1 Samuel 12

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 शमुवेल सर्व इस्राएलास म्हणाला, “पाहा जे तुम्ही मला म्हणाला ती प्रत्येक गोष्ट ऐकून मी तुम्हावर एक राजा नेमला आहे.
1 Samuel disse a todo Israel: "Atendi tudo o que vocês me pediram e estabeleci um rei para vocês.
2 तर आता पाहा, राजा तुम्हापुढे चालत आहे, आणि मी म्हातारा होऊन केस पिकलेला झालो आहे; पाहा, माझे पुत्र तुम्हाजवळ आहेत. व मी आपल्या तरुणपणापासून आजपर्यंत तुम्हापुढे चाललो आहे.
2 Agora vocês têm um rei que os governará. Quanto a mim, estou velho e de cabelos brancos, e meus filhos estão aqui com vocês. Tenho vivido diante de vocês desde a minha juventude até agora.
3 मी हा येथे आहे; परमेश्वरासमोर व त्याच्या अभिषिक्तासमोर माझ्याविरूद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला काय? मी कोणाचे गाढव घेतले काय? मी कोणाला लबाडीने लुबाडले आहे काय? मी कोणावर जुलूम केला आहे काय? मी डोळे बंद करून कोणाकडून लाच घेतली काय? माझ्याविरूद्ध साक्ष द्या, म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”
3 Aqui estou. Se tomei um boi ou um jumento de alguém, ou se explorei ou oprimi a alguém, ou se das mãos de alguém aceitei suborno, fechando os olhos para sua culpa, testemunhem contra mim na presença do Senhor e do seu ungido. Se alguma dessas coisas pratiquei, eu farei restituição".
4 ते म्हणाले, “तुम्ही आम्हास फसवले नाही, आमच्यावर जुलूम केला नाही, किंवा कोणा मनुष्याच्या हातून काही चोरले नाही.”
4 E responderam: "Você não nos explorou nem nos oprimiu. Você não tirou coisa alguma das mãos de ninguém".
5 मग तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही याविषयी आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे.” ते म्हणाले, “परमेश्वर साक्षी आहे.”
5 Samuel lhes disse: "O Senhor é testemunha diante de vocês, e bem como o seu ungido é hoje testemunha de que vocês não encontraram culpa alguma em minhas mãos". E disseram: "Ele é testemunha".
6 शमुवेल लोकांस म्हणाला, “ज्याने मोशेला व अहरोनाला नेमले, आणि ज्याने तुमच्या वडिलांना मिसर देशातून काढून वर आणले तो तर परमेश्वरच आहे.
6 Então Samuel disse ao povo: "O Senhor designou Moisés e Arão e tirou os seus antepassados do Egito.
7 तर आता, स्थिर उभे राहा, म्हणजे परमेश्वराने न्यायीपणाची जी सर्व कृत्ये तुम्हासाठी व तुमच्या वडिलांसाठी केली त्याविषयी मी परमेश्वरासमोर विनंती करतो.
7 Agora, pois, fiquem aqui, porque vou entrar em julgamento com vocês, perante o Senhor, com base nos atos justos realizados pelo Senhor em favor de vocês e de seus antepassados.
8 याकोब मिसरात गेल्यावर, तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराकडे आरोळी केली. तेव्हा परमेश्वराने मोशेला व अहरोनाला पाठवले, त्यांनी तुमच्या वाडवडिलांना मिसरातून काढून आणले आणि या ठिकाणी वसवले.
8 Depois que Jacó entrou no Egito, eles clamaram ao Senhor, e ele enviou Moisés e Arão para tirar seus antepassados do Egito e os estabelecer neste lugar.
9 पण परमेश्वर त्यांचा देव याला ते विसरले तेव्हा त्याने हासोराचा सेनापती सीसरा याच्या हाती, व पलिष्ट्यांच्या हाती, व मवाबाचा राजा याच्या हाती, त्यांना विकले आणि ते त्यांच्याशी लढले.
9 Seus antepassados, porém, se esqueceram do Senhor seu Deus; então ele os vendeu à Sísera, o comandante do exército de Hazor, e aos filisteus e ao rei de Moabe, que lutaram contra eles.
10 तेव्हा ते परमेश्वरास हाक मारून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, कारण आम्ही परमेश्वरास सोडून बआल आणि अष्टारोथ या मुर्तींची सेवा केली आहे. परंतु आता तू आमच्या शत्रूच्या हातातून आम्हास सोडीव म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.
10 Eles clamaram ao Senhor, dizendo: ‘Pecamos, abandonando o Senhor e prestando culto aos baalins e aos postes sagrados. Agora, porém, liberta-nos das mãos dos nossos inimigos, e nós prestaremos culto a ti’.
11 मग परमेश्वराने यरुब्बाल, बदान, व इफ्ताह, व शमुवेल यांना पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला.
11 Então o Senhor enviou Jerubaal, Baraque, Jefté e Samuel, e os libertou das mãos dos inimigos que os rodeavam, de modo que vocês viveram em segurança.
12 परंतु अम्मोनाच्या संतानाचा राजा नाहाश तुम्हावर आला असे तुम्ही पाहिले, तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा होता तरी, तुम्ही मला म्हणालात की, असे नको तर आम्हावर राजा राज्य करो.
