Êxodo 2

Marathi Bible (GL_MARATHI) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 लेवी वंशातील एक माणूस होता. त्याने लेवी वंशातीलच मुलगी बायको केली.
1 Foi-se um homem da casa de Levi e casou com uma filha de Levi.
2 ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला; तो मुलगा फार सुंदर व देखणा आहे असे पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले.
2 A mulher concebeu e deu à luz um filho; e, vendo que ele era formoso, escondeu-o três meses.
3 तो बाळ मुलगा असल्यामुळे सापडला जाईल व मारला जाईल अशी त्याच्या आईला भीती वाटली. तीन महिन्यानंतर तिने एक लव्हाव्व्याची पेटी तयार केली; ती पाण्यावर तरंगावी म्हणून तिने तिला आतून व बाहेरून डांबर लावले. तिने त्या तान्ह्या बाळाला पेटीत ठेवले; नंतर तिने ती पेटी नदीत उंच लव्हाव्व्यात ठेवली.
3 Não podendo, porém, escondê-lo por mais tempo, tomou para ele uma arca de juncos, e a revestiu de betume e pez; e, pondo nela o menino, colocou-a entre os juncos a margem do rio.
4 त्या बाळाची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली.
4 E sua irmã postou-se de longe, para saber o que lhe aconteceria.
5 त्याच वेळी फारोची मुलगी (राजकन्या) आंघोळ करण्यासाठी नदीवर गेली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. राजकन्येने उंच लव्हाव्व्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांतगितले.
5 A filha de Faraó desceu para banhar-se no rio, e as suas criadas passeavam à beira do rio. Vendo ela a arca no meio os juncos, mandou a sua criada buscá-la.
6 राजकन्येने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले, ते बाळ रडत होते, म्हणून तिला त्याच्याबद्दल फार वाईट वाटले! ती म्हणाली, “हा बाळ कोणातरी इब्री म्हणजे इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे.”
6 E abrindo-a, viu a criança, e eis que o menino chorava; então ela teve compaixão dele, e disse: Este é um dos filhos dos hebreus.
7 मग आतापर्यत लपून बसलेली ती बाळाची बहीण राजकन्येकडे गेली व म्हणाली, “या बाळाची काळजी घेण्यासाठी मी जाऊन एखादी इब्रीदाई शोधून आणू का?”
7 Então a irmã do menino perguntou à filha de Faraó: Queres que eu te vá chamar uma ama dentre as hebréias, para que crie este menino para ti?
8 राजकन्येने उत्तर दिले, “होय कृपाकरून लवकर घेऊन ये.”तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
8 Respondeu-lhe a filha de Faraó: Vai. Foi, pois, a moça e chamou a mãe do menino.
9 राजकन्या त्या बाईला म्हणाली, “बाई, ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज आणि त्याची चांगली काळजी घे; त्याबद्दल मी तुला मोबदला देईन.”तेव्हा त्या बाईने ते बाळ घेतले आणि त्याची योग्य काळजी घेतली.
9 Disse-lhe a filha de Faraó: Leva este menino, e cria-mo; eu te darei o teu salário. E a mulher tomou o menino e o criou.
10 ते मूल वाढले. मग काही काळानंतर एके दिवशी ती बाई त्या बाळाला घेऊन राजकन्येकडे आली; तेव्हा राजकन्येने ते बाळ घेतले आणि त्याला आपला स्वत:चा मुलगा म्हणून स्वीकारले; तिने त्याचे नांव मोशे ठेवले कारण तिने त्याला पाण्यातून उचलून घेतले होते.
10 Quando, pois, o menino era já grande, ela o trouxe à filha de Faraó, a qual o adotou; e lhe chamou Moisés, dizendo: Porque das águas o tirei.
11 मोशे वाढत जाऊन एक तरूण माणूस झाला. तेव्हा आपल्या इब्री लोकांस फार कष्टाची कामे करावयास भाग पाडले जात आहे हे त्याने पहिले. एके दिवशी एक मिसरचा माणूस इब्री माणसास मारत असताना त्याने पाहिले.
11 Ora, aconteceu naqueles dias que, sendo Moisés já homem, saiu a ter com seus irmãos e atentou para as suas cargas; e viu um egípcio que feria a um hebreu dentre, seus irmãos.
12 तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसरच्या माणसाला जिवे मारले व वाळूत पुरुन टाकले.
