Jeremias 21
Marathi Bible (GL_MARATHI) vs NTLH
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 यहूदाचा राजा सिद्कीया याने पशूहरला आणि सफन्या नावाच्या याजकाला यिर्मयाकडे पाठविले. त्याच वेळी यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. पशहूर हा मल्कीयाचा मुलगा होता, तर सफन्या मासेचा मुलगा होता. पशहूर व सफन्या ह्यांनी यिर्मयासाठी निरोप आणला.
1 O rei Zedequias, de Judá, mandou que Pasur, filho de Malquias, fosse junto com o sacerdote Sofonias, filho de Maaseias, e me fizesse o seguinte pedido:
2 पशहूर आणि सफन्या यिर्मयाला म्हणाले, “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर. काय घडणार आहेत ते परमेश्वराला विचार. कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, म्हणून आम्हाला भविष्यात काय घडणार हे जाणून घ्यायचे आहे. कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील. कदाचित् परमेश्वर नबुखद्नेस्सरला स्वारी करण्यापासून परावृत्त करील व परतवून लावेल.”
2 — Jeremias, peça a Deus, o Senhor , que nos ajude, pois o rei Nabucodonosor, da Babilônia, está fazendo guerra contra nós. Pode ser que o Senhor faça um milagre em nosso benefício e obrigue Nabucodonosor a se retirar.
3 नंतर पशूहर व सफन्या यांना यिर्मया म्हणाला, “सिद्कीया राजाला सांगा,
3 Então o Senhor falou comigo, e eu disse
4 परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो “तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन.“बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरुशलेममध्ये आणीन.
4 que levassem a Zedequias a seguinte resposta do Senhor , o Deus de Israel: — Quem vai bater em retirada são os soldados que Zedequias está pondo para guerrear contra o rei da Babilônia e o seu exército que está do lado de fora das muralhas de Jerusalém. Eu amontoarei as armas deles no centro da cidade.
5 मी स्वत: यहूदाच्या लोकांविरुद्ध म्हणजे तुमच्याविरुद्ध लढेन. मी माझ्या सामर्थ्यवान हाताने तुमच्याशी युद्ध करीन. कारण मी तुमच्यावर फार रागावलो आहे. मी तुमच्याविरुद्ध जोरदार युद्ध करुन माझ्या तुमच्यावरील रागाची तीव्रता सिद्ध करीन.
5 Eu mesmo lutarei contra vocês com toda a minha força, ira e raiva e com o meu grande furor.
6 यरुशलेममध्ये राहाणाऱ्या लोकांना मी ठार मारीन. सर्व शहरात रोगराई पसरवून मी माणसांना व प्राण्यांना मारीन.
6 Nesta cidade, matarei tudo o que tem vida; tanto as pessoas como os animais morrerão de uma doença horrível.
7 असे घडल्यावर,” हा परमेश्वराचा संदेश आहे, ‘मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन करीन. मी सिद्कीयाच्या अधिकाऱ्यानासुद्धा नबुखदनेस्सरच्या हवाली करीन. यरुशलेममधील काही लोक भयंकर रोगराई अथवा लढाई वा उपासमार याने मरणार नाहीत. पण त्या सर्वांना मी नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन. मी यहूदाच्या शत्रूला विजयी करीन. नबुखद्नेस्सरच्या सैन्याला यहूदातील लोकांना ठार मारायचे आहे म्हणून यहूदातील व यरुशलेममधील लोक तलवरीच्या घावाने मारले जातील. नबुखद्नेस्सर त्या लोकांना अजिबात दया दाखविणार नाही व त्यांच्याबद्दल त्याला दु:खही वाटणार नाही.’
7 O rei Zedequias, os seus oficiais e as outras pessoas que não morrerem por causa da guerra, da fome e da doença — todos estes eu deixarei que sejam presos pelo rei Nabucodonosor e pelos outros inimigos que querem matá-los. Nabucodonosor mandará matá-los; ele não terá dó nem piedade de nenhum deles. Eu, o Senhor , estou falando.
8 “यरुशलेममधील लोकांना असेही सांग, असे म्हणून परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, ‘मी तुम्हाला जीवन मरण ह्यात निवड करण्याचे स्वातंत्र्य देईन. मी काय म्हणतो ते समजावून घ्या.
8 Em seguida, Deus mandou que eu dissesse ao povo: — Escutem! Eu, o
9 जो यरुशलेममध्ये राहील तो लढाईत, उपासमारीने वा भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी यरुशलेमच्या बाहेर जाऊन बाबेलच्या सैन्याला शरण जाईल, तो जागेल. त्या सैन्याने नगरीला वेढा घातला आहे म्हणून नगरीला रसद मिळू शकत नाही. पण जो कोणी नगर सोडून जाईल, त्याचा जीव वाचेल.
9 Quem ficar nesta cidade será morto na batalha, pela fome ou pela doença. Mas quem sair e se entregar aos babilônios que estão cercando a cidade não será morto: o que essa pessoa vai ganhar é escapar com vida.
10 यरुशलेम नगरीवर संकट आणण्याचे मी ठरविले आहे. मी तिला मदत करणार नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे, “मी बाबेलच्या राजाला यरुशलेम देऊन टाकीन. तो ती आगीत भस्मसात करील.’
10 Pois eu resolvi não proteger esta cidade e sim destruí-la. Ela será entregue ao rei da Babilônia, e ele a queimará completamente. Eu, o Senhor , estou falando.
11 यहूदाच्या राजघराण्याला हे सांगा: परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका.
11 — ausente —
12 दावीदाच्या घराण्यातील लोकानो, परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही दररोज न्याय्यपणे लोकांचा निवाडा केला पाहिजे. गुन्हेगारांपासून बळींचे रक्षण करा. तुम्ही असे केले नाही, तर मी खूप रागावेन. माझा राग, कोणीही विझवू न शकणाऱ्या अग्नीप्रमाणे असेल. तुम्ही दुष्कृत्ये केली म्हणून असे होईल.’
12 — ausente —
13 यरुशलेम, मी तुझ्याविरुद्ध आहे. तू डोंगराच्या शिखरावर बसतेस. तू ह्या दरीच्यावर राणीप्रमाणे बसतेस. तुम्ही, यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणता, ‘कोणीही आमच्यावर हल्ला करु शकणार नाही. कोणीही आमच्या भक्कम नगरीत येणार नाही.’ पण परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका:
13 Jerusalém, você está num lugar bem alto, acima dos vales, como uma rocha que fica acima do planalto. Mas eu, o Senhor , lutarei contra você. Você diz que ninguém tem a coragem de atacá-la, que ninguém consegue tomá-la.
14 “तुम्हाला योग्य अशी शिक्षा मिळेल. तुमच्या रानास मी आग लावेन ती आग तुमच्याभोवतीचे सर्व काही जाळून टाकील.”‘
14 Mas eu, o Senhor , a castigarei por causa do que você tem feito. Vou pôr fogo no seu palácio, e tudo o que estiver em volta também será queimado. Eu, o Senhor , estou falando.”
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 21, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.