Salmos 69
Marathi Bible (GL_MARATHI) vs VC
VC Versão Católica
1 देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.
1 Ao mestre de canto. Segundo a melodia: Os lírios. Salvai-me, ó Deus, porque as águas me vão submergir.
2 इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही. मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे. मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत. मी आता लवकरच बुडणार आहे.
2 Estou imerso num abismo de lodo, no qual não há onde firmar o pé. Vim a dar em águas profundas, encobrem-me as ondas.
3 मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे. माझा घसा दुखत आहे. मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत तुझ्या मदतीची वाट पाहिली.
3 Já cansado de tanto gritar, enrouqueceu-me a garganta. Finaram-se-me os olhos, enquanto espero meu Deus.
4 मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत. ते विनाकारण माझा तिरस्कार करतात. माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात. माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात. मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.
4 Mais numerosos que os cabelos de minha cabeça são os que me detestam sem razão. São mais fortes que meus ossos os meus injustos inimigos. Porventura posso restituir o que não roubei?
5 देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे. मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.
5 Vós conheceis, ó Deus, a minha insipiência, e minhas faltas não vos são ocultas.
6 प्रभु, सर्वशक्तीमान परमेश्वरा, तुझ्या भक्तांना माझी लाज वाटू देऊ नकोस. इस्राएलाच्या देवा, तुझी उपासना करणाऱ्यांना माझ्यामुळे अडचणीत येऊ देऊ नकोस.
6 Os que esperam em vós, ó Senhor, Senhor dos exércitos, por minha causa não sejam confundidos. Que os que vos procuram, ó Deus de Israel, não tenham de que se envergonhar por minha causa,
7 माझा चेहरा लाजेने झाकला गेला आहे. मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बाळगतो.
7 pois foi por vós que eu sofri afrontas, cobrindo-se-me o rosto de confusão.
8 माझे भाऊ मला परक्याप्रमाणे वागवतात. माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात.
8 Tornei-me um estranho para meus irmãos, um desconhecido para os filhos de minha mãe.
9 तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो.
9 É que o zelo de vossa casa me consumiu, e os insultos dos que vos ultrajam caíram sobre mim.
10 मी रडतो, उपवास करतो आणि त्यामुळे ते माझी चेष्टा करतात.
10 Por mortificar minha alma com jejuns, só recebi ultrajes.
11 माझे दु:ख दाखवण्याकरता मी जोडेभरडे कपडे वापरतो आणि लोक माझ्याविषयी विनोदी किस्से सांगतात.
11 Por trocar minhas roupas por um saco, tornei-me ludíbrio deles.
12 ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात. मद्य पिणारे लोक माझ्यावर गाणी रचतात.
12 Falam de mim os que se assentam às portas da cidade, escarnecem-me os que bebem vinho.
13 माझ्याविषयी म्हणशील तर परमेश्वरा, ही माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे, तू माझा स्वीकार करावस असे मला वाटते. तू मला तारशील असा विश्वास मला वाटते.
13 Minha oração, porém, sobe até vós, Senhor, na hora de vossa misericórdia, ó Deus. Na vossa imensa bondade, escutai-me, segundo a fidelidade de vosso socorro.
14 मला चिखलातून बाहेर काढ मला चिखलात बुडू देऊ नकोस. माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपासून मला वाचव. मला ह्या खोल पाण्यापासून वाचव.
14 Tirai-me do lodo, para que não me afunde. Livrai-me dos que me detestam, salvai-me das águas profundas.
15 लाटांमुळे मला बुडू देऊ नकोस खोल खड्यांना माझा घास घेऊ देऊ नकोस. धडग्याच्या जबड्यात मला जाऊ देऊ नकोस.
15 Não me deixeis submergir nas muitas águas, nem me devore o abismo. Nem se feche sobre mim a boca do poço.
16 परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.
16 Ouvi-me, Senhor, pois que vossa bondade é compassiva; em nome de vossa misericórdia, voltai-vos para mim.
17 तुझ्या सेवाकापासून दूर जाऊ नकोस, मी संकटात आहे, लवकर ये मला मदत कर.