12 Olhou para um lado e para outro, e vendo que não havia ninguém ali, matou o egípcio e escondeu-o na areia.
13 दुसऱ्या दिवशी दोन इब्री माणसे मारामारी करत होती. मोशेने पहिले की त्यांच्यामधील एक दोषी आहे. मोशे त्याला म्हणाला, “तू आपल्या शेजाऱ्याला का मारत आहेस?”
13 Tornou a sair no dia seguinte, e eis que dois hebreus contendiam; e perguntou ao que fazia a injustiça: Por que feres a teu próximo?
14 त्या माणसने उत्तर दिले, “तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? मला सांग! तू कालजसे त्या मिसरच्या माणसाला जिवे मारलेस, तसे मला मारावयास पाहातोस काय?”तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता सर्वाना माहीत झाले आहे.”
14 Respondeu ele: Quem te constituiu a ti príncipe e juiz sobre nós? Pensas tu matar-me, como mataste o egípcio? Temeu, pois, Moisés e disse: Certamente o negócio já foi descoberto.
15 मोशेन काय केले हे फारोला समजले तेव्हा त्याने त्याला जिवे मारावयाचे ठरवले. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ थांबला.
15 E quando Faraó soube disso, procurou matar a Moisés. Este, porém, fugiu da presença de Faraó, e foi habitar na terra de Midiã; e sentou-se junto a um poço.
16 मिद्यानात एक याजक होता. त्याला सात मुली होत्या; आपल्या बापाच्या शेरडामेंढरास पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या डोणीत पाणी भरण्याचा प्रयत्न करीत होत्या;
16 O sacerdote de Midiã tinha sete filhas, as quais vieram tirar água, e encheram os tanques para dar de beber ao rebanho de seu pai.
17 परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावले. तेव्हा मोशेन त्या मुलींना त्यांच्या शेरडामेंढरांस पाणी पाजण्यास मदत केली.
17 Então vieram os pastores, e as expulsaram dali; Moisés, porém, levantou-se e as defendeu, e deu de beber ao rebanho delas.
18 मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज एवढ्या लवकर घरी कशा आला?”
18 Quando elas voltaram a Reuel, seu pai, este lhes perguntou: como é que hoje voltastes tão cedo?
19 मुलींनी उत्तर दिले, “तेथील मेढपाळानी आम्हाला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. परंतु एका मिसरच्या माणसाने आम्हाला मदत केली. त्याने आम्हासाठी पाणी काढून आपल्या शेरडेमेंडरास पाजले.”
19 Responderam elas: um egípcio nos livrou da mão dos pastores; e ainda tirou água para nós e deu de beber ao rebanho.
20 तेव्हा रगुवेल आपल्या मुलींना म्हणला, “तो माणूस कोठे आहे? तुम्ही त्याला सोडून का आला? त्याला आपल्या घरी जेवावयास बोलावून आणा.”
20 E ele perguntou a suas filhas: Onde está ele; por que deixastes lá o homem? chamai-o para que coma pão.
21 त्या माणसापाशी राहण्यास मोशेला आनंद वाटला. त्या माणसाने आपली मुलगी सिप्पोरा हिच्याबरोबर त्याचे लग्न करून दिले.
21 Então Moisés concordou em morar com aquele homem, o qual lhe deu sua filha Zípora.
22 सिप्पोराला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नांव गेर्षोम ठेवले.
22 E ela deu à luz um filho, a quem ele chamou Gérson, porque disse: Peregrino sou em terra estrangeira.
23 बऱ्याच वर्षानंतर मिसरचा राजा मरण पावला. अजूनही इस्राएल लोकानां अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती. त्यांनी मदतीकरिता हाका मारल्या व देवाने त्या ऐकल्या;
23 No decorrer de muitos dias, morreu o rei do Egito; e os filhos de Israel gemiam debaixo da servidão; pelo que clamaram, e subiu a Deus o seu clamor por causa dessa servidão.
24 देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला आठवण झाली.
24 Então Deus, ouvindo-lhes os gemidos, lembrou-se do seu pacto com Abraão, com Isaque e com Jacó.
25 देवाने इस्राएल लोकांचे हाल पाहिले आणि त्यांना लगेच मदत करावयाचे ठरवले.
25 E atentou Deus para os filhos de Israel; e Deus os conheceu.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.