Mateus 27

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला. आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला.
1 De manhã cedo, todos os chefes dos sacerdotes e líderes religiosos do povo tomaram a decisão de condenar Jesus à morte.
2 त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
2 E, amarrando-o, levaram-no e o entregaram a Pilatos, o governador.
3 त्याच वेळेला, यहूदा, जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता, त्याने पाहिले कि, त्यांनी येशूला जिवे मारण्याचे ठरविले आहे, तेव्हा त्याने जे केले होते त्याचे त्याला वाईट वाटले. म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक व वडिलांना परत दिली.
3 Quando Judas, que o havia traído, viu que Jesus fora condenado, foi tomado de remorso e devolveu aos chefes dos sacerdotes e aos líderes religiosos as trinta moedas de prata.
4 तो म्हणाला, “मी पाप केले आहे, मी एका निष्पाप मनुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले.”यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हांला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”
4 E disse: "Pequei, pois traí sangue inocente". E eles retrucaram: "Que nos importa? A responsabilidade é sua".
5 तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वत:ला गळफास लावून घेतला.
5 Então Judas jogou o dinheiro dentro do templo, saindo, foi e enforcou-se.
6 मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे मंदिराच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमाविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.”
6 Os chefes dos sacerdotes ajuntaram as moedas e disseram: "É contra a lei colocar este dinheiro no tesouro, visto que é preço de sangue".
7 म्हणून त्यांनी त्या पैशांनी कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेण्याचे ठरविले. यरूशलेमला भेट देण्यासाठी येणाऱ्या माणसांना मरण आले तर त्यांना पुरण्यासाठी त्या शेताचा उपयोग करता येईल.
7 Então decidiram usar aquele dinheiro para comprar o campo do Oleiro, para cemitério de estrangeiros.
8 त्यामुळे आजही त्या जागेला ‘रक्ताचे शेत’ असे म्हणतात.
8 Por isso ele se chama campo de Sangue até o dia de hoje.
9 अशा रीतीने यिर्मया संदेष्ट्याचे बोल खरे ठरले. ते असे:“त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली हे पैसे यहूदी लोकांनी त्याच्या (येशूच्या) जिवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले.
9 Então se cumpriu o que fora dito pelo profeta Jeremias: "Tomaram as trinta moedas de prata, preço em que foi avaliado pelo povo de Israel,
10 मला प्रभु परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी कुंभारचे शेत विकत घेतले.”
10 e as usaram para comprar o campo do Oleiro, como o Senhor me ordenou".
11 राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
11 Jesus foi posto diante do governador, e este lhe perguntou: "Você é o rei dos judeus? " Respondeu-lhe Jesus: "Tu o dizes".
12 पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
12 Acusado pelos chefes dos sacerdotes e pelos líderes religiosos, ele nada respondeu.
13 म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”
13 Então Pilatos lhe perguntou: "Você não ouve a acusação que eles estão fazendo contra você? "
14 परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही. आणि पिलात आश्चर्यचकित झाला.
14 Mas Jesus não lhe respondeu nenhuma palavra, de modo que o governador ficou muito impressionado.
15 वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.
15 Por ocasião da festa era costume do governador soltar um prisioneiro escolhido pela multidão.
16 त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बरब्बाहोते.
16 Eles tinham, naquela ocasião, um prisioneiro muito conhecido, chamado Barrabás.
17 म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? कुविख्यात बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?”
17 Pilatos perguntou à multidão que ali se havia reunido: "Qual destes vocês querem que lhes solte: Barrabás ou Jesus, chamado Cristo? "
18 लोकांनी इर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले.
18 Porque sabia que o haviam entregado por inveja.
19 न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दु:ख सहन करावे लागेले आहे.”
19 Estando Pilatos sentado no tribunal, sua mulher lhe enviou esta mensagem: "Não se envolva com este inocente, porque hoje, em sonho, sofri muito por causa dele".
20 पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडील जनांनी लो कसमुदायाचे मन वळविले.
20 Mas os chefes dos sacerdotes e os líderes religiosos convenceram a multidão a que pedisse Barrabás e mandasse executar a Jesus.
21 पिलात म्हणाला, “माझ्यासमोर बराब्बा व येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले. ‘बरब्बा.’
21 Então perguntou o governador: "Qual dos dois vocês querem que eu lhes solte? " Responderam eles: "Barrabás! "
22 पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
22 Perguntou Pilatos: "Que farei então com Jesus, chamado Cristo? " Todos responderam: "Crucifica-o! "
23 पिलाताने विचारले, “का? मी त्याला जिवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केला आहे?”परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
23 "Por quê? Que crime ele cometeu? ", perguntou Pilatos. Mas eles gritavam ainda mais: "Crucifica-o! "
24 लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”
24 Quando Pilatos percebeu que não estava obtendo nenhum resultado, mas, pelo contrário, estava se iniciando um tumulto, mandou trazer água, lavou as mãos diante da multidão e disse: "Estou inocente do sangue deste homem; a responsabilidade é de vocês".
