Números 22

Marathi Bible (GL_MARATHI) vs BKJ

Sair da comparação
1 नंतर इस्राएल लोक मवाबमधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरिहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला.
1 E os filhos de Israel partiram, e acamparam nas planícies de Moabe, deste lado do Jordão, junto a Jericó.
2 सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते. मवाबचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता.
2 E Balaque, filho de Zipor, viu tudo o que Israel havia feito aos amorreus.
3 मवाबचा राजा मिद्यानींच्या नेत्यांना म्हणाला, “गाय जशी शेतातले सगळे गवत खाऊन टाकते तसेच हे लोक आपला नाश करतील.”त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबचा राजा होता.
3 E Moabe estava com medo do povo, porque eram muitos, e Moabe se afligiu, por causa dos filhos de Israel.
4 त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात रहात होता. इथेच बलामचे लोक रहात असत. बालाकाचा निरोप हा होता: “एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर मधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ ठोकला आहे.
4 E Moabe disse aos anciãos de Midiã: Agora este grupo lamberá tudo o que há ao nosso redor, como o boi lambe a erva do campo. E naquele tempo, Balaque, filho de Zipor, era rei dos moabitas.
5 ये आणि मला मदत कर. मला एकट्याला हे लोक खूप भारी आहेत. तुझ्याजवळ खूप शक्ति आहे हे मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात. आणि जर एखाद्याला शाप दिलास तर त्याच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात. म्हणून ये आणि या लोकांविरुद्ध बोल. कदाचित त्यानंतर मी त्यांचा पराभव करु शकेन. मी त्यांना माझा देश सोडायला भाग पाडू शकेन.”
5 Assim, ele enviou mensageiros a Balaão, filho de Beor, a Petor, que está junto ao rio, na terra dos filhos do seu povo, para chamá-lo, dizendo: Eis que um povo saiu do Egito; eis que cobrem a face da terra e eles habitam diante de mim.
6 मवाब आणि मिद्यानचे पुढारी बलामशी बोलायला गेले. त्याच्या कामाचामोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामाला सांगितले.
6 Por isso, peço-te, vem agora, amaldiçoa-me este povo, porque é forte demais para mim; para que eu possa vencê-los, feri-los e expulsá-los da terra, porque sei que aquele a quem abençoas está abençoado, e aquele a quem amaldiçoas está amaldiçoado.
7 बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हाला सांगेन.” मवाबचे पुढारी त्या रात्री बलामबरोबर राहिले.
7 E os anciãos de Moabe e os anciãos de Midiã partiram, com a recompensa pela adivinhação em suas mãos; e foram até Balaão e lhe transmitiram as palavras de Balaque.
8 देव बलामकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?”
8 E ele lhes disse: Passai aqui esta noite, e vos trarei a resposta que o SENHOR me falar; e os príncipes de Moabe ficaram com Balaão.
9 बलाम देवाला म्हणाला, “सिप्पोरचा मुलगा बालाकने, मवाबच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे.
9 E Deus veio até Balaão e disse: Quem são estes homens contigo?
10 तो निरोप हा: एका नवीन राष्ट्राचे लोक मिसरमधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून ये आणि त्या लोकांविरुद्ध बोल. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन.आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.”
10 E Balaão disse a Deus: Balaque, filho de Zipor, rei de Moabe, os enviou a mim, dizendo:
11 पण देव बलामला म्हणाला, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांविरुद्ध बोलू नकोस. ती माझा आशीर्वाद मिळालेली माणसे आहेत.”
11 Eis que saiu um povo do Egito, que cobre a face da terra. Vem, agora, amaldiçoa-os; talvez eu consiga vencê-los e expulsá-los.
12 दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकच्या पुढाऱ्यांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्या बरोबर जाऊ देणार नाही.”
12 Então, Deus disse a Balaão: Não irás com eles, tu não amaldiçoarás a este povo, porque são benditos.
13 त्यामुळे मवाबचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्याला हे सांगितले. ते म्हणाले, “बलामने आमच्या बरोबर यायला नकार दिला.”
