2 Reis 18

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 अहाजचा मुलगा हिज्कीया हा यहूदाचा राजा झाला. एलाचा मुलगा होशे याच्या इस्राएलवरील सत्तेचे तेव्हा तिसरे वर्ष होते.
1 No terceiro ano do reinado de Oséias, filho de Elá, rei de Israel, Ezequias, filho de Acaz, rei de Judá, começou a reinar.
2 हिज्कीया पंचवीस वर्षाचा असताना राज्यावर आला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी.ही जखऱ्याची मुलगी.
2 Ele tinha vinte e cinco anos de idade quando começou a reinar, e reinou vinte e nove anos em Jerusalém. O nome de sua mãe era Abia, filha de Zacarias.
3 आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच हिज्कीयाचे वर्तनही परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते.
3 Ele fez o que o Senhor aprova, tal como tinha feito Davi, seu predecessor.
4 हिज्कीयाने उंचस्थानावरील पुजास्थळे नष्ट करुन टाकली. तसेच स्मृतिस्तंभ, आणि अशेराचे खांबही पाडून टाकले. इस्राएलचे लोक तेव्हा मोशेने केलेल्या पितळी सापापुढे धूप जाळत असत. या पितळी सापाला “नहुश्तान”म्हणत. लोक याची पूजा करत म्हणून हिज्कीयाने त्याचे तुकडे तुकडे केले.
4 Removeu os altares idólatras, quebrou as colunas sagradas e derrubou os postes sagrados. Despedaçou a serpente de bronze que Moisés havia feito, pois até àquela época os israelitas lhe queimavam incenso. Ela era chamada Neustã.
5 इस्राएलचा देव परमेश्वर याच्यावरच हिज्कीयाचा विश्वास होता. हिज्कीयासारखा राजा यहूदात त्याच्या आधी किंवा नंतरही झाला नाही. यहूदात हिज्कीया याच्या कारकिर्दीचा प्रारंभ
5 Ezequias confiava no Senhor, o Deus de Israel. Nunca houve ninguém como ele entre todos os reis de Judá, nem antes nem depois dele.
6 त्याची परमेश्वरावर निष्ठा होती. त्यात त्याने खंड पडू दिला नाही. मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञांचे हिज्कीयाने पालन केले.
6 Ele se apegou ao Senhor e não deixou de segui-lo; obedeceu aos mandamentos que o Senhor tinha dado a Moisés.
7 परमेश्वर हिज्कीयाच्या बाजूचा होता. त्यामुळे त्याने जे जे केले त्यात त्याला यश आले.अश्शूरच्या राजाविरुध्द बंड करुन हज्किीयाने त्याचे मांडलिकत्व नाकारले.
7 E o Senhor estava com ele; era bem sucedido em tudo o que fazia. Rebelou-se contra o rei da Assíria e deixou de submeter-se a ele.
8 थेट गज्जा आणि त्याच्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. लहान खेड्यापासून मोठ्या नगरापर्यंत सर्व पलिष्टी गावे त्याने जिंकली.
8 Desde a torre de sentinela até à cidade fortificada, ele derrotou os filisteus, até Gaza e o seu território.
9 अश्शूरचा राजा शल्मनेसर याने शोमरोनवर हल्ला केला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. हिज्कीयाच्या यहूदावरील सत्तेच्या चौथ्या वर्षी (म्हणजेच एलाचा मुलगा होशे याचे इस्राएलवरच्या अधिपत्याचे सातवे वर्ष असताना) हे झाले.
9 No quarto ano do reinado do rei Ezequias, o sétimo ano do reinado de Oséias, filho de Elá, rei de Israel, Salmaneser, rei da Assíria, marchou contra Samaria e a cercou.
10 तीन वर्षांनी शल्मनेसरने शोमरोन घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. (आणि अर्थातच इस्राएलचा राजा होशे याच्या नवव्या वर्षी) अश्शूरांचा शोमरोनला वेढा
10 Ao fim de três anos, os assírios a tomaram. Assim a cidade foi conquistada no sexto ano do reinado de Ezequias, o nono ano do reinado de Oséias, rei de Israel.
11 अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे, गोजनमधील हाबोर नदीजवळ आणि मेदी नगरांमध्ये ठेवले.
11 O rei assírio deportou os israelitas para a Assíria e os estabeleceu em Hala, em Gozã do rio Tabor e nas cidades dos medos.
12 इस्राएल लोकांनी त्यांच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही, परमेश्वराच्या कराराचा भंग केला. परमेश्वराचा सेवक मोशे याचे करार पाळले नाहीत म्हणून हे सर्व झाले. लोकांनी परमेश्वराचा करार जुमानला नाही, त्याची शिकवण ऐकली नाही.
12 Isto aconteceu porque os israelitas não obedeceram ao Senhor seu Deus, mas violaram a sua aliança: tudo o que Moisés, o servo do Senhor, tinha ordenado. Não o ouviram nem lhe obedeceram.
