1 Coríntios 11

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ACF

Sair da comparação
ACF Almeida Corrigida Fiel
1 मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
1 Sede meus imitadores, como também eu de Cristo.
2 मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी तुम्हास नेमून दिलेले विधी, काटेकोरपणे पाळता.
2 E louvo-vos, irmãos, porque em tudo vos lembrais de mim, e retendes os preceitos como vo-los entreguei.
3 परंतु तुम्हास हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे आणि प्रत्येक पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे
3 Mas quero que saibais que Cristo é a cabeça de todo o homem, e o homem a cabeça da mulher; e Deus a cabeça de Cristo.
4 प्रत्येक पुरुष जो प्रार्थना करताना किंवा संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो.
4 Todo o homem que ora ou profetiza, tendo a cabeça coberta, desonra a sua própria cabeça.
5 परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता प्रार्थना करते आणि लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.
5 Mas toda a mulher que ora ou profetiza com a cabeça descoberta, desonra a sua própria cabeça, porque é como se estivesse rapada.
6 जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तर तिने आपले मस्तक झाकावे.
6 Portanto, se a mulher não se cobre com véu, tosquie-se também. Mas, se para a mulher é coisa indecente tosquiar-se ou rapar-se, que ponha o véu.
7 ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे.
7 O homem, pois, não deve cobrir a cabeça, porque é a imagem e glória de Deus, mas a mulher é a glória do homem.
8 पुरूष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.
8 Porque o homem não provém da mulher, mas a mulher do homem.
9 आणि पुरूष स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली.
9 Porque também o homem não foi criado por causa da mulher, mas a mulher por causa do homem.
10 ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.
10 Portanto, a mulher deve ter sobre a cabeça sinal de poderio, por causa dos anjos.
11 तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही.
11 Todavia, nem o homem é sem a mulher, nem a mulher sem o homem, no Senhor.
12 कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
12 Porque, como a mulher provém do homem, assim também o homem provém da mulher, mas tudo vem de Deus.
13 हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?
13 Julgai entre vós mesmos: é decente que a mulher ore a Deus descoberta?
14 पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हास शिकवीत नाही काय?
14 Ou não vos ensina a mesma natureza que é desonra para o homem ter cabelo crescido?
15 परंतु स्त्रीने लांब केस राखणे हे तिला गौरव आहे कारण तिला तिचे केस आच्छादनासाठी दिले आहेत.
15 Mas ter a mulher cabelo crescido lhe é honroso, porque o cabelo lhe foi dado em lugar de véu.
16 जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
16 Mas, se alguém quiser ser contencioso, nós não temos tal costume, nem as igrejas de Deus.
17 पण आताही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते.
17 Nisto, porém, que vou dizer-vos não vos louvo; porquanto vos ajuntais, não para melhor, senão para pior.
18 प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये फुटी असतात आणि काही प्रमाणात त्यावर विश्वास ठेवतो.
18 Porque antes de tudo ouço que, quando vos ajuntais na igreja, há entre vós dissensões; e em parte o creio.
19 यासाठी की, जे तुमच्यामध्ये स्वीकृत आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे.
19 E até importa que haja entre vós heresias, para que os que são sinceros se manifestem entre vós.
20 म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूभोजन घेत नाही.
20 De sorte que, quando vos ajuntais num lugar, não é para comer a ceia do Senhor.
21 कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हातील प्रत्येकजण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा अतीतृप्त झालेला असतो.
21 Porque, comendo, cada um toma antecipadamente a sua própria ceia; e assim um tem fome e outro embriaga-se.
22 खाण्यापिण्यासाठी तुम्हास घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजवता? मी तुम्हास काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करू काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करत नाही.
22 Não tendes porventura casas para comer e para beber? Ou desprezais a igreja de Deus, e envergonhais os que nada têm? Que vos direi? Louvar-vos-ei? Nisto não vos louvo.
23 कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली,
23 Porque eu recebi do Senhor o que também vos ensinei: que o Senhor Jesus, na noite em que foi traído, tomou o pão;
24 आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
24 E, tendo dado graças, o partiu e disse: Tomai, comei; isto é o meu corpo que é partido por vós; fazei isto em memória de mim.
25 त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
25 Semelhantemente também, depois de cear, tomou o cálice, dizendo: Este cálice é o novo testamento no meu sangue; fazei isto, todas as vezes que beberdes, em memória de mim.
26 कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
26 Porque todas as vezes que comerdes este pão e beberdes este cálice anunciais a morte do Senhor, até que venha.
27 म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल.
27 Portanto, qualquer que comer este pão, ou beber o cálice do Senhor indignamente, será culpado do corpo e do sangue do Senhor.
28 म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.
28 Examine-se, pois, o homem a si mesmo, e assim coma deste pão e beba deste cálice.
29 कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो.
29 Porque o que come e bebe indignamente, come e bebe para sua própria condenação, não discernindo o corpo do Senhor.
30 याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत.
30 Por causa disto há entre vós muitos fracos e doentes, e muitos que dormem.
31 परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
31 Porque, se nós nos julgássemos a nós mesmos, não seríamos julgados.
32 परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हासही शिक्षा होऊ नये.
32 Mas, quando somos julgados, somos repreendidos pelo Senhor, para não sermos condenados com o mundo.
33 म्हणून माझ्या बंधूनो व बहिणींनो जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा.
33 Portanto, meus irmãos, quando vos ajuntais para comer, esperai uns pelos outros.
34 जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही दंड मिळण्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करून देईन.
34 Mas, se algum tiver fome, coma em casa, para que não vos ajunteis para condenação. Quanto às demais coisas, ordená-las-ei quando for.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Coríntios 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.