25 सर्व लोक ओरडून म्हणू लागले, “याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही व आमची मुले भोगायला तयार आहोत.”
25 Todo o povo respondeu: "Que o sangue dele caia sobre nós e sobre nossos filhos! "
26 मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.
26 Então Pilatos soltou-lhes Barrabás, mandou açoitar Jesus e o entregou para ser crucificado.
27 नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यापालाच्या वाड्यात घेऊन आले. ते सर्व घोळक्याने येशूभोवती जमले.
27 Então, os soldados do governador levaram Jesus ao Pretório e reuniram toda a tropa ao seu redor.
28 त्यांनी येशूचे कपडे काढले व त्याला लाल किरमिजी झगा घातला.
28 Tiraram-lhe as vestes e puseram nele um manto vermelho;
29 काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले. ते म्हणू लागले, “यहूद्याचा राजा चिरायू होवो!”
29 fizeram uma coroa de espinhos e a colocaram em sua cabeça. Puseram uma vara em sua mão direita e, ajoelhando-se diante dele, zombavam: "Salve, rei dos judeus! "
30 नंतर शिपाई येशूवर थुंकले. त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले.
30 Cuspiram nele e, tirando-lhe a vara, batiam-lhe com ela na cabeça.
31 येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले. मग ते त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी घेऊन गेले.
31 Depois de terem zombado dele, tiraram-lhe o manto e vestiram-lhe suas próprias roupas. Então o levaram para crucificá-lo.
32 शिपाई येशूला शहराबाहेर घेऊन चालले होते. तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूचा वधस्तंभ वाहायला लावले. तो कुरेने या गावचा असून त्याचे नाव शिमोन होते.
32 Ao saírem, encontraram um homem de Cirene, chamado Simão, e o forçaram a carregar a cruz.
33 जेव्हा ते ‘गुलगुथा’ (म्हणजे कवटीची जागा) नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले.
33 Chegaram a um lugar chamado Gólgota, que quer dizer Lugar da Caveira,
34 तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
34 e lhe deram para beber vinho misturado com fel; mas, depois de prová-lo, recusou-se a beber.
35 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले.
35 Depois de o crucificarem, dividiram as roupas dele, tirando sortes.
36 शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले.
36 E, sentando-se, vigiavam-no ali.
37 येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू - यहूद्यांचा राजा.”
37 Por cima de sua cabeça colocaram por escrito a acusação feita contra ele: ESTE É JESUS, O REI DOS JUDEUS.
38 येशूच्या दोन्ही बाजूंना दोन लुटारु खिळण्यात आले होते.
38 Dois ladrões foram crucificados com ele, um à sua direita e outro à sua esquerda.
39 जवळून जाणारे लोक येशूची निंदा करु लागले. ते डोकी हलवू लागले.
39 Os que passavam lançavam-lhe insultos, balançando a cabeça
40 आणि म्हणू लागले, “तू म्हणालास की, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभे करीन.’ आता स्वत:चा बचाव कर, जर तू खरोखरच देवाचा पूत्र असलास तर वधस्तंभारून खाली ये.”
40 e dizendo: "Você que destrói o templo e o reedifica em três dias, salve-se! Desça da cruz, se é Filho de Deus! "
41 तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, वडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले.
41 Da mesma forma, os chefes dos sacerdotes, os mestres da lei e os líderes religiosos zombavam dele,
42 ते म्हणू लागले, “याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वत:चा बचाव करू शकत नाही. लोक म्हणतात की, हा इस्राएल (यहूदी) लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल, तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू!
42 dizendo: "Salvou os outros, mas não é capaz de salvar a si mesmo! E é o rei de Israel! Desça agora da cruz, e creremos nele.
43 याचा देवावर विश्वास आहे, जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला वाचवावे. तो स्वत: असे म्हणत असे, ‘मी देवाचा पुत्र आहे.”‘
43 Ele confiou em Deus. Que Deus o salve agora, se dele tem compaixão, pois disse: ‘Sou o Filho de Deus! ’ "
44 तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर देखील येशूविषयी वाईट गोष्टी बोलू लागले.
44 Igualmente o insultavam os ladrões que haviam sido crucificados com ele.
45 दुपारनंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला.
45 E houve trevas sobre toda a terra, do meio dia às três horas da tarde.
46 सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकत्नी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
46 Por volta das três horas da tarde, Jesus bradou em alta voz: "Eloí, Eloí, lamá sabactâni? " que significa: "Meu Deus! Meu Deus! Por que me abandonaste? "
47 जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे एकले. ते म्हणू लागले, “तो एलीयाला हाक मारीत आहे!”
