1 Reis 17

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
1 Um profeta chamado Elias, de Tisbé, na região de Gileade, disse ao rei Acabe: — Em nome do
2 मग परमेश्वर एलीयाला म्हणाला,
2 Então o Senhor Deus disse a Elias:
3 “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे.
3 — Saia daqui, vá para o leste e esconda-se perto do riacho de Querite, a leste do rio Jordão.
4 त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.”
4 Você terá água do riacho para beber; e eu mandei que os corvos levem comida para você ali.
5 तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला.
5 Elias obedeceu à ordem do Senhor e foi e ficou morando perto do riacho de Querite.
6 रोज सकाळ संध्याकाळ त्यास कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
6 Ele bebia água do riacho, e os corvos vinham trazer pão e carne todas as manhãs e todas as tardes.
7 पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ आटला.
7 Mas algum tempo depois o riacho secou por falta de chuva.
8 तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला,
8 Então o Senhor Deus disse a Elias:
9 “सीदोनामधील सारफथ येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”
9 — Apronte-se e vá até a cidade de Sarepta, perto de Sidom, e fique lá. Eu mandei que uma viúva que mora ali dê comida para você.
10 तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्यास एक स्त्री भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?”
10 Então Elias foi para Sarepta. Quando estava chegando ao portão da cidade, ele encontrou a viúva, que estava catando lenha. Elias disse a ela: — Por favor, me dê um pouco de água para eu beber.
11 ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”
11 Quando ela ia indo buscar a água, ele a chamou e disse: — E traga pão também, por favor.
12 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भूकेने मरु.”
12 Porém ela respondeu: — Juro pelo seu Deus vivo, o
13 तेव्हा एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे, त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर.
13 — Não se preocupe! — disse Elias. — Vá preparar a sua comida. Mas primeiro faça um pãozinho com a farinha que você tem e traga-o para mim. Depois prepare o resto para você e para o seu filho.
14 इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.”
14 Pois o Senhor , o Deus de Israel, diz isto: “Não acabará a farinha da sua tigela, nem faltará azeite no seu jarro até o dia em que eu, o Senhor , fizer cair chuva.”
15 तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा पुत्र यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले.
15 Então a viúva foi e fez como Elias tinha dito. E todos eles tiveram comida para muitos dias.
16 पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
16 Como o Senhor havia prometido por meio de Elias, não faltou farinha na tigela nem azeite no jarro.
17 काही दिवसानंतर त्या स्त्रीचा पुत्र आजारी पडला. जिच्या मालकीचे ते घर होते, त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला.
17 Algum tempo depois, o filho da viúva ficou doente. Ele foi ficando cada vez pior e acabou morrendo.
18 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एलीया, तू तर देवाचा मनुष्य आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”
18 Então ela disse a Elias: — Homem de Deus, o que o senhor tem contra mim? Será que o senhor veio aqui para fazer com que Deus lembrasse dos meus pecados e assim provocar a morte do meu filho?
19 एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्यास ठेवले.
19 — Dê-me o seu filho! — disse Elias. Então pegou o menino dos braços da mãe e o levou para o andar de cima, para o quarto onde estava morando, e o colocou na sua cama.
20 एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?”
20 Então orou em voz alta, assim: — Ó
21 मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून करून प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”
21 Aí Elias se deitou em cima do menino três vezes e orou deste modo: — Ó
22 एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा प्राण पुन्हा येऊन तो जिवंत झाला.
22 E o Senhor Deus respondeu à oração de Elias. O menino começou a respirar outra vez e tornou a viver.
23 एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्यास सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा पुत्र जिवंत आहे.”
23 Elias pegou o menino, e o levou para baixo, para a sua mãe, e disse: — Veja! O seu filho está vivo!
24 ती स्त्री एलीयाला म्हणाली, “तू खरोखरच देवाचा मनुष्य आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्या शब्दाद्वारे बोलतो हे आता मला कळले.”
24 Então ela disse a Elias: — Agora eu sei que o senhor é um homem de Deus e que Deus realmente fala por meio do senhor!

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.