Provérbios 20

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 द्राक्षारस आणि मद्य यामुळे लोकांचा स्वत:वरचा ताबा जातो. ते खूप जोरात बोलतात आणि फुशारकी मारायला लागतात. ते झिंगलेले असतात आणि मूर्खासारख्या गोष्टी करायला लागतात.
1 O vinho é zombadore a bebida fermentada provoca brigas; não é sábio deixar-se dominar por eles.
2 राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता.
2 O medo que o rei provoca é como o do rugido de um leão; quem o irrita põe em risco a própria vida.
3 कुठलाही मूर्ख वादविवादाला सुरुवात करु शकतो. म्हणून जो वादविवादाला नकार देतो त्याचा तुम्ही आदर करु शकता.
3 É uma honra dar fim a contendas, mas todos insensatos envolvem-se nelas.
4 आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.
4 O preguiçoso não ara a terra na estação própria; mas na época da colheita procura, e não acha nada.
5 चांगला उपदेश हा खोल विहिरीतून घेतलेल्या पाण्यासारखा असतो. परंतु शहाणा माणूस दुसऱ्याकडून शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
5 Os propósitos do coração do homem são águas profundas, mas quem tem discernimento os traz à tona.
6 बरेच लोक आपण प्रामाणिक आणि प्रेमळ आहोत असे सांगतात. पण खरोखरच असा माणूस सापडणे कठीण असते.
6 Muitos se dizem amigos leais, mas um homem fiel, quem poderá achar?
7 चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.
7 O homem justo leva uma vida íntegra; como são felizes os seus filhos!
8 जेव्हा राजा बसून लोकांचा न्यायनिवाडा करतो तेव्हा त्याला स्वत:च्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघता येतात.
8 Quando o rei se assenta no trono para julgar, com o olhar esmiúça todo o mal.
9 कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही.
9 Quem poderá dizer: "Purifiquei o coração; estou livre do meu pecado? "
10 जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.
10 Pesos adulterados e medidas falsificadas, são coisas que o Senhor detesta.
11 लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.
11 Até a criança mostra o que é por suas ações; o seu procedimento revelará se ela é pura e justa.
12 आपल्याला बघायला डोळे आणि ऐकायला कान आहेत आणि ते परमेश्वरानेच आपल्यासाठी केले आहेत.
12 Os ouvidos que ouvem e os olhos que vêem foram feitos pelo Senhor.
13 जर तुम्हाला झोपायला आवडत असेल तर तुम्ही गरीब व्हाल. पण तुमच्या वेळेचा काम करुन उपयोग करा आणि तुम्हाला भरपूर खायला मिळेल.
13 Não ame o sono, ou você acabará ficando pobre; fique desperto, e terá alimento de sobra.
14 एखादा माणूस तुमच्याकडून काही विकत घेतो तेव्हा तो म्हणतो, “हे योग्य नाही, याची किंमत फार आहे.” नंतर तोच माणूस इतरांना जाऊन सांगतो की त्याने फार चांगला व्यवहार केला.
14 "Não vale isso! Não vale isso! ", diz o comprador, mas, quando se vai, gaba-se do bom negócio.
15 सोने आणि हिरे माणसाला श्रीमंत बनवतात. परंतु जर एखाद्याला तो काय बोलतो आहे हे कळत असेल तर त्याची किंमत खूपच जास्त असते.
15 Mesmo onde há ouro e rubis em grande quantidade, os lábios que transmitem conhecimento são uma rara preciosidade.
16 तुम्ही जर दुसऱ्या माणसाच्या कर्जासाठी स्वत:ला जामीन ठेवलेत तर तुम्ही तुमचे कपडे सुध्दा घालवून बसाल.
16 Tome-se a veste de quem serve de fiador ao estranho; sirva ela de penhor de quem dá garantia a uma mulher leviana.
17 तुम्ही जर फसवून कुठली गोष्ट घेतलीत तर ती चांगली आहे असे तुम्हाला कदाचित् वाटेल. पण शेवटी ती कवडीमोलाचीच ठरेल.
