Jeremias 44

Marathi Bible (GL_MARATHI) vs BKJ

Sair da comparação
1 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला. मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांसाठी तो होता. हे लोक मिग्दोल, तहपनहेस, मेमफिस व दक्षिण मिसर येथे राहत होते. संदेश असा होता:
1 A palavra que veio a Jeremias, a respeito de todos os judeus que habitam na terra do Egito, que habitam em Migdol, e em Tafnes, e em Nofe, e na região de Patros, dizendo:
2 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यरुशलेम नगरीवर व यहूदाच्या इतर नगरांवर मी जी भयंकर संकटे आणली, ती तुम्ही पाहिलीत. आता ती नगरे म्हणजे नुसती दगडधोंड्यांची रास झाली आहेत.
2 Assim diz o SENHOR dos Exércitos, o Deus de Israel: Vós tendes visto todo o mal que eu tenho trazido sobre Jerusalém, e sobre todas as cidades de Judá, e, eis que neste dia elas são uma desolação, e nenhum homem habita nelas.
3 तेथे राहणाऱ्या लोकांनी पाप केल्यामुळे मी त्यांचा नाश केला. त्यांनी अनेक दैवतांना बळी अर्पण केले. त्यामुळे मला राग आला. तुमच्या लोकांनी व पूर्वजांनी, पूर्वी कधी, त्या दैवतांना पुजले नव्हते.
3 Por causa da perversidade que cometeram, para me provocar à ira, indo queimar incenso, para servirem outros deuses, a quem eles não conheceram, nem eles, vós, nem vossos pais.
4 मी त्या लोकांकडे माझे संदेष्टे पुन्हा पुन्हा पाठविले ते माझे सेवक होते. त्या संदेष्ट्यांनी माझा संदेश सांगितला आणि ते लोकांना म्हणाले, ‘अशी भयंकर कृत्ये करु नका. परमेश्वर मूर्तीपूजेचा तिरस्कार करतो.’
4 Contudo, eu enviei a vós todos os meus servos, os profetas, madrugando e enviando-os, dizendo: Ó, não façais estas coisas abomináveis que eu odeio.
5 पण त्यांनी संदेष्ट्यांचे ऐकले नाही. त्यांनी संदेष्ट्यांकडे लक्ष दिले नाही. ते दुष्कृत्ये करीतच राहिले ते दैवतांना बळी अर्पण करीतच राहिले.
5 Porém, eles não escutaram, nem inclinaram os seus ouvidos para se desviarem de sua perversidade, para não queimarem incenso a outros deuses.
6 म्हणून त्यांच्यावरचा माझा राग मी व्यक्त केला. मी यहूदातील नगरांना व यरुशलेमच्या मार्गांना शिक्षा केली. माझ्या रागामुळेच आज यरुशलेम व यहूदातील नगरे नुसती दगडविटांच्या राशी झाली आहेत.”
6 Por isso, derramou-se a minha fúria e a minha ira, e acendeu-se nas cidades de Judá e nas ruas de Jerusalém, e elas foram devastadas e desoladas, como neste dia.
7 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मूर्तीची पूजा करीत राहून तुम्ही स्वत:लाच इजा का करुन घेत आहात? तुम्ही पुरुष व स्त्रिया, मुले व बाआलके यांना यहूदाच्या कुळापासून तोडत आहात. त्यामुळे यहूदाच्या कुळातील कोणीही शिल्लक राहणार नाही.
7 Agora, portanto, assim diz o SENHOR, o Deus dos Exércitos, o Deus de Israel: Por que cometestes este grande mal contra vossas almas, eliminando de vós, para fora de Judá, homem e mulher, criança e o que mama, para não deixardes ali remanescente algum;
8 मूर्तीपूजा कुरुन तुम्ही मला का संतापवता? आता तुम्ही मिसरमध्ये राहात आहात आणि मिसरच्या दैवतांना बळी अर्पण करुन तुम्ही मला संतापवत आहात. तुम्ही तुमचाच नाश करुन घ्याल. ती तुमचीच चूक असेल. तुमचे वागणेच असे असेल की दुसऱ्या राष्ट्रांतील लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलतील. जगातील इतर राष्ट्रे तुमची चेष्टा करतील.
8 vós me provocais à ira com as obras das vossas mãos, queimando incenso para outros deuses na terra do Egito, aonde fostes habitar, para que fossem eliminados, e para que pudésseis ser uma maldição e uma vergonha entre todas as nações da terra?
