Jeremias 50

Marathi Bible (GL_MARATHI) vs BKJ

Sair da comparação
1 बाबेल व खास्दी ह्यंच्यासाठी परमेश्वराने पुढील संदेश दिला हा संदेश देवाने यिर्मयामार्फत दिला.
1 A palavra que o SENHOR falou contra Babilônia, e contra a terra dos caldeus por intermédio de Jeremias, o profeta:
2 “सर्व राष्ट्रांत घोषणा कर! झेंडा उंच उभारुन संदेश दे. माझा सगळा संदेश दे आणि सांग ‘बाबेल काबीज केला जाईल. बेल दैवताची फजिती होईल. मरदोख घाबरुन जाईल. बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल. त्या भयभीत होतील.’
2 Declarai vós entre as nações, e divulgai, e erguei um estandarte. Divulgai e não ocultai, dizei: Babilônia é tomada, Bel está perplexo, Merodaque está quebrado em pedaços. Os seus ídolos estão perplexos, suas imagens estão quebradas em pedaços.
3 उत्तरेकडचे राष्ट्र बाबेलवर चढाई करील. ते राष्ट्र बाबेलचे ओसाड वाळवंट करील. तेथे कोणीही राहणार नाही. माणसे व प्राणी, दोघेही, तेथून पळ काढतील”
3 Porque do norte sobe uma nação contra ela, a qual desolará sua terra, e ninguém habitará lá. Eles removerão dali tanto homem quanto animal.
4 परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी इस्राएलचे व यहूदाचे लोक एकत्र येतील. ते एकत्र येऊन रडतील, आणि एकत्रितपणेच त्यांच्या परमेश्वर देवाचा शोध घेतील.
4 Naqueles dias, e naquele tempo, diz o SENHOR, os filhos de Israel virão, eles e os filhos de Judá juntamente, indo e chorando. Eles irão, e buscarão o SENHOR seu Deus.
5 ते सियोनची वाट विचारतील, व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील. लोक म्हणतील, ‘चला, आपण स्वत: परमेश्वराला जाऊन मिळू या, अखंड राहणारा एक करार करु या. आपण कधीही विसरणार नाही असा करार करु या.’
5 Eles perguntarão o caminho para Sião com suas faces naquela direção, dizendo: Vinde, e unamo-nos ao SENHOR em um perpétuo pacto, que não será esquecido.
6 “माझे लोक चुकलेल्या मेंढराप्रमाणे आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी (नेत्यांनी) त्यांना चुकीच्या मार्गाने नेले. त्यांना डोंगर टेकड्यांतून भटकायला लावले. ते त्यांच्या विश्रांतीची जागा विसरले.
6 Meu povo tem sido ovelhas perdidas. Seus pastores as têm extraviado, eles as desviaram sobre os montes. Eles vão do monte para a colina, eles esqueceram o seu lugar de descanso.
7 ज्यांना माझे लोक सापडले, त्यांनी त्यांना दुखवले, आणि ते शत्रू म्हणाले, ‘आम्ही काहीही चूक केली नाही.’ त्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले. परमेश्वरच खरा त्यांचे विश्रांतिस्थान होता. त्यांच्या वडिलांनी परमेश्वर देवावरच विश्वास ठेवला.
7 Todos os que as encontravam as devoravam, e seus adversários disseram: Nós não transgredimos, porque eles pecaram contra o SENHOR, a habitação da justiça, o SENHOR, a esperança dos seus pais.
8 “बाबेलपासून दूर पळा खास्द्यांची भूमी सोडा कळपाच्या पुढे चालणाऱ्या एडक्याप्रमाणे व्हा.
8 Fugi do meio de Babilônia, e saí da terra dos caldeus, e sede como os bodes adiante dos rebanhos.
9 मी उत्तरेकडून खूप राष्ट्रांना एकत्र आणीन. ते बाबेलविरुद्ध लढायला सज्ज होतील. उत्तरेकडचे लोक बाबेल काबीज करतील. ते बाबेलवर बाणांचा वर्षाव करतील. ते बाण, युद्धावरुन रिकाम्या हाताने कधीच न परतणाऱ्या, सैनिकांप्रमाणे असतील.
9 Pois eis que eu farei surgir, e farei se levantar contra Babilônia uma assembleia de grandes nações da região do norte, e eles por-se-ão em ordem contra ela. Dali ela será tomada. As suas flechas serão como as de um homem poderoso especialista, nenhuma tornará vazia.
10 शत्रू खास्द्यांची सर्व संपत्ती घेतील. सैनिक त्यांना पाहिजे ते लुटून नेतील.” परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.