13 E Balaão se levantou pela manhã, e disse aos príncipes de Balaque: Voltai à vossa terra, porque o SENHOR se recusa a deixar que eu vá convosco.
14 म्हणून बालाकने बलामकडे दुसरे पुढारी पाठवले. यावेळी त्याने पहिल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढारी पाठवले. हे पुढारी पहिल्या पुढाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते.
14 E os príncipes de Moabe se levantaram e foram até Balaque, e disseram: Balaão se recusou a vir conosco.
15 ते बलामकडे गेले आणि म्हणाले, “बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो: तुझ्या इथे येण्याच्या आड कुठलीही गोष्ट येऊ देवू नको.
15 E Balaque enviou mais príncipes, ainda mais honrados do que eles.
16 मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशिल ते मी करीनपण तू ये व या लोकांविरुद्ध माझ्यासाठी बोल.”
16 E eles vieram até Balaão e lhe disseram: Assim diz Balaque, filho de Zipor: Peço-te que não deixes de vir até mim,
17 बलामने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, “मी माझ्या देवाची, परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे. मी त्याच्या आज्ञे विरुद्ध काहीही करु शकत नाही. परमेश्वराने सांगितल्या खेरीज मी कुठलीही लहान-मोठी गोष्ट करणार नाही. बालाकाने मला त्याचे सुंदर घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही.
17 porque grandemente te honrarei, e farei tudo o que me disseres. Portanto, vem, peço-te, amaldiçoa este povo.
18 परंतु आजच्या रात्रीपुरते तुम्ही इथे मागच्या सारखे राहू शकता. आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला रात्रीतून कळू शकेल.”
18 E Balaão respondeu, e disse aos servos de Balaque: Mesmo que Balaque me desse a sua casa cheia de prata e de ouro, eu não poderia ir além da palavra do SENHOR, meu Deus, para fazer mais ou menos.
19 त्या रात्री देव बलामकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्या बरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.”
19 Agora portanto, peço-vos que fiqueis também aqui esta noite, para que eu possa saber o que o SENHOR me dirá mais.
20 दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबच्या पुढाऱ्यांबरोबर चालला.
20 Veio, pois, Deus a Balaão, de noite, e disse-lhe: Se os homens vierem te chamar, levanta-te e vai com eles; porém a palavra que eu te disser, isso farás.
21 बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामपुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामला थांबवणारहोता.
21 E Balaão se levantou pela manhã, e selou sua jumenta, e foi com os príncipes de Moabe.
22 बलामच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामला देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले.
22 E a ira de Deus se acendeu, porque ele foi; e o anjo do SENHOR se pôs no caminho, como adversário. E ele seguia, montado em sua jumenta, e seus dois servos estavam com ele.
23 नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या.
23 E a jumenta viu o anjo do SENHOR em pé no caminho, com a espada desembainhada na mão; e a jumenta se desviou do caminho e foi para o campo; e Balaão feriu a jumenta, para trazê-la de volta ao caminho.
24 गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले.
24 Mas o anjo do SENHOR se pôs em uma vereda entre as vinhas, um muro de um lado, e um muro do outro lado.
25 नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्याला वळसा घालून जाणे शक्य नव्हते.
25 E quando a jumenta viu o anjo do SENHOR, encostou-se no muro, e esmagou o pé de Balaão contra o muro, e ele a feriu novamente.
26 गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या चालण्याच्या काठीने मारायला सुरुवात केली.
26 Então, o anjo do SENHOR passou mais à frente, e ficou mais adiante, em um lugar estreito, onde não havia como se desviar, nem para a direita nem para a esquerda.
27 नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामला म्हणाली, “तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.”
27 E quando a jumenta viu o anjo do SENHOR, caiu debaixo de Balaão; e a ira de Balaão se acendeu, e ele feriu a jumenta com uma vara.
28 बलामने गाढवीला उत्तर दिले, “तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.”
