1 Samuel 13

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ACF

Sair da comparação
ACF Almeida Corrigida Fiel
1 शौल राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने (दोन) वर्षे इस्राएलावर राज्य केल्यानंतर,
1 Saul reinou um ano; e no segundo ano do seu reinado sobre Israel,
2 त्याने इस्राएलातून तीन हजार पुरुष निवडून घेतले; त्यातले दोन हजार त्याच्याबरोबर मिखमाशांत व बेथेलाच्या डोंगरात होते आणि योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात एक हजार होते. बाकीच्या लोकांस त्याने त्यांच्या घराकडे पाठवले, प्रत्येकजण त्याच्या तंबूकडे गेला.
2 Saul escolheu para si três mil homens de Israel; e estavam com Saul dois mil em Micmás e na montanha de Betel, e mil estavam com Jônatas em Gibeá de Benjamim; e o resto do povo despediu, cada um para sua casa.
3 गिब्यात पलिष्ट्यांच्या सैन्यांना योनाथानाने पराजित केले आणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले, “इब्र्यांना ऐकू द्या.”
3 E Jônatas feriu a guarnição dos filisteus, que estava em Gibeá, o que os filisteus ouviram; pelo que Saul tocou a trombeta por toda a terra, dizendo: Ouçam os hebreus.
4 शौलाने पलिष्ट्यांच्या सैन्याला पराजित केले आणि पलिष्ट्यांना इस्राएलाचा तिरस्कार वाटू लागला, असे सर्व इस्राएलांनी ऐकले. त्यानंतर लोक शौलाजवळ गिलगालात एकत्र जमले.
4 Então todo o Israel ouviu dizer: Saul feriu a guarnição dos filisteus, e também Israel se fez abominável aos filisteus. Então o povo foi convocado para junto de Saul em Gilgal.
5 मग तीस हजार रथ व सहा हजार रथ चालवणारे, आणि समुद्राच्या वाळूसारखे असंख्य लोक घेऊन पलिष्टी इस्राएलाशी लढाई करायला जमले आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ-आवेनाच्या पूर्वेस तळ दिला.
5 E os filisteus se ajuntaram para pelejar contra Israel, trinta mil carros, e seis mil cavaleiros, e povo em multidão como a areia que está à beira do mar; e subiram, e se acamparam em Micmás, ao oriente de Bete-Áven.
6 आपण अडचणीत आलो आहो हे इस्राएलांनी पाहिले. कारण लोक निराश झाले होते, तेव्हा लोक गुहा, झुडपात, खडकात, विहीरीत, व खड्यात लपले.
6 Vendo, pois, os homens de Israel que estavam em apuros (porque o povo estava angustiado), o povo se escondeu pelas cavernas, e pelos espinhais, e pelos penhascos, e pelas fortificações, e pelas covas.
7 कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले. पण शौल गिलगालात तसाच राहिला आणि सर्व लोक त्याच्यामागे थरथर कापत गेले.
7 E alguns dos hebreus passaram o Jordão para a terra de Gade e Gileade; e, estando Saul ainda em Gilgal, todo o povo ia atrás dele tremendo.
8 शमुवेलाने नेमलेल्या वेळेप्रमाणे तो सात दिवस थांबला परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक शौलापासून विखरून जाऊ लागले.
8 E esperou Saul sete dias, até ao tempo que Samuel determinara; não vindo, porém, Samuel a Gilgal, o povo se dispersava dele.
9 तेव्हा शौलाने म्हटले, “होमार्पणे व शांत्यर्पणे इकडे माझ्यापाशी आणा.” मग त्याने होमार्पण अर्पिले.
9 Então disse Saul: Trazei-me aqui um holocausto, e ofertas pacíficas. E ofereceu o holocausto.
10 त्याने होमार्पण अर्पिण्याची समाप्ती केली तितक्यात पाहा शमुवेलाचे आगमन झाले. शौल त्यास भेटण्यास आणि अभिवादन करण्यास बाहेर गेला.
10 E sucedeu que, acabando ele de oferecer o holocausto, eis que Samuel chegou; e Saul lhe saiu ao encontro, para o saudar.
