1 Crônicas 10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI
1 आणि पलिष्टी इस्राएलाविरूद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले.
1 E aconteceu que, em combate com os filisteus, os israelitas foram postos em fuga, e muitos caíram mortos no monte Gilboa.
2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले.
2 Os filisteus perseguiram Saul e seus filhos, e mataram Jônatas, Abinadabe e Malquisua, filhos de Saul.
3 शौलाविरूद्ध त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्यास गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता.
3 O combate foi se tornando cada vez mais violento em torno de Saul, até que os flecheiros o alcançaram e o feriram gravemente.
4 नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक. नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाइट रीतीने वागतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही, तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वत:ची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला.
4 Então Saul ordenou ao seu escudeiro: "Tire sua espada e mate-me com ela, senão sofrerei a vergonha de cair nas mãos desses incircuncisos". Mas o seu escudeiro estava apavorado e não quis fazê-lo. Saul, então, apanhou a própria espada e jogou-se sobre ela.
5 जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले, तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेही तलवार उपसून त्यावर पडला व मेला.
5 Quando o escudeiro viu que Saul estava morto, jogou-se também sobre sua espada e morreu.
6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले.
6 Dessa maneira Saul e seus três filhos morreram, e, assim, toda a descendência real.
7 जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्राएल मनुष्याने पाहिले की, शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यामध्ये राहू लागले.
7 Quando os israelitas que habitavam no vale viram que o exército tinha fugido e que Saul e seus filhos estavam mortos, fugiram abandonando suas cidades. Depois os filisteus foram ocupá-las.
8 मग असे झाले की, दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले.
8 No dia seguinte, quando os filisteus foram saquear os mortos, encontraram Saul e seus filhos caídos no monte Gilboa.
9 त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकांस कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले.
9 Cortaram a cabeça de Saul, pegaram suas armas e enviaram mensageiros por toda a terra dos filisteus proclamando a notícia entre os seus ídolos e o seu povo.
10 त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.
10 Expuseram suas armas num dos templos dos seus deuses e penduraram sua cabeça no templo de Dagom.
11 पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले.
11 Quando os habitantes de Jabes-Gileade ficaram sabendo o que os filisteus haviam feito com Saul,
12 तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनिक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एला वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
12 os mais corajosos dentre eles foram e apanharam os corpos de Saul e de seus filhos e os levaram a Jabes. Lá sepultaram seus ossos sob a Grande Árvore, e jejuaram por sete dias.
13 शौल परमेश्वराशी अविश्वासू होता म्हणून त्यास मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पाळन केले नाही, परंतु भूतविद्या प्रवीण स्रिकडे सल्ला विचारण्यास गेला.
13 Saul morreu porque foi infiel ao Senhor; não guardou a palavra do Senhor e chegou a consultar uma médiun em busca de orientação,
14 त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही. म्हणून परमेश्वराने त्यास मारले आणि इशायाचा पुत्र दावीद याच्याकडे राज्य सोपवले.
14 em vez de consultar o Senhor. Por isso o Senhor o entregou à morte e deu o reino a Davi, filho de Jessé.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.