Provérbios 14

Marathi Bible (GL_MARATHI) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 शहाणी स्त्री तिच्या शहाणपणाचा उपयोग तिचे घर जसे असायला हवे तसे करण्यासाठी करते. पण मूर्ख बाई तिच्या मूर्खपणामुळे घराचा सत्यानाश करते.
1 Toda mulher sábia edifica a sua casa, mas a tola derriba-a com as suas mãos.
2 जो माणूस योग्य रीतीने जगतो तो परमेश्वराला मान देतो. पण जो माणूस इमानदार नसतो तो परमेश्वराचा तिरस्कार करतो.
2 O que anda na sua sinceridade teme ao Senhor , mas o que se desvia de seus caminhos despreza-o.
3 मूर्ख व गर्विष्ठ माणसाचे शब्द त्याच्यावर संकटे आणतात. पण शहाण्या माणसाचे शब्द त्याला वाचवतात.
3 Na boca do tolo está a vara da soberba, mas os lábios do sábio preservá-lo-ão.
4 जर काम करायला गायी नसल्या तर धान्याचे कोठार रिकामे राहील. लोक गायीच्या शक्तीचा उपयोग चांगले पीक काढण्यासाठी करुन घेऊ शकतात.
4 Não havendo bois, o celeiro fica limpo, mas, pela força do boi, há abundância de colheitas.
5 सत्यावादी माणूस खोटे बोलत नाही. तो चांगला साक्षीदार असतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते तो कधीच खरे सांगत नाही. तो वाईट साक्षीदार असतो.
5 A testemunha verdadeira não mentirá, mas a testemunha falsa se desboca em mentiras.
6 जे लोक देवाची थट्टा करतात ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते कधीच मिळत नाही. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते खरोखर शहाणे आहेत. त्यांच्याजवळ ज्ञान सहजपणे येते.
6 O escarnecedor busca sabedoria e não a acha, mas para o prudente o conhecimento é fácil.
7 मूर्खाशी मैत्री करु नका. तो तुम्हाला काहीही शिकवू शकणार नाही.
7 Vai-te à presença do homem insensato e nele não divisarás os lábios do conhecimento.
8 हुशार लोक शहाणे असतात. कारण ते ज्या गोष्टी करतात त्याचा काळजीपूर्वक विचार करतात. पण मूर्ख लोक मूर्ख असतात कराण आपण दुसऱ्यांना फसवून जगू शकतो असे त्यांना वाटत असते.
8 A sabedoria do prudente é entender o seu caminho, mas a estultícia dos tolos é enganar.
9 मूर्ख माणूस त्याने केलेल्या वाईट गोष्टींसाठी किंमत मोजण्याच्या कल्पनेला हसतो. पण चांगले लोक त्यासाठी क्षमा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
9 Os loucos zombam do pecado, mas entre os retos há boa vontade.
10 जर एखादा माणूस दु:खी असला तर फक्त त्यालाच ते दु:ख जाणवत असते. त्याचप्रमाणे जर माणूस आनंदी असला तर तो आनंद जाणवू शकेल असा तो एकटाच असतो.
10 O coração conhece a sua própria amargura, e o estranho não se entremeterá na sua alegria.
11 वाईट माणसाच्या घराचा नाश होईल. पण चांगल्या माणसाचे घर सदैव राहील.
11 A casa dos ímpios se desfará, mas a tenda dos retos florescerá.
12 लोकांना वाटत असते हाच मार्ग बरोबर आहे. पण तो मार्ग फक्त मरणाकडे नेतो.
12 Há caminho que ao homem parece direito, mas o fim dele são os caminhos da morte.
13 माणूस जरी हसत असला तरी तो मनातून दु:खी असू शकतो. आणि हसल्यावरही खिन्नता तिथे तशीच राहाते.
13 Até no riso terá dor o coração, e o fim da alegria é tristeza.
14 दुष्ट माणसांना त्यांनी केलेल्या चुकांबद्दल पूर्ण किंमत मोजावी लागेल. आणि चांगल्या माणसांना चांगल्या कृत्यांबद्दल बक्षीस मिळेल.
14 Dos seus caminhos se fartará o infiel de coração, mas o homem bom se fartará de si mesmo.
15 मूर्ख जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो. पण शहाणा माणूस प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करतो.
15 O simples dá crédito a cada palavra, mas o prudente atenta para os seus passos.
16 शहाणा माणूस परमेश्वराचा आदर करतो आणि वाईटापासून दूर राहतो. पण मूर्ख विचार न करता गोष्टी करतो. तो लक्षपूर्वक गोष्टी करत नाही.
16 O sábio teme e desvia-se do mal, mas o tolo encoleriza-se e dá-se por seguro.
17 जो माणूस चटकन् रागावतो तो मूर्खासारख्या गोष्टी करतो. शहाणा मनुष्य सहनशील असतो.
