2 Crônicas 17
Marathi Bible (GL_MARATHI) vs NVI
NVI Nova Versão Internacional
1 आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा मुलगा. इस्राएलला तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटने यहूदाचे बळ वाढवले.
1 Josafá, filho de Asa, foi o seu sucessor e fortaleceu-se contra Israel.
2 त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या. आसाने काबीज केलेल्या एफ्राइमच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने ठाणी बसवली.
2 Posicionou tropas em todas as cidades fortificadas de Judá e pôs guarnições em Judá e nas cidades de Efraim que seu pai, Asa, tinha conquistado.
3 यहोशाफाटला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. ते बाल देवतेच्या भजनी लागला नाही.
3 O Senhor esteve com Josafá porque, em seus primeiros anos, ele andou nos caminhos que seu pai Davi tinha seguido. Não consultou os baalins,
4 आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या. इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही.
4 mas buscou o Deus de seu pai e obedeceu aos seus mandamentos, e não imitou as práticas de Israel.
5 परमेश्वारने यहोशाफाटला यहूदाचा खंबीर राजा केले. यहूदा लोकांनी यहोशाफाटसाठी नजराणे आणले त्यामुळे त्याला धन तसेच मानसन्मान मिळाला.
5 O Senhor firmou o reino de Josafá, e todo o Judá lhe trazia presentes, de maneira que teve grande riqueza e honra.
6 परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्च स्थाने आणि अशेरा देवीचे खांब त्याने काढून टाकले.
6 Ele seguiu corajosamente os caminhos do Senhor; além disso, retirou de Judá os altares idólatras e os postes sagrados.
7 आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून लोकांना शिकवण द्यायला पाठवले. बेन - हईक, ओबद्या, जखऱ्या, नखनेल आणि मीखाया हे ते सरदार होत.
7 No terceiro ano de seu reinado, ele enviou seus oficiais Bene-Hail, Obadias, Zacarias, Natanael e Micaías para ensinarem nas cidades de Judá.
8 त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असायेल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवींचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले.
8 Com eles foram os levitas Semaías, Netanias, Zebadias, Asael, Semiramote, Jônatas, Adonias, Tobias, Tobe-Adonias e os sacerdotes Elisama e Jeorão.
9 हे सरदार, लेवी आणि याजक या सर्वांनी लोकांना शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातल्या गावोगावी जाऊन ते लोकांना शिकवत गेले.
9 Eles percorreram todas as cidades do reino de Judá, levando consigo o Livro da Lei do Senhor e ensinando o povo.
10 यहूदाच्या आसपासच्या देशांनी परमेश्वराची धास्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी यहोशाफाटवर स्वारी करुन युध्दाला तोंड फोडले नाही.
10 O temor do Senhor caiu sobre todos os reinos ao redor de Judá, de forma que não entraram em guerra contra Josafá.
11 काही पलिष्टे यहोशाफाटसाठी भेटी आणत. या राजाचे वर्चस्व ते जाणून असल्यामुळे रुपेही आणत. काही अरबी शेळ्या-मेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे 7,700 मेंढे आणि 7,700 बोकड त्याला दिले.
11 Alguns filisteus levaram presentes a Josafá, além da prata que lhe deram como tributo, e os árabes levaram-lhe rebanhos: sete mil e setecentos carneiros e sete mil e setecentos bodes.
12 यहोशाफाटचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारे बांधली.
12 Josafá foi se tornando cada vez mais poderoso; construiu fortalezas e cidades-armazéns em Judá,
13 या कोठारांच्या गावामध्ये त्याने भरपूर साठा केला. यरुशलेममध्ये यहोशाफाटने चांगली लढाऊ माणसेही ठेवली.
13 onde guardava enorme quantidade de suprimentos. Também mantinha em Jerusalém homens de combate experientes.
14 आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे: यहूदातील सरदार असे: अदना हा 3,00,000 सैनिकांचा सेनापती होता.
14 A lista desses homens, por famílias, era a seguinte: De Judá, líderes de batalhões de 1. 000: o líder Adna, com 300. 000 homens de combate;
15 यहोहानानच्या हाताखाली 280,000 सैनिक होते.
15 em seguida, o líder Joanã, com 280. 000;
16 जिख्रीचा मुलगा अमस्या हा त्या खालोखाल 2,00,000 जणांचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.
16 depois, Amasias, filho de Zicri, que se apresentou voluntariamente para o serviço do Senhor, com 200. 000.
17 बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत 2,00,000 सैनिक धनुष्यबाण आणि ढाली वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.
17 De Benjamim: Eliada, um guerreiro valente, com 200. 000 homens armados com arcos e escudos;
18 यहोजाबादकडे युध्दसज्ज असे 1,80,000 जण होते.
18 Jeozabade, com 180. 000 homens armados para a batalha.
19 ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. या खेेरीज यहूदाभरच्या नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.
19 Esses eram os homens que serviam o rei, além dos que estavam posicionados nas cidades fortificadas em todo o Judá.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Crônicas 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.