Jeremias 10
Marathi Bible (GL_MARATHI) vs NTLH
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 इस्राएलच्या वंशजांनो, परमेश्वर तुमच्याविषयी काय म्हणतो ते ऐका.
1 Povo de Israel, escutem a mensagem de Deus, o Senhor , para vocês!
2 परमेश्वर असे म्हणतो,“दुसऱ्या देशांतील लोकांचे अनुकरण करु नका. आकाशात दिसणाऱ्या काही खास गोष्टींना घाबरु नका. या आकाशातील गोष्टी बघून दुसरे देश घाबरतात. परंतु तुम्ही अजिबात घाबरु नका.
2 Ele diz: “Não sigam os costumes de outras nações. Elas podem ficar espantadas quando aparecem coisas estranhas no céu, mas vocês não devem se assustar.
3 त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. त्यांच्या मूर्ती म्हणजे दुसरे काही नसून जंगलातील लाकडे आहेत कामगार लाकूड पटाशीने छिनून त्या मूर्ती बनवितो.
3 A religião dessa gente não vale nada. Cortam uma árvore na floresta, e um artista, com as suas ferramentas, faz um ídolo.
4 ते लोक, त्या मूर्ती चांदीसोन्याने मढवून त्यांना सुंदर रुप देतात. त्या खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने खिळे मारुन घट्ट बसवितात.
4 Então o enfeitam com prata e ouro e o firmam com pregos para que não caia aos pedaços.
5 इतर देशांतील अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांनाच त्या वाहून न्याव्या लागतात. तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.”
5 Esses ídolos não podem falar: são como um espantalho numa plantação de pepinos. Eles têm de ser carregados porque não podem andar. Não tenham medo deles: não podem fazer mal, nem podem fazer bem.”
6 परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस. तुझ्या नावातच मोठेपण व सामर्थ्य आहे.
6 Ó Senhor Deus, não há ninguém igual a ti. Tu és grande, e o teu nome é poderoso.
7 परमेश्वर, प्रत्येक माणसाने तुझा आदर केला पाहिजे. तू सर्व राष्ट्रांचा राजा आहेस. म्हणूनच सर्वाना आदरणीय आहेस त्या राष्ट्रांमध्ये काही शहाणी माणसे जरुर आहेत पण तुझ्या इतके सुज्ञ कोणीही नाही.
7 Quem não te respeitará, ó Rei de todas as nações? Tu mereces todo o respeito. Não há ninguém como tu entre todos os sábios das nações.
8 दुसऱ्या देशातील लोक मतिमंद आणि मूर्ख आहेत. दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्ती त्यांना उपदेश करतात.
8 Todos os seus sábios são ignorantes e tolos. Será que os ídolos de madeira podem lhes ensinar alguma coisa?
9 ते लोक तार्शिशहून आणलेल्या चांदीचा आणि उफाजहून आणलेल्या सोन्याचा वापर करुन पुतळे बनवितात. ह्या मूर्ती सुतार आणि सोनार घडवितातत्या मूर्तीवर ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात ‘शहाणे लोक’ असे ‘देव’ तयार करतात.
9 Esses ídolos são folheados com prata da Espanha e com ouro de Ufaz; tudo é trabalho de artistas. Os seus vestidos são roxos e vermelhos, feitos por tecelões habilidosos.
10 पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. खरा सजीव असा केवळ देवच आहें शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहें त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते. त्याचा कोप देशांतील लोक सहन करु शकत नाहीत.
10 Mas o Senhor é o Deus verdadeiro; ele é o Deus vivo, o Rei eterno. Quando o as nações não podem suportar a sua ira.
11 परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांना पुढील संदेश द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्ग आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.“
11 Digam às nações que os deuses, que não fizeram a terra e o céu, serão destruídos. Eles desaparecerão completamente da terra.
12 ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली असा एकमेव देवच आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन त्याने जग निर्माण केलें आपल्या समंजसपणाच्या आधारे पृथ्वीवर आकाश पांघरले.
12 Pelo seu poder, o Senhor Deus fez a terra; com a sua sabedoria, ele criou o mundo e, com a sua inteligência, estendeu o céu como se fosse uma coberta.
13 ढगांचा गडगडाट आणि आकाशातून पडणारा मुसळधार पाऊस ही देवाचीच करणी आहे. पृथ्वीच्या प्रत्येक भागावरील आकाशात तो मेघ पाठवितो. पावसाबरोबर वीज पाठवितो. आपल्या भांडारातून वारा आणतो.
13 Quando Deus dá ordem, as águas rugem no céu. Ele manda as nuvens subirem dos fins da terra. Ele faz o raio para a chuva e manda o vento sair dos seus depósitos.
