2 Crônicas 29

Marathi Bible (GL_MARATHI) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची मुलगी.
1 Ezequias tinha vinte e cinco anos de idade quando começou a reinar, e reinou vinte e nove anos em Jerusalém. O nome de sua mãe era Abia, filha de Zacarias.
2 हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे.
2 Ele fez o que o Senhor aprova, tal como tinha feito Davi, seu predecessor.
3 हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करुन ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले.
3 No primeiro mês do primeiro ano de seu reinado, ele reabriu as portas do templo do Senhor e as consertou.
4 सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका, देवाच्या सेवेसाठी शुचिर्भूत व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांनी मानलेला देव आहे. ज्या वस्तूं इथल्या नाहीत त्या इथून काढून टाका. त्या वस्तू म्हणजे घाणा असून त्या हे पवित्र मंदिर भ्रष्ट करतात.
4 Convocou os sacerdotes e os levitas, reuniu-os na praça que fica no lado leste
5 आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली.
5 e disse: "Escutem-me, levitas! Consagrem-se agora e consagrem o templo do Senhor, o Deus dos seus antepassados. Retirem tudo o que é impuro do santuário.
6 त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले.
6 Nossos pais foram infiéis; fizeram o que o Senhor, o nosso Deus, reprova e o abandonaram. Desviaram o rosto do local da habitação do Senhor e deram-lhe as costas.
7 म्हणून यहूदा यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांना शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हांला माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात.
7 Também fecharam as portas do pórtico e apagaram as lâmpadas. Não queimaram incenso nem apresentaram holocausto no santuário para o Deus de Israel.
8 म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपली बायका पोरे कैदी झाली.
8 Por isso, a ira do Senhor caiu sobre Judá e sobre Jerusalém; e ele fez deles objeto de espanto, horror e zombaria, conforme vocês podem ver com os seus próprios olhos.
9 म्हणून मी, हा हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही.
9 Por isso os nossos pais caíram à espada e os nossos filhos, as nossas filhas e as nossas mulheres foram levadas como prisioneiras.
10 तेव्हा मुलांनो, आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हाला त्याने निवडले आहे.”
10 Pretendo, pois, agora fazer uma aliança com o Senhor, o Deus de Israel, para que o fogo da sua ira se afaste de nós.
11 तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढीलप्रमाणे: कहाथ घराण्यातले अमासयचा मुलगा महथ आणि अजऱ्याचा मुलगा योएल. मरारी कुळातला अब्दीचा मुलगा कीश आणि यहल्लेलेलाचा मुलगा अजऱ्या.गर्षोनी कुळातला जिम्माचा मुलगा यवाह आणि यवाहचा मुलगा एदेन, अलीसाफानच्या घराण्यातील शिम्री आणि ईएल आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मत्तन्या. हेमानच्या कुळातील यहीएल आणि शिमी,येदुथूनच्या कुळातील शमया आणि उज्जियेल.
11 Meus filhos, não sejam negligentes agora, pois o Senhor os escolheu para estarem diante dele e o servirem, para ministrarem perante ele e queimarem incenso".
12 मग या लेवींनी आपल्या भाऊबंदांसह एकत्र येऊन मंदिराच्या शुध्दतेसाठी सर्व तयारी केली. परमेश्वराने राजामार्फत केलेली आज्ञा त्यांनी पाळली. मंदिराच्या स्वच्छतेसाठी ते आत शिरले.
12 Então estes levitas puseram-se a trabalhar: dentre os descendentes de Coate: Maate, filho de Amasai, e Joel, filho de Azarias; dentre os descendentes de Merari: Quis, filho de Abdi, e Azarias, filho de Jealelel; dentre os descendentes de Gérson: Joá, filho de Zima, e Éden, filho de Joá;
13 परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुध्द आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करुन त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तिथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या.
13 dentre os descendentes de Elisafã: Sinri e Jeuel; dentre os descendentes de Asafe: Zacarias e Matanias;
14 पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवींनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. आठव्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुध्दता होऊन ते पवित्र व्हायला आणखी आठ दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले.
14 dentre os descendentes de Hemã: Jeuel e Simei; dentre os descendentes de Jedutum: Semaías e Uziel.
15 त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, “परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि तीवरील सर्व भांडी आम्ही शुध्द केल्या आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुध्द केली आहेत.
15 Tendo reunido e consagrado os seus parentes, os levitas foram purificar o templo do Senhor, conforme o rei havia ordenado em obediência à palavra do Senhor.
16 राजा आहाजने आपल्या कारकिर्दीत गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुध्दी करुन आम्ही ती मांडली आहेत. ती आता देवाच्या वेदीसमोरच आहेत.”
16 Os sacerdotes entraram no santuário do Senhor para purificá-lo e trouxeram para o pátio do templo do Senhor todas as coisas impuras que lá havia, e os levitas as levaram para o vale de Cedrom.
17 दुसऱ्या दिवशी सकाळी, नगरातील सर्वा सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला.
17 Começaram a consagração no dia primeiro do primeiro mês, e no oitavo dia chegaram ao pórtico do Senhor. Durante mais oito dias consagraram o templo do Senhor propriamente dito, terminando tudo no dia dezesseis.
18 त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्र स्थान आणि यहूदीलोक यांच्या शुध्दीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली.
18 Depois foram falar com o rei Ezequias e lhe relataram: "Purificamos todo o templo do Senhor, o altar dos holocaustos e a mesa do pão consagrado, ambos com todos seus utensílios.
