्याबरोबर परमेश्वराच्या करारात आणले आहे; तथापि माझ्या ठायी अन्याय असला तर तूच मला जिवे मार; तू आपल्या बापाजवळ मला का आणावे?”
8 Usa, pois, de misericórdia para com o teu servo, porque lhe fizeste entrar contigo em aliança no Senhor ; se, porém, há em mim culpa, mata-me tu mesmo; por que me levarias a teu pai?
9 तेव्हा योनाथान म्हणाला, “तुला असे न होवो माझ्या वडिलाने तुझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे मला खचित समजले तर मी ते तुला सांगणार नाही काय?”
9 Então, disse Jônatas: Longe de ti tal coisa; porém, se dalguma sorte soubesse que já este mal estava, de fato, determinado por meu pai, para que viesse sobre ti, não to declararia eu?
10 तेव्हा दावीद योनाथानाला म्हणाला, “जर कदाचित तुझ्या वडिलाने तुला कठोर उत्तर दिले तर ते मला कोण सांगेल?”
10 Perguntou Davi a Jônatas: Quem tal me fará saber, se, por acaso, teu pai te responder asperamente?
11 योनाथान दावीदाला म्हणाला, “चल आपण रानात जाऊ.” मग ते दोघे बाहेर रानात गेले.
11 Então, disse Jônatas a Davi: Vem, e saiamos ao campo. E saíram.
12 योनाथान दावीदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी असो. उद्या किंवा परवा या वेळेस मी आपल्या बापाचे मन पाहीन, तेव्हा पाहा जर, दावीदाविषयी त्याचे मन चांगले असेल तर मी तुझ्याकडे निरोप पाठवून ते तुला कळवणार नाही काय?
12 E disse Jônatas a Davi: O Senhor , Deus de Israel, seja testemunha. Amanhã ou depois de amanhã, a estas horas sondarei meu pai; se algo houver favorável a Davi, eu to mandarei dizer.
13 जर तुझे वाईट करावे असे माझ्या बापाला वाटले आणि जर मी ते तुला कळवले नाही, आणि तू शांतीने जावे म्हणून मी तुला रवाना केले नाही, तर परमेश्वर देव योनाथानाचे तसे व त्यापेक्षा अधिक करो. परमेश्वर जसा माझ्या बापा बरोबर होता तसा तो तुझ्या बरोबर असो.”
13 Mas, se meu pai quiser fazer-te mal, faça com Jônatas o Senhor o que a este aprouver, se não to fizer saber eu e não te deixar ir embora, para que sigas em paz. E seja o Senhor contigo, como tem sido com meu pai.
14 मी जिवंत आहे तोपर्यंत माझा घात होऊ नये म्हणून तू परमेश्वराची प्रेमदया माझ्यावर करावी असे केवळ नाही,
14 Se eu, então, ainda viver, porventura, não usarás para comigo da bondade do Senhor , para que não morra?
15 तर तू आपली कृपा माझ्या घराण्यावरून कधीही काढू नको; परमेश्वर दावीदाचा प्रत्येक शत्रू भूमीच्या पाठीवरून छेदून टाकील तेव्हाही ती काढू नको;
15 Nem tampouco cortarás jamais da minha casa a tua bondade; nem ainda quando o Senhor desarraigar da terra todos os inimigos de Davi.
16 म्हणून योनाथानाने दावीदाच्या घराण्याशी करार करून म्हटले, “परमेश्वर दावीदाच्या शत्रूंच्या हातून याची झडती घेवो.”
16 Assim, fez Jônatas aliança com a casa de Davi, dizendo: Vingue o Senhor os inimigos de Davi.
17 मग योनाथानाने दावीदाकडून त्याच्यावरच्या आपल्या प्रीती करता आणखी शपथ वाहवली कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्याने त्याच्यावर प्रीती केली.
17 Jônatas fez jurar a Davi de novo, pelo amor que este lhe tinha, porque Jônatas o amava com todo o amor da sua alma.
18 योनाथान त्यास म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे आणि तू नाहीस म्हणून कळेल कारण तुझे आसन रिकामे राहील.
