Provérbios 18

Marathi Bible (GL_MARATHI) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 काही लोकांना इतरांभोवती राहायला आवडत नाही. त्यांना जे पाहिजे तेच ते करतात. आणि त्यांना जर कुणी उपदेश केला तर ते अस्वस्थ होतात.
1 Quem se isola procura sua própria vontade e se irrita contra tudo o que é razoável.
2 मूर्खाला इतरांपासून शिकायची इच्छा नसते. त्याला फक्त स्वत:च्याच कल्पना सांगायच्या असतात.
2 O insensato não tem propensão para a inteligência, mas para a expansão dos próprios sentimentos.
3 लोकांना वाईट माणूस आवडत नाही. लोक त्या मूर्खाची चेष्टा करतात.
3 O desprezo ombreia com a iniqüidade; o opróbrio com a vergonha.
4 शहाण्या माणसाचे शब्द शहाणपणाच्या खोल विहिरीतून उसळून वर येणाऱ्या पाण्यासारखे असतात.
4 As palavras da boca de um homem são águas profundas; a fonte da sabedoria é uma torrente transbordante.
5 लोकांचा न्यायनिवाडा करताना तुम्ही न्यायी असायला हवे. जर तुम्ही दोषी माणसाला सोडून दिले तर ते चांगल्या लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल.
5 Não fica bem favorecer um perverso para prejudicar o direito do justo.
6 मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वत:वर संकट ओढवून घेतो. त्याचे शब्द भांडण सुरु करु शकतात.
6 Os lábios do insensato promovem contendas: sua boca atrai açoites.
7 मूर्ख माणूस बोलतो तेव्हा स्वत:चाच नाश करुन घेतो. त्याचेच शब्द त्याला अडचणीत आणतात.
7 A boca do tolo é a sua ruína; seus lábios são uma armadilha para a sua própria vida.
8 लोकांना नेहमी अफवा ऐकायला आवडतात. ते पोटात जाणाऱ्या चांगल्या अन्नासारखे असते.
8 As palavras do delator são como gulodices: penetram até as entranhas.
9 जो माणूस कामात ढिला आणि मंद असतो. तो त्या गोष्टींचा कामाचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच वाईट असतो.
9 O frouxo no trabalho é um irmão do dissipador.
10 परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे. तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे. चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात.
10 O nome do Senhor é uma torre: para lá corre o justo a fim de procurar segurança.
11 श्रीमंती आपले रक्षण करेल असे श्रीमंतांना वाटते. ती बळकट किल्ल्याप्रमाणे आहे असे त्यांना वाटते.
11 A fortuna do rico é sua cidade forte; em seu pensar, ela é como uma muralha elevada.
12 गर्विष्ठ माणसाचा लवकरच नाश होईल. पण विनम्र माणसाचा गौरव होईल.
12 Antes da ruína, o coração do homem se eleva, mas a humildade precede a glória.
13 तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी इतरांना त्यांचे बोलणे संपवू द्या. त्यामुळे तुम्ही गोंधळणार नाही आणि मूर्खही ठरणार नाही.
13 Quem responde antes de ouvir, passa por tolo e se cobre de confusão.
14 आजारपणात माणसाचे मन त्याला जिवंत ठेवू शकते. पण जर आता सारे काही व्यर्थ आहे असे त्याला वाटत असेल तर सारीच आशा संपते.
14 O espírito do homem suporta a doença, mas quem erguerá um espírito abatido?
15 शहाण्या माणसाला नेहमी अधिक शिकायची इच्छा असते. तो माणूस नेहमी अधिक ज्ञान मिळवण्यासाठी लक्षपूर्वक ऐकत असतो.
15 O coração inteligente adquire o saber; o ouvido dos sábios procura a ciência.
16 जर तुम्हाला महत्वाच्या माणसाला भेटायची इच्छा असेल तर त्याला नजराणा द्या. नंतर तुम्ही त्याला सहजपणे भेटू शकता.
16 O presente de um homem lhe abre tudo, e lhe dá acesso junto aos grandes.
17 सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्र विचारीत नाही.
17 Quem advoga sua causa, por primeiro, parece ter razão; sobrevém a parte adversa, que examina a fundo.
18 दोन बलवान माणसे वाद घातल असली तर तो वाद चिठ्ठ्या टाकून सोडवणे चांगले.
18 A sorte apazigua as contendas e decide entre os poderosos.
19 जर तुम्ही मित्राचा अपमान केलात तर त्याला परत जिंकणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण असते. आणि वादविवाद लोकांना एकमेकांपासून राजवाड्याच्या प्रवेशद्वारांवरील आडव्या बळकट खांबांइतके दूर नेतात.
19 Um irmão ofendido é pior que uma cidade forte; as questões entre irmãos são como os ferrolhos de uma cidadela.
20 तुम्ही जे बोलता त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. जर तुम्ही चांगले बोललात तर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. जर तुम्ही वाईट बोललात तर वाईट गोष्टी घडतील.
20 É do fruto de sua boca que um homem se nutre; com o produto de seus lábios ele se farta.
21 जीवन किंवा मरणही देणारे शब्द जीभ बोलू शकते. आणि ज्यांना बोलायला आवडते त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या परिणामाचा स्वीकार करायची तयारी ठेवली पाहिजे.
21 Morte e vida estão à mercê da língua: os que a amam comerão dos seus frutos.
22 जर तुम्हाला बायको मिळाली, तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेवर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते.
22 Aquele que acha uma mulher, acha a felicidade: é um dom recebido do Senhor.
23 गरीब माणूस मातीची भीक मागेल. पण श्रीमंत माणूस उत्तर देतानासुध्दा मग्रूर असतो.
23 O pobre fala suplicando; a resposta do rico é ríspida.
24 काही मित्रांबरोबर असणे आनंददायी असते. पण जवळचा मित्र भावापेक्षाही चांगला असतो.
24 O homem cercado de muitos amigos tem neles sua desgraça, mas existe um amigo mais unido que um irmão.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 18, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.