Mateus 4

Marathi Bible (GL_MARATHI) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले.
1 A seguir, Jesus foi levado pelo Espírito ao deserto, para ser tentado pelo diabo.
2 चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही. त्यानंतर त्याला खूप भूक लागली.
2 E, depois de jejuar quarenta dias e quarenta noites, teve fome.
3 तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे.”
3 Então o tentador, aproximando-se, disse a Jesus: — Se você é o Filho de Deus, mande que estas pedras se transformem em pães.
4 येशूने उत्तर दिले, “असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल.”‘ अनुवाद 8:3
4 Jesus, porém, respondeu:
5 मग सैतानाने त्याला पवित्र नगरात (यरुशलेेमात) नेले. सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले.
5 Então o diabo levou Jesus à Cidade Santa, colocou-o sobre o pináculo do templo
6 आणि त्याला म्हटले, “जर तू देवाचा पूत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की,‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलतील.”‘ स्तोत्र 91:11-12
6 e disse: — Se você é o Filho de Deus, jogue-se daqui, porque está escrito: “Aos seus anjos ele dará ordens a seu respeito. E eles o sustentarão nas suas mãos, para que você não tropece em alguma pedra.”
7 येशूने त्याला उत्तर दिले, “असे सुद्धा लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको.”‘ अनुवाद 6:16
7 Jesus respondeu:
8 मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखविले.
8 O diabo ainda levou Jesus a um monte muito alto, mostrou-lhe todos os reinos do mundo e a glória deles
9 सैतान म्हणाला, “जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन.”‘
9 e disse: — Tudo isso lhe darei se, prostrado, você me adorar.
10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की‘देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”‘ अनुवाद 6:13
10 Então Jesus lhe ordenou:
11 मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले.
11 Com isto, o diabo deixou Jesus, e eis que vieram anjos e o serviram.
12 नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला.
12 Ao ouvir que João tinha sido preso, Jesus voltou para a Galileia.
13 परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही, तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला. जबुलून व नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे.
13 E, deixando Nazaré, foi morar em Cafarnaum, situada à beira-mar, na região de Zebulom e Naftali.
14 यशया ह्या संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. यशयाने वर्तविलेले भविष्य असे होते:
14 Isso aconteceu para se cumprir o que tinha sido dito por meio do profeta Isaías:
15 जबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग, यार्देन नदीपलीकडचा प्रदेश व यहूदीतरांचा गालील यांमधील-
15 “Terra de Zebulom, terra de Naftali, caminho do mar, além do Jordão, Galileia dos gentios!
16 अंधारात वावरणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला.” यशया 9:1-2
16 O povo que vivia em trevas viu grande luz, e aos que viviam na região e sombra da morte resplandeceu-lhes a luz.”
17 त्योवेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”(मार्क 1:16-20; लूक 5:1-11)
17 Daí em diante Jesus começou a pregar e a dizer:
18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते.
18 Caminhando junto ao mar da Galileia, Jesus viu dois irmãos, Simão, chamado Pedro, e André. Eles lançavam as redes ao mar, porque eram pescadores.
19 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”
19 Jesus lhes disse:
20 मग ते मागेपुढे न पाहता लगेच जाळे टाकून देऊन ते त्याच्या मागे चालू लागले.
20 Então eles deixaram imediatamente as redes e o seguiram.
21 तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले. आणि त्याने त्यांना बोलावले.
21 Pouco mais adiante, Jesus viu outros dois irmãos, Tiago, filho de Zebedeu, e João, o irmão dele. Eles estavam no barco em companhia de seu pai, consertando as redes; e Jesus os chamou.
22 तेव्हा ते आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले.
22 Então eles, no mesmo instante, deixaram o barco e seu pai e seguiram Jesus.
23 येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली.
23 Jesus percorria toda a Galileia, ensinando nas sinagogas, pregando o evangelho do Reino e curando todo tipo de doenças e enfermidades entre o povo.
24 येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले.
24 E a sua fama correu por toda a Síria. Trouxeram-lhe, então, todos os doentes, acometidos de várias enfermidades e tormentos: endemoniados, epilépticos e paralíticos. E ele os curou.
25 मग गालील व दकापलीस, यरुशलेम व यहूदीया येथून व यार्देनेच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालले.
25 E da Galileia, de Decápolis, de Jerusalém, da Judeia e do outro lado do Jordão numerosas multidões o seguiam.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Mateus 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.