1 Samuel 10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही?
1 Samuel tomou um pequeno frasco de óleo e derramou-o na cabeça de Saul; beijou-o e disse: O Senhor te confere esta unção para que sejas chefe da sua herança.
2 आज तू माझ्यापासून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामिनाच्या प्रांतात सेल्सह येथे तुला दोन माणसे भेटतील ती तुला म्हणतील की, ज्या गाढवांचा शोध करायला तू गेला होतास ती सांपडली आहेत. पाहा तुझा बाप गाढवांची काळजी सोडून, तुझी चिंता करीत आहे, तो म्हणतो, मी आपल्या मुलासाठी काय करू?”
2 Quando te apartares hoje de mim, encontrarás dois homens junto do túmulo de Raquel, na terra de Benjamim, em Selsac. Eles te dirão: As jumentas que foste procurar foram encontradas. Teu pai não se inquieta mais por elas, mas tem cuidado por vós, e aflige-se perguntando o que poderá fazer por vós.
3 मग तेथून तू पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हा तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षरसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील.
3 Seguirás o teu caminho até o carvalho de Tabor, onde se apresentarão a ti três homens que sobem a adorar a Deus em Betel, levando um três cabritos, outro três fatias de pão, e o terceiro um odre de vinho.
4 आणि ती तुला अभिवादन करून तुला दोन भाकरी देतील त्या तू त्यांच्या हातातून घेशील.
4 Depois de te saudarem, dar-te-ão dois pães e tu os receberás de suas mãos.
5 त्यानंतर परमेश्वराच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील. आणि तू तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्यापुढे सतार, झांज, बासरी व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील; ते भविष्यवाणी करीत असतील.
5 Depois disso, chegarás a Gabaa-Eloim onde se encontra o governador dos filisteus. À entrada da cidade encontrarás um grupo de profetas descendo do lugar alto, precedidos de saltérios, de tímpanos, de flautas e de cítaras, profetizando.
6 परमेश्वराचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील, आणि तू बदलून निराळा पुरुष होशील.
6 O Espírito do Senhor virá também sobre ti, profetizarás com eles e tornar-te-ás um outro homem.
7 आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.
7 Quando vires acontecer todos esses sinais, faze o que a circunstância te ditar, porque Deus estará contigo.
8 तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगालास जा. पाहा होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे यज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन. मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन तोपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा.
8 Descerás antes de mim a Gálgala; irei ter contigo ali, para oferecer holocaustos e sacrifícios pacíficos. Esperarás sete dias até que eu chegue; então instruir-te-ei sobre o que deverás fazer.
9 आणि असे झाले की, शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर, परमेश्वराने त्यास दुसरे मन दिले. आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्यास प्राप्त झाली.
9 Logo que Saul voltou as costas, despedindo-se de Samuel, Deus transformou-lhe o coração. Todos esses sinais se cumpriram no mesmo dia.
10 जेव्हा ते डोंगराजवळ आले, तेव्हा पाहा भविष्यवाद्यांचा गट त्यास भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला.
10 Chegando ele a Gabaa, veio-lhe ao encontro um grupo de profetas; o Espírito de Deus apoderou-se de Saul e ele pôs-se a profetizar no meio deles.
11 तेव्हा असे झाले की, ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती, त्या सर्वांनी पाहिले की तो भविष्यवक्त्यांबरोबर भविष्यवाणी करत आहे, ते लोक एकमेकांना म्हणू लागले की, “कीशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवक्त्यांपैकी एक आहे काय?”
11 Todos os que o tinham conhecido antes, vendo-o cantar com os profetas, perguntavam uns aos outros: Que aconteceu ao filho de Cis? Porventura também Saul está entre os profetas?
12 तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, “त्यांचा बाप कोण आहे?” यावरुन, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय?
12 Dentre a multidão, alguém perguntou: Quem é o pai dele? De onde o provérbio: Porventura também Saul está entre os profetas?
13 भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला.
13 Acabados esses cânticos proféticos, foi Saul para o lugar alto.
14 नंतर, शौलाचा काका त्यास व त्याच्या चाकराला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” तो बोलला, “आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो; ती नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलाकडे गेलो.”
14 Seu tio disse-lhe então, e ao seu servo: Aonde fostes? Saul respondeu: À procura das jumentas; mas não as encontramos e, por isso, fomos ter com Samuel.
