Ezequiel 5
Marathi Bible (GL_MARATHI) vs NAA
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 “मानवपुत्रा, तुझ्या भुकेच्या वेळे नंतर,तू ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तू एक धारदार तलवार घे. न्हाव्याच्या वस्तऱ्याप्रमाणे ती वापर आणि तुझे केस व दाढी कापून टाक. केस तराजूत घालून त्यांचे वजन कर. तुझ्या केसांचे तीन सारखे भाग कर. तुझे 1/3 केस (एक भाग) ‘नगरीवर (विटेवर) ठेव आणि जाळ. याचा अर्थ काही लोक नगराच्या आत मरतील. मग तलवारीने 1/3 केसांचे (आणखी एका भागाचे) बारीक बारीक तुकडे कर आणि ते नगरीभोवती (विटेभोवती) टाक. ह्याचा अर्थ काही लोक नगरामध्ये मरतील. मग राहिलेले 1/3 केस (उरलेला भाग) हवेत भिरकावून दे. वारा त्यांना दूर उडवून नेऊ देत. ह्याचा अर्थ मी तलवार उपसून दूरच्या देशांपर्यंत जाऊन काही लोकांचा पाठलाग करीन.
1 — Filho do homem, pegue uma espada afiada e use-a como navalha de barbeiro, passando-a pela sua cabeça e pela sua barba. Depois, pegue uma balança e reparta os cabelos que você cortou.
2 पण तू जाऊन काही केस आण व त्यांना तुझ्या अंगरख्यात बांध. ह्याचा अर्थ माझ्या काही लोकांना मी वाचवीन.
2 Queime uma terça parte no meio da cidade, quando se cumprirem os dias do cerco. Pegue outra terça parte e corte-a com a espada, enquanto você rodeia a cidade. Espalhe a outra terça parte ao vento, e irei atrás deles com a espada.
3 उडून गेलेल्या केसातील काही केस मिळव आणि ते विस्तवावर टाक. ह्याचा अर्थ अग्नी इस्राएलच्या संपूर्ण घराचा जाळून नाश करील.”
3 Mas pegue uns poucos cabelos e prenda-os nas bordas das suas roupas.
4 मग परमेश्वर, माझा प्रभू मला म्हणाला, “ती वीट म्हणजे जणू यरुशलेम आहे. मी यरुशलेमला इतर राष्ट्रांच्या मध्ये ठेवले आहे. आणि तिच्याभोवती इतर देश आहेत.
4 Pegue ainda alguns cabelos, jogue-os no fogo, e deixe que se queimem. Dali sairá um fogo contra toda a casa de Israel.
5 यरुशलेमच्या लोकांनी माझ्या नियमांविरुद्ध बंड केले. दुसऱ्या कोठल्याही राष्ट्रांपेक्षा ते वाईट आहेत. त्यांच्या भोवती असलेल्या देशांतील लोकांपेक्षा त्यांनी माझे नियम जास्त मोडले. त्यांनी माझ्या आज्ञा मानायचे नाकारले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत.”
5 — Assim diz o Senhor Deus: Esta é Jerusalém; eu a coloquei no meio das nações, com os outros países ao seu redor.
6 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकट आणीन. का? कारण तुम्ही माझे नियम पाळले नाहीत, माझ्या आज्ञा मानल्या नाहीत. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांपेक्षा तुम्हीच माझे नियम अधिक मोडलेत. एवढेच नाही तर ते लोक ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे म्हणत होते, त्याच तुम्ही केल्यात.”
6 Ela, porém, se rebelou contra os meus juízos e os meus estatutos, sendo mais perversa do que as nações e os países ao seu redor. Porque os moradores de Jerusalém rejeitaram os meus juízos e não andaram nos meus estatutos.
7 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “म्हणून आता मी सुद्धा तुमच्या विरुद्ध आहे. ते इतर लोक पाहात असतानाच मी तुला शिक्षा करीन.
7 Portanto, assim diz o Senhor Deus: Vocês são mais rebeldes do que as nações que estão ao seu redor. Não andaram nos meus estatutos, não executaram os meus juízos, nem procederam segundo o direito das nações ao redor de vocês.
8 पूर्वी कधी केल्या नव्हत्या अशा गोष्टी मी तुला करीन. आणि तशा भयंकर गोष्टी मी कधीच पुन्हा करणार नाही. का? कारण तुम्ही फार भयंकर गोष्टी केल्या.
8 Por isso, assim diz o Senhor Deus: Eis que eu, eu mesmo, estou contra você, Jerusalém, e vou executar os meus juízos dentro de você, à vista das nações.
9 यरुशलेममधील लोक उपासमारीने एवढे हैराण होतील की आईवडील मुलांना व मुले आईवडीलांना खातील. मी अनेक मार्गांनी तुम्हाला शिक्षा करीन. ज्यांना मी जिवंत ठेवलंय त्यांना मी सगळीकडे पसरवीन.”
