1 Reis 15

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 नबाटाचा पुत्र यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, रहबामाचा पुत्र अबीयाम यहूदाचा पुढचा राजा झाला.
1 E, no décimo oitavo ano do rei Jeroboão, filho de Nebate, Abias começou a reinar sobre Judá.
2 अबीयाने तीन वर्षे यरूशलेमेत राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमाची कन्या.
2 E três anos reinou em Jerusalém; e era o nome de sua mãe Maaca, filha de Absalão.
3 आपल्या वडिलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ठ नव्हता.
3 E andou em todos os pecados que seu pai tinha cometido antes dele; e seu coração não foi perfeito para com o Senhor , seu Deus, como o coração de Davi, seu pai.
4 दाविदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याच्याखातर त्याने त्याचा दीप यरूशलेमेत कायम राहू दिला. त्यानंतर त्याच्या पुत्राला उभारले, व यरूशलेम सुरक्षित ठेवले.
4 Mas, por amor de Davi, o Senhor lhe deu uma lâmpada em Jerusalém, levantando seu filho depois dele e confirmando Jerusalém.
5 दाविदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.
5 Porquanto Davi tinha feito o que era reto aos olhos do Senhor e não se tinha desviado de tudo o que lhe ordenara em todos os dias da sua vida, senão só no caso de Urias, o heteu.
6 रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.
6 E houve guerra entre Roboão e Jeroboão todos os dias da sua vida.
7 अबीयामाने आणखी जे काही केले त्याची नोंद, यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे.
7 Quanto ao mais dos atos de Abias, e a tudo quanto fez, porventura, não está tudo escrito no Livro das Crônicas dos Reis de Judá? Também houve guerra entre Abias e Jeroboão.
8 अबीयामाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा पुत्र आसा राज्य करु लागला.
8 E Abias dormiu com seus pais, e o sepultaram na Cidade de Davi; e Asa, seu filho, reinou em seu lugar.
9 यराबामाच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला,
9 E, no vigésimo ano de Jeroboão, rei de Israel, começou Asa a reinar em Judá
10 आसाने यरूशलेमेवर एक्केचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमाची कन्या.
10 e quarenta e um anos reinou em Jerusalém; e era o nome de sua mãe Maaca, filha de Absalão.
11 आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.
11 E Asa fez o que era reto aos olhos do Senhor , como Davi, seu pai,
12 त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष वेश्या होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडिलांनी केलेल्या मूर्ती पूर्णपणे हलवल्या.
12 porque tirou da terra os rapazes escandalosos, e tirou todos os ídolos que seus pais fizeram,
13 आपली आजी माका हिला आसाने राणीच्या पदावरून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली.
13 e até a Maaca, sua mãe, removeu para que não fosse rainha, porquanto tinha feito um horrível ídolo a Aserá; também Asa desfez o seu ídolo horrível e o queimou junto ao ribeiro de Cedrom.
14 त्याने उच्च स्थानाची नासधूस केली नाही, मात्र आसा आयुष्यभर परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
14 Os altos, porém, se não tiraram; todavia, foi o coração de Asa reto para com o Senhor todos os seus dias.
15 आसा आणि त्याचे वडिल यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करून घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यामध्ये होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.
15 E à Casa do Senhor trouxe as coisas consagradas de seu pai e as coisas que ele mesmo consagrara: prata, e ouro, e utensílios.
16 आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.
16 E houve guerra entre Asa e Baasa, rei de Israel, todos os seus dias.
17 इस्राएलचा राजा बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणे जाणे त्यास थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले.
17 Porque Baasa, rei de Israel, subiu contra Judá e edificou a Ramá, para que a ninguém fosse permitido sair, nem entrar junto a Asa, rei de Judá.
18 आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामाचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेन-हदाद हा टब्रिम्मोनचा पुत्र आणि टब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.
