Cânticos 8
Marathi Bible (GL_MARATHI) vs VC
VC Versão Católica
1 माझ्या आईचे दुध पिणाऱ्या माझ्या लहानग्या भावासारखा तू असावास असे मला वाटते. तू जर मला बाहेर दिसलास तर मी तुझे चुंबन घेईन आणि त्यात काही गैर आहे असे कुणीही म्हणणार नाही.
1 Ah, se fosses meu irmão, amamentado ao seio de minha mãe! Então, encontrando-te fora, poderia beijar-te sem que ninguém me censurasse.
2 मी तुला माझ्या आईच्या घरात घेऊन जाईन. जिने मला शिकवले तिच्या खोलीत मी तुला नेईन. मी तुला माझ्या डाळींबांपासून बनवलेले मसाल्यांनी युक्त असे मद्य देईन.
2 Eu te levaria, far-te-ia entrar na casa de minha mãe; dar-te-ia a beber vinho perfumado, licor de minhas romãs.
3 त्याचा डावा बाहू माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा बाहू मला धरत आहे.
3 Sua mão esquerda está sob a minha cabeça, e sua direita abraça-me.
4 यरुशलेमच्या स्त्रियांनो, मला वचन द्या. माझी तयारी होईपर्यंत प्रेमाला जागवू नका, चेतवू नका.
4 - Conjuro-vos, filhas de Jerusalém, não desperteis nem perturbeis o amor, antes que ele o queira.
5 वाळवंटातून, प्रियकराच्या अंगावर रेलत येणारी ही स्त्री कोण आहे?मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, जिथे तुझ्या आईने तुला प्रसवले, जिथे तुझा जन्म झाला तेथे.
5 - Quem é esta que sobe do deserto apoiada em seu bem-amado? - Sob a macieira eu te despertei, onde em dores te deu à luz tua mãe, onde em dores te pôs no mundo tua mãe.
6 तू तुझ्या हृदयावर जी मोहोर धारण करतोस, किंवा तुझ्या बोटात तुझा शिक्का असलेली अंगठी घालतोस त्याप्रमाणे तू मला तुझ्या अगदी जवळ ठेव. प्रेम मृत्यूसारखेच शक्तिशाली आहे. वासना थडग्यासारखी शक्तिमान आहे. त्याच्या ठिणग्या ज्वाला बनतात आणि त्याची खूप मोठी आग होते.
6 - Põe-me como um selo sobre o teu coração, como um selo sobre os teus braços; porque o amor é forte como a morte, a paixão é violenta como o cheol. Suas centelhas são centelhas de fogo, uma chama divina.
7 प्रेमाला पूर नष्ट करु शकत नाही, नद्या प्रेमाला बुडवू शकत नाहीत. जर एखाद्याने आपल्या जवळचे सर्वकाही प्रेमासाठी उधळून दिले तर त्याला बोल लावला जाईल. त्याचा तिरस्कार होईल.
7 As torrentes não poderiam extinguir o amor, nem os rios o poderiam submergir. Se alguém desse toda a riqueza de sua casa em troca do amor, só obteria desprezo.
8 आम्हाला एक लहान बहीण आहे आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. जर एखादा माणूस मला तिच्याशी लग्न करायचे आहे असे सांगत आला तर आम्ही काय करायचे?
8 Temos uma irmã pequenina que não tem ainda os seus seios formados. Que faremos nós de nossa irmã no dia que for pedida {em casamento}?
9 ती जर भिंत असती तर आम्ही तिच्याभोवती चांदीची महिरप उभारली असती. ती जर दार असती तर तिच्या भोवती आम्ही देवदारुची फळी ठेवली असती.
9 Se ela é um muro, construiremos sobre ela ameias de prata. Se é uma porta, fechá-la-emos com batentes de cedro.
10 मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे माझे मनोरे आहेत. आणि तो माझ्या बाबतीत पूर्ण समाधानी आहे.
10 - Ora, eu sou um muro, e meus seios são como torres; por isso sou aos seus olhos uma fonte de alegria.
11 शलमोनचा बाल हामोनला एक द्राक्षाचा मळा होता. त्याने माणसांना मळ्याचे प्रमुख नेमले आणि प्रत्येकाने 1000 शेकेल चांदीच्या मूल्याइतकी द्राक्षे आणली.
11 Salomão tinha uma videira em Baal-Hamon. Confiou-a aos guardas, cada um dos quais devia dar mil siclos de prata pelos frutos colhidos.
12 शलमोना, तू तुझे 1000 शेकेलठेवून प्रत्येकाला त्याने आणलेल्या द्राक्षाच्या मोबदल्यात 200 शेकेल दे. पण मी माझा स्वत:चा द्राक्षाचा मळा मात्र ठेवणार आहे.
12 Eu disponho de minha videira: mil siclos para ti, Salomão! Duzentos para aqueles que velam pela colheita.
13 तू इथे या बागेत बस. मित्र-मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत. मलाही तो ऐकू दे!
13 - Os amigos estão atentos. Ó tu, que habitas nos jardins, faze-me ouvir a tua voz.
14 माझ्या प्रियकरा, तू लवकर चल. मसाल्याच्या पर्वतावरील हरिणासारखा वा तरुण हरिणासारखा हो.
14 - Foge, meu bem-amado, como a gazela ou como o cervozinho sobre os montes perfumados!
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Cânticos 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.