14 लोक अगदी मूर्ख आहेत. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार मूर्ख बनविले जातात. त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. ते फक्त थोतांडचआहे
14 Diante disso, todos os seres humanos são tolos e ignorantes. Todos os artistas ficam envergonhados com os ídolos que fazem, pois são deuses falsos, deuses que não têm vida.
15 त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत. त्या खोट्या आहेत, न्यायदानाच्या वेळी त्यांचा नाश होईल.
15 Não valem nada; são uma tapeação. Serão destruídos quando o
16 पण याकोबचा देव त्या मूर्तीसारखा नाही. त्याने सर्व गोष्टींची निर्मिती केली आणि इस्राएलच्या वंशजांची, स्वत:चे खास लोक म्हणून निवड केली. “सर्वशक्तिमान परमेश्वर” हेच देवाचे नाव.
16 O Deus de Jacó não é assim; foi ele quem fez todas as coisas e escolheu Israel para ser o seu povo. O seu nome é
17 आपल्या मालकीच्या सर्व चीजवस्तू घेऊन पळून जाण्याच्या तयारीत राहा. यहूदाच्या लोकांनो, शत्रूने तुमच्या शहराला वेढले असून तुम्ही आता अडकला आहात.
17 Moradores de Jerusalém, a cidade está cercada pelos inimigos! Peguem as suas trouxas,
18 परमेश्वर म्हणतो, “यावेळी, मी यहूदाच्या लोकांना ह्या देशा बाहेर घालवून देईन. मी त्यांना त्रास देऊन दु:ख भोगण्यास भाग पाडीन म्हणजे त्यांना धडा मिळेल.”
18 porque agora o Senhor vai jogar vocês para fora desta terra a fim de que venham a ter juízo. Sou eu, o
19 अरेरे, मी (यिर्मया) फारच जखमी झालो. माझ्या जखमा भरुन येण्यासारख्या नाहीत. तरीसुद्धा मी स्वत:लाच सांगतो, “हे माझे दु:ख मला पूर्णपणे भोगलेच पाहिजे.”
19 O povo de Jerusalém grita: “Estamos gravemente feridos! As nossas feridas não querem sarar! E nós pensávamos que podíamos aguentar estas coisas!
20 माझ्या तंबूचा नाश झाला. तंबूचे सर्व दोर तुटले आहेत. माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत. माझा तंबू उभारायला एकही माणूस उरला नाही. माझा निवारा बांधायला एकही माणूस शिल्लक नाही.
20 As nossas barracas estão destruídas, e as cordas que as seguravam arrebentaram. Os nossos filhos partiram, foram todos embora. Não sobrou ninguém para armar as nossas barracas de novo, e não há ninguém para colocar as cortinas.”
21 मेंढपाळ (नेते) मूर्ख आहेत. ते परमेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. ते शहाणे नाहीत. त्यामुळे त्यांचे कळप (लोक) इतस्तत: विखरुन हरवले आहेत.
21 Eu respondi: “As autoridades são tolas: não pedem que o Foi por isso que elas fracassaram, e o nosso povo foi espalhado.
22 मोठा आवाज ऐका! तो आवाज उत्तरेकडून येत आहे; यहुदातील शहरांचा तो नाश करील. युहदाचे निर्जन वाळवंट होईल. तेथे कोल्ह्यांची वस्ती होईल.
22 Escutem! Acabam de chegar notícias! Há uma grande agitação num país do Norte. O seu exército vai fazer com que as cidades de Judá virem um deserto, um lugar onde vivem os lobos.”
23 परमेश्वरा, माणसाच्या आयुष्यावर त्याचा स्वत:चा खरा हक्क नसतो, हे मला माहीत आहे. लोक भविष्याच्या योजना खरोखरच ठरवू शकत नाहीत.
23 Ó Senhor Deus, eu sei que o ser humano não é dono do seu futuro; ninguém pode controlar o que acontece na sua vida.
24 परमेश्वरा, आम्हाला सुधार!पण न्याय्य रीतीने सुधार! रागाच्या भरात आम्हांला शिक्षा करु नकोस. नाही तर तू कदाचित् आमचा नाश करशील.
24 Ó Senhor , corrige o nosso povo, mas não sejas duro demais. Não nos castigues quando estiveres irado porque aí acabarias com toda a nossa gente.
25 तुला राग आला असेल, तर दुसऱ्या राष्ट्रांना शिक्षा कर. ते तुला जाणत नाहीत वा मान देत नाहीत. ते तुझी उपासना करीत नाहीत. त्या राष्ट्रांनी याकोबच्या कुटुंबाचा विनाश केला. त्यांनी इस्राएल नेस्तनाबूत केले आणि इस्राएलच्या भूमीचा नाश केला.
25 Derrama a tua ira sobre as nações que não te adoram, sobre os povos que te rejeitam. Pois mataram a nós, os descendentes de Jacó, e arrasaram o nosso país.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.