18 Disse-lhe Jônatas: Amanhã é a Festa da Lua Nova; perguntar-se-á por ti, porque o teu lugar estará vazio.
19 तू तीन दिवस तू दूर राहील्या नंतर, ते कार्य घडले त्या दिवशी ज्या ठिकाणी तू लपला होतास तेथे लवकर ऊतरून, एजेल दगडाजवळ तू राहा.
19 Ao terceiro dia, descerás apressadamente e irás para o lugar em que te escondeste no dia do ajuste; e fica junto à pedra de Ezel.
20 मी निशाणावर नेम धरत आहे असे दाखवून तीन बाण त्याच्या बाजूला मारीन.
20 Atirarei três flechas para aquele lado, como quem atira ao alvo.
21 मग पाहा मी पोराला पाठवून म्हणेन जा बाणांचा शोध कर. जर मी पोराला म्हणालो, पाहा बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये, तर तू ये; कारण तुझे कुशल आहे आणि तुझे वाईट होणार नाही; परमेश्वर जिवंत आहे.
21 Eis que mandarei o moço e lhe direi: Vai, procura as flechas; se eu disser ao moço: Olha que as flechas estão para cá de ti, traze-as; então, vem, Davi, porque, tão certo como vive o Senhor , terás paz, e nada há que temer.
22 परंतु जर मी पोराला म्हणेन, पाहा बाण तुझ्या पलीकडे आहेत; तर तू निघून जा कारण परमेश्वराने तुला पाठवून दिले आहे.
22 Porém, se disser ao moço: Olha que as flechas estão para lá de ti. Vai-te embora, porque o Senhor te manda ir.
23 आणि जी गोष्ट तू व मी बोलतो आहे तिच्याविषयी तर पाहा परमेश्वर तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये निरंतर साक्षी आहे.”
23 Quanto àquilo de que eu e tu falamos, eis que o Senhor está entre mim e ti, para sempre.
24 मग दावीद रानात लपून राहिला आणि चंद्रदर्शन आली तेव्हा राजा जेवायला बसला.
24 Escondeu-se, pois, Davi no campo; e, sendo a Festa da Lua Nova, pôs-se o rei à mesa para comer.
25 राजा आपल्या आसनावर जसा इतर वेळी तसा भिंतीजवळ आसनावर बसला व योनाथान उठून उभा राहिला व अबनेर शौलाच्या बाजूला बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती.
25 Assentou-se o rei na sua cadeira, segundo o costume, no lugar junto à parede; Jônatas, defronte dele, e Abner, ao lado de Saul; mas o lugar de Davi estava desocupado.
26 तरी शौल त्या दिवशी काही बोलला नाही. कारण त्यास असे वाटले, त्यास काही झाले असेल, खचित तो शुद्ध नसेल.
26 Porém, naquele dia, não disse Saul nada, pois pensava: Aconteceu-lhe alguma coisa, pela qual não está limpo; talvez esteja contaminado.
27 मग चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी असे झाले की, दावीदाची जागा रिकामी होती आणि शौलाने आपला मुलगा योनाथानाला म्हटले, “इशायाचा मुलगा काल व आजही जेवायला का आला नाही.”
27 Sucedeu também ao outro dia, o segundo da Festa da Lua Nova, que o lugar de Davi continuava desocupado; disse, pois, Saul a Jônatas, seu filho: Por que não veio a comer o filho de Jessé, nem ontem nem hoje?
28 तेव्हा योनाथानाने शौलाला उत्तर दिले की, “दावीदाने बेथलहेमास जायला आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली.
28 Respondeu Jônatas a Saul: Davi me pediu, encarecidamente, que o deixasse ir a Belém.
29 तो म्हणाला, मी तुला विनंती करतो मला जाऊ दे कारण आमचे घराणे नगरात यज्ञ करणार आहे आणि मला माझ्या भावाने आज्ञा केली आहे म्हणून आता तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर मला माझ्या भावांना भेटायला जाऊ दे. यामुळे तो राजाच्या पंक्तीस आला नाही.”
29 Ele me disse: Peço-te que me deixes ir, porque a nossa família tem um sacrifício na cidade, e um de meus irmãos insiste comigo para que eu vá. Se, pois, agora, achei mercê aos teus olhos, peço-te que me deixes partir, para que veja meus irmãos. Por isso, não veio à mesa do rei.