17 O que presto se ira fará doidices, e o homem de más imaginações será aborrecido.
18 मूर्खांना त्यांच्या मूर्खपणाबद्दल शिक्षा होते. पण शहाण्यांना ज्ञानाचा लाभ होतो.
18 Os simples herdarão a estultícia, mas os prudentes se coroarão de conhecimento.
19 चांगले लोक वाईटांबरोबर लढताना जिंकतील, वाईटांना त्यांच्यापुढे नतमस्तक होणे भाग पडेल.
19 Os maus inclinam-se perante a face dos bons, e os ímpios, diante das portas do justo.
20 गरीबाला मित्र नसतात, शेजारीही नसतो. पण श्रीमंताला खूप मित्र असतात.
20 O pobre é aborrecido até do companheiro, mas os amigos dos ricos são muitos.
21 जो शेजाऱ्याला पाण्यात पाहातो, तो पाप करतो. जर सुखी व्हायचे असेल तर त्या गरीबांशी दयाळू राहा.
21 O que despreza ao seu companheiro peca, mas o que se compadece dos humildes é bem-aventurado.
22 जो दुष्ट गोष्टींच्या योजना आखतो तो चूक करतो. पण जो चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याजवळ प्रेम करणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे मित्र असतात.
22 Porventura, não erram os que praticam o mal? Mas beneficência e fidelidade haverá para os que praticam o bem.
23 जर तुम्ही कष्ट केलेत तर तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुमच्या जवळ असतील. पण जर तुम्ही काही न करता फक्त बोलतच राहिलात तर तुम्ही गरीबच राहाल.
23 Em todo trabalho há proveito, mas a palavra dos lábios só encaminha para a pobreza.
24 शहाण्यांना संपत्तीचे बक्षीस मिळते. पण मूर्खांना मूर्खपणाचे बक्षीस मिळते.
24 A coroa dos sábios é a sua riqueza, a estultícia dos tolos é só estultícia.
25 जो माणूस खरे सांगतो तो इतरांना मदत करतो. जो खोटे बोलतो तो इतरांना दु:ख देतो.
25 A testemunha verdadeira livra as almas, mas o que se desboca em mentiras é enganador.
26 जो परमेश्वराचा आदर करतो तो सुरक्षित असतो आणि त्याची मुलेही सुरक्षितपणे जगतात.
26 No temor do Senhor , há firme confiança, e ele será um refúgio para seus filhos.
27 परमेश्वराबद्दलची आदर युक्त भीती खरे जीवन देते. त्यामुळे माणूस मरणाच्या जाळ्यातून वाचतो.
27 O temor do Senhor é uma fonte de vida para preservar dos laços da morte.
28 जर राजा खूप लोकांवर राज्य करत असला तर तो महान असतो. पण जर तिथे लोकच नसले तर त्या राजाची काहीच किंमत नसते.
28 Na multidão do povo está a magnificência do rei, mas, na falta de povo, a perturbação do príncipe.
29 सहनशील माणूस खूप हुशार असतो. ज्या माणसाला चटकन् राग येतो तो आपण मूर्ख आहोत, हे सिध्द करतो.
29 O longânimo é grande em entendimento, mas o de ânimo precipitado exalta a loucura.
30 जर एखाद्याच्या मनात शांती असली तर त्याचे शरीर निरोगी असते. पण मत्सर त्याच्या शरीरात आजार निर्माण करतो.
30 O coração com saúde é a vida da carne, mas a inveja é a podridão dos ossos.
31 जो माणूस गरीबांवर संकटे आणतो तो आपण देवाचा आदर करीत नाही हे दाखवतो. देवानेच दोघांनाही निर्माण केले आहे. पण जर एखादा गरीबांशी कनवाळूपणे वागला तर तो देवाचा आदर करतो हे दिसून येते.
31 O que oprime ao pobre insulta aquele que o criou, mas o que se compadece do necessitado honra-o.
32 संकटाच्यावेळी दुष्ट माणसाचा पराभव होतो. पण चांगली माणसे मरणाच्या दारातही विजयी होतात.
32 Pela sua malícia, será lançado fora o ímpio, mas o justo até na sua morte tem esperança.
33 शहाणा माणूस नेहमी शहाण्या गोष्टींचा विचार करतो. पण मूर्खाला शहाणपणाबद्दल काहीही माहिती नसते.
33 No coração do prudente, repousa a sabedoria, mas o que há no interior dos tolos se conhece.
34 चांगलपणा देशाला महान बनवतो. पण पाप कुठल्याही लोकांना लाज आणते.
34 A justiça exalta as nações, mas o pecado é o opróbrio dos povos.
35 राजाजवळ जेव्हा शहाणे नेते असतात तेव्हा राजा आनंदी असतो. पण मूर्ख नेत्यांवर राजा रागावतो.
35 O rei tem seu contentamento no servo prudente, mas, sobre o que procede indignamente, cairá o seu furor.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.