10 E Caldeia será um despojo; todos os que a despojarem estarão satisfeitos, diz o SENHOR.
11 “बाबेल, तू आनंदी व उल्हसित आहेस तू माझी भूमी घेतलीस. धान्यात शिरलेल्या गायीप्रमाणे तू नाचतेस. तू आनंदाने घोड्याप्रमाणे खिंकाळतेस.
11 Porque vos alegrastes, porque vos regozijastes, ó vós, destruidores da minha herança, porque vós sois fartos como a novilha na grama, e mugis como touros.
12 “आता तुझी आई खजील होईल. तुला जन्म देणारी ओशाळवाणी होईल. बाबेल सर्व राष्ट्रांत क्षुद्र ठरेल. ती म्हणजे ओसाड, निर्जन वाळवंट होईल.
12 Vossa mãe estará profundamente perplexa, ela que vos deu à luz será envergonhada. Eis que a última das nações será uma vastidão, uma terra seca, e um deserto.
13 परमेश्वर आपला क्रोध प्रकट करील, म्हणून तेथे कोणीही राहणार नाही. बाबेल संपूर्ण निर्जन होईल.“बाबेल जवळून जाणारा प्रत्येकजण भयभीत होईल. बाबेलचा असा वाईट रीतीने नाश झालेला पाहून ते हळहळतील.
13 Por causa da ira do SENHOR, ela não será habitada, porém ela será inteiramente desolada. Todo aquele que passar por Babilônia estará atônito, e assobiará por todas as suas pragas.
14 “बाबेलविरुद्ध लढण्यास सज्ज व्हा. धनुर्धाऱ्यांनो बाबेलवर बाणांचा वर्षाव करा. त्यात कमतरता करु नका. बाबेलने परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे.
14 Ponde-vos em ordem contra Babilônia ao redor, todos vós os que entesais o arco; atirai-lhe, não poupeis flechas, porque ela pecou contra o SENHOR.
15 बाबेलला वेढा घातलेल्या सैनिकांनो जयघोष करा. बाबेलने शरणागती पत्करली आहे. तिची तटबंदी व बुरुज पाडले आहेत. परमेश्वर त्यांना योग्य तीच शिक्षा करीत आहे. तिच्या लायकीप्रमाणे, तुम्ही राष्ट्रांनी तिला शिक्षा द्यावी. तिने जसे इतर राष्ट्रांशी वर्तन, केले, तसेच तिच्याशी करा.
15 Gritai contra ela ao redor. Ela deu a sua mão; seus alicerces estão caídos, os seus muros estão destroçados, porque esta é a vingança do SENHOR. Exercei vingança sobre ela, como ela tem feito, fazei para com ela.
16 बाबेलमधील लोकांना धान्य पेरु देऊ नका. त्यांना पीक काढू देऊ नका. बाबेलच्या सैनिकांनी खूप कैद्यांना त्यांच्या शहरात आणले. पण आता शत्रू सैनिक आले आहेत, त्यामुळे कैदी आपापल्या घरी परत जात आहेत. ते आपल्या देशांकडे धाव घेत आहेत.
16 Cortai de Babilônia o semeador, e aquele que maneja a foice no tempo de colheita, por medo da espada opressora eles virar-se-ão cada um para seu povo, e eles fugirão cada um para sua própria terra.
17 “सर्व देशभर पसरलेल्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे इस्राएल आहे. सिंहाने पाठलाग करुन दूर पळवून लावलेल्या मेंढराप्रमाणे इस्राएल आहे. त्यांच्यावर प्रथम हल्ला करणारा सिंह म्हणजे अश्शूरचा राजा आणि त्याची हाडे मोडणारा अखेरच सिंह म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय.”
17 Israel é uma ovelha desgarrada. Os leões o afugentaram. Primeiramente o rei da Assíria o devorou, e por último, este Nabucodonosor, rei de Babilônia, quebrou os seus ossos.
18 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी लवकरच बाबेलच्या राजाला व त्याच्या देशाला शिक्षा करीन. अश्शुरच्या राजाला केली तशीच बाबेलच्या राजाला मी शिक्षा करीन.
18 Portanto assim diz o SENHOR dos Exércitos, o Deus de Israel: Eis que eu punirei o rei de Babilônia, e a sua terra, como eu puni o rei da Assíria.
19 “मी इस्राएलला त्याच्या भूमीत परत आणीन. कर्मेलच्या डोंगरावर व बाशानच्या भूमीत वाढलेले धान्य तो खाईल व तृप्त होईल. एफ्राईम व गिलाद येथील टेकड्यांवर तो चरेल.”
