1 Crônicas 28

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 दावीदाने इस्राएलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूर वीर आणि लढवय्ये यांना यरूशलेमेत एकत्र बोलावले.
1 O rei Davi ordenou que todas as autoridades de Israel se reunissem na cidade de Jerusalém. Portanto, se reuniram em Jerusalém todos os chefes das tribos , os oficiais que cuidavam dos negócios do reino, os chefes dos grupos de famílias, os administradores das propriedades e de todo o gado que pertenciam ao rei e aos seus filhos e também os funcionários do palácio, os oficiais superiores do exército e outros homens importantes.
2 नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.
2 Então Davi ficou de pé na frente deles e disse: — Povo da minha terra, meus irmãos, escutem! Eu quis construir uma casa onde ficasse guardada para sempre a
3 पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.’
3 mas ele me proibiu de construí-lo porque sou soldado e fiz correr muito sangue.
4 इस्राएलाचा देव परमेश्वर याने मला सर्वकाळ इस्राएलाचा राजा होण्यासाठी माझ्या वडिलाच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे. कारण त्याने यहूदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली.
4 O Senhor , o Deus de Israel, escolheu a mim e aos meus descendentes a fim de governarmos o povo de Israel para sempre. Pois ele escolheu a tribo de Judá para que dela saíssem os reis; da tribo de Judá ele preferiu a família do meu pai; e entre os filhos do meu pai ele me escolheu para me fazer rei de todo o povo de Israel.
5 देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्राएलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे.
5 Ele me deu muitos filhos e entre todos eles escolheu Salomão para governar Israel, o reino do Senhor .
6 त्याने मला म्हटले तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील. कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.
6 E Davi continuou: — Deus me disse: “O seu filho Salomão é quem irá construir o meu Templo. Eu o escolhi para ser meu filho e serei pai dele.
7 माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.
7 Se ele continuar a obedecer a todas as minhas leis e mandamentos, como tem feito até hoje, eu firmarei o seu reino para sempre”.
8 तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्वकाळचे वतन म्हणून द्यावा.
8 Davi disse também: — Portanto, agora, na presença do nosso Deus e desta assembleia de todo o povo de Israel, o povo do
9 हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत:करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील.
9 E a Salomão ele disse: — Meu filho, reconheça o Deus do seu pai e sirva-o com todo o coração e de livre e espontânea vontade. Ele conhece todos os seus pensamentos e desejos. Se você o procurar, ele o aceitará; mas, se o abandonar, ele o rejeitará para sempre.
10 परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.”
10 Você deve compreender que o Senhor o escolheu para construir o seu santo Templo. Portanto, seja forte e mãos à obra!
11 दावीदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला.
11 Davi entregou a Salomão a planta de todos os prédios do Templo, dos depósitos, de todas as salas e do Lugar Santíssimo , onde os pecados são perdoados.
12 त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा.
12 Deu também as plantas de tudo o que tinha planejado para os pátios e as salas que deveriam ficar ao seu redor e as plantas dos depósitos onde seriam guardados os objetos do Templo e as ofertas dedicadas a Deus.
13 याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली.
13 Davi também deu a Salomão por escrito a maneira de organizar os sacerdotes e levitas no cumprimento dos seus deveres, para fazer o trabalho do Templo e para cuidar de todos os objetos do Templo.
14 सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले.
14 O plano determinava o peso da prata e do ouro que deveriam ser usados para fazer os objetos do Templo,
15 सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले.
15 para fazer cada lamparina e candelabro ,
16 आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले.
16 as mesas de prata e cada uma das mesas de ouro onde seriam colocados os pães oferecidos a Deus.
17 शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुप्याच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले.
17 Também determinava o peso do ouro puro que deveria ser usado para fazer os garfos, as bacias e as jarras, o peso da prata e do ouro para fazer os pratos
18 धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करुब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले.
18 e o peso do ouro puro que deveria ser usado para fazer o altar onde o incenso é queimado e para fazer o carro onde seriam colocados os querubins , que com as asas estendidas cobrem a arca da aliança de Deus, o Senhor .
19 दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.”
19 O rei Davi disse: — Tudo o que está nestas plantas foi escrito de acordo com as instruções que o
20 दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.
20 E disse ao seu filho Salomão: — Seja forte e corajoso e mãos à obra! Não desanime, nem tenha medo, pois o
21 देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामांत कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागिर कामात मदत करण्यास तुझ्याबरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील.”
21 Os sacerdotes e os levitas foram escalados para cuidar dos serviços do Templo. Trabalhadores que sabem fazer todos os tipos de serviço estão prontos para ajudá-lo, e todo o povo e os seus líderes estão às suas ordens.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 28, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.