1 Reis 13

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या मनुष्यास) यहूदाहून बेथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता.
1 Eis que, por ordem do Senhor , veio de Judá a Betel um homem de Deus; e Jeroboão estava junto ao altar, para queimar incenso.
2 परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”
2 Clamou o profeta contra o altar, por ordem do Senhor , e disse: Altar, altar! Assim diz o Senhor : Eis que um filho nascerá à casa de Davi, cujo nome será Josias, o qual sacrificará sobre ti os sacerdotes dos altos que queimam sobre ti incenso, e ossos humanos se queimarão sobre ti.
3 हे निश्चित घडेल, अशी संदेष्ट्याने लोकांस खूण दिली. तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल, असे परमेश्वराने सांगितले आहे.”
3 Deu, naquele mesmo dia, um sinal, dizendo: Este é o sinal de que o Senhor falou: Eis que o altar se fenderá, e se derramará a cinza que há sobre ele.
4 राजाने जेव्हा देवाच्या मनुष्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेल येथे ऐकले. तेव्हा यराबामाने वेदीवरील आपला हात उचलून त्या मनुष्याकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” मग ज्या हाताने त्याने त्या मनुष्याकडे निर्देश केला होता तो हे बोलत असताना लुळा पडला. त्यास तो हलवता येईना
4 Tendo o rei ouvido as palavras do homem de Deus, que clamara contra o altar de Betel, Jeroboão estendeu a mão de sobre o altar, dizendo: Prendei-o! Mas a mão que estendera contra o homem de Deus secou, e não a podia recolher.
5 तसेच, वेदी भंग पावली. त्यावरील राख जमिनीवर पडली. देवाच्या मनुष्याच्या तोंडून परमेश्वराचे वचन निघत होते याची ती खूण होती.
5 O altar se fendeu, e a cinza se derramou do altar, segundo o sinal que o homem de Deus apontara por ordem do Senhor .
6 तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.” तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला.
6 Então, disse o rei ao homem de Deus: Implora o favor do Senhor , teu Deus, e ora por mim, para que eu possa recolher a mão. Então, o homem de Deus implorou o favor do Senhor , e a mão do rei se lhe recolheu e ficou como dantes.
7 राजा त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल, काहीतरी खा मग मी तुला इनाम देईन.”
7 Disse o rei ao homem de Deus: Vem comigo a casa e fortalece-te; e eu te recompensarei.
8 पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही.
8 Porém o homem de Deus disse ao rei: Ainda que me desses metade da tua casa, não iria contigo, nem comeria pão, nem beberia água neste lugar.
9 काहीही न खाण्यापिण्याबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच, येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही, अशीही त्याची आज्ञा आहे.”
9 Porque assim me ordenou o Senhor pela sua palavra, dizendo: Não comerás pão, nem beberás água; e não voltarás pelo caminho por onde foste.
10 त्याप्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना, ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.
10 E se foi por outro caminho; e não voltou pelo caminho por onde viera a Betel.
11 बेथेल नगरात एक वृध्द देवाचा मनुष्य राहत होता. त्याच्या मुलांनी त्यास या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. राजाला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले.
11 Morava em Betel um profeta velho; vieram seus filhos e lhe contaram tudo o que o homem de Deus fizera aquele dia em Betel; as palavras que dissera ao rei, contaram-nas a seu pai.
12 तेव्हा देवाचा मनुष्य म्हणाला, “कोणत्या रस्त्याने तो परतला?” तेव्हा मुलांनी आपल्या वडिलांना यहूदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला.
12 Perguntou-lhes o pai: Por que caminho se foi? Mostraram seus filhos o caminho por onde fora o homem de Deus que viera de Judá.
13 त्या वृध्द संदेष्ट्याने “मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले.” त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरुन निघाला.
13 Então, disse a seus filhos: Albardai-me um jumento. Albardaram-lhe o jumento, e ele montou.
14 हा वृध्द संदेष्टा त्या देवाच्या माणासाच्या मागावर निघाला. तेव्हा तो एला वृक्षाखाली बसलेला आढळला. वृध्द संदेष्ट्याने त्यास विचारले, “तूच का तो यहूदाहून आलेला देवाचा मनुष्य?” संदेष्ट्याने यावर होकार दिला.
14 E foi após o homem de Deus e, achando-o sentado debaixo de um carvalho, lhe disse: És tu o homem de Deus que vieste de Judá? Ele respondeu: Eu mesmo.
15 तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आमच्याकडे जेव.”
15 Então, lhe disse: Vem comigo a casa e come pão.
16 पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही.