19 E, eu trarei Israel novamente para sua habitação, e ele alimentar-se-á em Carmelo e em Basã, e a sua alma estará satisfeita sobre o monte Efraim e Gileade.
20 परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक, इस्राएलचे अपराध शोधण्याचे कसून प्रयत्न करतील. पण अपराध असणारच नाही. लोक यहूदाची पापे शोधण्याचे प्रयत्न करतील. पण त्यांना एकही पाप सापडणार नाही. का? कारण मी इस्राएलमधील व यहूदातील काही वाचलेल्या लोकांचे रक्षण करीन आणि त्यांनी पाप केले असले तरी त्यांना क्षमा करीन.”
20 Naqueles dias, e naquele tempo, diz o SENHOR, a iniquidade de Israel será procurada, e nenhuma será achada. E os pecados de Judá, não mais serão encontrados, porque perdoarei aqueles que restarem.
21 परमेश्वर म्हणतो, “मराथाईमवर हल्ला करा. पकोडच्या लोकांवर चढाई करा. त्यांच्यावर हल्ला करा. त्यांना ठार करा. त्यांचा संपूर्ण नाश करा. माझ्या आज्ञेप्रमाणे करा.
21 Sobe contra a terra de Merataim, contra esta, e contra os habitantes de Pecode. Devasta e destrói completamente após eles, diz o SENHOR, e faze conforme tudo que eu tenho te ordenado.
22 “युध्दाचा खणखणाट सर्व देशातू ऐकू जाऊ शकेल. तो मोठ्या नाशाचा आवाज असेल.
22 Um som de batalha está na terra, e de grande destruição.
23 बाबेलला ‘सर्व जगाचा हातोडा’ असे म्हटले गेले. पण आता ‘हातोड्याचे तुकडे तुकडे झाले आहेत इतर राष्ट्रापेक्षा बाबेलचा सर्वाधिक नाश झाला आहे.
23 Como está o martelo de toda a terra cortado em pedaços e quebrado! Como Babilônia tornou-se uma desolação entre as nações!
24 बाबेल, मी तुझ्यासाठी सापळा रचला, आणि तुला समजण्याआधीच तू पकडला गेलास. तू परमेश्वराविरुद्ध लढलास, म्हणून तू सापडलास व पकडला गेलास.
24 Eu coloquei uma armadilha para ti, e tu és também uma presa, ó Babilônia, e tu não estavas alerta. Tu foste encontrada, e também capturada, porque contendeste contra o SENHOR.
25 परमेश्वराने आपले कोठार उघडले आहे. त्यांच्या क्रोधाची हत्यारे परमेश्वराने बाहेर आणली आहेत. खास्द्यांच्या देशात सर्वशक्तिमान परमेश्वर देवाला काम करायचे असल्याने त्याने ती हत्यारे बाहेर काढली आहेत.
25 O SENHOR abriu seu arsenal e tirou as armas de sua indignação, pois esta é a obra do Senhor DEUS dos Exércitos na terra dos caldeus.
26 दूरवरुन बाबेलवर चालून या. तिची धान्याची कोठारे फोडा. बाबेलचा संपूर्ण नाश करा. कोणालाही जिवंत सोडू नका. धान्याच्या राशीप्रमाणे प्रेतांच्या राशी घाला.
26 Vinde contra ela da fronteira mais distante, abri os seus depósitos. Lançai-a como montões, e a destruí completamente. Nada dela lhe fique de resto.
27 बाबेलमधल्या सर्व तरुण बैलांना (पुरुषांना) ठार करा. त्यांची कत्तल होऊ द्या. त्यांच्या पराभवाची वेळ आली आहे. त्यांचे फार वाईट होईल. ही त्यांच्या शिक्षेची वेळ आहे.
27 Matai todos os seus novilhos. Deixai-os descer para o abate. Ai deles! Pois o seu dia é vindo, o tempo da sua visitação.
28 लोक बाबेलमधून बाहेर धावत आहेत. ते त्या देशातून सुटका करुन घेत आहेत. ते सियोनला येत आहेत. परमेश्वराच्या कृत्याबद्दल ते प्रत्येकाला सांगत आहेत. बाबेलला योग्य अशी शिक्षा परमेश्वर करीत असल्याबद्दल ते सांगत आहेत. बाबेलने परमेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त केले म्हणून आता परमेश्वर बाबेलचा नाश करीत आहे.
28 A voz daqueles que fogem e escapam da terra de Babilônia, para declarar em Sião a vingança do SENHOR nosso Deus, a vingança do seu templo.
