1 Crônicas 15

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs BKJ

Sair da comparação
1 दावीदाने दावीद नगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला.
1 E Davi fez para si casas na cidade de Davi, e preparou um lugar para a arca de Deus, e armou para ela uma tenda.
2 मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”
2 Então, Davi disse: Ninguém deve carregar a arca de Deus, senão os levitas; porque o SENHOR os escolheu para carregar a arca de Deus, e para sempre ministrar diante dele.
3 मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले.
3 E Davi reuniu todo o Israel em Jerusalém, para fazer subir a arca do SENHOR ao seu lugar, o qual ele havia preparado.
4 दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले.
4 E Davi reuniu os filhos de Arão, e os levitas;
5 कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती.
5 e dos filhos de Coate: Uriel, o chefe; e os seus irmãos, cento e vinte;
6 मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती.
6 e dos filhos de Merari: Asaías, o chefe; e os seus irmãos, duzentos e vinte;
7 गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती.
7 dos filhos de Gérson: Joel, o chefe; e os seus irmãos, cento e trinta;
8 अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते.
8 dos filhos de Elizafã: Semaías, o chefe; e os seus irmãos, duzentos.
9 हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते.
9 dos filhos de Hebrom: Eliel, o chefe; e os seus irmãos, oitenta;
10 उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती.
10 dos filhos de Uziel: Aminadabe, o chefe; e os seus irmãos, cento e doze;
11 दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले.
11 E Davi chamou Zadoque e Abiatar, os sacerdotes; e os levitas: Uriel, Asaías, e Joel, Semaías, e Eliel e Aminadabe,
12 दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा.
12 e disse-lhes: Vós sois os chefes dos pais dos levitas; santificai-vos, tanto vós, como os vossos irmãos, para que possais fazer subir a arca do SENHOR Deus de Israel até o lugar que preparei para ela.
13 पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.”
13 Porque, como vós não o fizestes da primeira vez, o SENHOR nosso Deus fez uma fenda sobre nós, pois não o buscamos segundo a ordem devida.
14 यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.
14 Assim, os sacerdotes e os levitas se santificaram para fazer subir a arca do SENHOR Deus de Israel.
15 मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला.
15 E os filhos dos levitas carregaram a arca de Deus sobre os seus ombros, com as suas hastes sobre eles, como Moisés ordenou, segundo a palavra do SENHOR.
16 दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.
16 E Davi falou com os chefes dos levitas para indicarem os seus irmãos para serem os cantores, com instrumentos de música, saltérios, harpas e címbalos, soando ao erguerem as suas vozes com alegria.
17 लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
17 Assim, os levitas indicaram Hemã, o filho de Joel; e os seus irmãos, Asafe, o filho de Berequias; e dos filhos de Merari, os seus irmãos; Etã, o filho de Cusaías;
18 याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
18 e com eles, os seus irmãos de segundo grau: Zacarias, Bene, e Jaaziel, e Semiramote, e Jeiel, e Uni, Eliabe, e Benaia, e Maaseias, e Matitias, e Elifeleu, e Micneias, e Obede-Edom, e Jeiel; os porteiros.
19 हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते.
19 Assim, os cantores: Hemã, Asafe, e Etã, foram indicados para soarem com címbalos de bronze;
20 जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.
20 e Zacarias, e Aziel, e Semiramote, e Jeiel, e Uni, e Eliabe, e Maaseias, e Benaia, com saltérios sobre Alamote;
21 मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते.
21 e Matitias, e Elifeleu, e Micneias, e Obede-Edom, e Jeiel, e Azazias, com harpas, sobre seminite para distinção.
22 लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
22 E Quenanias, chefe dos levitas, foi para a música; ele instruía música, porque era habilidoso.
23 बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.
23 E Berequias e Elcana foram os porteiros da arca.
24 शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
24 E Sebanias, e Josafá, e Netanel, e Amasai, e Zacarias, e Benaia, e Eliézer, os sacerdotes, sopravam as trombetas diante da arca de Deus; e Obede-Edom e Jeías foram porteiros da arca.
25 अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.
25 Assim, Davi, e os anciãos de Israel, e os capitães sobre milhares, foram fazer subir a arca do pacto do SENHOR da casa de Obede-Edom, com alegria.
26 परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
26 E sucedeu, quando Deus ajudou os levitas que carregavam a arca do pacto do SENHOR, que eles ofereceram sete novilhos e sete carneiros.
27 कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
27 E Davi estava vestido com uma veste de linho fino, e todos os levitas que carregavam a arca, e os cantores e Quenanias, o mestre do cântico; Davi também tinha sobre si um éfode de linho.
28 अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला.
28 Assim, todo o Israel fez subir a arca do pacto do SENHOR com brados, e com som de corneta, e com trombetas, e com címbalos, fazendo ruído com saltérios e harpas.
29 पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले.
29 E sucedeu, enquanto a arca do pacto do SENHOR chegava à cidade de Davi, que Mical, a filha de Saul, ao olhar por uma janela, viu o rei Davi dançando e se divertindo; e ela o desprezou no seu coração.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.