1 Reis 16
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs VC
1 यानंतर परमेश्वर हनानीचा पुत्र येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते.
1 A palavra do Senhor foi dirigida a Jeú, filho de Hanani, contra Baasa, nestes termos:
2 “तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामाच्या वाटेनेच गेलास व इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे.
2 Levantei-te do pó e estabeleci-te príncipe do meu povo de Israel; tu, porém, andaste pelo caminho de Jeroboão, e levaste meu povo de Israel a cometer pecados que excitam a minha cólera.
3 तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या घराण्याचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन.
3 Por isso vou varrer Baasa e sua casa, e farei da sua casa o que fiz da casa de Jeroboão, filho de Nabat.
4 बाशाच्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील व कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”
4 Todo membro da família de Baasa que morrer na cidade, será comido pelos cães; o que morrer no campo, comê-lo-ão as aves do céu.
5 इस्राएलाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकिकत लिहीली आहे.
5 O resto da história de Baasa, suas ações e seus grandes feitos, tudo isso se acha consignado no livro das Crônicas dos reis de Israel.
6 बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र एला हा त्यानंतर राज्य करु लागला.
6 Baasa adormeceu com seus pais e foi enterrado em Tersa. Seu filho Ela sucedeu-lhe no trono.
7 तेव्हा परमेश्वराने हनानीचा पुत्र येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वरास फार संताप आला होता. आधी यराबामाच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामाच्या कुळाचा संहार केला म्हणून परमेश्वराचा कोप झाला होता.
7 O oráculo do Senhor, transmitido pelo profeta Jeú, filho de Hanani, fora pronunciado contra Baasa e sua casa, não só por causa de todo o mal que ele tinha feito aos olhos do Senhor, irritando-o com o seu proceder e imitando a casa de Jeroboão, mas também porque Baasa tinha destruído essa casa.
8 यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्वीसावे वर्ष चालू असताना, एला हा राजा झाला. एला हा बाशाचा पुत्र तिरसामध्ये इस्राएलावर याने दोन वर्षे राज्य केले.
8 No vigésimo sexto ano de Asa, rei de Judá, Ela, filho de Baasa, tornou-se rei de Israel. Residia em Tersa e reinou dois anos.
9 जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथापैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.
9 Seu servo Zambri, que comandava a metade de sua cavalaria, conspirou contra ele. Numa ocasião em que ele bebia e se embriagava em Tersa, na casa de Arsa, intendente de seu palácio nessa cidade,
10 जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलाचा राजा झाला.
10 entrou Zambri e o assassinou, sucedendo-lhe no trono, no vigésimo sétimo ano de Asa, rei de Judá.
11 जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची सूड ऊगवला. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले.
11 Logo que ficou rei e sentou-se no trono, mandou exterminar toda a casa de Baasa, não deixando vivo nenhum filho varão, nenhum parente, nenhum amigo.
12 बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच जिम्रीने बाशाच्या घराण्याचा नाश केला
12 Desse modo, exterminou toda a casa de Baasa, assim como o Senhor o predissera contra Baasa pela boca do profeta Jeú.
13 बाशा आणि त्याचा पुत्र एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध झाला.
13 Tal foi o castigo de todos os pecados que Baasa e seu filho Ela tinham cometido e levado Israel a cometer, provocando com o culto dos ídolos a cólera do Senhor, Deus de Israel.
14 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.
14 resto da história de Ela e suas ações, tudo está consignado no livro das Crônicas dos reis de Israel.
15 आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलाचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलाच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते.
15 No vigésimo sétimo ano de Asa, rei de Judá, Zambri reinou em Tersa durante sete dias. O exército sitiava Gebeton dos filisteus.
16 जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा सर्व इस्राएलांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता.
16 Quando o exército, que estava acampado ali, ouviu dizer que Zambri tinha conspirado contra o rei e o assassinara, todo o Israel constituiu imediatamente como seu rei o general Amri.
17 तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला.
17 Este partiu de Gebeton com todo o Israel e veio sitiar Tersa.
18 नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने राजमहालाला आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले.
