Êxodo 21

Marathi Bible (GL_MARATHI) vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 मग देव मोशेला म्हणाला, “जे इतर नियम तू इस्राएल लोकांना लावून द्यावेत ते हे:
1 Deus ordenou a Moisés que desse aos israelitas estas leis :
2 “तुम्ही जर एखादा इस्राएली गुलाम विकत घेतला तर त्याने फक्त सहा वर्षे काम करावे; सहा वर्षानंतर सातव्या वर्षी तो मुक्त होऊन स्वतंत्र होईल; भरपाई म्हणून तो तुझे काही देणे लागणार नाही.
2 — Se você comprar um escravo israelita, ele deverá trabalhar seis anos para você. Mas no sétimo ano ele ficará livre, sem ter de pagar nada.
3 जर तो सडा आला असेल तर त्याने मुक्त होताना एकटेच निघून जावे; परंतु जर तो त्याची बायको घेऊन आला असेल तर त्याने त्याच्या बायकोला घेऊन जावे.
3 Se ele era solteiro quando se tornou seu escravo, não levará a mulher quando for embora. Mas, se era casado, então poderá levar a mulher.
4 जर तो सडा आला असेल तर त्याच्या मालकाने त्याला बायको करून द्यावी; तिला मुले किंवा मुली झाल्या असतील तर त्याची बायको व तिची मुलेबाळे मालकाच्या मालकीची राहतील; आपली सेवा पूर्ण करताच त्याला एकट्याला मुक्त केले जाईल.
4 Se o dono do escravo lhe der uma mulher, e ela der à luz filhos e filhas, a mulher e os filhos serão do dono, e o escravo irá embora sozinho.
5 “पण जर कदाचित आपल्या मालकाबरोबर राहाण्याचे तो ठरविल तर मग ‘मी माझ्या मालकावर व माझ्या बायकोमुलांवर प्रेम करतो, मी मुक्त होऊ इच्छित नाही, मी मालकाकडेच राहातो,’ असे त्याने म्हटले पाहिजे.
5 Se o escravo disser que ama a sua mulher, os seus filhos e o seu dono e não quiser ser posto em liberdade,
6 असे झाले तर त्याच्या मालकाने त्याला देवासमोर अथवा न्यायधीशासमोर आणावे; त्याने त्याला दाराजवळ किंवा दरवाजाच्या लाकडी चौकटीजवळ न्यावे आणि अरीच्या अणकुचीदार टोकाने त्याचा कान टोचावा; मग तो गुलाम त्या मालकाची आयुष्यभर चाकरी करील.
6 então o dono o levará ao lugar de adoração. Ali ele o encostará na porta ou no batente da porta e furará a orelha dele com um furador. Então ele será seu escravo por toda a vida.
7 “एखाद्या माणसाने आपली मुलगी गुलाम म्हणून विकण्याचे ठरविले तर तिच्या मुक्ततेचे नियम पुरुषगुलामाच्या मुक्तते सारखे नाहीत.
7 — Se um homem vender a sua filha para ser escrava, ela não ficará livre como ficam os escravos do sexo masculino.
8 जर मालक तिच्यावर खूष नसेल तर त्याने तिला परत तिच्या बापाला विकावे; जर त्याने तिच्याबरोबर लग्न करावयाचे कबूल केले असेल तर तिला परक्याला विकण्याचा त्याला अधिकार नाही.
8 Se um homem a comprar e disser que quer casar com ela, mas depois não gostar dela, ele terá de vendê-la novamente ao pai dela. O seu dono não poderá vendê-la a estrangeiros, pois ele não agiu direito com ela.
9 तिला आपल्या मुलाशी लग्न करून देण्यासाठी ठेवून घ्यावयाचे असेल तर त्याने तिला गुलामस्त्रीप्रमाणे नव्हे तर मुलीप्रमाणे वागवावे.
9 Se alguém comprar uma escrava para fazê-la casar com seu filho, deverá tratá-la como se fosse sua filha.
10 “मालकाने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले तर त्याने पहिल्या बायकोस अन्नवस्त्र कमी पडू देऊ नये तसेच तिला लागणाऱ्या इतर वस्तू देणे व तिच्याशी बायको या नात्याने व्यवहार करणे चालू ठेवावे कारण तसा तिला त्याच्याविरुद्ध हक्क आहे.
10 Se um homem casar com uma segunda mulher, deverá continuar a dar à primeira a mesma quantidade de alimentos e de roupas e os mesmos direitos que ela possuía antes.
11 ह्या तीन गोष्टी त्याने तिच्यासाठी कराव्यात आणि त्या केल्या नाहीत तर मग ती त्याला काही खंडणी न देता मुक्त होईल; ती त्याचे काही देणे लागणार नाही.
11 Se ele não cumprir essas três coisas, ela poderá sair livre, sem ter de pagar nada.
12 “कोणी एखाद्याला मारले व त्यामुळे तो मेला तर त्याला अवश्य जिवे मारावे.
