1 Samuel 17

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ACF

Sair da comparação
ACF Almeida Corrigida Fiel
1 तेव्हा पलिष्ट्यांनी आपले सैन्य लढाईसाठी एकवट केले. यहूदीयातील सोखो येथे एकत्र होऊन त्यांनी सोखो व अजेका यामध्ये अफस-दम्मीमात आपली छावणी दिली.
1 E os filisteus ajuntaram as suas forças para a guerra e congregaram-se em Socó, que está em Judá, e acamparam-se entre Socó e Azeca, no termo de Damim.
2 मग शौल व इस्राएलाची माणसे एकत्र मिळाली आणि त्यांनी एलाच्या खोऱ्यात छावणी करून पलिष्ट्यांशी लढण्यास सैन्यरचना केली.
2 Porém Saul e os homens de Israel se ajuntaram e acamparam no vale do carvalho, e ordenaram a batalha contra os filisteus.
3 तेव्हा पलिष्टी लोक एका बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि इस्राएली दुसऱ्या बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये खोरे होते.
3 E os filisteus estavam num monte de um lado, e os israelitas estavam num monte do outro lado; e o vale estava entre eles.
4 गथ या ठिकाणचा गल्याथ नावाचा एक युद्धवीर पलिष्ट्यांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची सहा हात व एक वित अशी होती.
4 Então saiu do arraial dos filisteus um homem guerreiro, cujo nome era Golias, de Gate, que tinha de altura seis côvados e um palmo.
5 त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि त्याने खवलाचे चिलखत घातलेले होते आणि त्या चीलखताचे वजन तर पाच हजार पितळ्याचे शेकेल असे होते.
5 Trazia na cabeça um capacete de bronze, e vestia uma couraça de escamas; e era o peso da couraça de cinco mil siclos de bronze.
6 त्याच्या पायांत पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळ्याची बरची होती.
6 E trazia grevas de bronze por cima de seus pés, e um escudo de bronze entre os seus ombros.
7 त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती. आणि त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडाचे शेकेल असे होते. त्याच्या पुढे एक ढालवाहणारा चालला होता.
7 E a haste da sua lança era como o eixo do tecelão, e a ponta da sua lança de seiscentos siclos de ferro, e diante dele ia o escudeiro.
8 तेव्हा तो उभा राहिला आणि इस्राएलच्या सैन्यास हाक मारून त्यास म्हणाला, “तुम्ही लढाई कारायास का निघाला आहा? मी पलिष्टी आहे, आणि तुम्ही शौलाचे चाकर ना? तुम्ही आपल्या मधून एक पुरुष निवडा आणि तो माझ्याकडे उतरून येवो.
8 E parou, e clamou às companhias de Israel, e disse-lhes: Para que saireis a ordenar a batalha? Não sou eu filisteu e vós servos de Saul? Escolhei dentre vós um homem que desça a mim.
9 जर माझ्याशी लढाई करून त्याने मला जीवे मारले तर आम्ही तुमचे चाकर होऊ. परंतु जर मी त्यास जीवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करावी.”
9 Se ele puder pelejar comigo, e me ferir, a vós seremos por servos; porém, se eu o vencer, e o ferir, então a nós sereis por servos, e nos servireis.
10 आणखी तो पलिष्टी म्हणाला, “मी आज इस्राएलाच्या सैन्याची निंदा करितो मला एक पुरुष द्या म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.”
10 Disse mais o filisteu: Hoje desafio as companhias de Israel, dizendo: Dai-me um homem, para que ambos pelejemos.
11 जेव्हा शौलाने व सर्व इस्राएलाने त्या पलिष्ट्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा ते घाबरे होऊन फार भ्याले.
11 Ouvindo então Saul e todo o Israel estas palavras do filisteu, espantaram-se, e temeram muito.
12 त्या वेळी दावीद हा यहूदाच्या बेथलेहेमच्या एफ्राथी इशाय नामे मनुष्याचा पुत्र होता; त्या मनुष्यास तर आठ पुत्र होते आणि शौलाच्या दिवसात तो म्हातारा झाला होता.
12 E Davi era filho de um homem efrateu, de Belém de Judá, cujo nome era Jessé, que tinha oito filhos; e nos dias de Saul era este homem já velho e adiantado em idade entre os homens.
13 इशायाचे तीन जेष्ठ पुत्र शौलाच्या मागे लढाईला गेले आणि त्यांची नावे ही; पहिला अलीयाब व दुसऱ्याचे अबीनादाब व तिसऱ्याचे शम्मा.
