1 Samuel 15
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 शमुवेल शौलाला म्हणाला, “परमेश्वराने आपले लोक इस्राएल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले तर आता तू परमेश्वराची वचने ऐक.
1 Samuel disse a Saul: O Senhor enviou-me para que te consagrasse rei de seu povo de Israel. Ouve agora o que diz o Senhor.
2 सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.
2 Assim fala o Senhor dos exércitos: Vou pedir contas a Amalec do que ele fez a Israel, opondo-se-lhe no caminho, quando saiu do Egito.
3 आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रिया मुले व बालके व गाय-बैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.”
3 Vai, pois, fere Amalec e vota ao interdito tudo o que lhe pertence, sem nada poupar: matarás homens e mulheres, crianças e meninos de peito, bois e ovelhas, camelos e jumentos.
4 मग शौलाने लोकांस बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ होते व यहूदातील माणसे दहा हजार होती.
4 Saul comunicou isso ao povo e fez o seu recenseamento em Telaim: havia duzentos mil homens de Israel e dez mil de Judá.
5 मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.
5 Saul avançou até a cidade de Amalec e pôs-se de emboscada no vale.
6 तेव्हा शौलाने केनी लोकांस म्हटले, “अमालेक्याबरोबर तुम्हास मारू नये म्हणून तुम्ही त्याच्यांमधून निघून जा; कारण इस्राएल लोक मिसरांतून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहाने वर्तला.” तेव्हा केनी अमालेक्यामधून निघून गेले.
6 Disse aos cineus: Retirai-vos, separai-vos dos amalecitas, não suceda que eu vos envolva com eles {no massacre}, porque tratastes bem os israelitas quando saíram do Egito. E os cineus separaram-se dos amalecitas.
7 मग शौलाने हवीला पासून मिसरासमोरील शूरापर्यंत अमालेक्यांना मार दिला.
7 Saul bateu os amalecitas desde Hévila até Sur, que está ao oriente do Egito.
8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तलवारीच्या धारेखाली जिवे मारले.
8 Tomou vivo Agag, rei de Amalec, e votou todo o povo ao interdito, passando-o ao fio da espada.
9 तथापि शौलाने व लोकांनी अगागला जिवंत ठेवले; तसेच मेंढरे, बैल, पशु, कोकरे, असे जे काही चांगले धष्टपुष्ट ते राखून ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे टाकाऊ आणि निरूपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी संपूर्ण नाश केला.
9 Mas Saul e seus homens pouparam a Agag assim como o melhor do rebanho miúdo e do grande, os animais cevados e os cordeiros, e tudo o que havia de melhor; não quiseram votá-los ao interdito. Só exterminaram o que era ordinário e sem valor.
10 तेव्हा परमेश्वराचे वचन शमुवेलाकडे आले, ते म्हणाले,
10 O Senhor disse a Samuel:
11 “मी शौलाला राजा केले याचे मला दु:ख होत आहे. कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराचा धावा केला.
11 Arrependo-me de ter feito rei a Saul; ele se desviou de mim e não executou as minhas ordens. Samuel irritou-se com isso, e clamou ao Senhor durante toda a noite.
12 शमुवेल शौलाला भेटण्यासाठी पहाटेस उठला. तेव्हा कोणी शमुवेलाला सांगितले की, शौल कर्मेलास आला होता आणि पाहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे.
12 Na manhã seguinte, indo ao encontro de Saul, alguém veio dizer-lhe: Saul chegou ao Carmelo e erigiu ali uma estela, retomando em seguida o seu caminho para Gálgala.
13 मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौल त्यास म्हणाला, “परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो! मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.”
13 Samuel foi ter com ele; Saul disse-lhe: Deus te abençoe! Cumpri, a ordem do Senhor.
14 तेव्हा शमुवेल म्हणाला, “तर मेंढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय-बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?”
14 Samuel disse-lhe: Mas que balidos de ovelhas são esses que ressoam aos meus ouvidos, e esses mugidos de gado que ouço?
15 मग शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली. कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत. पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला.”
15 É a presa tomada aos amalecitas, respondeu Saul. O povo poupou o melhor das ovelhas e dos bois para os sacrificar ao Senhor, teu Deus; o resto, votamo-lo ao interdito.
16 तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले, “तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले.” ते मी तुला ऐकवतो. शौल त्यास म्हणाला, “बोला!”
