1 Samuel 1

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम या नगरामधील एक पुरुष होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा तो एलीहूचा मुलगा तो तोहचा मुलगा तो सूफाचा मुलगा तो एलकाना एफ्राईमी होता.
1 Havia em Ramataim-Sofim um homem das montanhas de Efraim, chamado Elcana, filho de Jeroão, filho de Eliu, filho de Tolu, filho de Suf, o efraimita.
2 त्यास दोन स्त्रिया होत्या, एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती.
2 Tinha ele duas mulheres, uma chamada Ana e outra Fenena. Esta última tinha filhos; Ana, porém, não os tinha.
3 तो पुरुष आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास देवाचे याजक होते.
3 Cada ano subia esse homem de sua cidade para adorar o Senhor dos exércitos e oferecer-lhe um sacrifício em Silo, onde se encontravam os dois filhos de Heli, Ofini e Finéias, sacerdotes do Senhor.
4 यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली पत्नी पनिन्ना हिला व तिची सर्व मुले तिच्या सर्व मुली यांना मांसाचे वाटे देत असे.
4 Cada vez que Elcana oferecia um sacrifício, dava porções à sua mulher Fenena, bem como aos filhos e filhas que ela teve;
5 परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो जास्त प्रीती करत असे, पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती.
5 a Ana, porém, dava uma porção dupla, porque a amava, embora o Senhor a tivesse tornado estéril.
6 परमेश्वराने तिची कुस बंद केल्यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवत असे.
6 Sua rival afligia-a duramente, provocando-a a murmurar contra o Senhor que a tinha feito estéril.
7 ती प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारासोबत परमेश्वराच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे.
7 Isto se repetia cada ano quando ela subia à casa do Senhor; Fenena continuava provocando-a. Então, Ana punha-se a chorar e não comia.
8 तेव्हा तिचा पती एलकाना तिला नेहमी म्हणत असे, “हन्ना तू कां रडतेस? तू का खात नाहीस? आणि तुझे मन का दु:खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?”
8 Seu marido dizia-lhe: Ana, por que choras? Por que não comes? Por que estás triste? Não valho eu para ti como dez filhos?
9 मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक परमेश्वराच्या घराच्या दाराजवळच्या आपल्या आसनावर बसला होता.
9 {Desta vez} Ana levantou-se, depois de ter comido e bebido em Silo. Ora, o sacerdote Heli estava sentado numa cadeira à entrada do templo do Senhor.
10 तेव्हा ती खूप दु:खीत अशी होती आणि ती परमेश्वराजवळ प्रार्थना करून फार रडली.
10 Ana, profundamente amargurada, orou ao Senhor e chorou copiosamente.
11 ती नवस करून म्हणाली, “हे सैन्याच्या परमेश्वरा जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशील व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व दासीला पुरूष संतान देशील तर मी त्यास त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात परमेश्वरास देऊन टाकीन आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही.”
11 E fez um voto, dizendo: Senhor dos exércitos, se vos dignardes olhar para a aflição de vossa serva, e vos lembrardes de mim; se não vos esquecerdes de vossa escrava e lhe derdes um filho varão, eu o consagrarei ao Senhor durante todos os dias de sua vida, e a navalha não passará pela sua cabeça.
12 आणि असे झाले की ती परमेश्वराच्या पुढे प्रार्थना करीत असता एलीने तिच्या तोंडाकडे पाहिले.
12 Prolongando ela sua oração diante do Senhor, Heli observava o movimento dos seus lábios.
13 हन्ना तर आपल्या मनात बोलत होती. तिचे ओठ मात्र हालत होते पण तिची वाणी ऐकू येत नव्हती म्हणून ती मद्य पिऊन नशेत बोलत असेल असे एलीला वाटले.
13 Ana, porém, falava no seu coração, e apenas se moviam os seus lábios, sem se lhe ouvir a voz.
14 तेव्हा एली तिला म्हणाला, “किती वेळ तू मद्याच्या नशेत मस्त राहशील? तू मद्याचा अंमल आपल्यापासून दूर कर.”
14 Heli, julgando-a ébria, falou-lhe: Até quando estarás tu embriagada? Vai-te e deixa passar o teu vinho.
15 तेव्हा हन्ना उत्तर देऊन म्हणाली, “असे नाही, माझ्या स्वामी, मी दु:खीत आत्म्याची स्त्री आहे. द्राक्षरस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव परमेश्वरा पुढे ओतत आहे.”