19 त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.
19 Preparamos e consagramos todos os utensílios que o rei Acaz, em sua infidelidade, retirou durante o seu reinado. Eles estão em frente do altar do Senhor".
20 यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले. बोकडांचे रक्त वेदीवर शिंपडून याजकांनी पापार्पण केले. परमेश्वराने इस्राएल लोकांना क्षमा करावी म्हणून हे विधी याजकांनी केले. सामस्त इस्राएल लोकांसाठी होमार्पण आणि पापार्पण करावे अशी राजाची आज्ञा होती.
20 Cedo, na manhã seguinte, o rei Ezequias reuniu os líderes da cidade e, juntos, subiram ao templo do Senhor,
21 दावीद, राजाचा द्रष्टा गाद आणि संदेष्टा नाथान यांच्या आज्ञेबरहुकूम राजा हिज्कीयाने झांजा, सतारी व वीणा वाजवण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात लेवींची नेमणूक केली. परमेश्वराने संदेष्ट्यांमार्फत तशी आज्ञा केली होती.
21 levando sete novilhos, sete carneiros, sete cordeiros e sete bodes como oferta pelo pecado, em favor da realeza, do santuário e de Judá. O rei ordenou que os sacerdotes, descendentes de Arão, sacrificassem os animais no altar do Senhor.
22 त्या प्रमाणे दावीदाची वाद्ये घेऊन लेवी आणि कर्णे घेऊन याजक उभे राहिले
22 Então os sacerdotes abateram os novilhos e aspergiram o sangue sobre o altar; em seguida fizeram o mesmo com os carneiros e com os cordeiros.
23 मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण करण्याची आज्ञाकेली. त्याला सुरुवात होताच परमेश्वराचे भजन स्तवनही सुरु झाले. कर्णे आणि इस्राएलचा राजा दावीद याची वाद्ये यांचा गजर सुरु झाला.
23 Depois, os bodes para a oferta pelo pecado foram levados para diante do rei e da assembléia, que impuseram as mãos sobre eles.
24 होमार्पण चालू असेपर्यंत समुदाय अभिवादन करत होता. गायक गात होते आणि कर्णे वाजवणे चालू होते.
24 Os sacerdotes abateram os bodes e apresentaram o sangue sobre o altar como oferta pelo pecado, para fazer propiciação por todo o Israel, pois era em favor de todo o Israel que o rei havia ordenado o holocausto e a oferta pelo pecado.
25 होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासकट सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली.
25 O rei posicionou os levitas no templo do Senhor, com címbalos, liras e harpas, segundo a prescrição de Davi, de Gade, vidente do rei, e do profeta Natã; isso foi ordenado pelo Senhor, por meio de seus profetas.
26 हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यानी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदित झाले. सर्वांनी लवून नमस्कार करुन देवाची आराधना केली.
26 Assim os levitas ficaram em pé, preparados com os instrumentos de Davi, e os sacerdotes com as cornetas.
27 हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वत:ला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी होमार्पणेही आणली.
27 Então Ezequias ordenou que sacrificassem o holocausto sobre o altar. Iniciado o sacrifício, começou também o canto ao Senhor, ao som das cornetas e dos instrumentos de Davi, rei de Israel.
28 मंदिरात एकंदर होमार्पणे आणली गेली त्याची मोजदाद पुढीलप्रमाणे: सत्तर बैल, शंभर मेंढे, दोनशे कोकरे. त्यांचे परमेश्वराला होमार्पण करण्यात आले.
28 Toda a assembléia prostrou-se em adoração, enquanto os músicos cantavam e os corneteiros tocavam, até que terminou o holocausto.
29 सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमंढरे हे परमेश्वराला वाहिलेले पशू.
29 Então o rei e todos os presentes ajoelharam-se e adoraram.
30 होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. या पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते.
30 O rei Ezequias e seus oficiais ordenaram aos levitas que louvassem o Senhor com as palavras de Davi e do vidente Asafe. Eles louvaram com alegria, depois inclinaram suas cabeças e adoraram.
31 होमबली पुष्कळ होते. शांतिअर्पणांच्या पशूंची चरबी आणि पेयार्पणेही विपुल होती.
31 Disse então Ezequias: "Agora que vocês se dedicaram ao Senhor, tragam sacrifícios e ofertas de gratidão ao templo do Senhor". Assim, a comunidade levou sacrifícios e ofertas de gratidão, e alguns, espontaneamente, levaram também holocaustos.
32 परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिज्कीया आणि सगळे लोक आनंदित झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला.
32 Esses holocaustos que a assembléia ofertou ao Senhor foram setenta bois, cem carneiros e duzentos cordeiros.
33 — ausente —
33 Os animais consagrados como sacrifícios chegaram a seiscentos bois e três mil ovelhas e bodes.
34 — ausente —
34 Como os sacerdotes eram muito poucos para tirar a pele de todos os holocaustos, os seus parentes, os levitas, os ajudaram até o fim da tarefa e até que outros sacerdotes se consagrassem, pois os levitas demoraram menos para se consagrarem do que os sacerdotes.
35 — ausente —
35 Houve holocaustos em grande quantidade, oferecidos com a gordura das ofertas de comunhão e com as ofertas derramadas que acompanhavam esses holocaustos. Assim foi restabelecido o culto no templo do Senhor.
36 — ausente —
36 Ezequias e todo o povo regozijavam-se com o que Deus havia feito por seu povo, e tudo em tão pouco tempo.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 29, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.