Provérbios 8
Marathi Bible (GL_MARATHI) vs VC
VC Versão Católica
1 ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला तू एकावेस म्हणून तुला बोलावत आहेत.
1 Por ventura não clama a Sabedoria e a inteligência não eleva a sua voz?
2 ते टेकडीच्या माथ्यावर जिथे रस्ते मिळतात, तिथे उभे आहेत.
2 No cume das montanhas posta-se ela, e nas encruzilhadas dos caminhos.
3 ते शहराच्या दरवाजाशी आहेत. ते उघड्या दरवाजातून बोलावत आहेत.
3 Alça sua voz na entrada das torres, junto às portas, nas proximidades da cidade.
4 ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते, “लोक हो! मी तुम्हाला बोलावत आहे. मी सगळ्या लोकांना बोलावत आहे.
4 É a vós, ó homens, que eu apelo; minha voz se dirige aos filhos dos homens.
5 तुम्ही जर मूर्ख असाल, तर शहाणे व्हायला शिका. मूर्ख माणसांनो समजून घ्यायला शिका.
5 Ó simples, aprendei a prudência, adquiri a inteligência, ó insensatos.
6 लक्ष द्या! ज्या गोष्टी शिकवतो त्या महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला फक्त योग्य असलेल्या गोष्टीच सांगतो.
6 Prestai atenção, pois! Coisas magníficas vos anuncio, de meus lábios só sairá retidão,
7 माझे शब्द खरे आहेत. मला वाईटाचा, खोट्याचा तिरस्कार वाटतो.
7 porque minha boca proclama a verdade e meus lábios detestam a iniqüidade.
8 मी ज्या गोष्टी सांगतो त्या न्याय्य आहेत. माझ्या शब्दांत काहीही चुकीचे अथवा खोटे नाही.
8 Todas as palavras de minha boca são justas, nelas nada há de falso nem de tortuoso.
9 जो माणूस समजूतदार आहे त्याला या गोष्टी स्पष्ट दिसतात. ज्ञानी माणूस या गोष्टी समजू शकतो.
9 São claras para os que as entendem e retas para o que chegou à ciência.
10 माझ्या शिस्तीचा स्वीकार करा. ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे. ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यावान आहे.
10 Recebei a instrução e não o dinheiro. Preferi a ciência ao fino ouro,
11 ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे. ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.”
11 pois a Sabedoria vale mais que as pérolas e jóia alguma a pode igualar.
12 “मी ज्ञान आहे. मी चांगल्या न्यायाने जगते. तुम्ही मला ज्ञानाबरोबर आणि चांगल्या योजनांबरोबर पाहू शकता.
12 Eu, a Sabedoria, sou amiga da prudência, possuo uma ciência profunda.
13 जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
13 O temor do Senhor é o ódio ao mal. Orgulho, arrogância, caminho perverso, boca mentirosa: eis o que eu detesto.
14 परंतु मी लोकांना योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते आणि योग्य चांगला न्याय देते. मी समजूतदारपणा आणि शक्ती देते.
14 Meu é o conselho e o bom êxito, minha a inteligência, minha a força.
15 राजे राज्य करताना माझा उपयोग करतात. राज्यकर्ते चांगले कायदे करण्यासाठी माझा उपयोग करतात.
15 Por mim reinam os reis e os legisladores decretam a justiça;
16 प्रत्येक चांगला राज्यकर्ता त्याच्या अंमलाखाली असलेल्या लोकांवर राज्य करण्यासाठी माझा उपयोग करुन घेतो.
16 por mim governam os magistrados e os magnatas regem a terra.
17 मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
17 Amo os que me amam. Quem me procura, encontra-me.
18 माझ्याजवळही देण्यासाठी श्रीमंती आणि मानमरातब आहेत. मी खरी संपत्ती आणि यश देते.
18 Comigo estão a riqueza e a glória, os bens duráveis e a justiça.
19 मी ज्या गोष्टी देते त्या शुध्द सोन्यापेक्षा चांगल्या असतात. आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात.