18 Zambri, vendo a cidade tomada, retirou-se para o fortim do palácio real e incendiou o palácio. Morreu assim
19 आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. याने यराबामाप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलाच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.
19 pelos pecados que tinha cometido, fazendo o mal aos olhos do Senhor, imitando o proceder de Jeroboão e entregando-se ao pecado ao qual Jeroboão arrastara Israel.
20 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करून उठला तेव्हाची हकिकतही या पुस्तकात आहे.
20 O resto da história de Zambri e sua conjuração, tudo está consignado no livro das Crônicas dos reis de Israel.
21 इस्राएलाच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथाचा पुत्र तिब्नी याच्या बाजूचे असून, त्यास राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते.
21 Então se dividiu o povo de Israel em duas facções: metade era por Tebni, filho de Ginet, e queria fazê-lo rei, e metade por Amri.
22 तिब्नीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्नी मारला गेला आणि अम्री राजा झाला.
22 O partido de Amri prevaleceu contra o de Tebni, filho de Ginet. Tebni morreu, e reinou Amri.
23 यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना, अम्री इस्राएलाचा राजा झाला. अम्रीने इस्राएलावर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता.
23 No trigésimo primeiro ano de Asa, rei de Judá, Amri tornou-se rei de Israel e reinou durante doze anos. Depois de ter reinado seis anos em Tersa,
24 त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दोन किक्कार रूपे देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले.
24 comprou o monte de Samaria a Somer por duzentos talentos de prata. Construiu uma cidade nesse monte e chamou-a Samaria, do nome de Somer, a quem pertencera o monte.
25 अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट, त्या गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.
25 Amri fez o mal aos olhos do Senhor, mais ainda que todos os seus predecessores.
26 नबाटाचा पुत्र यराबाम याने जी पापे केली तीच याने केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलावर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. व्यर्थ दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
26 Andou por todo o caminho de Jeroboão, filho de Nabat, e nos pecados com que este fizera pecar Israel, provocando com seus ídolos a cólera do Senhor, Deus de Israel.
27 अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकिकत इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे.
27 O resto da história de Amri, suas ações e seus grandes feitos, tudo isso se acha consignado no livro das Crônicas dos reis de Israel.
28 अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र अहाब हा राज्य करु लागला.
28 Amri adormeceu com seus pais e foi sepultado em Samaria. Seu filho Acab sucedeu-lhe no trono.
29 यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.
29 No trigésimo oitavo ano de Asa, rei de Judá, Acab, filho de Amri, tornou-se rei de Israel e reinou vinte e dois anos sobre Israel em Samaria.
30 परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते सर्व अम्रीचा मुलगा अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.
30 Acab, filho de Amri, fez o mal aos olhos do Senhor, e mais ainda que todos os seus predecessores.
31 नबाटाचा पुत्र यराबाम याने केले ते तर त्यास शुल्लक वाटले म्हणून की काय त्याने आणखी दुष्कृत्ये केली. एथबाल याची कन्या ईजबेल हिच्याशी त्याने लग्र केले. एथबाल हा सीदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बआल या दैवतांच्या भजनी लागला.
31 Como se lhe não bastasse o andar nos pecados de Jeroboão, filho de Nabat, desposou ainda Jezabel, filha de Etbaal, rei dos sidônios, e chegou até a render culto a Baal, prostrando-se diante dele.
32 शोमरोन येथे त्याने बआलाच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली.
32 Erigiu um altar a Baal no templo que lhe edificou em Samaria.
33 अशेराच्या पूजेसाठी अहाबाने स्तंभ उभारला. आपल्या आधीच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.
33 Acab fez também a asserá, irritando assim o Senhor, Deus de Israel, mais ainda que todos os seus predecessores no trono de Israel.
34 याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा पुत्र अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब हा वारला. नूनचा पुत्र यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले.
34 No tempo de Acab, Hiel de Betel reconstruiu Jericó. Lançou-lhe os alicerces ao preço de Abirão, seu primogênito, e pôs-lhe as portas ao preço de Segub, seu último filho, assim como o Senhor o predissera pela boca de Josué, filho de Num.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 16, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.