1 Reis 11
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NAA
1 राजा शलमोनाचे अनेक विदेशी स्त्रिंयावर प्रेम जडले होते. फारोच्या मुलीखेरीज, हित्ती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले.
1 Além da filha de Faraó, Salomão amou muitas mulheres estrangeiras: moabitas, amonitas, edomitas, sidônias e heteias,
2 परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांस सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हास त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला.
2 mulheres das nações de que o Senhor tinha dito aos filhos de Israel: “Não casem com elas, nem casem elas com vocês, pois perverteriam o coração de vocês, para seguirem os seus deuses.” A estas Salomão se apegou pelo amor.
3 त्यास सातशे स्त्रिया होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्यास आणखी तीनशे दासीही होत्या. या बायकांनी त्यास देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.
3 Tinha setecentas mulheres que eram princesas e trezentas concubinas; e suas mulheres lhe perverteram o coração.
4 तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्यास इतर दैवतांकडे वळवले. आपले वडिल दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही.
4 Sendo já velho, suas mulheres lhe perverteram o coração para seguir outros deuses, e o coração dele não era fiel ao Senhor , seu Deus, como havia sido fiel o coração de Davi, seu pai.
5 सीदोनी लोकांच्या अष्टारोथ देवाची शलमोनाने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही शलमोनाने भजले.
5 Salomão seguiu Astarote, deusa dos sidônios, e Milcom, abominação dos amonitas.
6 अशाप्रकारे शलमोनाने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले. आपले वडिल दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वरास पूर्णपणे अनुसरला नाही.
6 Assim, Salomão fez o que era mau aos olhos do Senhor e não perseverou em seguir o Senhor , como Davi, seu pai, havia feito.
7 कमोश या मवाबी लोकांच्या अमंगळ दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरूशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या अमंगळ दैवतासाठीही एक उंच स्थान बांधले.
7 Nesse tempo, sobre o monte que fica diante de Jerusalém, Salomão construiu um santuário a Quemos, abominação de Moabe, e a Moloque, abominação dos filhos de Amom.
8 आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच पूजास्थळे बांधली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.
8 Assim fez para todas as suas mulheres estrangeiras, as quais queimavam incenso e ofereciam sacrifícios aos seus deuses.
9 इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावृत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते.
9 O Senhor se indignou contra Salomão, por ter desviado o seu coração do Senhor , Deus de Israel, que lhe havia aparecido duas vezes
10 इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले.
10 e ordenado que não seguisse outros deuses. Ele, porém, não guardou o que o Senhor lhe havia ordenado.
11 तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्याकडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या सेवकाला मी ते देईन.
11 Por isso o Senhor disse a Salomão: — Já que você procedeu assim e não guardou a minha aliança, nem os meus estatutos que lhe ordenei, vou tirar o reino de você e dá-lo a um dos seus servos.
12 पण तुझे वडिल दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा पुत्र गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन.
12 No entanto, por amor a Davi, seu pai, não farei isso enquanto você estiver vivo, mas durante o reinado do seu filho.
13 तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दाविदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरूशलेमेसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”
13 Todavia, não tirarei o reino todo; darei uma tribo a seu filho, por amor a Davi, meu servo, e por amor a Jerusalém, que escolhi.
14 आणि मग परमेश्वराने अदोमी हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमाच्या राजघराण्यातला होता.
14 O Senhor levantou um adversário contra Salomão, a saber, Hadade, o edomita, que era da linhagem real de Edom.
15 त्याचे असे झाले दाविदाने पूर्वी अदोमाचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दाविदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. तेव्हा त्याने अदोमातील सर्वांची कत्तल केली होती.
15 Porque, quando Davi esteve em Edom, Joabe, o comandante do exército, que tinha ido sepultar os mortos, matou todos os homens em Edom.
16 यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोम येथे सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोम येथे कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही.
16 Porque Joabe ficou ali seis meses com todo o Israel, até que eliminou todos os homens em Edom.
17 हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडिलांचे काही अदोमी सेवकही त्याच्याबरोबर गेले.
17 Porém Hadade fugiu para o Egito na companhia de alguns homens edomitas, dos servos de seu pai. Na ocasião, Hadade era ainda muito jovem.
18 मिद्यानाहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हे सगळे लोक मिळून मिसरला गेले. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्नवस्त्राची सोय केली.
18 Partiram de Midiã e foram até Parã, de onde levaram consigo alguns homens e chegaram ao Egito, a Faraó, rei do Egito, que deu a Hadade uma casa, e lhe prometeu sustento, e lhe deu terras.
19 फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्नही लावून दिले. त्याची राणी तहपनेस हिची ती बहीण होती.
19 Hadade encontrou favor aos olhos de Faraó, tanto que este lhe deu por mulher a irmã de sua própria mulher,
20 या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा पुत्र झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलांबरोबरच वाढला.
20 a irmã de Tafnes, a rainha. A irmã de Tafnes deu-lhe à luz seu filho Genubate, que foi criado por Tafnes na casa de Faraó, onde Genubate ficou entre os filhos de Faraó.
21 दाविदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्यास कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”
21 Quando Hadade soube no Egito que Davi tinha morrido e que Joabe, comandante do exército, estava morto, disse a Faraó: — Deixe-me voltar para a minha terra.