12 — Deverá ser morto todo aquele que ferir uma pessoa de modo que ela morra.
13 परंतु जाणूनबुजून न ठरविता, अपघाताने एखाद्याचे हातून कोणी मेले तर देवाने हे घडू दिले असे समजावे. लोक सुराक्षिततेसाठी जाऊ शकतील अशा काही खास जागा मी निवडीन तो माणूस आपल्या सुरक्षिततेसाठी मी निवडलेल्या विशेष ठिकाणापैकी एके जागी पळून जाऊ शकेल.
13 Porém, se foi apenas um acidente, não tendo havido intenção de matar, então aquele que matou deverá fugir para um lugar que eu escolherei e ali ele ficará livre.
14 परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर मात्र त्याला शिक्षा करावी; त्याला वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.
14 Mas, se um homem ficar com raiva e matar outro de propósito, deverá ser morto, ainda que ele tenha fugido para o meu altar a fim de se salvar.
15 “जो माणूस आपल्या आईबापास मारहाण करील त्याला अवश्य ठार मारावे.
15 — Quem bater no pai ou na mãe será morto.
16 जो कोणी एखाद्याला चोरून नेऊन गुलाम म्हणून विकेल किंवा गुलाम म्हणून स्वत:कडे ठेवेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.
16 — Quem levar à força uma pessoa para vendê-la ou para ficar com ela como escrava será morto.
17 “जो कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप देईल त्या माणसाला अवश्य जिवे मारावे.
17 — Quem amaldiçoar o pai ou a mãe será morto.
18 “दोघे जण भांडत असताना एकाने दुसऱ्याला दगड किंवा ठोसा मारला आणि त्यामुळे जर दुसरा मेला नाही तर मारणाऱ्याला जिवे मारु नये.
18 — Se durante uma briga um homem ferir o outro com uma pedra ou com um soco, ele não será castigado se aquele que foi ferido não morrer. Mas, se este ficar de cama,
19 जर मारलेल्या माणसाला काही दिवस बिछान्यात पडून राहावे लागले तर मारणाऱ्याने त्याला त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो माणूस बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा.
19 e mais tarde se levantar, e começar a andar fora da casa com a ajuda de uma bengala, então aquele que o feriu terá de pagar o tempo que o outro perdeu e também as despesas do tratamento.
20 “काही वेळा लोक आपल्या गुलामाला किंवा गुलाम स्त्रीला छडीने मारहाण करतात त्यामुळे जर तो गुलाम किंवा ती गुलाम स्त्री मेली तर त्यांना मारणाऱ्याला अवश्य शिक्षा करावी;
20 — ausente —
21 आणि जर तो गुलाम किंवा गुलाम स्त्री मेली नाही आणि काही दिवसांनी तो किंवा ती बरी झाली तर त्यांना मारणाऱ्याला खुना बद्दलची शिक्षा होणार नाही कारण मालकाने त्यांना किमत देऊन विकत घेतले आहे; आणि ते त्याचे गुलाम आहेत.
21 — ausente —
22 “दोघे जर मारामारी करीत असतील व त्यांचा धक्का एखाद्या गरोदर बाईला लागला आणि त्या बाईचा गर्भपात झाला पण तिला इतर कोणतीही इजा झाली नाही तर ज्याचा धक्का तिला लागला तिचा नवरा न्यायाधीशांच्या सल्ल्याने जो दंड ठरवील तो दंड त्याने द्यावा.
22 — Se alguns homens estiverem brigando e ferirem uma mulher grávida, e por causa disso ela perder a criança, mas sem maior prejuízo para a sua saúde, aquele que a feriu será obrigado a pagar o que o marido dela exigir, de acordo com o que os juízes decidirem.
23 परंतु त्या बाईला जास्त इजा झाली असेल तर त्या माणसाला शिक्षा करावी; जर एखाढ्या माणसाला ठार मारण्यात आले असेल तर त्या कृत्याला जबाबदार असणाऱ्या माणसाला ठार मारावे. म्हणजे जिवाबद्दल जीव.
23 Mas, se a mulher for ferida gravemente, o castigo será vida por vida,
24 डोव्व्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,
24 olho por olho, dente por dente, mão por mão, pé por pé,
25 चटक्याबद्दल चटका, ओरखड्याबद्दल ओरखडा, व जखमेबद्दल जखम असा बदला घ्यावा.
25 queimadura por queimadura, ferimento por ferimento, machucadura por machucadura.
26 “जर एखाद्याने आपल्या गुलामाच्या किंवा गुलाम स्त्रीच्या डोव्व्यावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा डोळा गेला तर त्या मालकाने त्याला मुक्त करून जाऊ द्यावे कारण त्याने आपला डोळा देऊन खंडणी भरली आहे. गुलाम किंवा गुलामस्त्रीला हा नियम सारखाच लागू आहे.