28 E o SENHOR abriu a boca da jumenta, e ela disse a Balaão: O que eu te fiz, que me feriste estas três vezes?
29 पण गाढवी बलामला म्हणाली, “बघ मी तुझीच गाढवी आहे. खूप वर्षे तू माझ्यावर बसत आला आहेस. आणि या पूर्वी मी असे काही केले नाही हे तुला माहीत आहे.”‘हे खरे आहे’ बलाम म्हणाला.
29 E Balaão disse à jumenta: Porque zombaste de mim; quisera eu ter uma espada na mão, porque agora te mataria.
30 नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला.
30 E a jumenta disse a Balaão: Não sou a tua jumenta, em que cavalgaste desde o tempo em que me tornei tua até hoje? Alguma vez fiz isso contigo? E ele disse: Não.
31 परमेश्वराच्या दूताने बलामला विचारले, “तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी
31 Então, o SENHOR abriu os olhos de Balaão, e ele viu o anjo do SENHOR em pé no caminho, com a sua espada desembainhada na mão; e ele inclinou a cabeça e caiu sobre a sua face.
32 तुझ्या गाढवीने मला पाहिले आणि ती दूर गेली. असे तीन वेळा घडले. जर गाढवी वळली नसती तर आतापर्यंत मी तुला मारले असते आणि तुझ्या गाढवीला जिवंत राहू दिले असते.”
32 E o anjo do SENHOR lhe disse: Por que espancaste a tua jumenta três vezes? Eis que eu saí para ser teu adversário, porque o teu caminho é perverso diante de mim.
33 तेव्हा बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. तू रस्त्यात उभा आहेस हे मला माहीत नव्हते. मी जर चूक करीत असेन तर मी घरी परत जाईन.”
33 E a jumenta me viu e se desviou de mim três vezes; se ela não tivesse se desviado de mim, certamente agora eu teria te matado, e poupado a vida dela.
34 तेव्हा परमेश्वराचा दूत बलामला म्हणाला, “नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल.” म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.
34 E Balaão disse ao anjo do SENHOR: Eu pequei, porque não sabia que estavas no caminho contra mim. Agora, se te desagradei, voltarei.
35 बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामला भेटायला अर्णोन नदी जवळच्या मवाबच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते.
35 E o anjo do SENHOR disse a Balaão: Vai com os homens, mas somente a palavra que eu falar, essa falarás. Então Balaão foi com os príncipes de Balaque.
36 जेव्हा बालाकाने बलामला पाहिले तेव्हा तो त्याला म्हणाला, “मी तुला आधीच यायला सांगितले होते. हे खूप खूप महत्त्वाचे आहे असे मी तुला सांगत होतो. तू माझ्याकडे का आला नाहीस? आता मी तुला कदाचित पैसे देऊ शकणार नाही.”
36 E quando Balaque soube que Balaão vinha, foi ao seu encontro até a cidade de Moabe, que está na fronteira de Arnom, na extremidade do território.
37 बलामने उत्तर दिले, “पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेत तेवढेच मी बोलू शकतो.
37 E Balaque disse a Balaão: Porventura não te enviei mensageiros a chamar-te? Por que não viestes a mim? Eu não sou capaz de te honrar?
38 नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला.
38 E Balaão disse a Balaque: Eis que eu tenho vindo a ti; por acaso, posso eu falar alguma coisa? A palavra que Deus puser em minha boca, esta falarei.
39 बालाकाने काही गुरे व मेंढ्या बळी म्हणून मारल्या. त्याने थोडे मास बलामला दिले आणि थोडे त्याच्याबरोबर असलेल्या पुढाऱ्यांना दिले.
39 E Balaão foi com Balaque, e chegaram a Quiriate-Huzote.
40 दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामला घेऊन बामोथबाल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता.
40 E Balaque ofereceu bois e ovelhas; e os enviou a Balaão e aos príncipes que estavam com ele.
41 — ausente —
41 E no dia seguinte, Balaque tomou a Balaão e o levou aos lugares altos de Baal, para que pudesse ver dali a parte mais distante do povo.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Números 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.