15 Não é assim, meu Senhor, respondeu ela, eu sou uma mulher aflita: não bebi nem vinho, nem álcool, mas derramo a minha alma na presença do Senhor.
16 “आपली दासी दुष्ट स्त्री आहे असे तू समजू नका कारण मी माझ्या यातना व क्लेश यांमुळे आतापर्यंत बोलले आहे.”
16 Não tomes a tua escrava por uma pessoa frívola, porque é a grandeza de minha dor e de minha aflição que me fez falar até aqui.
17 मग एली उत्तर देत म्हणाला, “शांतीने जा; इस्राएलाचा देव याच्याजवळ जे मागणे तू मागितले आहेस ते तो तुला देवो.”
17 Heli respondeu: Vai em paz, e o Deus de Israel te conceda o que lhe pedes.
18 ती बोलली, “आपल्या दासीवर तुमची कृपादृष्टी होऊ द्या.” मग ती स्त्री निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने अन्न सेवन केले व पुढे तिचे तोंड उदास राहिले नाही.
18 Encontre a tua serva graça aos teus olhos, ajuntou ela. A mulher se foi, comeu, e o seu rosto não era mais o mesmo.
19 आणि सकाळी त्यांनी उठून परमेश्वराची उपासना केली; मग ते निघून रामा येथे आपल्या घरी परतले. आणि एलकानाने आपली पत्नी हन्ना हिला जाणले व परमेश्वराने तिची आठवण केली.
19 No dia seguinte pela manhã, prostraram-se diante do Senhor, e voltaram para a sua casa em Ramá.
20 नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्यास परमेश्वरापासून मागून घेतले.
20 Elcana conheceu Ana, sua mulher, e o Senhor lembrou-se dela. Ana concebeu, e, passado o seu tempo, deu à luz um filho que chamou Samuel; porque, dizia, eu o pedi ao Senhor.
21 पुन्हा एकदा तो पुरुष एलकाना, आपल्या सर्व कुटुंबासहीत परमेश्वरास वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला.
21 Elcana, seu marido, foi com toda a sua casa para oferecer ao Senhor o sacrifício anual.
22 परंतु हन्ना वर गेली नाही; ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, “मुलाचे दूध तोडीपर्यंत मी वर जाणार नाही; त्यानंतर मग मी त्यास नेईन, जेणेकरून तो परमेश्वरापुढे हजर होईल व तो तेथे कायम वस्ती करील.”
22 Ana, porém, não foi, e disse ao seu marido: Quando o menino for desmamado, eu o levarei para apresentá-lo ao Senhor, e lá ficará para sempre.
23 तेव्हा तिचा पती एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटते ते कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत राहा; केवळ परमेश्वर आपले वचन स्थापित करो.” मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यंत तिने त्यास स्तनपान दिले.
23 Faze como achares melhor, respondeu-lhe Elcana; fica até que o tenhas desmamado e que o Senhor se digne confirmar a sua promessa. Ela ficou e aleitou o seu filho até que o desmamou.
24 आणि त्याचे दूध तोडल्यावर तिने तीन गोऱ्हे व एक एफाभर सपीठ व द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्यास शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात नेले; तेव्हा मूल अजून लहानच होते.
24 Após tê-lo desmamado, tomou-o consigo, e levando também três touros, um efá de farinha e um odre de vinho, conduziu-o à casa do Senhor em Silo. O menino era ainda muito criança.
25 मग त्यांनी एक गोऱ्हा कापला आणि मुलाला एलीकडे आणले.
25 Imolaram o touro e conduziram o menino a Heli.
26 आणि ती म्हणाली, “हे माझ्या प्रभू! आपला जीव जिवंत आहे; माझ्या प्रभू, जी स्त्री परमेश्वराची प्रार्थना करीत येथे तुमच्याजवळ उभी राहिली होती, ती मीच आहे.
26 Ana disse-lhe: Ouve, meu Senhor, por tua vida, eu sou aquela mulher que esteve aqui em tua presença orando ao Senhor.
27 या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी परमेश्वरापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे.
27 Eis aqui o menino por quem orei; o Senhor ouviu o meu pedido.
28 मी तो परमेश्वरास दिला आहे; तो जगेल तोपर्यंत तो परमेश्वरास समर्पित केलेला आहे.” तेव्हा तेथे एलकाना व त्यांच्या कुटुंबाने परमेश्वराची उपासना केली.
28 Portanto, eu também o dou ao Senhor: ele será consagrado ao Senhor para todos os dias de sua vida. E prostraram-se naquele lugar diante do Senhor.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.