16 Samuel disse-lhe: Basta! vou cientificar-te do que o Senhor me disse esta noite. Fala, disse Saul.
17 मग शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले”
17 E Samuel: Por pequeno que foste aos teus próprios olhos, acaso não te tornaste o chefe das tribos de Israel, e não te consagrou o Senhor, rei de Israel?
18 परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की, जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर. ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर.
18 O Senhor te havia dado uma ordem, e te havia dito que votasses ao interdito esses pecadores, os amalecitas, combatendo-os até o completo extermínio.
19 तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले?
19 Por que não ouviste a sua voz? Por que te lançaste sobre os despojos fazendo o mal aos olhos do Senhor.?
20 तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यामध्ये मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे.
20 Mas eu obedeci à voz do Senhor, replicou Saul; fui pelo caminho que ele me traçou, trouxe Agag, rei de Amalec, e votei ao interdito os amalecitas.
21 परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली.”
21 O povo somente tomou dos despojos algumas ovelhas e bois, à guisa de primícias do interdito, para os sacrificar ao Senhor, teu Deus, em Gálgala.
22 शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.
22 Samuel replicou-lhe: Acaso o Senhor se compraz tanto nos holocaustos e sacrifícios como na obediência à sua voz? A obediência é melhor que o sacrifício e a submissão vale mais que a gordura dos carneiros.
23 कारण बंडखोरी जादुगीरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.”
23 A rebelião é tão culpável quanto a superstição; a desobediência é como o pecado de idolatria. Pois que rejeitaste a palavra do Senhor, também ele te rejeita e te despoja da realeza!
24 मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.
24 Saul disse: Pequei! Transgredi a ordem do Senhor e as tuas instruções, pois tive medo do povo e ouvi a sua voz.
25 तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
25 Agora, peço-te, perdoa o meu pecado, e volta comigo para que eu adore o Senhor.
26 शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही; कारण तू देवाचे वचन धिक्कारले, आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राज्य करण्यापासून धिक्कारले आहे.”
26 Não voltarei contigo!, exclamou Samuel. Rejeitaste a palavra do Senhor, por isso o Senhor te rejeita, e não quer mais que sejas rei de Israel.
27 शमुवेल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.
27 Samuel voltou-se e ia-se retirando, mas Saul agarrou-o pela ponta do manto, o qual se rasgou.
28 तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले, “परमेश्वराने आज इस्राएलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्यास दिले आहे.
28 Samuel disse-lhe: Assim o Senhor arranca hoje de ti a realeza sobre Israel, a fim de dá-la a outro melhor do que tu.
29 तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.”
29 Aquele que é a verdade de Israel não mente, nem se arrepende, pois não é um homem para se arrepender.
30 तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. तरी आता मी तुला विनंती करतो माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्राएलासमोर तू माझा सन्मान कर आणि परमेश्वर तुझा देव याचे भजन पूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
30 Saul respondeu: Pequei, mas rogo-te que {continues} a honrar-me na presença. dos anciãos de meu povo e diante de Israel. Volta comigo, para eu adorar o Senhor, teu Deus!
31 मग शमुवेल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने परमेश्वराचे भजन पूजन केले.
31 Samuel voltou, pois, com o rei, e este adorou o Senhor.
32 मग शमुवेल म्हणाला, “अमालेक्याचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा.” तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला, आणि अगागाने म्हटले खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे.
32 Samuel disse: Trazei-me Agag, rei de Amalec. Aproximou-se Agag, cheio de alegria, dizendo: Certamente passou a amargura da morte!
33 तेव्हा शमुवेल म्हणाला, “जसे तुझ्या तलवारीने स्त्रियांना बालकांविरहित केले आहे, तशी बायकांमध्ये तुझी आई बालकाविरहित होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वराच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले.
33 Tua espada, disse-lhe Samuel, privou as mulheres de seus filhos; agora, é tua mãe que será uma mulher sem filho. E Samuel fê-lo em pedaços diante do Senhor, em Gálgala.
34 त्यानंतर शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला.
34 Depois disso Samuel retirou-se para Ramá, e Saul voltou para a sua casa em Gabaa de Saul.
35 शमुवेल आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला आणखी गेला नाही; तरी शमुवेलाने शौलासाठी शोक केला; आपण शौलाला इस्राएलांवर राजा केले म्हणून परमेश्वर अनुतापला.
35 O profeta não tornou mais a ver Saul até o dia de sua morte. Samuel afligia-se por causa de Saul, por se ter o Senhor arrependido de tê-lo feito rei de Israel.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.