Provérbios 11
Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT
NVT Nova Versão Transformadora
1 काही लोक नीट वजन न करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो.
1 O uso de balanças desonestas é detestável para o S enhor , mas ele se alegra com pesos exatos.
2 जे लोक गर्विष्ठ आहेत ते बिनमहत्वाचे ठरतील. पण जे लोक विनम्र आहेत ते शहाणेही होतील.
2 O orgulho leva à desgraça, mas com a humildade vem a sabedoria.
3 चांगल्या, इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. पण दुष्ट लोक जेव्हा दुसऱ्यांना फसवतात तेव्हा ते स्वत:चाच नाश करुन घेतात.
3 A honestidade guia os justos; a desonestidade destrói os desleais.
4 ज्या दिवशी देव लोकांचा न्याय करतो त्या दिवशी पैशाला काही किंमत नसते. परंतु चांगुलपणा लोकांना त्यांच्या मरणापासून वाचवतो.
4 As riquezas de nada ajudarão no dia do juízo, mas uma vida justa livra da morte.
5 जर चांगला माणूस इमानी असला तर त्याचे आयुष्य सोपे असेल. पण दुष्ट माणसाचा मात्र त्याने केलेल्या वाईट गोष्टीमुळे नाश होईल.
5 A integridade dirige os passos do justo, mas o peso do pecado cai sob os perversos.
6 इमानी माणसाला चांगुलपणा वाचवतो. पण दुष्ट मात्र त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतात.
6 A justiça dos justos os livra; a ambição dos desleais os apanha numa armadilha.
7 दुष्ट माणूस मेल्यानंतर त्याला आशेला जागा नसते. तो ज्या ज्या गोष्टींची आशा ठेवतो त्या सर्व कवडीमोल असतात.
7 Quando o perverso morre, sua esperança morre com ele, pois confiou na própria força.
8 चांगल्या माणसांचा संकटापासून बचाव होईल. आणि ती संकटे दुष्ट माणसांवर येतील.
8 O justo é salvo da angústia, mas o perverso a recebe em lugar dele.
9 दुष्ट माणूस काहीतरी बोलून लोकांना दुखवू शकतो. पण चांगल्या माणसांचे त्यांच्या शहाणपणामुळे रक्षण होते.
9 O hipócrita, com suas palavras, destrói seus amigos, mas o conhecimento livra os justos.
10 चांगली माणसे जेव्हा यशस्वी होतात तेव्हा सर्व शहर आनंदी होते. जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा लोक आनंदाने ओरडू लागतात.
10 A cidade inteira comemora o sucesso dos justos; todos gritam de alegria quando morrem os perversos.
11 इमानदार लोक त्यांचे आशीर्वाद देतात तेव्हा शहर मोठे होते. पण दुष्टांचा बोलण्यामुळे शहराचा नाश होऊ शकतो.
11 A cidade prospera pelos benefícios que os justos trazem, mas as palavras dos perversos a destroem.
12 ज्या माणसाला चांगली समज बुध्दी नसते तो त्याच्या शेझाऱ्याबद्दल वाईट बोलतो. परंतु शहाण्या माणसाला केव्हा गप्प बसायचे ते कळते.
12 É falta de bom senso desprezar o próximo; a pessoa sensata permanece calada.
13 जो माणूस दुसऱ्या लोकांबद्दल काही गुप्त गोष्टी सांगतो तो गुप्तता पाळत नाही. (म्हणून त्याच्यावर विश्वास टाकणे शक्य नसते.) पण जो माणूस विश्वासू असतो तो अफवा पसरवत नाही.
13 O fofoqueiro espalha segredos, mas a pessoa confiável sabe guardar confidências.
14 कमजोर नेत्यांमुळे देश गर्तेत जातो. पण बरोच चांगले उपदेशक असले तर तो देश सुरक्षित असतो.
14 Sem uma liderança sábia, a nação cai; ter muitos conselheiros lhe dá segurança.
15 जर तुम्ही दुसऱ्या माणसाचे कर्ज फेडण्याची हमी घेतलीत तर तुम्हाला त्या बद्दल पश्चात्ताप करावा लागेल. पण जर तुम्ही त्याला तसे व्यवहार करायला नकार दिलात तर तुम्ही सुरक्षित राहाल.