26 — ausente —
27 एखाद्या मालकाने आपल्या गुलामाच्या किंवा गुलाम स्त्रीच्या तोंडावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा दात पडला तर मारणाऱ्याने गुलामाला मुक्त करून जाऊ द्यावे कारण त्याने आपला दात देऊन खंडणी भरली आहे. गुलाम किंवा गुलामस्त्रीला हा नियम सारखाच लागू आहे.
27 — ausente —
28 “एखाद्याच्या बैलाने एखाद्या पुरुषाला किंवा बाईला हुंदडून जिवे मारले तर त्या बैलास दगडमार करून जिवे मारावे, त्या बैलाचे मांस कोणी खाऊ नये, परंतु त्या बैलाचा मालक दोषी ठरणार नाही.
28 — Se um boi chifrar um homem ou uma mulher, e a pessoa morrer, o boi deverá ser morto a pedradas, e ninguém comerá a sua carne. Mas o dono do boi não será castigado.
29 परंतु त्या बैलाने पूर्वी काहीजणांना मारले असेल आणि त्याविषयी त्याच्या मालकाला जर सूचना दिली असेल तर मग तो मालक दोषी आहे कारण त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही किंवा गोठ्यात त्याच्या जागी बंद करून ठेवले नाही आणि म्हणून मोकळा ठेवल्यामूळे त्या बैलाने जर कोणाला जिवे मारले तर त्याबद्दल त्याचा मालक दोषी आहे, त्या बैलाला धोंडमार करुन जिवे मारावे व त्याच्या मालकासही जिवे मारावे.
29 Porém, se o boi tinha o costume de chifrar as pessoas, e o seu dono sabia disso e não o prendeu, e o boi matar algum homem ou alguma mulher, o boi será morto a pedradas. E o seu dono também será morto.
30 परंतु मेलेल्या माणसाच्या कुटुंबातील लोकांना त्या मालकाच्या जिवाबद्दल खंडणी पाहिजे असल्यास त्या बैलाच्या मालकास जिवे मारू नये पण त्याने आपला जीव वाचविण्यासाठी न्यायाधीश ठरवील ती खंडणी द्यावी.
30 No entanto, se deixarem que o dono pague uma multa para salvar a sua vida, então ele terá de pagar tudo o que for exigido.
31 “बैलाने एखाद्या मुलाला किंवा मुलीला हुंदडून जिवे मारले तर त्याबाबतीत हाच नियम लागू करावा.
31 Se um boi matar um menino ou uma menina, o dono será julgado por esta mesma lei .
32 एखाद्या बैलाने जर गुलामाला हुंदडून ठार मारले तर त्या बैलाच्या मालकाने त्या गुलामाच्या मालकाला चांदीची तीस नाणीद्यावी आणि त्या बैलालाही दगडाने जिवे मारावे; गुलाम किंवा गुलाम स्त्री म्हणजे गुलाम पुरुष किंवा स्त्री यांना हा नियम सारखाच लागू राहील.
32 Se um boi chifrar um escravo ou uma escrava, o dono receberá como pagamento trinta barras de prata, e o boi será morto a pedradas.
33 “एखाद्या माणसाने विहिरीवरचे झाकण काढून घेतले असेल किंवा त्याने खडृ खणून त्यावर झाकण ठेवले नसेल आणि जर एखाद्याचे जनावर म्हणजे बैल, गाढव वगैरे त्या खड्यात पडून मेले तर खडृ्याचा मालक दोषी आहे;
33 — Se alguém tirar a tampa de um poço ou se cavar um poço e não o tapar, e nele cair um boi ou um jumento,
34 त्याने त्या जनावराच्या मालकाला भरपाई म्हणून त्याची किंमत द्यावी आणि ते मेलेले जनावर घेऊन जावे.
34 essa pessoa terá de pagar ao dono o preço do animal. Ela fará o pagamento em dinheiro, porém o animal morto será seu.
35 “जर एखाद्याच्या बैलाने दुसऱ्या बैलाला दुंदडून मारून टाकले तर जिवंत राहिलेला बैल विकून आलेले पैसे दोघा मालकांनी निम्मे वाटून घ्यावेत आणि मेलेला बैलही अर्धा अर्धा वाटून घ्यावा.
35 Se o boi de um homem ferir o boi de outro, e o boi que foi ferido morrer, o boi vivo será vendido, e o dinheiro será repartido entre os dois homens; e o boi morto será dividido também entre os dois.
36 परंतु त्या बैलाने पूर्वी इतर बैलांना हुंदडून जिवे मारले असेल तर आपल्या मारक्या बैलाला मोकळे सोडल्याबद्दल मालक दोषी ठरेल; त्याने बैलाबद्दल बैल द्यावा व मेलेला बैल घ्यावा.
36 Porém, se o boi já era conhecido como boi chifrador, e o seu dono não o prendeu, ele dará ao outro homem um boi vivo, mas o boi morto será seu.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 21, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.