Êxodo 35

Marathi Bible (GL_MARATHI) vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 मग मोशेने सगळया इस्राएल लोकांना एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, “ज्या आज्ञा तुम्ही पाळाव्या म्हणून परमेश्वराने तुम्हाला दिल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो;
1 Moisés reuniu todo o povo de Israel e lhe disse: — É isto o que o
2 “कामकाजासाठी सहा दिवस आहेत परंतु सातवा दिवस विसाव्यासाठी पवित्र दिवस आहे, तो पाळून विसावा घेतल्यामुळे तुम्ही परमेश्वराचा सन्मान कराल. सातव्या दिवशी-शब्बाथ दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे.
2 vocês têm seis dias para trabalhar, porém o sétimo dia deve ser sagrado, um dia solene dedicado ao Senhor . Qualquer pessoa que fizer algum trabalho nesse dia deverá ser morta.
3 शब्बाथ दिवशी तुम्ही राहात असलेल्या जागेत कोठेही तुम्ही विस्तव देखील पेटवू नये.”
3 No sábado, nem mesmo acendam fogo nas suas casas.
4 मोशे सर्व इस्राएल लोकांस म्हणाला, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा अशा.
4 Moisés disse a todo o povo de Israel: — É isto o que o
5 परमेश्वरासाठी पवित्र अर्पणेगोळा करा; काय द्यावे ह्याविषयी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनात परमेश्वराकडे आणावे; सोने, चांदी, पितळ;
5 façam uma oferta ao Senhor . Quem quiser fazer isso deverá trazer uma oferta de ouro, prata ou bronze;
6 निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;
6 fios de lã azul, púrpura e vermelha; linho fino; tecido feito de pelos de cabra;
7 लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
7 peles de carneiro tingidas de vermelho e peles finas; madeira de acácia;
8 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले;
8 azeite para lamparinas; especiarias para a preparação do azeite de ungir e para o incenso de cheiro agradável;
9 तसेच एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावी.
9 pedras de ônix e outras pedras de valor para serem colocadas no manto sacerdotal e no peitoral do Grande Sacerdote .
10 “जे तुम्ही कारागीर आहात त्या तुम्ही परमेश्वराने आज्ञा केलेल्या सर्व वस्तू तयार कराव्यात म्हणजे,
10 — Todos os homens habilidosos deverão vir e fazer tudo o que o Senhor mandou,
11 पवित्र निवास मंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फव्व्या, अडसर, खांब, व खुर्च्या;
11 isto é, a Tenda , as suas coberturas (a de dentro e a de fora), os prendedores, as armações, as travessas, os postes e as bases;
12 पवित्र कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,
12 a arca da aliança , os seus cabos de madeira, a sua tampa e a cortina para separar o Lugar Santíssimo do Lugar Santo ;
13 मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची पवित्र भाकर;
13 a mesa, os seus cabos e todo o seu equipamento; os pães oferecidos a Deus;
14 प्रकाशाकरीता दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आमि दिव्यासाठी तेल;
14 o candelabro e o seu equipamento; as lamparinas com o seu azeite;
15 धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी धूप, पवित्र निवास मंडपाच्या दारासाठी पडदा;
15 o altar de queimar incenso e os seus cabos; o azeite de ungir ; o incenso cheiroso; a cortina para a entrada da Tenda;
16 होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, पितळेचे गंगाळ व त्याची बैठक;
16 o altar de queimar as ofertas e a sua grelha de bronze; os cabos e o resto do equipamento do altar; a pia com o seu suporte;
17 अंगणाभोवतीच्या कनातीचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या खुर्च्या, आणि अंगणाचे दार झाकण्यासाठी पडदा;
17 a cortina do pátio, os seus postes e as suas bases; a cortina da entrada do pátio;
18 निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी आधार देणाऱ्या मेखा व तणावासाठी लागणाऱ्या दोऱ्या;
18 as estacas e as cordas da Tenda, e as estacas e as cordas do pátio;
19 पवित्र स्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवाकरण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या मुलांची पवित्र वस्त्रे.”
19 e as roupas que os sacerdotes usarão quando servirem no Lugar Santo, isto é, as roupas sagradas de Arão e dos seus filhos.
20 मग सर्व इस्राएल लोक मोशेपुढून निघून गेले.