9 तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? यहूदाच्या राजा राण्यांनी केलेली वाईट कृत्ये तुम्हाला आठवत नाहीत का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदात व यरुशलेमच्या रस्त्यावर केलेली पापे तुम्ही विसरलात का?
9 Tendes vós esquecido a maldade de vossos pais, e a maldade dos reis de Judá, e a maldade das suas esposas, e as vossas próprias maldades, e as maldades de vossas esposas, que cometeram na terra de Judá, e nas ruas de Jerusalém?
10 आजतागायत यहूदातील लोक नम्र झालेले नाहीत त्यांनी माझ्याबद्दल आदर दाखविलेला नाही. ते, माझ्या शिकणुकीप्रमाणे वागले नाहीत. मी तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना घालून दिलेले नियम त्यांनी पाळले नाही.”
10 Eles não se humilharam até este dia, nem temeram, nem andaram em minha lei, nem em meus estatutos, que eu coloquei perante vós, e perante vossos pais.
11 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकटे आणण्याचे ठरविले आहे. मी यहूदाच्या कुळाचा संपूर्ण नाश करीन.
11 Portanto assim diz o SENHOR dos Exércitos, o Deus de Israel: Eis que eu colocarei a minha face contra vós para o mal, e para cortar todo o Judá.
12 यहूदातील अगदी थोडे लोक वाचले आहेत. ते येथे मिसरला आले आहेत. पण यहूदातील कुळातल्या त्या वाचलेल्या लोकांचा मी नाश करीन. अती महत्वाच्या व्यक्तीपासून अती सामान्यपर्यंत सर्वच्या सर्व युद्धात ठार होतील वा उपासमारीने मरतील. इतर राष्ट्रांतील लोक त्यांची निंदा करतील. त्या लोकांच्या बाबतीत जे घडले, ते पाहून इतर राष्ट्रांतील लोक घाबरतील. ते लोक म्हणजे जणू काय शिवी बनतील, दुसरी राष्ट्रे त्यांचा अपमान करतील.
12 E, eu tomarei o remanescente de Judá, que têm incitado suas faces para adentrar a terra do Egito para ali peregrinar, e serão todos consumidos, e cairão na terra do Egito. Eles serão consumidos pela espada e pela fome. Eles morrerão, desde o menor até o maior, pela espada e pela fome. E eles serão uma abominação, e um assombro, e uma maldição, e uma vergonha.
13 मिसरमध्ये राहण्यास गेलेल्या त्या लोकांना मी शिक्षा करीन. त्यासाठी मी तलवार, उपासमार व भयंकर रोगराई या गोष्टींचा उपयोग करीन. यरुशलेम नगरीला जशी मी शिक्षा केली, तशीच त्यांना शिक्षा करीन.
13 Porque eu punirei aqueles que habitam na terra do Egito, como eu puni Jerusalém, pela espada, pela fome, e pela peste.
14 यहूदातून वाचून मिसरमध्ये राहण्यास गेलेला एकही जण माझ्या शिक्षेतून सुटणार नाही. त्यांच्यातील कोणीही यहूदास परतणार नाही. त्या लोकांची यहूदात परत येऊन राहण्याची इच्छा आहे, पण काही निसटून गेलेले लोक सोडून कोणीही यहूदात परत जाणार नाही.”
14 De modo que ninguém do remanescente de Judá, que foram à terra do Egito para ali peregrinar, escapará ou permanecerá, para retornar à terra de Judá, à qual eles têm o desejo de voltar a habitar ali; porque ninguém retornará, senão alguns fugitivos.
15 मिसरमध्ये राहणाऱ्या यहूदी स्त्रिया, दैवतांना बळी अर्पण करीत होत्या, त्यांच्या पतींना ते माहीत होते. पण त्यांनी त्या स्त्रियांना असे करण्यापासून परावृत्त केले नाही. तेथे असलेल्या यहूदी लोकांचा एक मोठा समुदाय एकत्र येत होता. हे लोक मिसरच्या दक्षिण भागात राहात होते. ज्या स्त्रिया दैवतांना बळी अर्पण करीत होत्या, त्यांचे पती यिर्मयाला म्हणाले.