19 Mais precioso que o mais fino ouro é o meu fruto, meu produto tem mais valor que a mais fina prata.
20 मी लोकांना योग्य मार्गावर आणते. मी तयांना योग्य न्यायाच्या मार्गाने नेते.
20 Sigo o caminho da justiça, no meio da senda da eqüidade.
21 जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते. होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरुन टाकीन.
21 Deixo os meus haveres para os que me amam e acumulo seus tesouros.
22 खूप पूर्वी सुरुवातीला परमेश्वराने प्रथम माझीच निर्मिती केली.
22 O Senhor me criou, como primícia de suas obras, desde o princípio, antes do começo da terra.
23 आरंभीला मला निर्माण केले गेले. जगाची सुरुवात होण्यापूर्वी मी निर्माण झाले.
23 Desde a eternidade fui formada, antes de suas obras dos tempos antigos.
24 महासागराच्या आधी माझा जन्म झाला. पाणी उत्पन्न होण्या आधी मी होते.
24 Ainda não havia abismo quando fui concebida, e ainda as fontes das águas não tinham brotado.
25 पर्वतांच्या आधी माझा (ज्ञानाचा) जन्म झाला. डोंगरांच्या आधी माझा जन्म झाला.
25 Antes que assentados fossem os montes, antes dos outeiros, fui dada à luz;
26 परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याआधीच मी जन्मले. शेतांच्या आधी माझा जन्म झाला. देवाने पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच माझा जन्म झाला होता.
26 antes que fossem feitos a terra e os campos e os primeiros elementos da poeira do mundo.
27 परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते. परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते. त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते.
27 Quando ele preparava os céus, ali estava eu; quando traçou o horizonte na superfície do abismo,
28 परमेश्वराने आकाशात ढग ठेवण्याआधी माझा जन्म झाला. आणि परमेश्वराने समुद्रात पाणी ठेवले तेव्हाही मी तिथे होते.
28 quando firmou as nuvens no alto, quando dominou as fontes do abismo,
29 परमेश्वराने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाणी परमेश्वराच्या संमती शिवाय चढू शकत नाही. परमेश्वराने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा मी तिथे होते.
29 quando impôs regras ao mar, para que suas águas não transpusessem os limites, quando assentou os fundamentos da terra,
30 एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते. माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे. मी त्याचा आनंद होते.
30 junto a ele estava eu como artífice, brincando todo o tempo diante dele,
31 त्याने निर्माण केलेल्या जगाविषयी परमेश्वर उत्सुक होता. तो तिथे निर्माण केलेल्या लोकांबद्दल आनंदी होता.
31 brincando sobre o globo de sua terra, achando as minhas delícias junto aos filhos dos homens.
32 “मुलांनो, आता माझे ऐका, जर तुम्ही माझा मार्ग अनुसरला तर तुम्हीही आनंदी व्हाल.
32 E agora, meus filhos, escutai-me: felizes aqueles que guardam os meus caminhos.
33 माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा. ऐकायला नकार देऊ नका.
33 Ouvi minha instrução para serdes sábios, não a rejeiteis.
34 जो माझे ऐकतो तो सुखी होतो. तो रोज माझ्या दारावर पाहारा देतो. तो माझ्या दाराजवळ थांबतो.
34 Feliz o homem que me ouve e que vela todos os dias à minha porta e guarda os umbrais de minha casa!
35 ज्या माणसाला मी सापडते. त्याला जीवन सापडते. त्याला परमेश्वराकडून चांगल्या गोष्टी मिळतील.
35 Pois quem me acha encontra a vida e alcança o favor do Senhor.
36 पण जो माझ्याविरुध्द पाप करतो तो स्वत:लाच इजा करुन घेतो. जे लोक माझा तिरस्कार करतात ते मरणाला कवटाळतात.”
36 Mas quem me ofende, prejudica-se a si mesmo; quem me odeia, ama a morte.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.