20 Então o povo de Israel foi para casa,
21 नंतर ज्या लोकांना मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली.
21 e todos os que, de fato, queriam voltaram trazendo uma oferta para o Senhor , a fim de que a Tenda da Presença de Deus , o Senhor , fosse construída. Eles trouxeram tudo o que era necessário para a adoração e para fazer as roupas dos sacerdotes.
22 ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.
22 Vieram homens e mulheres, todos com muita boa vontade, e trouxeram fivelas, brincos, anéis, pulseiras e todo tipo de objetos de ouro. E essas ofertas foram dedicadas ao Senhor .
23 ज्यांच्याकडे निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले.
23 E também trouxeram como oferta linho fino, fios de lã azul, púrpura e vermelha, tecido feito de pelos de cabra, peles de carneiro tingidas de vermelho e peles finas.
24 चांदी व पितळ अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वराला अर्पण केले.
24 Todos os que podiam dar trouxeram prata e bronze como oferta ao Senhor , e também os que tinham madeira de acácia que podia ser usada para qualquer trabalho.
25 ज्या स्त्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.
25 Todas as mulheres habilidosas trouxeram o que haviam feito: fios de linho fino e fios de lã azul, púrpura e vermelha.
26 ज्या इतर स्त्रियांना मदत करण्याची इच्छा झाली त्या सर्वानी आपले कौशल्य दाखवून बकऱ्याच्या केसाचे कापड आणले.
26 Elas também fizeram tecidos de pelos de cabra.
27 अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली.
27 Os líderes trouxeram pedras de ônix e outras pedras de valor para serem colocadas no manto sacerdotal e no peitoral do Grande Sacerdote .
28 लोकांनी सुगंधी मसाले व जैतूनाचे तेल देखील आणले त्यांचा उपयोग सुगंधी धूप अभिषेकाचे तेल आणि दिव्याचे तेल यासाठी करण्यात आला.
28 E trouxeram também especiarias e o azeite para as lamparinas, para ungir e para o incenso cheiroso.
29 ज्या इस्राएल लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी आपल्या खुषीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली; परमेश्वराने मोशेला व लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे वस्तू बनविण्यास त्यांचा उपयोग झाला.
29 Todos os israelitas trouxeram de muita boa vontade as suas ofertas a Deus, o Senhor , para o trabalho que ele, por meio de Moisés, havia ordenado que fosse feito.
30 तेव्हा मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पहा परमेश्वराने यहुदा वंशातील उरी (उरी हा हूरचा पुत्र होता) ह्याचा मुलगा बसालेल ह्याची निवड केली आहे.
30 Moisés disse ao povo de Israel: — O
31 परमेश्वराच्या आत्म्याने बसालेल याला भरले आहे त्याला सर्व प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी कसब आणि ज्ञान दिले आहे.
31 Deus o encheu com o seu Espírito e lhe deu inteligência, competência e habilidade para fazer todo tipo de trabalho artístico;
32 तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीच्या वस्तू तयार करील.
32 para fazer desenhos e trabalhar em ouro, prata e bronze;
33 तो हिऱ्यांना पैलू पाडून हिरे आणि रत्ने जडवून देईल. बसालेल लाकूड कामही करून त्यापासून सर्व प्रकारच्या वस्तू बनवील.
33 para lapidar e montar pedras preciosas; para entalhar madeira; e para fazer todo tipo de artesanato.
34 परमेश्वराने त्याला आणि दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब, याला ह्या विशेष कला इतरांना शिकविण्याचे सामर्थ्य दिले आहे.
34 O Senhor deu a Bezalel e a Aoliabe, filho de Aisamaque, da tribo de Dã, o dom de ensinar os outros.
35 कोरीव काम करणारे कुशल सुतार, धातू काम करणारे कारागीर, निळया, जांभळया ज्ञान व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसवी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्या. सर्व कारागिरीची कामे ते करु शकतात कारण परमेश्वराने त्यासाठी ह्या दोघांना ज्ञान व कसब दिले आहे.”
35 Ele lhes deu habilidade para fazerem todos os trabalhos de gravador e de desenhista, para tecerem linho fino e fios de lã azul, púrpura e vermelha e para fazerem outros tecidos. Eles têm habilidade para todo tipo de trabalho e para fazer desenhos.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 35, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.