Deuteronômio 29
Marathi Bible (GL_MARATHI) vs NAA
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 इस्राएलांशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात आणखी एक पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो हा पवित्र करार होय.
1 São estas as palavras da aliança que o Senhor ordenou que Moisés fizesse com os filhos de Israel na terra de Moabe, além da aliança que havia feito com eles em Horebe.
2 मोशेन सर्व इस्राएलांना जवळ बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मिसरमध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे.
2 Moisés mandou reunir todo o Israel. Então lhes disse: — Vocês viram com os seus próprios olhos tudo o que o
3 ती संकटे, चमत्कार आणि विस्मयकारक गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत.
3 Viram grandes provas, sinais e grandes maravilhas.
4 पण नेमके काय झाले हे तुम्हांला आजही समजू शकलेले नाही. तुम्ही जे पाहिलेत आणि ऐकलेत त्याचे खरे आकलन परमेश्वराने तुम्हाला होऊ दिलेले नाही.
4 Mas até o dia de hoje o Senhor não deu a vocês um coração para entender, nem olhos para ver, nem ouvidos para ouvir.
5 परमेश्वराने तुम्हांला वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत.
5 Durante quarenta anos eu os conduzi pelo deserto e, nesse tempo, não envelheceram as roupas que vocês usavam, nem se gastaram as sandálias que vocês calçavam.
6 तुम्हीं भाकरी खाल्ली नाही की द्राक्षारस अथवा मद्य प्यायले नाही. पण परमेश्वराने तुमची काळजी वाहिली. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हांला कळावे म्हणून त्याने असे केले.
6 Vocês não comeram pão, nem beberam vinho ou bebida forte, para que soubessem que eu sou o Senhor , seu Deus.
7 “तुम्ही येंथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग आपल्यावर चढाई करुन आले. पण आपण त्यांचा पराभव केला.
7 Quando chegaram a este lugar, Seom, rei de Hesbom, e Ogue, rei de Basã, saíram ao nosso encontro para lutar contra nós, e nós os derrotamos.
8 त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना ते इनाम म्हणून दिला.
8 Tomamos a terra deles e a demos por herança aos rubenitas, aos gaditas e à meia tribo dos manassitas.
9 या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला सर्व कार्यात असेच यश मिळत राहील.
9 Portanto, guardem e cumpram as palavras desta aliança, para que vocês prosperem em tudo o que fizerem.
10 “आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडीलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात.
10 — Hoje todos vocês estão diante do Senhor , seu Deus: os chefes das tribos, os anciãos e os oficiais, todos os homens de Israel,
11 तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्यातील सर्व उपरे हे ही इथे आहेत.
11 as crianças, as mulheres e os estrangeiros que se encontram no arraial, desde o rachador de lenha até o tirador de água,
12 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे.
12 para que entrem na aliança do Senhor , seu Deus, e no juramento que hoje o Senhor , seu Deus, está fazendo com vocês,
13 त्याद्वारे तो तुम्हांला आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हांला आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे.
13 para que hoje os estabeleça por seu povo, e ele seja o Deus de vocês, como ele lhes prometeu e como jurou aos pais de vocês, Abraão, Isaque e Jacó.
14 हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी-आज इथे उपस्थित असलेल्यांबरोबरच नव्हे तर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर नसलेल्या आपल्या वंशजांसाठीही आहे.
14 Não é somente com vocês que faço esta aliança e este juramento,
15 आपण मिसरमध्ये कसे राहात होतो ते तुम्हांला आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला याचीही तुम्हांला आठवण आहे.
15 porém com aquele que, hoje, aqui, está conosco diante do Senhor , nosso Deus, e também com aquele que não está aqui, hoje, conosco.
16 त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या आपल्याला तिरस्करणीय असलेल्या मूर्तीही पाहिल्यात.
16 — Porque vocês sabem como habitamos na terra do Egito e como passamos pelo meio das nações pelas quais vocês passaram.
17 आपल्या परमेश्वर देवापासून परावृत होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कूळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विषवल्लीसमान असतात.
17 Viram as suas abominações e os seus ídolos, feitos de madeira e de pedra, e viram também a prata e o ouro que havia entre elas.
18 “एखादा हे बोलणे ऐकूनही, ‘मी मला हवे तेच करणार. माझे काहीही वाकडे होणार नाही’ असे स्वत:चे समाधान करुन घेत असेल. पण त्याने हे लक्षात ठेवावे की त्याचा त्याला त्रास तर होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळते या न्यायाने निरपराध्यांनाही त्रास होईल.
18 Que entre vocês não haja homem, nem mulher, nem família, nem tribo cujo coração hoje se desvie do Senhor , nosso Deus, e vá servir os deuses destas nações. Que não haja entre vocês raiz que produza erva venenosa e amarga,
19 परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वत:च्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे.
19 ninguém que, ouvindo as palavras desta maldição, se abençoe no seu íntimo, dizendo: “Terei paz, mesmo que eu ande na teimosia do meu coração”, pois isso destruiria a terra molhada com a seca.
20 “या देशाची कशी वाट लागली हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती आणि परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील.
20 O Senhor não estará disposto a perdoá-lo; pelo contrário, a ira do Senhor e o seu zelo se acenderão sobre tal homem, e toda maldição escrita neste livro cairá sobre ele; e o Senhor apagará o nome desse homem da face da terra.
21 येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.
21 O Senhor o separará de todas as tribos de Israel para calamidade, segundo todas as maldições da aliança escrita neste Livro da Lei.
22 “‘परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?’ असे इतर राष्ट्रातील लोक विचारतील.
22 — Então a geração vindoura, os filhos que vierem depois de vocês e os estrangeiros que virão de terras remotas verão as pragas desta terra e as suas doenças, com que o Senhor a terá afligido;
23 त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला.
23 verão toda a terra abrasada com enxofre e sal, de modo que não será semeada, nada produzirá, nem crescerá nela erva alguma, assim como foi a destruição de Sodoma e de Gomorra, de Admá e de Zeboim, que o Senhor destruiu na sua ira e no seu furor;
24 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते.
24 sim, todas as nações verão isso e perguntarão: “Por que o Senhor fez isso com esta terra? Qual foi a causa do furor de tamanha ira?”
25 म्हणून त्यांच्यावर तो क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्या बाबतीत खरी करुन दाखवली.
25 Então se dirá: “Porque abandonaram a aliança que o Senhor , Deus de seus pais, fez com eles, quando os tirou do Egito.
26 क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?
26 Eles foram e serviram outros deuses, e os adoraram; deuses que não conheceram e que ele não lhes havia designado.
27 “काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.
27 Por isso a ira do Senhor se acendeu contra esta terra, trazendo sobre ela toda a maldição que está escrita neste livro.
28 — ausente —
28 Com ira, indignação e grande furor, o Senhor os arrancou de sua terra e os lançou para outra terra, como hoje se vê.”
29 — ausente —
29 — As coisas encobertas pertencem ao Senhor , nosso Deus, porém as reveladas nos pertencem, a nós e aos nossos filhos, para sempre, para que cumpramos todas as palavras desta lei.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 29, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.