15 Quem aceita ser fiador terá problemas; quem evita esse compromisso está seguro.
16 .दयाळू आणि कोमल स्त्री आदराला पात्र होते. जे लोक जुलमी आहेत ते केवळ पैसा मिळवतात.
16 A mulher bondosa ganha respeito; tudo que os homens cruéis obtêm é riqueza.
17 दयाळू माणसाला लाभ होईल. पण जो माणूस उलट्या काळजाचा असतो तो स्वत:वर संकटे ओढवून घेतो.
17 Quem faz o bem beneficia a si mesmo; quem pratica o mal só se prejudica.
18 दुष्ट माणूस दुसऱ्यांना फसवतो आणि त्यांचे पैसे घेतो. पण जो माणूस न्याची आहे आणि जो योग्य गोष्टी करतो त्याला फलप्राप्ती होते.
18 A riqueza do perverso dura apenas um momento, mas a recompensa do justo é duradoura.
19 चांगुलपणा खरोखरच जीवन आणतो. पण दुष्ट माणसे दुष्टपणाकडे वळतात आणि मरण मिळवतात.
19 O justo encontra a vida; o perverso encontra a morte.
20 जे लोक आनंदाने दुष्टपणा करतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो. पण जे लोक योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल परमेश्वर आनंदी असतो.
20 Os perversos de coração são detestáveis para o S enhor , mas ele se alegra com os que andam em integridade.
21 दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल.
21 O perverso certamente será castigado, mas os justos serão poupados.
22 जर स्त्री सुंदर असून मूर्ख असली तर ते डुकराच्या नाकात सुंदर सोन्याची नथ असल्यासारखे असते.
22 A mulher bonita, mas indiscreta, é como anel de ouro em focinho de porco.
23 चांगल्या लोकांना च्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांतून अधिक चांगले निर्माण होते. पण दुष्टांना जर त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यामुळे संकटेच येतात.
23 Os justos têm a expectativa de uma recompensa, enquanto os perversos só podem esperar o juízo.
24 जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल.
24 Quem dá com generosidade se torna mais rico, mas o mesquinho perde tudo.
25 जो उदार होऊन देतो त्याला लाभ होतो. जर तुम्ही दुसऱ्याना मदत केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल.
25 O generoso prospera; quem revigora outros será revigorado.
26 जो अधाशी माणूस त्याचे धान्य विकायला नकार देतो त्याच्यावर लोक रागावतात. पण जो माणूस दुसऱ्यांना खायला मिळावे म्हणून आपले धान्य विकतो त्याच्याबद्दल लोकांना आनंद वाटतो.
26 O povo amaldiçoa quem esconde os cereais, mas abençoa quem os vende no tempo de necessidade.
27 जो माणूस दुसऱ्यांचे भले करायचा प्रयत्न करतो त्याचा लोक आदर करतात. जो माणूस वाईट गोष्टी करतो त्याच्या वाटेला फक्त संकटे येतात.
27 Quem procura o bem encontra favor; quem procura o mal será encontrado por ele.
28 जो माणूस आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पिवळ्या झालेल्या पानासारखा खाली पडतो. परंतु चांगला माणूस नव्या हिरव्या पानाप्रमाणे वाढत राहील.
28 Quem confia em seu dinheiro cairá, mas o justo floresce como a verde folhagem.
29 जर एखाद्याने त्याच्या कुटुंबावर संकटे आणली तर त्याला काहीही मिळणार नाही आणि शेवटी मूर्खाला शहाण्या माणसाची जबरदस्तीने सेवा करावी लागेल.
29 Quem causa problemas à família herda o vento; o insensato se torna servo do sábio.
30 चांगला माणूस ज्या गोष्टी करतो त्या जीवनवृक्षासारख्या असतात. शहाणा माणूस लोकांना नवे आयुष्य देतो.
30 O fruto do justo é árvore de vida; o sábio conquista pessoas.
31 जर पृथ्वीवर चांगल्या माणसांना बक्षीस मिळाले तर दुष्टांनासुध्दा त्याच्या पात्रतेनुसार काही तरी मिळेल.
31 Se o justo recebe o que merece aqui na terra, quanto mais o pecador perverso.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.