15 मग शौलाचा काका म्हणाला, “मी तुला विनंती करतो शमुवेल तुम्हाशी काय बोलला ते मला सांग.”
15 Conta-me, replicou o tio, o que vos disse Samuel.
16 तेव्हा शौल आपल्या काकाला म्हणाला, “गाढवे सापडली असे त्याने आम्हास उघड सांगितले.” परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुवेल बोलला ती त्याने त्यास सांगितली नाही.
16 Saul disse-lhe: Declarou-nos que as jumentas tinham já sido encontradas; mas nada lhe contou do que tinha dito o vidente relativamente ao reino.
17 मग शमुवेलाने लोकांस मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले.
17 Samuel convocou o povo diante do Senhor, em Masfa:
18 तेव्हा तो इस्राएलाच्या संतानाना म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, मी मिसरातून इस्राएलास वर आणले, आणि मिसऱ्यांच्या हातातून व तुम्हास पीडणारी जी राज्ये त्या सर्वांच्या हातातून तुम्हास सोडवले.
18 Assim, disse ele aos israelitas, fala o Senhor, Deus de Israel: Eu vos tirei do Egito, livrei-vos das mãos dos egípcios e de todos os reis que vos oprimiam.
19 परंतु तुमचा परमेश्वर, जो स्वत: तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्यास तुम्ही आज नाकारले; आणि आम्हांवर राजा नेमून ठेव, असे त्यास म्हटले. तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा.”
19 Vós, porém, rejeitastes hoje o vosso Deus que vos salvou de todos os males e de todas as tribulações, e dissestes: Estabelecei um rei sobre nós. Pois bem: ponde-vos por ordem de tribos e de milhares e apresentai-vos diante do Senhor.
20 शमुवेलाने इस्राएलाचे सर्व वंश जवळ आणले, तेव्हा बन्यामिनाचा वंश निवडून घेण्यात आला.
20 Samuel mandou que se aproximassem todas as tribos de Israel, e a tribo de Benjamim foi designada {pela sorte}.
21 मग त्याने बन्यामिनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला; आणि मात्रीचे घराणे आणि कीशाचा मुलगा शौल निवडून घेण्यात आला. पण जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही.
21 Mandou vir a tribo de Benjamim por famílias, e a família de Metri foi designada. E a escolha caiu, enfim, sobre Saul, filho de Cis. Procuraram-no, mas não o encontraram.
22 मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.”
22 Consultaram então de novo o Senhor: Haverá ainda alguém que tenha vindo aqui? O Senhor respondeu: Ele escondeu-se no meio das bagagens.
23 मग त्यांनी धावत जाऊन त्यास तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.
23 Correram a buscá-lo e colocaram-no no meio da multidão, a qual ele excedia em altura do ombro para cima.
24 तेव्हा शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “ज्याला परमेश्वराने निवडले त्यास तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकात कोणी नाही!” सर्व लोक ओरडून म्हणाले, “राजा दीर्घायुषी होवो!”
24 Samuel disse ao povo: Vedes aquele que o Senhor escolheu? Não há em todo o povo quem lhe seja semelhante. E todos o aclamaram, dizendo: Viva o rei!
25 तेव्हा शमुवेलाने राजाच्या कारभाराचे नियम आणि कायदे लोकांस सांगितले, आणि ते एका पुस्तकात लिहून परमेश्वराच्या समोर ठेवले. मग शमुवेलाने सर्व लोकांस आपापल्या घरी पाठवून दिले.
25 Samuel expôs em seguida ao povo os direitos do rei, consignou-os em um livro que depositou diante do Senhor, e despediu todo o povo, cada um para a sua casa.
26 शौलही आपल्या घरी गिबा येथे गेला, आणि ज्यांच्या मनाला परमेश्वराने स्पर्श केला, अशी काही बलवान माणसे त्यांच्याबरोबर गेली.
26 Saul voltou também para sua casa, em Gabaa, acompanhado de homens valentes, cujos corações tinham sido tocados por Deus.
27 परंतु काही कुचकामी माणसे होती ती म्हणाली, “हा पुरुष आम्हास कसा काय सोडवील?” त्यांनी त्याचा अनादर केला व त्यास काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.
27 Houve, porém, alguns homens maus que disseram: Que poderá este fazer por nós? Por isso desprezaram-no e não lhe levaram presente algum. Mas Saul não fez caso disso.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Samuel 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.