13 हिज्कीयाच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व मजबूत नगरांवर हल्ला चढवला. सर्व नगरांचा त्याने पाडाव केला.
13 No décimo quarto ano do reinado do rei Ezequias, Senaqueribe, rei da Assíria, atacou todas as cidades fortificadas de Judá e as conquistou.
14 तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला. निरोपात हिज्कीयाने म्हटले, “माझ्या हातून चूक झाली आहे. तुम्हाला हवे ते द्यायला मी तयार आहे. पण माझ्यावर हल्ला करु नये.”यावर अश्शूरच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला अकरा टन चांदी आणि एक टन सोने अशी खंडणी मागितली.
14 Então Ezequias, rei de Judá, enviou esta mensagem ao rei da Assíria, em Láquis: "Cometi um erro. Pára de atacar-me, e eu pagarei tudo que exigires". O rei da Assíria cobrou de Ezequias, rei de Judá, dez toneladas e meia de prata e uma tonelada e cinqüenta quilos de ouro.
15 हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व चांदी बाहेर काढली.
15 Assim, Ezequias lhes deu toda a prata que se encontrou no templo e na tesouraria do palácio real.
16 परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि खांब सोन्याच्या पल्याने मढवले होते ते सर्व काढून हिज्कीयाने घेतले आणि हे सोने अश्शूरच्या राजाला दिले.
16 Nessa ocasião Ezequias, rei de Judá, retirou o ouro com que havia coberto as portas e batentes do templo do Senhor, e o deu ao rei da Assíria.
17 अश्शूरच्या राजाने मोठ्या सैन्यासोबत आपले तीन महत्वाचे सेनापती यरुशलेममध्ये राजा हिज्कीयाकडे पाठवले. तेव्हा ते लाखीश येथून यरुशलेमला निघाले. वरच्या तलावाच्या पाटापाशी ते उभे राहिले. (परिटाच्या शेताकडे जो रस्ता जातो त्या वाटेवर हा वरचा तलाव आहे)
17 De Láquis o rei da Assíria enviou ao rei Ezequias, em Jerusalém, seu general, seu oficial principal e seu comandante de campo com um grande exército. Eles subiram a Jerusalém e pararam no aqueduto do açude superior, na estrada que leva ao campo do Lavandeiro.
18 तेथून त्यांनी राजाला निरोप पाठवला. राजाचा खानगीकडील कारभारी एल्याकिम (हा हिल्कीयाचा मुलगा) चिटणीस शेबना आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटायला तेव्हा पुढे आले.
18 Eles chamaram pelo rei; e o administrador do palácio, Eliaquim, filho de Hilquias, o secretário Sebna e o arquivista real Joá, filho de Asafe, foram ao seu encontro.
19 तेव्हा एक सेनापती त्यांना म्हणाला, “अश्शूरचा महान राजा काय म्हणतो ते हिज्कीयाला सांगा:तू कशाचा भरवंसा धरतो आहेस?
19 O comandante de campo lhes disse: "Digam isto a Ezequias: Assim diz o grande rei, o rei da Assíria: Em que você baseia sua confiança?
20 तुझ्या तोंडचे शब्द पोकळ, अर्थहीन आहेत. तू म्हणालास, “लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य माझ्याजवळ आहे.” पण माझ्यापासून फुटून निघाल्यापासून तुला कोणाचा आधार आहे?
20 Você pensa que meras palavras já são estratégia e poderio militar. Em quem você está confiando para se rebelar contra mim?
21 काठी म्हणून तू ज्याच्यावर रेलला आहेस तो तर मोडका बांबू आहे. ही काठी म्हणजे मिसर. माणूस अशा काठीवर विसंबून राहिला तर ती मोडून पडेल हातात रुतेल आणि क्लेश देईल लोक विश्वास ठेवतात तो मिसरचा राजा हा असा आहे.
21 Você está confiando no Egito, aquele caniço quebrado, que espeta e perfura a mão do homem que nele se apóia! Assim o faraó, rei do Egito, retribui a quem confia nele.
22 तू कदाचित् असे म्हणशील, “आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो.” पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचावरील पूजास्थळे आणि वेदी काढून टाकल्या आणि “फक्त यरुशलेममधील वेदीपुढेच आराधना करावी” असे यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना सांगितले हे मला माहीत आहे.
22 Mas, se vocês me disserem: "Estamos confiando no Senhor nosso Deus"; não é ele aquele cujos santuários e altares Ezequias removeu, dizendo a Judá e Jerusalém: "Vocês devem adorar diante deste altar em Jerusalém? "
23 आता माझा स्वामी अश्शूराचा राजा याच्याशी हा करार कर. तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर मी तुला दोन हजार घोडे द्यायचे कबूल करतो.
