1 Coríntios 10

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 बंधूनो, तुम्हास हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले.
1 Ora, irmãos, não quero que ignoreis que nossos pais estiveram todos debaixo da nuvem; e todos passaram pelo mar,
2 मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वाचा मेघात व समुद्रात बाप्तिस्मा झाला.
2 e todos foram batizados em Moisés, na nuvem e no mar,
3 त्यांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले.
3 e todos comeram de um mesmo manjar espiritual,
4 व ते एकच आत्मिक पेय प्याले कारण ते त्यांच्यामागून चालणाऱ्या खडकातून पीत होते आणि तो खडक ख्रिस्त होता.
4 e beberam todos de uma mesma bebida espiritual, porque bebiam da pedra espiritual que os seguia; e a pedra era Cristo.
5 परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता आणि त्यांची प्रेते अरण्यात पसरली होती.
5 Mas Deus não se agradou da maior parte deles, pelo que foram prostrados no deserto.
6 आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये.
6 E essas coisas foram-nos feitas em figura, para que não cobicemos as coisas más, como eles cobiçaram.
7 त्यांच्यापैकी काहीजण मूर्तीपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते मूर्तीसमोर शरीरासंबंधाच्या हेतूने नाच करण्यासाठी उठले.”
7 Não vos façais, pois, idólatras, como alguns deles; conforme está escrito: O povo assentou-se a comer e a beber e levantou-se para folgar.
8 ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.
8 E não nos prostituamos, como alguns deles fizeram e caíram num dia vinte e três mil.
9 आणि त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, ते सापांकडून मारले गेले.
9 E não tentemos a Cristo, como alguns deles também tentaram e pereceram pelas serpentes.
10 कुरकुर करू नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाला की, ते मृत्युदूताकडून मारले गेले.
10 E não murmureis, como também alguns deles murmuraram e pereceram pelo destruidor.
11 या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात
11 Ora, tudo isso lhes sobreveio como figuras, e estão escritas para aviso nosso, para quem já são chegados os fins dos séculos.
12 म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.
12 Aquele, pois, que cuida estar em pé, olhe que não caia.
13 जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल.
13 Não veio sobre vós tentação, senão humana; mas fiel é Deus, que vos não deixará tentar acima do que podeis; antes, com a tentação dará também o escape, para que a possais suportar.
14 तेव्हा, माझ्या प्रियांनो, मूर्तीपूजा टाळा.
14 Portanto, meus amados, fugi da idolatria.
15 मी तुमच्याशी बुद्धीमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा.
15 Falo como a sábios; julgai vós mesmos o que digo.
16 जो “आशीर्वादाचा प्याला” आम्ही आशीर्वादित करण्यास सांगतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागीतेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही?
16 Porventura, o cálice de bênção que abençoamos não é a comunhão do sangue de Cristo? O pão que partimos não é, porventura, a comunhão do corpo de Cristo?
17 आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत.
17 Porque nós, sendo muitos, somos um só pão e um só corpo; porque todos participamos do mesmo pão.
18 देहासंबंधाने इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत नाही का?
18 Vede a Israel segundo a carne; os que comem os sacrifícios não são, porventura, participantes do altar?
19 तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे?
19 Mas que digo? Que o ídolo é alguma coisa? Ou que o sacrificado ao ídolo é alguma coisa?
20 नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही.
20 Antes, digo que as coisas que os gentios sacrificam, as sacrificam aos demônios e não a Deus. E não quero que sejais participantes com os demônios.
21 तुम्ही देवाचा आणि भूतांचाही असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भुताच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही.
21 Não podeis beber o cálice do Senhor e o cálice dos demônios; não podeis ser participantes da mesa do Senhor e da mesa dos demônios.
22 आपण प्रभूला ईर्षेस पेटविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा.
22 Ou irritaremos o Senhor? Somos nós mais fortes do que ele?
23 “काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत.” पण सर्वच हितकारक नाही. “आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत.” परंतु सर्व गोष्टी लोकांस सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत.
23 Todas as coisas me são lícitas, mas nem todas as coisas convêm; todas as coisas me são lícitas, mas nem todas as coisas edificam.
24 कोणीही स्वतःचेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.
24 Ninguém busque o proveito próprio; antes, cada um, o que é de outrem.
25 मांसाच्या बाजारात जे मांस विकले जाते ते कोणतेही मांस खा. विवेकभावाला त्या मांसाविषयीचे कोणतेही प्रश्न न विचारता खा.
25 Comei de tudo quanto se vende no açougue, sem perguntar nada, por causa da consciência.
26 कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही प्रभूचे आहे.”
26 Porque a terra é do Senhor e toda a sua plenitude.
27 विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हास जेवावयास बोलावले आणि तुम्हास जावेसे वाटले तर विवेकभावाने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा.
27 E, se algum dos infiéis vos convidar e quiserdes ir, comei de tudo o que se puser diante de vós, sem nada perguntar, por causa da consciência.
28 परंतु जर कोणी तुम्हास सांगितले की, “हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,” तर विवेकभावासाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका.
28 Mas, se alguém vos disser: Isto foi sacrificado aos ídolos, não comais, por causa daquele que vos advertiu e por causa da consciência; porque a terra é do Senhor e toda a sua plenitude.
29 आणि जेव्हा मी “विवेक” म्हणतो तो स्वतःचा असे मी म्हणत नाही तर इतरांचा आणि हेच फक्त एक कारण आहे कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सद्सदविवेकबुद्धीने न्याय का व्हावा?
29 Digo, porém, a consciência, não a tua, mas a do outro. Pois por que há de a minha liberdade ser julgada pela consciência de outrem?
30 जर मी आभारपूर्वक अन्न खातो तर माझी निंदा होऊ नये कारण या गोष्टींबद्दल देवाला मी धन्यवाद देतो.
30 E, se eu com graça participo, por que sou blasfemado naquilo por que dou graças?
31 म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.
31 Portanto, quer comais, quer bebais ou façais outra qualquer coisa, fazei tudo para a glória de Deus.
32 यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका.
32 Portai-vos de modo que não deis escândalo nem aos judeus, nem aos gregos, nem à igreja de Deus.
33 जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
33 Como também eu em tudo agrado a todos, não buscando o meu próprio proveito, mas o de muitos, para que assim se possam salvar.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Coríntios 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.