18 Então, Asa tomou toda a prata e ouro que ficara nos tesouros da Casa do Senhor e os tesouros da casa do rei, e os entregou nas mãos de seus servos, e os enviou a Ben-Hadade, filho de Tabrimom, filho de Heziom, rei da Síria, que habitava em Damasco, dizendo:
19 आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडिल आणि तुझे वडिल यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून जाईल.”
19 Aliança há entre mim e ti, entre meu pai e teu pai; vês aqui que te mando um presente, prata e ouro; vai e anula a tua aliança com Baasa, rei de Israel, para que se retire de sobre mim.
20 राजा बेन-हदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ-माका, गालिल सरोवरालगतची गावे, किन्नेरोथ आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य इस्राएलावर पाठवले.
20 E Ben-Hadade deu ouvidos ao rei Asa, e enviou os capitães dos exércitos que tinha contra as cidades de Israel, e feriu a Ijom, e a Dã, e a Abel-Bete-Maaca, e a toda a Quinerete, com toda a terra de Naftali.
21 या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबूतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला.
21 E sucedeu que, ouvindo-o Baasa, deixou de edificar a Ramá e ficou em Tirza.
22 मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले. एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील गिबा आणि मिस्पा येथे या सर्व वस्तू त्यांनी वाहून नेल्या. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
22 Então, o rei Asa fez apregoar por toda a Judá que todos, sem exceção, trouxessem as pedras de Ramá e a sua madeira com que Baasa edificara; e com elas edificou o rei Asa a Geba de Benjamim e a Mispa.
23 आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
23 Quanto ao mais de todos os atos de Asa, e a todo o seu poder, e a tudo quanto fez, e às cidades que edificou, porventura, não está tudo escrito no Livro das Crônicas dos Reis de Judá? Porém, no tempo da sua velhice, padeceu dos pés.
24 आसाचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीद याच्या नगरात त्याचे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट राज्य करु लागला.
24 E Asa dormiu com seus pais e foi sepultado com seus pais na Cidade de Davi, seu pai; e Josafá, seu filho, reinou em seu lugar.
25 यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामाचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
25 E Nadabe, filho de Jeroboão, começou a reinar sobre Israel no ano segundo de Asa, rei de Judá; e reinou sobre Israel dois anos.
26 नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडिल यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामाने इस्राएल लोकांसही पाप करायला लावले होते.
26 E fez o que era mau aos olhos do Senhor e andou nos caminhos de seu pai e no seu pecado com que tinha feito pecar a Israel.
27 बाशा हा अहीयाचा पुत्र. हे इस्साखाराच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.
27 E conspirou contra ele Baasa, filho de Aías, da casa de Issacar, e feriu-o Baasa em Gibetom, que era dos filisteus, quando Nadabe e todo o Israel cercavam a Gibetom.
28 आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.
28 E matou-o Baasa no ano terceiro de Asa, rei de Judá, e reinou em seu lugar.
29 बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया यांच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.
29 E sucedeu, pois, que, reinando ele, feriu a toda a casa de Jeroboão; nada de Jeroboão deixou que tivesse fôlego, até o destruir, conforme a palavra do Senhor que dissera pelo ministério de seu servo Aías, o silonita,
30 राजा यराबामाने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांसही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामावर कोप झाला
30 por causa dos pecados de Jeroboão, o qual pecou e fez pecar a Israel, e por causa da provocação com que provocara ao Senhor , Deus de Israel.
31 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत.
31 Quanto ao mais dos atos de Nadabe e a tudo quanto fez, porventura, não está tudo escrito no Livro das Crônicas dos Reis de Israel?
32 बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
32 E houve guerra entre Asa e Baasa, rei de Israel, todos os seus dias.
33 यहूदाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा पुत्र बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले.
33 No ano terceiro de Asa, rei de Judá, Baasa, filho de Aías, começou a reinar sobre todo o Israel em Tirza, e reinou vinte e quatro anos.
34 पण परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपले वडिल यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली होती.
34 E fez o que era mau aos olhos do Senhor e andou no caminho de Jeroboão e no seu pecado com que tinha feito pecar a Israel.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.