9 Farei com você o que nunca fiz e o que jamais farei de novo, por causa de todas as suas abominações.
10 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “यरुशलेम, मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो की मी तुला शिक्षा करीन. मी तुला शिक्षा करीन असे वचन देतो. का? कारण माझ्या पवित्र स्थानावर तुम्ही भयंकर गोष्टी केल्या. त्यामुळे ते स्थान अपवित्र झाले. मी तुम्हाला शिक्षा करीन. अजिबात दया दाखविणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही.
10 Por isso, os pais vão devorar os próprios filhos dentro de você, ó Jerusalém, e os filhos vão devorar os pais. Executarei em você os meus juízos e tudo o que restar de você espalharei aos quatro ventos.
11 तुमचे एक तृतीयांश लोक रोगराईने व उपासमारीने नगरातच मरतील. एक तृतीयांश नगराबाहरे लढाईत मरतील. आणि उरलेल्या एक तृतीयांश लोकांचा माझी तलवार, दूरवरच्या देशांपर्यंत पाठलाग करील. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांना लढाईत ठार करतील. मगच माझा राग शांत होईल.
11 Portanto, porque você profanou o meu santuário com todas as suas coisas detestáveis e com todas as suas abominações, tão certo como eu vivo, diz o Senhor Deus, eu me retirarei. Os meus olhos não terão piedade, e eu não a pouparei.
12 ह्यानंतरच तुमच्या लोकांवरचा माझा राग मावळेल. माझ्याशी ते अतिशय वाईट वागले, त्यामुळे त्यांना शिक्षा होत आहे, हे मला माहीत आहे. तसेच, ‘मीच परमेश्वर आहे व त्यांच्याबद्दलच्या अतीव प्रेमापोटीमी त्यांच्याशी बोललो हे त्यांना त्या वेळी समजेल.”
12 Uma terça parte dos seus moradores morrerá de peste e será consumida pela fome dentro de suas muralhas; outra terça parte cairá à espada nos seus arredores; e a outra terça parte espalharei aos quatro ventos e irei atrás dela com a espada na mão.
13 देव म्हणाला, “यरुशलेम, मी तुझा नाश करीन. मग तू म्हणजे नुसता दगडमातीचा ढीग होशील. तुझ्या आजूबाजूचे लोक तुझी चेष्टा करतील. प्रत्येक येणारा जाणारा तुझी टर उडवेल.
13 — Assim se cumprirá a minha ira, satisfarei neles o meu furor e me acalmarei. Saberão que eu, o Senhor , falei motivado pelo meu zelo, quando cumprir neles o meu furor.
14 तुझ्या आजूबाजूचे लोक जशी तुझी चेष्टा करतील, तसेच तुझ्यावरुन ते धडाही घेतील. मी रागावलो आणि तुला शिक्षा केली हे ते पाहतील. मी खूपच संतापलो होतो. मी तुला ताकीद दिली. मी परमेश्वर, काय करणार आहे, ते तुला सांगितले होते.
14 Jerusalém, farei de você uma desolação e objeto de deboche entre as nações que estão ao seu redor, à vista de todos os que passarem.
15 मी तुझ्यावर उपासमारीची भयंकर वेळ आणीन, मी तुझा नाश करणाऱ्या गोष्टी तुझ्याकडे पाठवीन, हे मी तुला सांगितले होतेच. ती उपासमारीची वेळ पुन्हा पुन्हा यावी. मी तुझा धान्य पुरवठा बंद करीन हे मी तुला सांगितले होते.
15 — Assim, você será objeto de deboche e de zombaria, um exemplo de castigo e um motivo de espanto às nações que estão ao seu redor, quando eu executar em você juízos com ira e indignação, em furiosos castigos. Eu, o Senhor , falei.
16 मी तुझ्यावर उपासमार आणि हिंस्त्र प्राणी पाठवीन आणि ते तुझ्या मुलांना मारतील हे मी तुला सांगितले होते. नगरात सगळीकडे रोगराई व मृत्यू थैमान घालेल आणि शत्रू सैनिकांना तुझ्याविरुद्व लढण्यासाठी आणीन, असे मी तुला बजावले होते. ह्या सर्व गोष्टी घडतील असे मी म्हणजेच परमेश्वराने तुला सांगितले होते आणि तसेच घडेल.”
16 Quando eu atirar contra eles as flechas mortais da fome, flechas destruidoras, que eu enviarei para destruir vocês, então aumentarei a fome entre vocês e lhes cortarei o suprimento de pão.
17 — ausente —
17 Enviarei sobre vocês a fome, e animais selvagens que os deixarão sem filhos; a peste e o derramamento de sangue passarão por você, e trarei a espada contra você. Eu, o Senhor , falei.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.