22 तेव्हा फारो त्यास म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्वकाही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?” तेव्हा “हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.”
22 Então Faraó lhe perguntou: — Mas o que lhe falta comigo, para que você queira voltar para a sua terra? Hadade respondeu: — Não me falta nada; mas deixe-me ir.
23 देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा पुत्र. सोबाचा राजा हददेर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला.
23 Deus levantou mais um adversário contra Salomão, a saber, Rezom, filho de Eliada, que havia fugido de seu senhor Hadadezer, rei de Zobá.
24 दाविदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर, रजोनाने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला.
24 Ele ajuntou homens e se fez chefe de um bando. Depois do morticínio feito por Davi, eles se foram para Damasco, onde habitaram e fizeram de Rezom o seu rei.
25 अरामावर रजोनाने राज्य केले. इस्राएलाबद्दल त्यास चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलाला बराच त्रास दिला.
25 Este foi adversário de Israel durante toda a vida de Salomão, e lhe fez mal, como Hadade havia feito. Rezom detestava Israel e reinava sobre a Síria.
26 नबाट याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडिल वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.
26 Jeroboão, filho de Nebate, efraimita de Zereda, servo de Salomão, e cuja mãe era uma viúva chamada Zerua, revoltou-se contra o rei.
27 त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीद राजाच्या नगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करून घेत होता.
27 Esta foi a causa por que levantou a sua mão contra o rei: Salomão estava edificando Milo e reparando as brechas da cidade de seu pai Davi.
28 यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्यास योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले.
28 Jeroboão era um homem valente e capaz. Quando Salomão viu que ele era um jovem que fazia bem o seu trabalho, ele o encarregou de todos os trabalhadores forçados da casa de José.
29 एकदा यराबाम यरूशलेमेच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्यास शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखी कोणी नव्हते.
29 Aconteceu que, nesse tempo, quando Jeroboão estava saindo de Jerusalém, o profeta Aías, de Siló, o encontrou no caminho. O profeta estava usando uma capa nova, e os dois estavam sozinhos no campo.
30 अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.
30 Aías pegou a capa nova que estava usando, rasgou-a em doze pedaços
31 मग अहीया यराबामाला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत:जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन.
31 e disse a Jeroboão: — Pegue dez pedaços, porque assim diz o
32 आणि दाविदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरूशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी यरूशलेम नगराची निवड केली आहे.
32 Porém ele terá uma tribo, por amor a Davi, meu servo, e por amor a Jerusalém, a cidade que escolhi de todas as tribos de Israel.
33 शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मवाबाचा कमोश, अम्मोन्याचा मिलकोम या परकीय दैवतांचे तो भजन पूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडिल दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही.
33 Porque Salomão me abandonou e se inclinou diante de Astarote, deusa dos sidônios, diante de Quemos, deus de Moabe, e diante de Milcom, deus dos filhos de Amom. Ele não andou nos meus caminhos para fazer o que é reto aos meus olhos, a saber, para guardar os meus estatutos e os meus juízos, como fez Davi, seu pai.
34 तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर अधिपती राहील. माझा सेवक दावीद याच्याखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दाविदाने पाळल्या म्हणून मी त्यास निवडले.
34 Porém não vou tirar de Salomão o reino todo; pelo contrário, farei com que ele governe durante todos os dias da sua vida, por amor a Davi, meu servo, que escolhi e que guardou os meus mandamentos e os meus estatutos.
35 पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन.
35 Mas da mão do filho de Salomão tomarei o reino, a saber, as dez tribos, e as darei a você.
36 शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरूशलेमामध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरूशलेम हे नगर मी आपले स्वत:चे म्हणून निवडले.
36 E ao filho dele darei uma tribo, para que Davi, meu servo, tenha sempre uma lâmpada diante de mim em Jerusalém, a cidade que escolhi para pôr ali o meu nome.
37 बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.
37 Quanto a você, eu o tomarei e você reinará sobre tudo o que desejar a sua alma; e você será rei sobre Israel.
38 माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दाविदाप्रमाणे माझी सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दाविदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन.
38 Se você ouvir tudo o que eu lhe ordenar, e andar nos meus caminhos, e fizer o que é reto aos meus olhos, guardando os meus estatutos e os meus mandamentos, como fez Davi, meu servo, eu estarei com você, e lhe edificarei uma casa estável, como edifiquei para Davi, e darei Israel a você.
39 यामुळे मी दाविदाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.”
39 Por causa disso, afligirei a descendência de Davi, mas não para sempre.”
40 शलमोनाने यराबामाच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामाने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.
40 Salomão tentou matar Jeroboão, mas este se levantou e fugiu para o Egito, para junto de Sisaque, rei do Egito; e ali permaneceu até a morte de Salomão.
41 शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या नाहीत काय?
41 Quanto aos demais atos de Salomão, a tudo o que fez e à sua sabedoria, não está tudo escrito no Livro da História de Salomão?
42 यरूशलेमेतून शलमोनाने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले
42 O tempo que Salomão reinou sobre todo o Israel, em Jerusalém, foi de quarenta anos.
43 मग शलमोन मरण पावला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीद याच्या नगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या ठिकाणी रहबाम राज्य करू लागला.
43 Salomão morreu e foi sepultado na Cidade de Davi, seu pai, e Roboão, seu filho, reinou em seu lugar.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.