1 Samuel 11

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.”
1 Então Naás, que era amonita, foi e sitiou Jabes-Gileade. E todos os homens de Jabes disseram a Naás: — Faça uma aliança conosco, e nós o serviremos.
2 तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हाशी अशा अटीवर करार करीन की, मी तुम्हातील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्राएलाची मानहानी करीन.”
2 Porém Naás, o amonita, respondeu: — Farei aliança com vocês sob a condição de que seja vazado o olho direito de cada um de vocês. Assim, trarei vergonha sobre todo o Israel.
3 तेव्हा याबेशच्या वडिल जनांनी त्यास म्हटले, “आम्हांला सात दिवसाचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हास सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.”
3 Então os anciãos de Jabes lhe disseram: — Dê-nos sete dias para enviar mensageiros por todo o território de Israel. Se não houver ninguém que nos livre, então nos entregaremos a você.
4 आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे येऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हा सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले.
4 Quando os mensageiros chegaram a Gibeá, onde morava Saul, relataram este caso ao povo. Então todo o povo chorou em alta voz.
5 आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला, “लोकांस काय झाले? म्हणून ते रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्यास याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले.
5 Eis que Saul voltava do campo, atrás dos bois, e perguntou: — Que tem o povo? Por que estão chorando? Então lhe contaram o que os homens de Jabes haviam relatado.
6 तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला.
6 Quando Saul ouviu estas palavras, o Espírito de Deus se apossou dele, e ficou furioso.
7 मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले.
7 Pegou uma junta de bois, cortou-os em pedaços e os enviou a todo o território de Israel por meio de mensageiros que dissessem: — Assim se fará com os bois de todo aquele que não seguir Saul e Samuel. Então o temor do
8 मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते.
8 Saul contou-os em Bezeque. Dos filhos de Israel, havia trezentos mil; dos homens de Judá, trinta mil.
9 तेव्हा जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले, “याबेश-गिलादाच्या मनुष्यांना असे सांगा की, उद्या सूर्य तापेल तेव्हा तुमची सुटका होईल.” मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हा ते आनंदीत झाले.
9 Então disseram aos mensageiros que tinham vindo de Jabes: — Digam aos homens de Jabes-Gileade que amanhã, quando o sol aquentar, vocês serão socorridos. Os mensageiros foram, anunciaram isto aos homens de Jabes, e estes se alegraram.
10 मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.”
10 Então disseram aos amonitas: — Amanhã nós nos entregaremos, e vocês poderão fazer conosco o que bem quiserem.
11 मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली.
11 Aconteceu que, no dia seguinte, Saul dividiu o povo em três companhias, que, pela vigília da manhã, vieram para o meio do arraial e atacaram os amonitas, até que se fez sentir o calor do dia. Os sobreviventes se espalharam, e não ficaram dois deles juntos.
12 मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.”
12 Então o povo disse a Samuel: — Quem são aqueles que diziam que Saul não deveria reinar sobre nós? Tragam-nos para aqui, para que os matemos.
13 तेव्हा शौल बोलला, “आज कोणाही मनुष्यास जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्वराने इस्राएलास सोडवले आहे.”
13 Porém Saul disse: — Hoje ninguém será morto, porque no dia de hoje o
14 तेव्हा शमुवेलाने लोकांस म्हटले, “चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.”
14 E Samuel disse ao povo: — Venham, vamos a Gilgal e renovemos ali o reino.
15 मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हा तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.
15 E todo o povo partiu para Gilgal, onde proclamaram Saul seu rei, diante do Senhor , a cuja presença trouxeram ofertas pacíficas. E Saul muito se alegrou ali com todos os homens de Israel.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.