Gênesis 49
Marathi Bible (GL_MARATHI) vs NAA
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 मग याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले. तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्या जवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल हे मी तुम्हास सांगतो.”
1 Depois, Jacó chamou os seus filhos e disse: — Ajuntem-se, e eu lhes farei saber o que vai acontecer com vocês nos dias que virão:
2 “याकोबाच्या मुलांनो! तुम्ही सर्व एकत्र या आणि तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.”रऊबेन
2 Reúnam-se e ouçam, filhos de Jacó; ouçam o que diz Israel, o pai de vocês.
3 “रऊबेना! तू माझा पाहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस: पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पाहिला पुरावा आहेस. तू सर्वापेक्षा अधिक शक्तीवान व सर्वापेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस;
3 Rúben, você é o meu primogênito, minha força e as primícias do meu vigor, o mais excelente em dignidade e o mais excelente em poder.
4 परंतु तुझ्या भावना पुराच्या अनावर व बेबंद लाटांप्रमाणे आहे; तू माझा मुलांमध्ये श्रेष्ठ किंवा सर्वात अधिक महत्वाचा मुलगा होणार नाहीस कारण तू आपल्या बापाच्या एका बायकोपाशी जाऊन निजलास; तू आपल्या बापाच्या अंथरुणाचा आदर करुन मान राखला नाहीस.”
4 Impetuoso como a água, você não será o mais excelente, porque subiu ao leito de seu pai e o profanou; você profanou a minha cama.
5 “हे भाऊ आहेत; या दोन भावांना तरवारींने लढण्याची आवड आहे.
5 Simeão e Levi são irmãos; as suas espadas são instrumentos de violência.
6 त्यांनी गुपचूप वाईट गोष्टी करण्याचे ठरवले; त्यांचे हे बेत माझ्या जीवाला मान्य नाहीत; तसेच त्यांच्या गुप्त बैठका मला मान्य नाहीत; त्यांनी रागाच्या भरात माणसांची कत्तल केली; गंमत म्हणून त्यांनी पशूंना जखमी केले;
6 Que a minha alma não entre no conselho deles; que a minha glória não participe do seu agrupamento; porque no seu furor mataram homens, e na sua vontade perversa mutilaram touros.
7 त्यांचा राग शाप आहे; ते अति रागाने वेडे होतात तेव्हा अतिशय क्रूर बनतात; याकोबाच्या जमिनीत त्यांना वाटा मिळणार नाही. ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.”
7 Maldito seja o seu furor, pois era forte; e maldita seja a sua ira, pois era intensa; eu os dividirei em Jacó e os espalharei em Israel.
8 “यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील; तू तुझ्या शत्रूंचा पराभव करशील; तुझे भाऊ तुला लवून नमन करतील.
8 Judá, os seus irmãos o louvarão; a sua mão estará sobre o pescoço dos seus inimigos; os filhos de seu pai se inclinarão diante de você.
9 यहूदा, तू आपली शिकार मारलेल्या सिंहासारखा आहेस; माझ्या मुला, आपल्या शिकारीचा पशू मारुन त्याच्यावर उभा असलेल्या सिंहासारखा तू आहेस;यहूदा विसावा घेणाऱ्या सिंहासारखा आहेआणि त्याला त्रास देण्याइतका शूर दूसरा कोणीही नाही.
9 Judá é um leãozinho; da presa você subiu, meu filho. Ele se agacha e se deita como leão e como leoa; quem o despertará?
10 यहूदाचे कुटुंबीय राजे होतीलआणि योग्य राजा येईपर्यंत त्याच्या कुळातील राजवेत्र जाणार नाही मग बहुतेक जण त्याच्या आज्ञेत राहतील व त्याची सेवा करतील.
10 O cetro não se afastará de Judá, nem o bastão sairá de entre os seus pés, até que venha Siló; e a ele obedecerão os povos.
11 तो आपले गाढव अगदी चांगल्याद्राक्षवेलीस बांधून ठेवील; तो उंची द्राक्षारसाने आपले कपडे धुईल;
11 Ele amarrará o seu jumentinho à vide e o filho da sua jumenta, à videira mais excelente; lavará as suas roupas no vinho e a sua capa, em sangue de uvas.
12 द्राक्षमद्य घेतल्याने त्याचे डोळे त्या द्राक्षमद्यापेक्षा अधिक लालबुंद होतील; त्याचे दात दूधपिण्यामुळे दूधापेक्षा अधिक सफेद होतील.”
12 Os seus olhos serão cintilantes de vinho, e os seus dentes serão brancos de leite.
13 “जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल; त्याचा समुद्र किनारा जहाजासाठी सुरक्षित बंदर असेल. त्याच्या जमिनीची हद्द सिदोन नगरपर्यंत असेल.”
13 Zebulom habitará na praia dos mares e servirá de porto para os navios, e a sua fronteira se estenderá até Sidom.
14 “इस्साखार अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवासारखा होईल; जड वजनाचे सामान वाहून नेल्यावर तो विश्रांती घेईल.
14 Issacar é jumento de ossos fortes, deitado entre os rebanhos de ovelhas.
15 आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे तो पाहिल आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार होईल.”
15 Viu que o repouso era bom e que a terra era deliciosa; baixou os ombros à carga e sujeitou-se ao trabalho escravo.
16 “दान इस्राएलाच्या इतर वंशाप्रामाणे आपल्या लोकांचा न्याय करील.