13 Foram-se os três filhos mais velhos de Jessé, e seguiram a Saul à guerra; e eram os nomes de seus três filhos, que se foram à guerra, Eliabe, o primogênito, e o segundo Abinadabe, e o terceiro Sama.
14 दावीद तर धाकटा होता आणि तीन वडील पुत्र शौलामागे गेले होते.
14 E Davi era o menor; e os três maiores seguiram a Saul.
15 दावीद शौलापासून बेथेलहेमास आपल्या बापाची मेंढरे राखावयास जात येत असे.
15 Davi, porém, ia e voltava de Saul, para apascentar as ovelhas de seu pai em Belém.
16 तो पलिष्टी चाळीस दिवस सकाळी व सायंकाळी लढाईसाठी जवळ येऊन उभा राही.
16 Chegava-se, pois, o filisteu pela manhã e à tarde; e apresentou-se por quarenta dias.
17 इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले की, “तुझ्या भावांसाठी एक माप भाजलेले धान्य व या दहा भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांजवळ धावत जा.
17 E disse Jessé a Davi, seu filho: Toma, peço-te, para teus irmãos um efa deste grão tostado e estes dez pães, e corre a levá-los ao arraial, a teus irmãos.
18 हे लोण्याचे दहा गोळे त्यांच्या हजारांवरील सरदारास नेऊन दे आणि आपल्या भावांचा समाचार घेऊन त्यांची खूण आण.
18 Porém estes dez queijos de leite leva ao capitão de mil; e visitarás a teus irmãos, a ver se vão bem; e tomarás o seu penhor.
19 तुझे भाऊ शौलासोबत आहेत आणि सर्व इस्राएली एलाच्या खोऱ्यात, पलिष्ट्यांशी लढत आहेत.”
19 E estavam Saul, e eles, e todos os homens de Israel no vale do carvalho, pelejando com os filisteus.
20 दावीद पहाटेस उठला आणि एका राखणाऱ्यांकडे मेंढरे सोपवून इशायाने सांगितल्या प्रमाणे सामान घेऊन गेला. तेव्हा सैन्य रणशब्द करून लढण्यास जात असता दावीद सैन्याच्या छावणी जवळ जाऊन पोहोचला.
20 Davi então se levantou de madrugada, pela manhã, e deixou as ovelhas com um guarda, e carregou-se, e partiu, como Jessé lhe ordenara; e chegou ao lugar dos carros, quando já o exército saía em ordem de batalha, e a gritos chamavam à peleja.
21 इस्राएल व पलिष्ट्यांनी त्यांच्या सेना लढाईसाठी समोरासमोर सज्ज् केल्या.
21 E os israelitas e filisteus se puseram em ordem, fileira contra fileira.
22 तेव्हा दावीद आपल्याजवळील सामान राखणाऱ्याच्या हाती ठेवून सैन्याकडे धावला आणि त्याने आपल्या भावांस सलाम केला.
22 E Davi deixou a carga que trouxera na mão do guarda da bagagem, e correu à batalha; e, chegando, perguntou a seus irmãos se estavam bem.
23 तो त्यांच्याशी बोलत असता पाहा तो युद्धवीर पलिष्टी गल्याथ नावाचा गथकर पलिष्ट्यांच्या सैन्यातून निघून मागे म्हटलेले शब्द बोलू लागला आणि ते दावीदाने ऐकले.
23 E, estando ele ainda falando com eles, eis que vinha subindo do exército dos filisteus o homem guerreiro, cujo nome era Golias, o filisteu de Gate; e falou conforme àquelas palavras, e Davi as ouviu.
24 सर्व इस्राएलांचे पुरूष त्या मनुष्यास पाहून पळाले आणि फार भ्याले.
24 Porém todos os homens em Israel, vendo aquele homem, fugiram de diante dele, e temiam grandemente.
25 मग इस्राएलाची माणसे म्हणाली, “हा जो मनुष्य पुढे आला आहे त्यास तुम्ही पाहिले काय? तो खरेच इस्राएलाची निंदा करण्यास आला आहे. आणि जो मनुष्य ह्याला जिवे मारील त्यास राजा फार धन देईल आणि आपली कन्या त्यास देईल आणि त्याच्या बापाचे कुटुंब नामांकित करील.”
25 E diziam os homens de Israel: Vistes aquele homem que subiu? Pois subiu para afrontar a Israel; há de ser, pois, que, o homem que o ferir, o rei o enriquecerá de grandes riquezas, e lhe dará a sua filha, e fará livre a casa de seu pai em Israel.
