1 Crônicas 19
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARIB
1 आणि यानंतर असे झाले की, अम्मोन्याचा नाहाश राजा याच्या मृत्यू झाला व त्याच्याजागी त्याचा पुत्र राजा झाला.
1 Aconteceu, depois disto, que Naás, rei dos amonitas, morreu; e seu filho reinou em seu lugar.
2 दावीदाने म्हणाला, “नाहाशाचा पुत्र हानून याच्यावर मी दया करीन. कारण त्याच्या पित्याने माझ्यावर दया केली होती.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनेसाठी आपले दूत अम्मोनी लोकांच्या देशी पाठवले.
2 Então disse Davi: usarei de benevolência para com Hanum, filho de Naás, porque seu pai usou de benevolência para comigo. Pelo que Davi enviou mensageiros para o consolarem acerca de seu pai. Mas quando os servos de Davi chegaram à terra dos amonitas, a Hanum, para o consolarem,
3 तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनाला म्हणाले की, “दावीदाने तुझे सांत्वन करण्याकरता किंवा तुझ्या मृत पित्याचा मान केला असे तुला वाटते का? त्याने या लोकांस तुझा प्रदेश पाहण्यास आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्यास तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.”
3 disseram os príncipes dos amonitas a Hanum: Pensas que Davi quer honrar a teu pai, porque te mandou consoladores? Não vieram ter contigo os seus servos a esquadrinhar, a transtornar e a espiar a terra?
4 हे ऐकून हानूनाने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. त्यांची कमरेपर्यंतची वस्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.
4 Pelo que Hanum tomou os servos de Davi, raspou-lhes a barba, e lhes cortou as vestes pelo meio até o alto das coxas, e os despediu.
5 मग कोणी जाऊन दावीदाला ही बातमी सांगितली, तेव्हा त्याने भेटण्यास माणसे पाठवली, कारण त्या मनुष्यांना मोठी लाज वाटली आणि राजाने त्यांना निरोप पाठवला तुमच्या दाढ्या वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे रहा मग इकडे या.
5 Então foram alguns e avisaram a Davi acerca desses homens; pelo que ele mandou mensageiros ao seu encontro, pois estavam sobremaneira envergonhados. Disse o rei: Ficai em Jericó até que vos torne a crescer a barba, e então voltai.
6 जेव्हा अम्मोन्यांनी पाहिले की, दावीदाला आम्ही दुर्गंध असे झाले आहोत, तेव्हा हानून आणि अम्मोनी लोकांनी मेसोपटेम्या व अराम माका व सोबा येथून रथ आणि सारथी मोलाने आणण्यासाठी एक हजार किक्कार रुपे पाठवले.
6 Vendo os amonitas que se tinham feito odiosos para com Davi, Hanum e os amonitas enviaram mil talentos de prata, para alugarem para si carros e cavaleiros de Mesopotâmia, de Arã-Maacá e de Zobá.
7 अम्मोन्यांनी बत्तीस हजार रथ व माकाच्या राजा व त्याचे लोक मोलाने ठेवले; तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ दिला. अम्मोनी आपल्या नगरातून एकत्र होऊन लढायला आले.
7 E alugaram para si trinta e dois mil carros e o rei de Maacá com a sua gente, os quais vieram e se acamparam diante de Medeba; também os amonitas se ajuntaram das suas cidades e vieram para a guerra.
8 दावीदाने हे ऐकले तेव्हा त्याने यवाबाला आणि त्याच्या सर्व सैन्यासकट पाठवले.
8 Davi, quando soube disto, enviou Joabe e todo o exército de homens valentes.
9 अम्मोनी लोक बाहेर पडले व लढाईसाठी त्यांनी नगराच्या वेशीजवळ मांडणी केली. आलेले राजे मैदानात एकीकडे उभे होते.
9 Os amonitas saíram e ordenaram a batalha à porta da cidade; porém os reis que tinham vindo se puseram à parte no campo.
10 सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्यामागे व एक पुढे आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील चांगल्या लढवय्यांना निवडले आणि अरामी सैन्याविरुध्द त्यांची व्यवस्थित मांडणी केली.
10 Ora, quando Joabe viu que a batalha estava ordenada contra ele pela frente e pela retaguarda, escolheu os melhores dentre os homens de Israel, e os pôs em ordem contra os sírios;
11 उरलेल्या इस्राएली सैन्याला आपला भाऊ अबीशयाच्या हाती सोपवले आणि त्याने या सैन्याची अम्मोन्याविरुध्द लढण्यास मांडणी केली.
11 e o resto do povo entregou na mão de Abisai, seu irmão; e eles se puseram em ordem de batalha contra os amonitas.
12 यवाब म्हणाला, “अरामाचे सैन्य जर माझ्यापेक्षा बलवान ठरले तर अबीशय तू मला सोडव. पण अम्मोनी सैन्य तुझ्यापेक्षा बलवान ठरले तर मी तुला सोडवीन.
12 E disse Joabe: Se os sírios forem mais fortes do que eu, tu virás socorrer-me; e, se os amonitas forem mais fortes do que tu, então eu te socorrerei a ti.
13 बलवान हो, व आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण सामर्थ्य दाखवू, मग परमेश्वराचे जे काय चांगले उद्देश आहेत तसे तो करो.”
13 Esforça-te, e pelejemos varonilmente pelo nosso povo e pelas cidades do nosso Deus; e faça o Senhor o que bem lhe parecer.
14 मग यवाब व त्याच्या सैन्यातील शिपाई अरामी सैन्याविरुध्द लढाई करण्यास चालून गेले, तेव्हा इस्राएलाच्या सैन्यापुढून पळाले.
14 Então se chegou Joabe, e o povo que estava com ele, diante dos sírios, para a batalha; e estes fugiram de diante dele.
15 अरामाचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरूशलेमेला परत आला.
15 Vendo, pois, os amonitas que os sírios tinham fugido, fugiram eles também de diante de Abisai, irmão de Joabe, e entraram na cidade. Então Joabe voltou para Jerusalém.
16 आणि इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांस बोलवून घेतले. शोफख हा हद्देजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता.
16 Ora, vendo-se os sírios derrotados diante de Israel, enviaram mensageiros, e fizeram sair os sírios que habitavam além do rio; e tinham por comandante Sofaque, chefe do exército de Hadadézer.
17 अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन अराम्यांच्या समोर व्यूह रचला व ते त्याच्याशी लढले.
17 Avisado disto, Davi ajuntou todo o Israel, passou o Jordão e, indo ao encontro deles, ordenou contra eles a batalha. Tendo Davi ordenado a batalha contra os sírios, pelejaram estes contra ele.
18 इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.
18 Mas os sírios fugiram de diante de Israel; e Davi matou deles os homens de sete mil carros, e quarenta mil homens da infantaria; matou também Sofaque, chefe do exército.
19 आणि इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे जेव्हा हद्देजराच्या सर्व सेवक व राजांनी पाहिले तेव्हा त्यांनी दावीदाशी तह केला व ते त्याचे चाकर झाले. म्हणून अरामी पुन्हा अम्मोनी लोकांस मदत करण्यास घाबरले. अशा रीतीने अरामी लोक अम्मोनींना मदत करण्यास तयार नव्हते.
19 Vendo, pois, os servos de Hadadézer que tinham sido derrotados diante de Israel, fizeram paz cem Davi, e serviram; e os sírios nunca mais quiseram socorrer os amonitas.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 19, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.