16 Dã julgará o seu povo, como uma das tribos de Israel.
17 तो रस्ताच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल; तो घोड्याच्या टाचेला दंश करील; त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरुन खाली कोसळेल;
17 Dã será uma serpente junto ao caminho, uma víbora junto à vereda, que morde o calcanhar do cavalo e faz o seu cavaleiro cair para trás.
18 “हे परमेश्वरा, तुझ्या कडून उध्दार होण्याची मी वाट पाहात आहे.”
18 A tua salvação espero, ó
19 “लुटारुंची टोळी” गाद वर हल्ला करेल, परंतु तो त्यांना पळवून लावील.”
19 Gade será atacado por guerrilheiros, mas ele lhes atacará a retaguarda.
20 “आशेराची जमीन उत्तम अन्न भरपूर उपजवील; राजाला योग्य असे चांगले अन्नपदार्थ त्याजकडे असतील.”
20 Aser, o seu pão será abundante e ele produzirá delícias reais.
21 “नफताली मोकळ्या सुटलेल्या बागडणाऱ्या हरिणीप्रमाणे होईल; त्याचे शब्द म्हणजे त्याचे बोलणे हरिणींच्या पाडसाप्रमाणे गोड व सुंदर असेल.”
21 Naftali é uma gazela solta; ele fala palavras bonitas.
22 “योसेफ अतिशय यशस्वी झाला आहे; तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे; ती कुंपणावरही पसरते.
22 José é um ramo frutífero, ramo frutífero junto à fonte; seus galhos se estendem sobre o muro.
23 पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध झाले व त्याच्याशी लढले; धनुर्धारी लोकांनी त्याचा द्धेष केला;
23 Os flecheiros lhe dão amargura, atiram contra ele e o hostilizam.
24 परंतु आपल्या वळकट धनुष्याच्या आणि कुशल बाहुंच्या जोरावर त्याने युद्व जिंकिले. त्याला याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक व तुमच्या बापाचा देव याजकडून तुम्हाला शक्ती मिळते.
24 O seu arco, porém, permanece firme, e os seus braços são feitos ativos pelas mãos do Poderoso de Jacó, sim, pelo Pastor e pela Pedra de Israel,
25 सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून व खाली खोल दरीतून आशीर्वाद देवो तसेच स्तनांचा व गर्भाचा आशीर्वाद तो तुला देवो.
25 pelo Deus de seu pai, que o ajudará, e pelo Todo-Poderoso, que o abençoará com bênçãos dos altos céus, com bênçãos das profundezas, com bênçãos dos seios e do ventre.
26 माझ्या आईबापाच्या जीवनात अनेक चांगल्या घटना घडल्या व अनेक चांगल्या गोष्टी त्यांना मिळाल्या; आणि मी तुझा बाप, मला त्यांच्यापेक्षा अधिक आशीर्वाद मिळाला; तुझ्या भावांनी तुला काही ठेवले नाही. परंतु माझे सर्व आशीर्वाद तुझ्यावर पर्वता एवढे होतील.’
26 As bênçãos de seu pai excederão as bênçãos de meus pais até o alto dos montes eternos; estejam elas sobre a cabeça de José e sobre o alto da cabeça do que foi distinguido entre seus irmãos.
27 “बन्यामीन एखाद्या भुकेलेल्या लांडग्यासारखा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारुन खाईल व राहिलेले संध्याकाळी वाटून टाकील.”
27 Benjamim é lobo que despedaça; pela manhã devora a presa e à tarde reparte o despojo.
28 हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत; आणि हया गोष्टी त्यांचा बाप त्यांच्याशी बोलला; त्याने प्रत्येक मुलाला ज्याच्या त्याच्या योग्यातेप्रमाणे आशीर्वाद दिला.
28 São estas as doze tribos de Israel e isto é o que lhes falou seu pai quando os abençoou; a cada um deles abençoou segundo a bênção que lhe cabia.
29 मग इस्राएलाने त्यांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “मी मरेन तेव्हा तुम्ही मला माझ्या लोकात नेऊन ठेवावे. एफ्राम हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे.
29 Depois Jacó lhes ordenou, dizendo: — Vou ser reunido ao meu povo; sepultem-me junto de meus pais, na caverna que está no campo de Efrom, o heteu,
30 ती गुहा कनान देशात मम्रेच्या राईजवळील मकपेला येथील शेतात आहे. आपल्या घराण्याला कबरस्तान असावे म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रामकडून विकत घेतले.
30 na caverna que está no campo de Macpela, em frente a Manre, na terra de Canaã, a qual Abraão comprou de Efrom com aquele campo, como propriedade para servir de sepultura.
31 अब्राहाम व त्याची बायको सारा, यांना त्या गुहेह पुरले आहे. इसहाक आणि त्याची बायको रिबेका यांनाही तेथेच पुरले आहे. आणि माझी बायको लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.
31 Ali eles sepultaram Abraão e Sara, sua mulher; ali eles sepultaram Isaque e Rebeca, sua mulher; e ali eu sepultei Lia.
32 ती गुहा हेथी लोकाकडून विकत घेतलेल्या शेतात आहे.”
32 O campo e a caverna que nele está foram comprados dos filhos de Hete.
33 आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर इस्राएल आपले पाय पलंगावर घेऊन झोपला व मरण पावला.
33 Quando Jacó acabou de dar essas ordens a seus filhos, recolheu os pés na cama, expirou e foi reunido ao seu povo.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 49, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.