17 Saborosa é a comida que se obtém com mentiras, mas depois dá areia na boca.
18 योजना आखण्या आधी चांगला सल्ला घ्या. तुम्हाला जर युध्द सुरु करायचे असेल तर मार्गदर्शनासाठी चांगल्या लोकांना शोधा.
18 Os conselhos são importantes para quem quiser fazer planos, e quem sai à guerra precisa de orientação.
19 जो माणूस इतरांबद्दल काही गोष्टी सांगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसते. म्हणून जो खूप बोलतो त्याच्याशी मैत्री करु नका.
19 Quem vive contando casos não guarda segredo; por isso, evite quem fala demais.
20 जर एखादा माणूस त्याच्या आईविरुध्द किंवा वडिलांविरुध्द बोलला तर तो अंधार होणारा प्रकाश आहे.
20 Se alguém amaldiçoar seu pai ou sua mãe, a luz de sua vida se extinguirá na mais profunda escuridão.
21 जर तुम्हाला सहज संपत्ती मिळाली असेल तर तिची तुम्हाला किंमत नसते.
21 A herança que se obtém com ganância no princípio, no final não será abençoada.
22 जर कुणी तुमच्याविरुद्व काही केले तर त्याला शिक्षा करायचा तुम्हीच प्रयत्न करु नका. परमेश्वरासाठी थांबा. शेवटी तोच तुम्हाला विजयी बनवेल.
22 Não diga: "Eu o farei pagar pelo mal que me fez! " Espere pelo Senhor, e ele dará a vitória a você.
23 काही लोक फसवी वजने आणि मापे वापरतात. ते त्याचा उपयोग लोकांना फसवण्यासाठी करतात. ते परमेश्वराला आवडत नाही. त्यामुळे त्याला आनंद होत नाही.
23 O Senhor detesta pesos adulterados, e balanças falsificadas não o agradam.
24 प्रत्येकाच्या बाबतीत जे काय घडते ते परमेश्वर ठरवतो. म्हणून आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते माणासाला कसे काय कळेल?
24 Os passos do homem são dirigidos pelo Senhor. Como poderia alguém discernir o seu próprio caminho?
25 देवाला काही वस्तू देण्याचे वचन देण्याआधी विचार करा. नंतर तुम्ही तसे वचन द्याला नको होते असे तुम्हाला वाटू शकेल.
25 É uma armadilha consagrar algo precipitadamente, e só pensar nas conseqüências depois que se fez o voto.
26 दुष्ट लोक कोणते ते शहाणा राजाच ठरवील. आणि तो राजाच त्या लोकांना शिक्षा करील.
26 O rei sábio abana os ímpios, e passa sobre eles a roda de debulhar.
27 मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय. माणसाच्या मनात काय आहे ते परमेश्वराला कळू शकते.
27 O espírito do homem é a lâmpada do Senhor, e vasculha cada parte do seu ser.
28 राजा जरा प्रामाणिक आणि सत्यवचनी असला, तर तो त्याची सत्ता राखू शकतो. त्याचे खरे प्रेम त्याचे राज्य बलकट ठेवते.
28 A bondade e a fidelidade preservam o rei; por sua bondade ele dá firmeza ao seu trono.
29 आपण तरुण माणसाचे त्याच्या शक्तीबद्दल कौतुक करतो. पण आपण वृध्दाला त्याच्या पांढऱ्या केसांमुळे मान देतो. त्यावरुन तो पूर्ण आयुष्य जगाला हे दिसते.
29 A beleza dos jovens está na sua força; a glória dos idosos, nos seus cabelos brancos.
30 आपल्याला शिक्षा झाली तर आपण चुका करणे थांबवू. दु:ख माणसाला बदलू शकते.
30 Os golpes e os ferimentos eliminam o mal; os açoites limpam as profundezas do ser.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 20, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.