15 Então todos os homens que sabiam que suas esposas tinham queimado incenso para outros deuses, e todas as mulheres que estavam presentes, uma grande multidão, e todo o povo que habitava na terra do Egito, em Patros, respondeu a Jeremias, dizendo:
16 “तू आम्हाला सांगितलेला परमेश्वराचा संदेश आम्ही मानणार नाही
16 Com relação à palavra que tu tens falado para nós em nome do SENHOR, nós não daremos ouvidos.
17 आम्ही स्वर्गातील राणीला बळी अर्पण करण्याचे वचन दिले आहे, तेव्हा आम्ही त्याप्रमाणेच करु. आम्ही बळी व पेयार्पण करुन तिची पूजा करु. आम्ही पूर्वीही हे केले आहे. आमच्या पूर्वजांनी, राजांनी व अधिकाऱ्यांनीही पूर्वी असेच केले. आम्ही सर्वांनी यहूदाच्या नगरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यावर हेच केले. आम्ही स्वर्गातील राणीची पूजा केली तेव्हा आम्हाला अन्नाची कमतरता नव्हती, आम्हाला यश होते, आमचे काहीही वाईट झाले नाही.
17 Mas nós certamente faremos qualquer coisa que sai de nossa própria boca, queimaremos incenso para a rainha do céu, e lhe derramaremos ofertas de bebidas, como nós temos feito, nós, e nossos pais, nossos reis, e nossos príncipes, nas cidades de Judá, e nas ruas de Jerusalém, pois então tínhamos abundância de mantimentos, e estávamos bem, e não víamos o mal.
18 पण आम्ही स्वर्गातील राणीला बळी व पेयार्पणे करुन तिची पूजा करण्याचे सोडून देताच आम्हाला अडचणी आल्या, आमचे लोक तलवारीने व उपासमारीने मारले गेले.”
18 Porém desde que nós cessamos de queimar incenso à rainha do céu, e de lhe derramar ofertas de bebidas, nós temos tido falta de todas as coisas, e temos sido consumidos pela espada, e pela fome.
19 मग स्त्रिया बोलू लागल्या, त्या यिर्मयाला म्हणाल्या, “जे काही आम्ही करीत होतो, ते आमच्या पतींना माहीत होते. स्वर्गातील राणीला बळी व पेयार्पण करण्याची त्यांची आम्हाला परवानगी होती. आम्ही पुऱ्यांमधून तिच्या प्रतिमा घडवीत होतो, हेही त्यांना माहीत होते.”
19 E quando nós queimávamos incenso à rainha do céu, e lhe derramávamos ofertas de bebida, lhe fazíamos bolos, para a adorar, e derramávamos ofertas de bebida sem nossos homens?
20 मग ह्या सर्व गोष्टी सांगणाऱ्या स्त्री पुरुषांशी यिर्मया बोलला
20 Então, Jeremias disse para todo o povo, para os homens, e para as mulheres, e para todo o povo que lhe tinha dado aquela resposta, dizendo:
21 तो त्या लोकांना म्हणाला, “तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर बळी दिले हे परमेश्वराच्या लक्षात आहे. तुम्ही, तुमच्या पूर्वजांनी, राजांनी, अधिकाऱ्यांनी व देशातील लोकांनी असेच केले परमेश्वराच्या लक्षात हे सर्व होते. त्याने त्याबद्दल विचार केला.
21 O incenso que vós queimastes nas cidades de Judá, e nas ruas de Jerusalém, vós e vossos pais, vossos reis e vossos príncipes, e o povo da terra, não se lembra deles o SENHOR e não adentrou isto à sua mente?
22 मग परमेश्वराची सहनशक्ती संपली. तुम्ही केलेल्या वाईट आणि भयंकर कृत्यांचा परमेश्वराला तिरस्कार वाटला. म्हणून त्याने तुमच्या देशाचे ओसाड वाळवंट केले. तेथे आता कोणीही राहत नाही. तो देश आता शापरुप झाला आहे.
22 Por isso, o SENHOR não podia mais suportar, por causa do mal de vossos feitos, e por causa das abominações que vós tendes cometido. Portanto, vossa terra é uma desolação, e um assombro, e uma maldição, sem um habitante, como neste dia.
23 तुम्ही दैवतांना बळी अर्पण केले, म्हणूनच असे वाईट घडले, तुम्ही परमेश्वराविरुध्द वागून पाप केले. तुम्ही परमेश्वराचे ऐकले नाही. त्याच्या शिकवणुकीप्रमाणे तुम्ही वागला नाहीत अथवा त्याने घालून दिलेले नियम तुम्ही पाळले नाहीत करारातील तुमच्या शर्ती तुम्ही पाळल्या नाहीत.”
23 Porque vós tendes queimado incenso, e porque vós tendes pecado contra o SENHOR, e não tendes obedecido a voz do SENHOR, nem andado na sua lei, nem em seus estatutos, nem em seus testemunhos. Portanto, este mal vos sobreveio, como neste dia.