23 Aceite, pois, agora, o desafio do meu senhor, o rei da Assíria: Eu lhe darei dois mil cavalos; se você tiver cavaleiros para eles!
24 माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार नाहीस. रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.
24 Como você pode derrotar o mais insignificante guerreiro do meu senhor? Você confia no Egito para lhe dar carros de guerra e cavaleiros?
25 मी यरुशलेमचा संहार करायला चाल करुन आलोय तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय नव्हे. परमेश्वरा मला म्हणाला, “या देशावर स्वारी करुन त्याचा पूर्ण पाडाव कर.”
25 Além disso, será que vim atacar e destruir este local sem uma palavra da parte do Senhor? O próprio Senhor me disse que marchasse contra este país e o destruísse".
26 तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “आमच्याशी तू कृपया अरामी भाषेत बोल. आम्हाला ती भाषा कळते. यहूदी भाषेत बोलू नको. कारण नाही तर तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”
26 Então Eliaquim, filho de Hilquias, Sebna e Joá disseram ao comandante de campo: "Por favor, fala com teus servos em aramaico, porque entendemos essa língua. Não fales em hebraico, pois assim o povo que está sobre os muros entenderá".
27 पण रब-शाके त्यांना म्हणाला, “परमेश्वराने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वत:चे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.”
27 O comandante, porém, respondeu: "Será que meu senhor enviou-me para dizer essas coisas, somente para o seu senhor e para você e não para os que estão sentados no muro, que, como vocês, terão de comer as próprias fezes e beber a própria urina? "
28 मग रबशाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूरचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका
28 Então o comandante levantou-se e gritou em hebraico: "Ouçam a palavra do grande rei, o rei da Assíria!
29 राजाचे म्हणणे आहे, ‘हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हाला वाचवू शकणार नाही.’
29 Assim diz o rei: Não deixem que Ezequias os engane. Ele não poderá livrá-los de minha mão.
30 तो म्हणतो तसे परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हाला सांगतो, ‘परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूरचा राजा आपल्या शहराजा पराभव करु शकणार नाही.’
30 Não deixem Ezequias convencê-los a confiar no Senhor, quando diz: ‘Com certeza o Senhor nos livrará; esta cidade não será entregue nas mãos do rei da Assíria’.
31 पण हिज्कीयाचे ऐकू नका.“कारण अश्शूरचा राजा म्हणतो ‘माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हाला खायला मिळतील. स्वत:च्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल.
31 Não dêem ouvidos a Ezequias. Assim diz o rei da Assíria: Façam paz comigo e rendam-se. Então cada um de vocês comerá de sua própria videira e de sua própria figueira e beberá água de sua própria cisterna,
32 तुमच्या भूमीसारख्याच दुसऱ्या भूमीत मी तुम्हाला घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे ह्दयपरिवर्तन करु पाहात आहे. ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.
32 até que eu venha e os leve para uma terra igual à de vocês, terra de cereais, de vinho, terra de pão e de vinhas, terra de oliveiras e de mel. Escolham a vida e não a morte! Não dêem ouvidos a Ezequias, pois ele os está iludindo, quando diz: ‘O Senhor nos livrará’.
33 इतर दैवतांनी आपले देश अश्शूरच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.
33 Será que o deus de alguma nação conseguiu livrar sua terra das mãos do rei da Assíria?
34 कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवतं? सफरवाईम, हेना, इळ्व यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का? नाही.
34 Onde estão os deuses de Hamate e de Arpade? Onde estão os deuses de Sefarvaim, Hena e Iva? Acaso livraram Samaria das minhas mãos?
35 इतर राष्ट्रांच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याहातून परमेश्वर यरुशलेम वाचवणार का? नाही.”
35 Qual dentre todos os deuses dessas nações conseguiu livrar sua terra do meu poder? Como então o Senhor poderá livrar Jerusalém das minhas mãos? "
36 पण लोक गप्पच होते. ते सेनापातीला काहीही बोलले नाहीत. कारण “त्यांनी काहीही उत्तर द्याचये नाही” अशी राजा हिज्कीयाची त्यांना आज्ञा होती.
36 Mas o povo permaneceu calado e nada disse em resposta, pois o rei tinha ordenado: "Não lhe respondam".
37 हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम (एल्याकीम राजवाड्याचा कारभारी होता) चिटणीस शेबना आणि असाफचा मुलगा यवाह (हा नोंदी करणारा होता.) हिज्कीयाकडे आले. शोकाकुल होऊन त्यांनी वस्त्रे फाडली होती. अश्शूरचा सेनापती काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.
37 Então o administrador do palácio, Eliaquim, filho de Hilquias, o secretário Sebna e o arquivista real Joá, filho de Asafe, retornaram com as vestes rasgadas a Ezequias e lhe relataram o que o comandante de campo tinha dito.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 18, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.