Salmos 74

Marathi Bible (GL_MARATHI) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?.
1 Ó Deus, por que nos rejeitas para sempre? Por que se acende a tua ira contra as ovelhas do teu pasto?
2 तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव. तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत. ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?
2 Lembra-te da tua congregação, que adquiriste desde a antiguidade, que remiste para ser a tribo da tua herança. Lembra-te do monte Sião, no qual tens habitado.
3 देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल. शत्रूंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये.
3 Dirige os teus passos para as ruínas perpétuas, para tudo de mau que o inimigo fez no santuário.
4 शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या. ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले.
4 Os teus adversários bramam no lugar das assembleias e erguem as suas próprias insígnias como sinais.
5 फावड्याने गवत कापणाऱ्यासारखे शत्रुचे सैनिक दिसत होते.
5 Parecem-se com os que empunham os seus machados no espesso da floresta;
6 देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करुन तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले.
6 e agora, com os seus machados e martelos, destroem todos os entalhes de madeira.
7 त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले. तुझ्या नावाला गौरव प्राप्त करुन देण्यासाठी ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मातीत मिळवले.
7 Incendeiam o teu santuário; profanam a morada do teu nome, arrasando-a até o chão.
8 शत्रूंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले. त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थानजाळून टाकले.
8 Disseram no seu coração: “Acabemos com eles de uma vez.” Queimaram todos os lugares santos de Deus na terra.
9 आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही. आता कोणी संदेष्टे राहिले नाही. कुणालाही काय करावे ते कळत नाही.
9 Já não vemos os nossos sinais; já não há profeta; nem há, entre nós, quem saiba até quando isso vai durar.
10 देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत? तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का?
10 Até quando, ó Deus, o adversário nos afrontará? Será que o inimigo blasfemará o teu nome para sempre?
11 देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस? तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास.
11 Por que retiras a tua mão, sim, a tua mão direita, e a conservas no teu seio?
12 देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस.
12 Mas Deus é meu Rei desde a antiguidade; ele é quem opera feitos salvadores no meio da terra.
13 देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.
13 Tu, com o teu poder, dividiste o mar; esmagaste sobre as águas a cabeça dos monstros marinhos.
14 समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस.
14 Despedaçaste as cabeças do Leviatã e o deste por alimento às criaturas do deserto.
15 तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस आणि तूच नद्या कोरड्या करतोस.
15 Tu abriste fontes e ribeiros; secaste rios caudalosos.
16 देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस. सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस.
16 Teu é o dia; tua também é a noite; a luz e o sol, tu os formaste.
17 पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस.तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास.
17 Fixaste os confins da terra; verão e inverno, tu os fizeste.
18 देवा, या गोष्टींची आठवण ठेव. शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे. ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.
18 Lembra-te disto: o inimigo tem insultado o e um povo insensato tem blasfemado o teu nome.
19 त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस. तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस.
19 Não entregues à rapina a vida de tua pomba, nem te esqueças para sempre da vida dos teus aflitos.
20 आपला करार आठव या देशातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात हिंसा आहे.
20 Lembra-te da tua aliança, pois os lugares tenebrosos da terra estão cheios de moradas de violência.
21 देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली. त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा. गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात.
21 Não fique envergonhado o oprimido; que o aflito e o necessitado louvem o teu nome.
22 देवा, ऊठ! आणि युध्द कर! त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव.
22 Levanta-te, ó Deus, e defende a tua causa; lembra-te de como o ímpio te afronta todos os dias.
23 तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.
23 Não te esqueças da gritaria dos teus inimigos, do sempre crescente tumulto dos teus adversários.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 74, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.