24 यिर्मया त्या सर्वांना म्हणाला, “यहूदातून येऊन मिसरमध्ये राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी परमेश्वराचा संदेश ऐका:
24 Além disso, Jeremias disse para todo o povo, e para todas as mulheres: Ouvi a palavra do SENHOR, todo o Judá que estais na terra do Egito.
25 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणतो, ‘तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही म्हणाला “आम्ही दिलेले वचन पाळू. आम्ही स्वर्गातील राणीला बळी व पेये अर्पण करण्याचे वचन दिले आहे.” तर मग जा दिलेल्या वचनाप्रमाणे वागा दिलेले वचन पाळा.
25 Assim diz o SENHOR dos Exércitos, o Deus de Israel, dizendo: Vós e vossas esposas não somente falastes com vossas bocas, mas realizaram com vossas mãos, dizendo: Certamente, nós iremos cumprir com os nossos votos que fizemos de queimar incenso à rainha do céu, para lhe derramar ofertas de bebidas. Vós certamente ireis realizar vossos votos, e certamente cumprireis vossos votos.
26 पण मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांनो परमेश्वराचा संदेश ऐका मी माझ्या महान नावाची शपथ घेऊन वचन देतो की मिसरमध्ये राहणाऱ्या यहूदी लोकांपैकी कोणीही पुन्हा कधीही वचन देताना, माझी शपथ घेणार नाहीत ते पुन्हा कधीही “देवा शपथ.” असे म्हणणार नाही.
26 Portanto, ouvi vós a palavra do SENHOR, todo o Judá que habita na terra do Egito: Eis que eu jurei pelo meu grande nome, diz o SENHOR, que meu nome não será mais mencionado na boca de qualquer homem de Judá, em toda a terra do Egito, dizendo: O Senhor Deus vive.
27 “‘मी त्या यहूदाच्या लोकांवर लक्ष ठेवत आहे, पण ते काळजी घेण्यासाठी म्हणून नाही, तर त्यांना इजा व्हावी म्हणून. मिसरमध्ये राहणारे यहूदी लोक उपासमारीने मरतील वा तलवारीने मारले जातील. त्यांचा संपूर्ण नाश होईपर्यंत हे मरणाचे सत्र चालूच राहील.
27 Eis que eu irei vigiá-los para mal e não para bem, e todos os homens de Judá que estão na terra do Egito serão consumidos pela espada e pela fome, até que lhes sobrevenha um fim.
28 काही लोक तलवारीच्या वारातून निसटतील ते मिसरमधून यहूदाला परत येतील पण असे लोक फारच थोडे असतील. मग वाचलेल्या व मिसरमध्ये राहायला आलेल्या लोकांना कोणाचे शब्द खरे ठरले ते कळेल. ‘माझे शब्द खरे ठरले की त्यांचे’ ते त्यांना समजेल.
28 Contudo, um pequeno número que escapar da espada retornará da terra do Egito para à terra de Judá; e todo o remanescente de Judá, que entraram na terra do Egito para ali peregrinar, saberá quais palavras ficarão de pé, as minhas ou as deles.
29 मी तुम्हाला ह्याचा पुरावा देईन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे, ‘मी मिसरमध्येच तुम्हाला शिक्षा करीन. मग तुम्हाला दुखविण्याची वचने दिली होती ती खरी ठरतात, ह्याची तुम्हाला खात्री पटेल.
29 E isto será um sinal para vós, diz o SENHOR, que eu vos punirei neste lugar, para que vós possais saber que minhas palavras, certamente ficarão de pé contra vós para o mal.
30 मी म्हटल्याप्रमाणे करतो हाच तुमच्यासाठी पुरावा असेल.’ परमेश्वर पुढे म्हणतो, ‘फारो हफ्रा हा मिसरचा राजा आहे. त्याचे शत्रू त्याला मारायला टपले आहेत. मी फारो हफ्राला त्याच्या शत्रूंच्या ताब्यात देईन. सिद्कीया यहूदाचा राजा होता नबुखदनेस्सर त्याचा शत्रू होता, मी सिद्कीयाला त्याच्या शत्रूच्या ताब्यात दिले त्याचप्रमाणे फारो हफ्राला मी त्याच्या शत्रूच्या ताब्यात देईल.”
30 Assim diz o SENHOR: Eis que eu darei Faraó Hofra, rei do Egito, na mão do seu inimigo, e na mão daqueles que lhe buscam a vida, como eu dei Zedequias, rei de Judá, na mão de Nabucodonosor, rei de Babilônia, seu inimigo, e que buscava a sua vida.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 44, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.