26 तेव्हा दावीदाने आपल्याजवळ उभ्या राहिलेल्या लोकांस म्हटले, “जो मनुष्य त्या पलिष्ट्याला मारील आणि इस्राएलापासून अपमान दूर करील त्यास काय प्राप्त होईल? हा बेसुनती पलिष्टी कोण आहे की ज्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ मानावे?”
26 Então falou Davi aos homens que estavam com ele, dizendo: Que farão àquele homem, que ferir a este filisteu, e tirar a afronta de sobre Israel? Quem é, pois, este incircunciso filisteu, para afrontar os exércitos do Deus vivo?
27 मग लोकांनी त्यास उत्तर दिले, जो पुरुष त्यास मारील त्याचे असे करण्यात येईल.
27 E o povo lhe tornou a falar conforme àquela palavra dizendo: Assim farão ao homem que o ferir.
28 त्याचा भाऊ अलीयाब याने त्यास या लोकांशी बोलताना ऐकले; तेव्हा अलीयाब दावीदावर रागावून म्हणाला, “तू इकडे का आला आहेस? तू तो कळप रानात कोणाच्या जवळ ठेवला? तुझा गर्व आणि तुझ्या अंतःकरणाची दुष्टाई मी जाणत आहे लढाई पाहावी म्हणून तू आला आहेस.
28 E, ouvindo Eliabe, seu irmão mais velho, falar àqueles homens, acendeu-se a ira de Eliabe contra Davi, e disse: Por que desceste aqui? Com quem deixaste aquelas poucas ovelhas no deserto? Bem conheço a tua presunção, e a maldade do teu coração, que desceste para ver a peleja.
29 तेव्हा दावीद म्हणाला मी आता काय केले आहे? मी फक्त एक शब्द बोललो नाही काय?”
29 Então disse Davi: Que fiz eu agora? Porventura não há razão para isso?
30 मग तो त्याच्यापासून दुसऱ्याकडे फिरून तसेच भाषण करून म्हटले आणि लोकांनी त्यास पूर्वी प्रमाणे उत्तर दिले.
30 E desviou-se dele para outro, e falou conforme àquela palavra; e o povo lhe tornou a responder conforme às primeiras palavras.
31 जे शब्द दावीद बोलला ते लोकांनी ऐकले असता शौलाला सांगितले, मग त्याने त्यास बोलाविले.
31 E, ouvidas as palavras que Davi havia falado, as anunciaram a Saul, que mandou chamá-lo.
32 तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “त्या मनुष्यामुळे कोणाचे हृदय खचू नये तुमचा सेवक जाऊन त्या पलिष्ट्याशी लढेल.”
32 E Davi disse a Saul: Não desfaleça o coração de ninguém por causa dele; teu servo irá, e pelejará contra este filisteu.
33 तेव्हा शौलाने दावीदाला म्हटले, “त्या पलिष्ट्याबरोबर जाऊन लढाई करावयास तू शक्तीमान नाहीस. कारण तू केवळ कोवळा तरुण आहेस. तो तर त्याच्या तरुणपणापासून लढाईचा पुरुष आहे.”
33 Porém Saul disse a Davi: Contra este filisteu não poderás ir para pelejar com ele; pois tu ainda és moço, e ele homem de guerra desde a sua mocidade.
34 मग दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक आपल्या बापाची मेंढरे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक मेंढरू कळपातून नेले.
34 Então disse Davi a Saul: Teu servo apascentava as ovelhas de seu pai; e quando vinha um leão e um urso, e tomava uma ovelha do rebanho,
35 मग मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि मेंढरू त्याच्या जबडयातून काढले आणि जेव्हा तो माझ्या अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्यास ठार मारले.
35 Eu saía após ele e o feria, e livrava-a da sua boca; e, quando ele se levantava contra mim, lançava-lhe mão da barba, e o feria e o matava.
36 तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.”
36 Assim feria o teu servo o leão, como o urso; assim será este incircunciso filisteu como um deles; porquanto afrontou os exércitos do Deus vivo.
37 आणखी दावीदाने म्हटले, “ज्या परमेश्वराने सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पलिष्ट्याच्या हातातून मला राखील.” मग शौलाने म्हटले, “जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो.”
37 Disse mais Davi: O Senhor me livrou das garras do leão, e das do urso; ele me livrará da mão deste filisteu. Então disse Saul a Davi: Vai, e o Senhor seja contigo.