17 Não escondais ao vosso servo a vista de vossa face; atendei-me depressa, pois estou muito atormentado.
18 ये माझ्या आत्म्याचा उध्दार कर. मला माझ्या शत्रूंपासून सोडव.
18 Aproximai-vos de minha alma, livrai-me de meus inimigos.
19 तुला माझी लाज ठाऊक आहे. माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे. या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस.
19 Bem vedes minha vergonha, confusão e ignomínia. Ante vossos olhos estão os que me perseguem:
20 शरमेने मला गाडून टाकले आहे. लाजेमुळे मी लवकरच मरणार आहे. मी सहानुभूतीसाठी ताटकळलो आहे पण मला ती मिळाली नाही. कुणीतरी माझे सांत्वन करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कुणीही आले नाही.
20 seus ultrajes abateram meu coração e desfaleci. Esperei em vão quem tivesse compaixão de mim, quem me consolasse, e não encontrei.
21 त्यांनी मला विष दिले, अन्न नव्हे. त्यांनी मला आंब दिली द्राक्षारस नाही.
21 Puseram fel no meu alimento, na minha sede deram-me vinagre para beber.
22 त्यांचे ताट अन्नाने भरलेले आहे त्यांच्या, टेबलाजवळ बसून जेवताना त्यांना खूप सुरक्षित वाटते. हेच जेवण त्यांचा नाश करो अशी माझी इच्छा आहे.
22 Torne-se a sua mesa um laço para eles, e uma armadilha para os seus amigos.
23 ते आंध्ळे व्हावेत आणि त्यांच्या पाठी अशक्त व्हाव्यात अशी मी आशा करतो.
23 Que seus olhos se escureçam para não mais ver, que seus passos sejam sempre vacilantes.
24 त्यांना तुझ्या क्रोधाची चव घेऊ दे.
24 Despejai sobre eles a vossa cólera, e os atinja o fogo de vossa ira.
25 त्यांची घरे रिकामी कर. त्यांत कुणालाही राहू देऊ नकोस.
25 Seja devastada a sua morada, não haja quem habite em suas tendas,
26 त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील, त्यानंतर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी दुख आणि जखमा खरोखरच असतील.
26 porque perseguiram aquele a quem atingistes, e aumentaram a dor daquele a quem feristes.
27 त्यांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. तू किती चांगला असू शकतोस ते त्यांना दाखव नकोस.
27 Deixai-os acumular falta sobre falta, e jamais sejam por vós reconhecidos como justos.
28 जिवंत माणसांच्या यादीतून त्यांचे नाव पुसून टाक. त्यांचे नाव चांगल्या लोकांच्या यादीत लिहू नकोस.
28 Sejam riscados do livro dos vivos, e não se inscrevam os seus nomes entre os justos.
29 मी खिन्न आणि दु:खी आहे देवा, मला वर उचल, मला वाचव.
29 Eu, porém, miserável e sofredor, seja protegido, ó Deus, pelo vosso auxílio.
30 मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन. मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन.
30 Cantarei um cântico de louvor ao nome do Senhor, e o glorificarei com um hino de gratidão.
31 यामुळे देव आनंदित होईल. एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.
31 E isto a Deus será mais agradável que um touro, do que um novilho com chifres e unhas.
32 गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात. या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.
32 Ó vós, humildes, olhai e alegrai-vos; vós que buscais a Deus, reanime-se o vosso coração,
33 परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात.
33 porque o Senhor ouve os necessitados, e seu povo cativo não despreza.
34 देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्वानी त्याची स्तुती करा.
34 Louvem-no os céus e a terra, os mares e tudo o que neles se move.
35 परमेश्वर सियोनाला वाचवेल. परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील. ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील.
35 Sim, Deus salvará Sião e reconstruirá as cidades de Judá; para aí hão de voltar e a possuirão.
36 त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल. ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.
36 A linhagem de seus servos a receberá em herança, e os que amam o seu nome aí fixarão sua morada.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 69, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.