1 Crônicas 14

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 नंतर सोराचा राजा हिराम याने दावीदाकडे दूत पाठवले आणि याखेरीज त्याने गंधसरूचे लाकडे, गवंडी, सुतार दाविदासाठी त्याने घर बांधले.
1 Hirão, rei de Tiro, enviou a Davi uma delegação, que lhe trouxe toras de cedro, e também pedreiros e carpinteiros, para lhe construírem um palácio.
2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला इस्राएलावर राजा केले आहे हे दावीदाला समजले आणि इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले.
2 Então Davi teve certeza de que o Senhor o confirmara como rei de Israel e que seu reino estava prosperando por amor de seu povo Israel.
3 यरूशलेम मधल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. आणि तो आणखी पुत्र पौत्राचा पिता झाला.
3 Em Jerusalém Davi tomou para si mais mulheres e gerou mais filhos e filhas.
4 यरूशलेमेमध्ये जन्मलेल्या त्याच्या या मुलांची नावे अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
4 Estes são os nomes dos que lhe nasceram ali: Samua, Sobabe, Natã, Salomão,
5 इभार, अलीशवा, एल्पलेट,
5 Ibar, Elisua, Elpelete,
6 नोगा, नेफेग. याफीय,
6 Nogá, Nefegue, Jafia,
7 अलीशामा, बेल्यादा, अलीफलेट.
7 Elisama, Beeliada e Elifelete.
8 आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला.
8 Quando os filisteus ficaram sabendo que Davi tinha sido ungido rei de todo o Israel, foram com todo o exército prendê-lo, mas Davi soube disso e saiu para enfrentá-los.
9 आणि पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले.
9 Tendo os filisteus invadido o vale de Refaim,
10 मग दावीदाने देवाला विचारले. तो म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु काय? मला तू त्यांच्यावर जय देशील काय?” परमेश्वराने त्यास सांगितले “हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईन.”
10 Davi perguntou a Deus: "Devo atacar os filisteus? Tu os entregarás nas minhas mãos? " O Senhor lhe respondeu: "Vá, eu os entregarei nas suas mãos".
11 मग दावीद आणि त्याची माणसे बालपरासीम येथपर्यंत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, “देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे.” त्याठिकाणाचे नाव बाल-परासीम असे पडले आहे.
11 Então Davi e seus soldados foram a Baal-Perazim, e Davi os derrotou e disse: "Assim como as águas de uma enchente causam destruição, pelas minhas mãos Deus destruiu os meus inimigos". Então, aquele lugar passou a ser chamado Baal-Perazim.
12 पलिष्ट्यांनी आपले देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ती जाळून टाकण्याची आज्ञा दिली.
12 Como os filisteus haviam abandonado os seus ídolos ali, Davi ordenou que fossem queimados.
13 रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला.
13 Os filisteus voltaram a atacar o vale;
14 दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्यास म्हणाला “तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाऊ नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा.
14 então Davi consultou Deus de novo, que lhe respondeu: "Não ataque pela frente, mas dê a volta por trás deles e ataque-os em frente das amoreiras.
15 तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील तेव्हा लढाईला पुढे निघून जा. कारण देव पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे.”
15 Assim que você ouvir um som de passos por cima das amoreiras, saia para o combate, pois este é o sinal de que Deus saiu à sua frente para ferir o exército filisteu".
16 दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले.
16 E Davi fez como Deus lhe tinha ordenado, e eles derrotaram o exército filisteu, por todo o caminho, desde Gibeom até Gezer.
17 त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रात त्याची दहशत निर्माण केली.
17 Assim, a fama de Davi espalhou-se por todas as terras, e o Senhor fez com que todas as nações o temessem.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.