38 तेव्हा शौलाने आपली वस्त्रे दावीदावर घातली आणि डोक्यावर पितळेचा टोप घातला आणि त्याच्यावर चिलखत घातले.
38 E Saul vestiu a Davi de suas vestes, e pôs-lhe sobre a cabeça um capacete de bronze; e o vestiu de uma couraça.
39 दावीदाने त्याची तलवार आपल्या वस्त्राभोवती बांधिली मग तो चालू लागला. त्याने कधीही ती वापरली नव्हती. तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “याच्याने मला चालवत नाही. कारण त्यास त्याची सवय नव्हती.” मग दावीदाने शौलाला म्हटले, ही घेऊन माझ्याने चालवत नाही कारण याची पारख मी कधी केली नाही. तेव्हा दावीदाने ती आपल्या अंगातून काढली.
39 E Davi cingiu a espada sobre as suas vestes, e começou a andar; porém nunca o havia experimentado; então disse Davi a Saul: Não posso andar com isto, pois nunca o experimentei. E Davi tirou aquilo de sobre si.
40 त्याने आपली काठी हातात घेऊन ओहाळातून पाच गुळगुळीत गोटे आपल्यासाठी निवडून घेतले आणि त्याने त्याच्याजवळ जी मेंढपाळाची पिशवी होती, तीच्यात ते ठेवले व आपली गोफण हातात घेऊन पलिष्ट्याजवळ तो जाऊ लागला.
40 E tomou o seu cajado na mão, e escolheu para si cinco seixos do ribeiro, e pô-los no alforje de pastor, que trazia, a saber, no surrão, e lançou mão da sua funda; e foi aproximando-se do filisteu.
41 तो पलिष्टी चालत चालत दावीदाजवळ आला आणि जो मनुष्य ढाल वाहत होता तो त्याच्या पुढे चालला.
41 O filisteu também vinha se aproximando de Davi; e o que lhe levava o escudo ia adiante dele.
42 त्या पलिष्ट्याने दृष्टी लावून दावीदाला पाहिले, तेव्हा त्याने त्यास तुच्छ मानिले कारण की, तो कोवळा तरुण, तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता.
42 E, olhando o filisteu, e vendo a Davi, o desprezou, porquanto era moço, ruivo, e de gentil aspecto.
43 तेव्हा तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे? म्हणून काठी घेऊन माझ्याकडे आलास?” त्या पलीष्ट्याने दावीदाला आपल्या परमेश्वराच्या नावाने शाप दिला.
43 Disse, pois, o filisteu a Davi: Sou eu algum cão, para tu vires a mim com paus? E o filisteu pelos seus deuses amaldiçoou a Davi.
44 त्या पलिष्टयाने दावीदाला म्हटले, “माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुझे शरीर आकाशातील पाखरांना आणि रानातील वनपशूंना देतो.”
44 Disse mais o filisteu a Davi: Vem a mim, e darei a tua carne às aves do céu e às bestas do campo.
45 दावीदाने पलिष्ट्याला म्हटले, “तू तलवार, भाला व ढाल घेऊन मजवर आलास, परंतु मी सैन्यांचा परमेश्वर इस्राएलाच्या सैन्यांचा परमेश्वर ज्याची निंदा तू केली, त्याच्या नावाने तुझवर येत आहे.
45 Davi, porém, disse ao filisteu: Tu vens a mim com espada, e com lança, e com escudo; porém eu venho a ti em nome do Senhor dos Exércitos, o Deus dos exércitos de Israel, a quem tens afrontado.
46 परमेश्वर या दिवशी तुला माझ्या हाती देईल. मी तुला जीवे मारीन आणि तुझे मस्तक छेदिन आणि पलिष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील वनपशू यांस देईन. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल की, इस्राएलामध्ये परमेश्वर आहे.
46 Hoje mesmo o Senhor te entregará na minha mão, e ferir-te-ei, e tirar-te-ei a cabeça, e os corpos do arraial dos filisteus darei hoje mesmo às aves do céu e às feras da terra; e toda a terra saberá que há Deus em Israel;
47 हा सर्व समुदाय जाणेल की, तलवार व भाला याकडून परमेश्वर संरक्षण करीत नाही. कारण लढाई परमेश्वराची आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल.”
47 E saberá toda esta congregação que o Senhor salva, não com espada, nem com lança; porque do Senhor é a guerra, e ele vos entregará na nossa mão.