29 “धनुर्धाऱ्यांना बोलवा. त्यांना बाबेलवर हल्ला करायला सांगा. त्यांना शहराला वेढा घालायला सांगा. कोणालाही पळू देऊ नका. तिने केलेल्या दुष्कृत्यांची परतफेड करा. तिने इतर राष्ट्रांशी जसे वर्तन केले, तसेच तिच्याशी करा. बाबेलने परमेश्वराला मान दिला नाही. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराशी तिने उध्दटपणा केला. म्हणून बाबेलला शिक्षा करा.
29 Convocai os arqueiros contra Babilônia, todos vós que entesais o arco, acampai contra ela em redor. A ninguém dali deixai escapar. Recompensai-a conforme sua obra, conforme tudo que ela tem feito, pois ela tem sido arrogante contra o SENHOR, contra o Santo de Israel.
30 बाबेलच्या तरुणांना रस्त्यांत ठार केले जाईल. त्याच दिवशी तिचे सर्व सैनिक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
30 Portanto seus jovens cairão nas ruas, e naquele dia todos os seus homens de guerra serão cortados, diz o SENHOR.
31 “बाबेल, तू फार गर्विष्ठ आहेस, आणि मी तुझ्या विरुद्ध आहे” आमचा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो. “मी तुझ्या विरुद्ध आहे, आणि तुझी शिक्षेची वेळ आली आहे.
31 Eis que eu sou contra ti, ó tu, o mais orgulhoso, diz o Senhor DEUS dos Exércitos, porque teu dia é vindo, e o tempo em que te visitarei.
32 गर्विष्ठे बाबेल अडखळून पडेल आणि तिला उठायला कोणीही मदत करणार नाही. तिच्यातील गावांत मी आग लावीन. ती आग तिच्याभोवतालच्या प्रत्येकाला भस्मसात करील.”
32 E o mais orgulhoso tropeçará e cairá, e ninguém o erguerá. E eu atearei um fogo às suas cidades e este devorará todos ao seu redor.
33 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “इस्राएल व यहूदा येथील लोक गुलाम झाले आहेत. शत्रूने त्यांना पकडून नेले व तो इस्राएलला सोडणार नाही.
33 Assim diz o SENHOR dos Exércitos: Os filhos de Israel e os filhos de Judá foram oprimidos juntamente, e todos que os tomaram cativos os retiveram. Eles recusaram-se a libertá-los.
34 पण परमेश्वर त्या लोकांना परत आणेल. त्याचे नाव आहे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर देव’ तो समर्थपणे त्या लोकांचे रक्षण करील. त्यामुळे त्या देशाला विश्रांती मिळू शकेल. पण बाबेलच्या लोकांना विश्रांती मिळणार नाही.”
34 O seu Redentor é forte. O SENHOR dos Exércitos é o seu nome. Ele irá pleitear a sua causa, para que possa dar repouso à terra, e inquietar os habitantes de Babilônia.
35 देव म्हणतो, “तलवारी, बाबेलवासीयांना ठार कर. बाबेलमधील राजाच्या अधिकाऱ्यांना व ज्ञानी लोकांना ठार कर.
35 Uma espada está sobre os caldeus, diz o SENHOR, e sobre os habitantes de Babilônia, e sobre os seus príncipes, e sobre seus sábios homens.
36 तलवारी, बाबेलच्या याजकांना आणि खोट्या संदेष्ट्यांना ठार मार, ते मूर्ख माणंसांसारखे होतील. बाबेलच्या सैनिकांना ठार मार, ते सैनिक भीतीने गर्भगळीत झाले आहेत.
36 Uma espada está sobre os mentirosos, e eles irão caducar. Uma espada está sobre os seus poderosos homens, e eles ficarão consternados.
37 तलवारी, बाबेलचे घोडे व रथ नष्ट कर. दुसऱ्या देशांतून आणलेल्या भाडोत्री सैनिकांना मार. ते सैनिक अतिशय घाबरलेल्या स्त्रियांप्रमाणे भयभीत होतील. तलवारी, बाबेलच्या संपत्तीचा नाश कर. ती संपत्ती लुटली जाईल.
37 Uma espada está sobre seus cavalos, e sobre suas carruagens, e sobre todo o povo misto que está no meio dela. E eles tornar-se-ão como mulheres. Uma espada está sobre os seus tesouros, e eles serão roubados.
38 तलवारी, बाबेलच्या पाण्याला झळ पोहोचव, तेथील सर्व पाणी सुकून जाईल. बाबेलमध्ये पुष्कळ मूर्ती आहेत त्या मूर्ती बाबेलचे लोक मूर्ख असल्यांचे दर्शवितात म्हणून त्या लोकांचे वाटोळे होईल.