16 Porém ele disse: Não posso voltar contigo, nem entrarei contigo; não comerei pão, nem beberei água contigo neste lugar.
17 तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
17 Porque me foi dito pela palavra do Senhor : Ali, não comerás pão, nem beberás água, nem voltarás pelo caminho por que foste.
18 यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणि पुढे त्याने खोटे सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”
18 Tornou-lhe ele: Também eu sou profeta como tu, e um anjo me falou por ordem do Senhor , dizendo: Faze-o voltar contigo a tua casa, para que coma pão e beba água. (Porém mentiu-lhe.)
19 तेव्हा तो देवाचा मनुष्य वृध्द संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवणखाण केले.
19 Então, voltou ele, e comeu pão em sua casa, e bebeu água.
20 ते मेजावर बसलेले त्यास परत आणणाऱ्या संदेष्ट्याशी परमेश्वर बोलला.
20 Estando eles à mesa, veio a palavra do Senhor ao profeta que o tinha feito voltar;
21 वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या मनुष्यास म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस, असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस.
21 e clamou ao homem de Deus, que viera de Judá, dizendo: Assim diz o Senhor : Porquanto foste rebelde à palavra do Senhor e não guardaste o mandamento que o Senhor , teu Deus, te mandara,
22 येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.”
22 antes, voltaste, e comeste pão, e bebeste água no lugar de que te dissera: Não comerás pão, nem beberás água, o teu cadáver não entrará no sepulcro de teus pais.
23 या देवाच्या माणासाचे खाणेपिणे झाल्यावर वृध्द संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहूदाचा संदेष्टा (देवाचा मनुष्य) निघाला.
23 Depois de o profeta a quem fizera voltar haver comido pão e bebido água, albardou para ele o jumento.
24 परतीच्या वाटेवर एका सिंहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्यास मारुन टाकले. देवाच्या मनुष्याचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते.
24 Foi-se, pois, e um leão o encontrou no caminho e o matou; o seu cadáver estava atirado no caminho, e o jumento e o leão, parados junto ao cadáver.
25 इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.
25 Eis que os homens passaram e viram o corpo lançado no caminho, como também o leão parado junto ao corpo; e vieram e o disseram na cidade onde o profeta velho habitava.
26 वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या मनुष्यास फसवून आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा मनुष्य. त्याने परमेश्वराचे म्हणणे अवमानले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्यास मारायला सिंहाच्या स्वाधीन केले असावे. असे होणार हे परमेश्वराने सांगितले होते.”
26 Ouvindo-o o profeta que o fizera voltar do caminho, disse: É o homem de Deus, que foi rebelde à palavra do Senhor ; por isso, o Senhor o entregou ao leão, que o despedaçou e matou, segundo a palavra que o Senhor lhe tinha dito.
27 मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला.” मुलांनी त्याचे ऐकले.
27 Então, disse a seus filhos: Albardai-me o jumento. Eles o albardaram.
28 तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.
28 Ele se foi e achou o cadáver atirado no caminho e o jumento e o leão, parados junto ao cadáver; o leão não tinha devorado o corpo, nem despedaçado o jumento.
29 वृध्द देवाच्या संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला.
29 Então, o profeta levantou o cadáver do homem de Deus, e o pôs sobre o jumento, e o tornou a levar; assim, veio o profeta velho à cidade, para o chorar e enterrar.
30 त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखाच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.”
30 Depositou o cadáver no seu próprio sepulcro; e o prantearam, dizendo: Ah! Irmão meu!
31 मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी देवाच्या मनुष्या शेजारीच विसावू द्या.
31 Depois de o haver sepultado, disse a seus filhos: Quando eu morrer, enterrai-me no sepulcro em que o homem de Deus está sepultado; ponde os meus ossos junto aos ossos dele.
32 परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल.”
32 Porque certamente se cumprirá o que por ordem do Senhor clamou contra o altar que está em Betel e contra todas as casas dos altos que estão nas cidades de Samaria.
33 राजा यराबामामध्ये काहीही फरक पडला नाही. तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या मनुष्यांची तो याजक म्हणून निवड करत राहिला. हे पूरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत. ज्याला हवे त्यास याजक बनता येई.
33 Depois destas coisas, Jeroboão ainda não deixou o seu mau caminho; antes, de entre o povo tornou a constituir sacerdotes para lugares altos; a quem queria, consagrava para sacerdote dos lugares altos.
34 या गोष्टीने यराबामाच्या घराण्यास पाप लागले व त्यामुळे त्यांचा सर्वनाश झाला. आणि भूतलावरून ते नष्ट झाले.
34 Isso se tornou em pecado à casa de Jeroboão, para destruí-la e extingui-la da terra.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.