48 मग असे झाले की, तो पलिष्टी उठून दावीदा जवळ येत असता दावीदाने घाई करून पलिष्टयाला मारण्यास शत्रूच्या सैन्याकडे धावला.
48 E sucedeu que, levantando-se o filisteu, e indo encontrar-se com Davi, apressou-se Davi, e correu ao combate, a encontrar-se com o filisteu.
49 दावीदाने आपला हात पिशवीत घालून त्यातून एक गोटा काढून गोफणीने मारिला, आणि तो दगड त्या पलिष्ट्याच्या कपाळात शिरून तो जमिनीवर पालथा पडला.
49 E Davi pôs a mão no alforje, e tomou dali uma pedra e com a funda lha atirou, e feriu o filisteu na testa, e a pedra se lhe encravou na testa, e caiu sobre o seu rosto em terra.
50 असे करून दावीदाने गोफण व दगड यांनी पलिष्ट्याला जिंकले आणि त्याचा पराभव करून त्यास मारिले. परंतु दावीदाच्या हाती तलवार नव्हती.
50 Assim Davi prevaleceu contra o filisteu, com uma funda e com uma pedra, e feriu o filisteu, e o matou; sem que Davi tivesse uma espada na mão.
51 तेव्हा दावीद धावत जाऊन त्या पलिष्ट्यावर उभा राहिला आणि त्याचीच तलवार त्याच्या म्यानातून काढिली आणि तिच्याने त्याचे मुडंके कापून त्यास ठार मारले. मग आपला युद्धवीर मेला आहे हे पाहून पलिष्टी पळाले.
51 Por isso correu Davi, e pôs-se em pé sobre o filisteu, e tomou a sua espada, e tirou-a da bainha, e o matou, e lhe cortou com ela a cabeça; vendo então os filisteus, que o seu herói era morto, fugiram.
52 तेव्हा इस्राएल व यहूदीयांच्या मनुष्यांनी उठून आरोळी मारली, आणि खोऱ्यापर्यंत व एक्रोनाच्या वेशीपर्यंत ते पलिष्ट्यांच्या पाठीस लागले. पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोनापर्यंत जखमी होऊन पडले.
52 Então os homens de Israel e Judá se levantaram, e jubilaram, e seguiram os filisteus, até chegar ao vale, e até às portas de Ecrom; e caíram os feridos dos filisteus pelo caminho de Saaraim até Gate e até Ecrom.
53 मग इस्राएलाची संताने पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारे आली आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली.
53 Então voltaram os filhos de Israel de perseguirem os filisteus, e despojaram os seus arraiais.
54 दावीदाने त्या पलिष्ट्याचे डोके घेऊन यरूशलेमेत आणले, पण त्याची शस्त्रे आपल्या तबूंत ठेवली.
54 E Davi tomou a cabeça do filisteu, e a trouxe a Jerusalém; porém pôs as armas dele na sua tenda.
55 शौलाने दावीदाला त्या पलिष्ट्यांस लढण्यास जाताना पाहिले तेव्हा त्याने अबनेर सेनापती ह्याला म्हटले, “हे अबनेरा तो तरुण कोणाचा पुत्र आहे?” मग अबनेराने म्हटले, “हे राजा तुझ्या जिवाची शपथ मला माहीती नाही.”
55 Vendo, porém, Saul, sair Davi a encontrar-se com o filisteu, disse a Abner, o capitão do exército: De quem é filho este moço, Abner? E disse Abner: Vive a tua alma, ó rei, que o não sei.
56 तेव्हा राजाने म्हटले, “तो तरुण कोणाचा पुत्र आहे याची विचारपूस कर?”
56 Disse então o rei: Pergunta, pois, de quem é filho este moço.
57 त्या पलिष्ट्याला वधल्यानतंर दावीद परत आला तेव्हा अबनेराने त्यास घेऊन शौलाजवळ आणले. त्या पलिष्ट्याचे डोके त्याच्या हाती होते.
57 Voltando, pois, Davi de ferir o filisteu, Abner o tomou consigo, e o trouxe à presença de Saul, trazendo ele na mão a cabeça do filisteu.
58 तेव्हा शौलाने त्यास म्हटले, “हे तरुणा तू कोणाचा पुत्र आहेस?” मग दावीदाने म्हटले, “तुमचा दास इशाय बेथलहेमकर याचा मी पुत्र आहे.”
58 E disse-lhe Saul: De quem és filho, jovem? E disse Davi: Filho de teu servo Jessé, belemita.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.