38 A seca está sobre suas águas, e elas secarão, porque esta é a terra de imagens esculpidas, e eles estão loucos acerca de seus ídolos.
39 “पुन्हा कधीही बाबेलमध्ये मनुष्यवस्ती होणार नाही. जंगली, कुत्रे, शहामृग, आणि वाळवंटातील इतर प्राणी तेथे राहतील. पण कोणीही मनुष्याप्राणी तेथे पुन्हा कधीही राहणार नाही.
39 Portanto, habitarão ali os animais selvagens do deserto, com os animais selvagens das ilhas, e as corujas habitarão nela. E esta não será mais habitada para sempre, nem será ela habitada de geração a geração.
40 देवाने सदोम, गमोरा आणि त्या भोवतालच्या गावांचा संपूर्ण नाश केला. ती ठिकाणे आता निर्जन झाली आहेत. त्याचप्रमाणे, बाबेलमध्येही कोणी राहणार नाही, आणि तेथे कोणीही वस्ती करायला जाणार नाही.
40 Como Deus destruiu Sodoma e Gomorra e as cidades vizinhas, diz o SENHOR, desse modo nenhum homem habitará ali, nem qualquer filho de homem habitará nela.
41 “पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. ते एका शक्तिशाली राष्ट्रांतून येत आहेत. सर्व जगातील पुष्कळ राजे एकत्र येत आहेत.
41 Eis que um povo virá do norte, e uma grande nação, e muitos reis serão levantados das costas da terra.
42 त्यांच्या सैन्यांजवळ धनुष्यबाण व भाले आहेत. ते सैनिक क्रूर आहेत. त्यांच्याजवळ दया नाही. ते घोड्यांवर स्वार होऊन येतात. त्या घोड्यांच्या टापांचा आवाज समुद्राच्या गर्जनेप्रमाणे असतो. ते आपापल्या जागा घेऊन लढाईसाठी उभे ठाकतात. बाबेल नगरावर हल्ला करण्यासाठी ते सज्ज आहेत.
42 Eles irão segurar o arco e a lança. Eles são cruéis e não mostrarão misericórdia. Suas vozes rugirão como o mar, e eles montarão em cavalos, cada um posto em ordem, como um homem para a batalha, contra ti, ó filha de Babilônia.
43 बाबेलच्या राजाने ह्या सैन्याबद्दल ऐकले, आणि तो फारच घाबरला. भीतीने त्याचे हातपाय गळून गेले. प्रसून्न होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला कष्ट झाले.”
43 O rei de Babilônia ouviu relatos sobre eles, e suas mãos tornaram-se frágeis. Angústia apoderou-se dele e pontadas, como as de uma mulher em trabalho de parto.
44 परमेश्वर म्हणतो, “कधीतरी, यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपांतून सिंह येईल, व तो शेतांतील गोठ्यांमध्ये जाईल. मग सर्व गुरे दूर पळून जातील. मी त्या सिंहासारखाच असेन. बाबेलच्या भूमीपासूनच मी बाबेलला हुसकून लावीन. ह्यासाठी मी कोणाची निवड करावी बरे? कोणीही माझ्यासारखा नाही. मला आव्हान देणाराही कोणी नाही. म्हणून मीच हे करीन. मला पळवून लावण्यास कोणीही मेंढपाळ येणार नाही. मी बाबेलच्या लोकांचा पाठलाग करीन.”
44 Eis que ele como leão subirá da cheia do Jordão até a habitação do forte. Porém eu os farei de repente escapar de lá. E quem é o homem escolhido, para que eu possa estabelecer sobre ela? Pois quem é semelhante a mim? E quem me designará o tempo? E quem é o pastor que resistirá perante a mim?
45 बाबेलसाठी परमेश्वराने काय बेत केला आहे तो ऐका. खास्द्यांसाठी परमेश्वराने काय करायचे निश्र्च्ति केले आहे ते ऐका. बाबेलच्या कळपातील (लोकांतील) लहान मुलांना शत्रू फरपटत नेईल. मग बाबेलच्या कुरणांचा संपूर्ण नाश होईल. ह्या घटनेमुळे बाबेलला धक्का बसेल.
45 Portanto, ouvi o conselho do SENHOR, que ele executou contra Babilônia, e suas intenções, que ele planejou contra a terra dos caldeus: Certamente os menores do rebanho os arrastarão. Certamente ele fará suas habitações desoladas com ele.
46 बाबेल पडेल, आणि त्यामुळे पृथ्वी हादरेल राष्ट्रांतील लोक बाबेलचा आक्रोश ऐकतील.
46 Ao barulho da tomada de Babilônia, a terra estremece, e o grito se ouviu entre as nações.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 50, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.