11 तेव्हा शमुवेल म्हणाला, “तू हे काय केले आहे?” शौलाने म्हटले, “कारण मी पाहिले की, लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले, आणि नेमलेल्या दिवसाच्या आत तुम्ही आला नाही, आणि पलिष्टी मिखमाश येथे जमले आहेत,
11 Então disse Samuel: Que fizeste? Disse Saul: Porquanto via que o povo se espalhava de mim, e tu não vinhas nos dias aprazados, e os filisteus já se tinham ajuntado em Micmás,
12 म्हणून मी म्हणालो, पलिष्टी खाली गिलगालास माझ्याविरूद्ध येत आहेत आणि मी परमेश्वराची मर्जी अद्याप मिळवली नाही. म्हणून मी स्वत:च्या मजबुरीने भाग पडून होमार्पण अर्पिले.”
12 Eu disse: Agora descerão os filisteus sobre mim a Gilgal, e ainda à face do Senhor não orei; e constrangi-me, e ofereci holocausto.
13 नंतर शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणाचे कृत्य केले. परमेश्वर तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते.
13 Então disse Samuel a Saul: Procedeste nesciamente, e não guardaste o mandamento que o Senhor teu Deus te ordenou; porque agora o Senhor teria confirmado o teu reino sobre Israel para sempre;
14 परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. परमेश्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे, आणि त्यास आपल्या लोकांचा राजा होण्यास नेमले आहे, कारण परमेश्वराने जे तुला आज्ञापिले ते तू पाळले नाही.”
14 Porém agora não subsistirá o teu reino; já tem buscado o Senhor para si um homem segundo o seu coração, e já lhe tem ordenado o Senhor, que seja capitão sobre o seu povo, porquanto não guardaste o que o Senhor te ordenou.
15 मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामिनातील गिबा येथे गेला. त्यानंतर शौलाने आपणाजवळ जे लोक होते त्यांची गणना केली, ते सुमारे सहाशे होते.
15 Então se levantou Samuel, e subiu de Gilgal a Gibeá de Benjamim; e Saul contou o povo que se achava com ele, uns seiscentos homens.
16 शौल, त्याचा मुलगा योनाथान व त्याच्याबरोबरचे लोक बन्यामिनांतील गिब्यात राहिले. पण पलिष्ट्यांनी मिखमाशात छावणी केली.
16 E Saul e Jônatas, seu filho, e o povo que se achou com eles, ficaram em Gibeá de Benjamim; porém os filisteus se acamparam em Micmás.
17 पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणारे तीन टोळ्या करून निघाले. एक टोळी आफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली
17 E os saqueadores saíram do campo dos filisteus em três companhias; uma das companhias foi pelo caminho de Ofra à terra de Sual.
18 आणि दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि आणखी एक टोळी जो प्रांत सबोईम खोऱ्याकडला आहे त्याच्या वाटेने रानाकडे वळली.
18 Outra companhia seguiu pelo caminho de Bete-Horom, e a outra companhia foi pelo caminho do termo que dá para o vale Zeboim na direção do deserto.
19 तेव्हा इस्राएलाच्या सर्व देशात कोणी लोहार मिळेना, कारण पलिष्ट्यांनी म्हटले होते, कदाचित इब्री आपणासाठी तलवारी किंवा भाले करून घेतील.
19 E em toda a terra de Israel nem um ferreiro se achava, porque os filisteus tinham dito: Para que os hebreus não façam espada nem lança.
20 परंतु सर्व इस्राएली लोक, आपला नांगराचा फाळ, आपली कुदळ, आपली कुऱ्हाड, आणि विळ्यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात.
20 Por isso todo o Israel tinha que descer aos filisteus para amolar cada um a sua relha, e a sua enxada, e o seu machado, e o seu sacho.
21 नांगराचा फाळ आणि कुदळ यांना धार लावण्याचे शुल्क दोन तृतीयांश शेकेल आणि एकतृतीयांश कुऱ्हाडीला धार देण्यासाठी आणि पराणी सरळ करण्यासाठी.
21 Tinham porém limas para os seus sachos, e para as suas enxadas, e para as forquilhas de três dentes, e para os machados, e para consertar as aguilhadas.
22 आणि लढाईच्या दिवशी असे झाले की, जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यातल्या कोणाच्याही हाती तलवार व भाला नव्हता. फक्त शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ ते होते.
22 E sucedeu que, no dia da peleja, não se achou nem espada nem lança na mão de todo o povo que estava com Saul e com Jônatas; porém acharam-se com Saul e com Jônatas seu filho.
23 पलिष्ट्यांचे सैन्य निघून मिखमाशाच्या उताराकडे गेले.
23 E saiu a guarnição dos filisteus ao desfiladeiro de Micmás.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.