12 Quando, porém, vocês viram que Naás, rei dos amonitas, estava avançando contra vocês, então me disseram: ‘Não! Escolha um rei para nós’, embora o Senhor, o seu Deus, fosse o rei.
13 तर आता जो राजा तुम्ही निवडला ज्याला तुम्ही मागितले, तो हा पाहा; पाहा परमेश्वराने तुम्हावर राजा नेमला आहे.
13 Agora, aqui está o rei que vocês escolheram, aquele que vocês pediram; o Senhor deu um rei a vocês.
14 जर तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची सेवा कराल, त्याची वाणी ऐकाल, आणि परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध बंड करणार नाही, तर तुम्ही व तुम्हावर राज्य करणारा तुमचा राजाही परमेश्वर तुमचा देव याला मानीत जाल तर बरे.
14 Se vocês temerem, servirem e obedecerem ao Senhor, e não se rebelarem contra suas ordens, e, se vocês e o rei que reinar sobre vocês seguirem o Senhor, o seu Deus, tudo lhes irá bem!
15 परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेच्याविरूद्ध बंड कराल, तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांविरूद्ध होता, तसा तो तुमच्याविरुध्द होईल.
15 Todavia, se vocês desobedecerem ao Senhor e se rebelarem contra o seu mandamento, sua mão se oporá a vocês da mesma forma como se opôs aos seus antepassados.
16 तर आता तुम्ही स्वतःला सादर करा आणि जी मोठी गोष्ट परमेश्वर तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा.
16 Agora, preparem-se para ver este grande feito que o Senhor vai realizar diante de vocês!
17 आज गव्हाची कापणी आहे की नाही? परमेश्वरास मी हाक मारीन, अशासाठी की, त्याने मेघांच्या गडगडाटसह पाऊस पाठवावा. मग तुम्ही जाणाल व पाहाल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने किती मोठे दुष्टपण केले.”
17 Agora não é a época da colheita do trigo? Pedirei ao Senhor que envie trovões e chuva para que vocês reconheçam que fizeram o que o Senhor reprova totalmente, quando pediram um rei".
18 तेव्हा शमुवेलाने परमेश्वरास हाक मारली आणि त्याच दिवशी परमेश्वराने मेघगर्जनासह पाऊस पाठवला. म्हणून सर्व लोकांस परमेश्वराचे व शमुवेलाचे फार भय वाटले.
18 Então Samuel clamou ao Senhor, e naquele mesmo dia o Senhor enviou trovões e chuva. E assim todo o povo temeu grandemente o Senhor e Samuel.
19 तेव्हा अवघे लोक शमुवेलाला म्हणाले, “आम्ही मरू नये म्हणून, परमेश्वर तुमचा देव याच्याकडे तुम्ही आपल्या सेवकांसाठी प्रार्थना करा. कारण आम्ही राजा मागून आपल्या सर्व पापांत आणखी या दुष्कर्माची भर टाकली आहे.”
19 E todo o povo disse a Samuel: "Ore ao Senhor seu Deus em favor dos seus servos, para que não morramos, pois a todos os nossos pecados acrescentamos o mal de pedir um rei".
20 मग शमुवेल लोकांस म्हणाला, “भिऊ नका. तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका, तर आपल्या संपूर्ण मनाने परमेश्वराची सेवा करा.
20 Respondeu Samuel: "Não tenham medo. De fato, vocês fizeram todo esse mal, mas não deixem de seguir o Senhor, antes, sirvam o Senhor de todo o coração.
21 तुम्ही भलत्या गोष्टींकडे वळू नका कारण जे लाभदायक नाहीत व ज्यांच्याने तुमचे रक्षण करवत नाही कारण त्या निरोपयोगी आहेत.
21 Não se desviem, para seguir ídolos inúteis, que não têm qualquer proveito nem podem livrá-los, pois são inúteis.
22 कारण आपल्या महान नावाकरता, परमेश्वर आपल्या लोकांस नाकारणार नाही, कारण तुम्हास आपले स्वत:चे लोक असे करणे परमेश्वरास आनंददायी वाटले.
22 Por causa de seu grande nome o Senhor não os rejeitará, pois o Senhor teve prazer em torná-los o seu próprio povo.
23 मी तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी परमेश्वराच्या विरूद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच राहो. चांगला व सरळ मार्ग मी तुम्हास शिकवीन.
23 E longe de mim esteja pecar contra o Senhor, deixando de orar por vocês. Também lhes ensinarei o caminho que é bom e direito.
24 केवळ परमेश्वराचे भय धरा आणि खरेपणाने वागून आपल्या संपूर्ण मनाने तुम्ही त्याची सेवा करा. कारण त्याने तुम्हासाठी केवढी महान कृत्ये केली आहेत हे तुम्ही लक्षात घ्या.
24 Somente temam o Senhor e o sirvam fielmente de todo o coração; e considerem as grandes coisas que ele tem feito por vocês.
25 परंतु जर तुम्ही वाईट करण्याचे चालूच ठेवाल तर तुम्ही आणि तुमचा राजा दोघे नष्ट व्हाल.”
25 Todavia, se insistirem em fazer o mal, tanto vocês quanto o seu rei serão destruídos".

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.