47 Quando alguns dos que estavam ali ouviram isso, disseram: "Ele está chamando Elias".
48 एक जण लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला.
48 Imediatamente, um deles correu em busca de uma esponja, embebeu-a em vinagre, colocou-a na ponta de uma vara e deu-a a Jesus para beber.
49 परंतु दुसरे काही लोक म्हणु लागले, “थांबा, एलीया येऊन त्याला वाचवितो काय, हे आम्हांला पाहायचे आहे.”
49 Mas os outros disseram: "Deixem-no. Vejamos se Elias vem salvá-lo".
50 पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला.
50 Depois de ter bradado novamente em alta voz, Jesus entregou o espírito.
51 त्याचवेळी, येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले.
51 Naquele momento, o véu do santuário rasgou-se em duas partes, de alto a baixo. A terra tremeu, e as rochas se partiram.
52 कबरी उघडल्या, आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते, ते उठविले गेले.
52 Os sepulcros se abriram, e os corpos de muitos santos que tinham morrido foram ressuscitados.
53 ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यरूशलेमामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले.
53 E, saindo dos sepulcros, depois da ressurreição de Jesus, entraram na cidade santa e apareceram a muitos.
54 सेनाधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता.”
54 Quando o centurião e os que com ele vigiavam Jesus viram o terremoto e tudo o que havia acontecido, ficaram aterrorizados e exclamaram: "Verdadeiramente este era o Filho de Deus! "
55 तेथे बऱ्याच स्त्रिया वधस्तंपासून काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करण्यासाठी या स्त्रिया गालीलाहून त्याच्यामागून आल्या होत्या.
55 Muitas mulheres estavam ali, observando de longe. Elas haviam seguido Jesus desde a Galiléia, para o servir.
56 मरीया मग्दालिया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई तेथे होत्या.
56 Entre elas estavam Maria Madalena; Maria, mãe de Tiago e de José; e a mãe dos filhos de Zebedeu.
57 संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमथाईचा होता व येशूचा अनुयायी होता.
57 Ao cair da tarde chegou um homem rico, de Arimatéia, chamado José, que se tornara discípulo de Jesus.
58 योसेफ पिलाताकडे गेला. आणि त्याने त्याचे शरीर मागितले. पिलाताने येशूचे शरीर योसेफाला देण्याचा हुकूम शिपायांना केला.
58 Dirigindo-se a Pilatos, pediu o corpo de Jesus, e Pilatos ordenou que lhe fosse entregue.
59 नंतर योसेफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन तागाच्या कपड्यात ते गुंडाळले.
59 José tomou o corpo, envolveu-o num limpo lençol de linho
60 मग योसेफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरेच्या तोंडवर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली. या गोष्टी केल्यानंतर योसेफ निघून गेला.
60 e o colocou num sepulcro novo, que ele havia mandado cavar na rocha. E, fazendo rolar uma grande pedra sobre a entrada do sepulcro, retirou-se.
61 मरीया मग्दालिया, आणि मरीया नावाची दुसरी स्त्री कबरेभोवती बसल्या होत्या.
61 Maria Madalena e a outra Maria estavam assentadas ali, em frente do sepulcro.
62 त्या दिवसाला तयारीचा दिवसम्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परुशी पिलातकडे गेले.
62 No outro dia, que era o seguinte ao da Preparação, os chefes dos sacerdotes e os fariseus dirigiram-se a Pilatos
63 ते म्हणाले, ʇमहाराज, तो लबाड मनुष्य (येशू) जिवंत असताना असे म्हणाला होता की, मी मरण पावल्यानंतर तीन दिवसांनी परत उठेन.’
63 e disseram: "Senhor, lembramos que, enquanto ainda estava vivo, aquele impostor disse: ‘Depois de três dias ressuscitarei’.
64 म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याचा हुकुम द्या. (कारण) त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांना सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.ʈ
64 Ordena, pois, que o sepulcro dele seja guardado até o terceiro dia, para que não venham seus discípulos e, roubando o corpo, digam ao povo que ele ressuscitou dentre os mortos. Este último engano será pior do que o primeiro".
65 पिलात म्हणाला, ʇतुम्ही शिपाई घेऊ शकता. जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.ʈ
65 "Levem um destacamento", respondeu Pilatos. "Podem ir, e mantenham o sepulcro em segurança como acharem melhor".
66 म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला. आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.
66 Eles foram e armaram um esquema de segurança no sepulcro; e além de deixarem um destacamento montando guarda, lacraram a pedra.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Mateus 27, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.