30 तेव्हा योनाथानावर शौलाचा राग पेटला तो त्यास म्हणाला, “अरे विपरीत फितूर खोर पत्नीच्या मुला तुझी फजिती व तुझ्या आईच्या नागवेपणाची फजिती होण्यास तू इशायाच्या मुलाशी जडलास हे मला ठाऊक नाही काय?
30 Então, se acendeu a ira de Saul contra Jônatas, e disse-lhe: Filho de mulher perversa e rebelde; não sei eu que elegeste o filho de Jessé, para vergonha tua e para vergonha do recato de tua mãe?
31 कारण जोपर्यंत इशायाचा मुलगा पृथ्वीवर आहे तोपर्यंत तू आणि तुझे राज्यही स्थापित होणार नाही. म्हणून आता माणसे पाठवून त्यास माझ्याकडे आण, कारण त्यास खचित मरण पावले पाहिजे.”
31 Pois, enquanto o filho de Jessé viver sobre a terra, nem tu estarás seguro, nem seguro o teu reino; pelo que manda buscá-lo, agora, porque deve morrer.
32 मग योनाथानाने आपला बाप शौल याला उत्तर देऊन म्हटले, “त्याने कशासाठी मरावे? त्याने काय केले आहे?”
32 Então, respondeu Jônatas a Saul, seu pai, e lhe disse: Por que há de ele morrer? Que fez ele?
33 तेव्हा शौलाने त्यास मारायला भाला फेकला यावरुन योनाथानाला कळले की, आपल्या वडिलाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्चय केला आहे.
33 Então, Saul atirou-lhe com a lança para o ferir; com isso entendeu Jônatas que, de fato, seu pai já determinara matar a Davi.
34 मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदाविषयी त्यास वाईट वाटले कारण त्याच्या वडिलाने त्याचा अपमान केला.
34 Pelo que Jônatas, todo encolerizado, se levantou da mesa e, neste segundo dia da Festa da Lua Nova, não comeu pão, pois ficara muito sentido por causa de Davi, a quem seu pai havia ultrajado.
35 मग असे झाले की, योनाथान सकाळी दावीदाशी नेमेलेल्या वेळी आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन रानांत गेला.
35 Na manhã seguinte, saiu Jônatas ao campo, no tempo ajustado com Davi, e levou consigo um rapaz.
36 तो आपल्या पोराला म्हणाला, धाव आता मी बाण मारतो त्याचा शोध कर. पोर धावत असता त्याने त्याच्या पलीकडे बाण मारला.
36 Então, disse ao seu rapaz: Corre a buscar as flechas que eu atirar. Este correu, e ele atirou uma flecha, que fez passar além do rapaz.
37 जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला, “बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?”
37 Chegando o rapaz ao lugar da flecha que Jônatas havia atirado, gritou Jônatas atrás dele e disse: Não está a flecha mais para lá de ti?
38 योनाथानाने पोराच्या मागून हाक मारली की, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नको.” तेव्हा योनाथानाचा पोर बाण गोळा करून धन्याकडे आला.
38 Tornou Jônatas a gritar: Apressa-te, não te demores. O rapaz de Jônatas apanhou as flechas e voltou ao seu senhor.
39 मग पोराला काहीच ठाऊक नव्हते योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती.
39 O rapaz não entendeu coisa alguma; só Jônatas e Davi sabiam deste ajuste.
40 योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला दिली व त्यास म्हटले, “चल ही उचलून घेऊन नगरात जा.”
40 Então, Jônatas deu as suas armas ao rapaz que o acompanhava e disse-lhe: Anda, leva-as à cidade.
41 पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला.
41 Indo-se o rapaz, levantou-se Davi do lado do sul e prostrou-se rosto em terra três vezes; e beijaram-se um ao outro e choraram juntos; Davi, porém, muito mais.
42 योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा; कारण आपण दोघांनी परमेश्वराच्या नावाने शपथ वाहून म्हटले आहे की माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्ये व तुझ्या संतानामध्ये परमेश्वर साक्षी सर्वकाळ असो” मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरात गेला.
42 Disse Jônatas a Davi: Vai-te em paz, porquanto juramos ambos em nome do Senhor , dizendo: O Senhor seja para sempre entre mim e ti e entre a minha descendência e a tua.
43 — ausente —
43 Então, se levantou Davi e se foi; e Jônatas entrou na cidade.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 20, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.